आयुष दर्पण या आरोग्य विषयक मासिकाने महाराष्ट्रातील काही निवडक जिल्हे निवडून त्यांत स्त्री भ्रूण हत्या विरोधी प्रचार तथा प्रसार मोहिं आखली आहे . असे करणारे हे पहिलेच आरोग्य विषयक मासिक असून महाराष्ट्रातील तथा भारत्तातिल कमी होणारी मुलींची संख्या सामाजिक चिंतेचा विषय होंयाधिच कार्यवाही सुरु केलि आहे . मासिकाच्या शेवटच्या पानावर दर तिन महिन्यानंतर एक तक्रार अर्ज पथावंयत येणार असून ते अर्ज त्या त्या जिल्ह्याच्या तत्सम अधिकार्यांजवल पठाविंयत येतील. तसेच डॉक्टर , नर्से यांचे राच्केट भन्दा फोड़ कर्नार्यास योग्य बक्षिस देण्यात येणार आहे . बर्याच जिल्ह्यात हे काम PRO म्हणजे public relation operator मार्फ़त चलत असल्याचे धक्कादायक रित्या सामोरे आले आहे . असे जले जलगाँव , अकोल, बुल्धाना जिल्ह्यता पसरलेले असून त्याची योग्य दखल मात्र कुणीही घेत नहीं . महिला राष्ट्रपति , महिला लोकसभा अध्यक्ष असलेल्या आपल्या भारत देशात असे लाजिर्वाने उपक्रम लोक मुलीचा गर्भा हत्या करून करत आहेत . जलगाँव जिल्ह्यात तर मध्यप्रदेश , पुणे ,मुंबई येथील रुग्नाचे देखिल गर्भा पट घडवून आनले जातात . बेकायदेशीर कार्य कायद्याच्या मार्गाने केले जात आहे. अधिकार्यांची दिशाभूल तथा भ्रष्टाचार या मार्गाने हे कार्य चालू आहे . our mission http://www.facebook.com/pages/Save-Female-Child-And-Stop-Female-Infanticide/141299499232466
हा ब्लॉग मराठी लोकांसाठी असून, याची निर्मिती तथा संपादन आयुष दर्पण या स्वास्थ पत्रिका द्वारे केले जाते . आमचा उद्देश सामाजिक माहिती पोहोचविने असून आम्ही त्या साठीच कार्यरत आहोत . www.ayushdarpan.org
Saturday, October 16, 2010
आयुष दर्पण चा स्त्री भ्रूण हत्या विरोधी जन जागरण प्रचार
Labels:
सामाजिक
Subscribe to:
Post Comments (Atom)
see www.ayushdarpan.com
ReplyDeletefor more information
MAHARISHI WELL SAID !
ReplyDeleteI AM REPORTER TELL ME THE CENTER IN AKOLA AND BULDHANA... I WILL PUT THIS IN PAPPER
atuldmulatkar@gmail.com
ATUL SIR
sundar mahiti aahe
ReplyDeleteIts really horrible condition....
ReplyDeleteजळगावात होते मुलींची आयात
ReplyDeleteलेवा पाटील समाज हा जळगाव जिल्ह्यातला सधन समाज. हुंड्याचं प्रस्थ 'बाय-बाय' मध्ये, म्हणजे जेवढे तोळे सोनं तेवढे हजार हुंडा. साहजिकच मुलीचा जन्म म्हणजे बापाला घोर. गेल्या पंधरा-वीस वर्षांत या समाजातलं मुलींचं प्रमाण एवढं घसरलं की अल्पश्क्षिित व शेती करणाऱ्या मुलांना लग्नासाठी शोधूनही मुली मिळत नाहीत. त्यावर उपाय म्हणून नागपूरकडून आदिवासी समाजातल्या मुली आणून स्वखर्चाने लग्न लावलं जातं. पुष्कळदा मुलीच्या वडिलांना पैसेही दिले जातात. सामाजिक अभिसरण अशा अपरिहार्यतेमधून यावं यापेक्षा काळाने उगवलेला वेगळा सूड काय असू शकेल?
from
Maharashtra times
http://www.facebook.com/pages/Save-Female-Child-And-Stop-Female-Infanticide/141299499232466
ReplyDeletesome pages
http://www.ayushdarpan.com/mission.htm
http://onlinenews1.lokmat.com/php/detailednews.php?id=JalgaonEdition-13-1-07-12-2010-b89cb&ndate=2010-12-07&editionname=jalgaon
ReplyDeleteविलास बारी
जळगाव,दि.२- पंजाब, राजस्थान, गुजराथ आणि मध्यप्रदेशमार्गे जळगाव जिल्ह्यात स्थिरावलेला व त्यांच्यापैकी काही विदर्भ तसेच बुलढाणा जिल्ह्यात वसलेल्या लेवापाटीदार समाजात आज अल्पशिक्षीत किवा शेतकरी मुलाचे लग्न करणे म्हणजे दिव्यकर्म आहे. एकतर मुलींची घटलेली संख्या आणि आहे त्या मुलींमध्ये वाढलेले शिक्षणाचे प्रमाण, त्यामुळे वाढलेली करियरची महत्वाकांक्षा, शहरी राहणीमान यामुळे शेतकरी व अल्पशिक्षित तरूण मुलींना नको असतो. यामुळे लेवा समाजातील अल्पशिक्षीत युवकांचे भविष्य अंधकारमय दिसत आहे.
१९ व्या शतकापासून
धरली शिक्षणाची आस
शेती हा प्रमुख व्यवसाय असणाऱ्या लेवापाटीदार समाजाने १९ व्या शतकापासूनच शिक्षणाची आस धरली. मुख्यत: डॉक्टर, इंजिनिअर अशा व्यावसायिक शिक्षणाला या समाजाने प्राधान्य दिले आहे. आज लेवा पाटीदार समाजातील घराघरात पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेतलेली पिढीच्या पिढी आहे. यात मुलीसुद्धा मागे नाहीत.
इंग्लंड, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि आखाती देशात शेकडो लेवापाटीदार तरूण - तरूणी चांगल्या हुद्यावर काम करीत आहेत.
हुंडापद्धती ठरली मुलींसाठी मारक
लेवापाटीदार समाजामध्ये असणारी हुंडापद्धतीमुळे आजही अनेक समस्यांना या समाजातील तरुणांना सामोरे जावे लागत आहे. कष्टाळू आणि मेहनती असणारा हा समाज ज्याठिकाणी स्थिरावला त्याठिकाणी त्यांनी गडगंज संपत्ती मिळविली. मुलीच्या सुखासाठी आणि ऐश्वर्यासाठी पालकांकडून चांगल्या स्थळासाठी हुंडा देण्यात येऊ लागला. बाय-बायची पद्धतीने हा समाज बदनामसुद्धा झाला. सामान्यांच्या आवाक्याबाहेर मुलींचे लग्न गेले. यामुळे मुलीचे लग्न कसे करावे या भितीने धास्तावल्याने या समाजात स्त्रीभ्रूण हत्या वाढली आणि मुलगा व मुलगी यांच्या जन्मदरात आपोआप तफावत निर्माण झाली.
तरुणींनी घेतली शिक्षणात आघाडी
घरी गडगंज संपत्ती असल्याने समाजातील अनेक तरुणांनी शिक्षणाकडे पाठ फिरविली. त्यातच मुलीला चांगले शिक्षण दिले, तिला स्वत:च्या पायावर उभे केल्यास हुंडा कमी होऊन तिचे भविष्य उज्ज्वल होते हा पालकांमध्ये सकारात्मक बदल झाल्याने लेवा पाटीदार समाजातील मुलांच्या तुलनेत मुलींनी शिक्षणात आघाडी घेतली. आज या समाजात पदवीधर नाहीत अशा मुली मोजक्याच सापडतील.
दुसरीकडे दहावीत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेले अनेक तरुण व्यसनाधिनता आणि संगतगुणांमुळे पुढील शिक्षणात आपोआप मागे पडत गेले.येथूनच खऱ्या अर्थाने विवाहविषयक समस्या सुरू झाली.
महत्त्वाकांक्षेमुळे तरुणांची पंचाईत
शिक्षणामुळे स्वत:च्या पायावर उभे राहिलेल्या किवा तशी क्षमता राखणाऱ्या मुलींचा आत्मविश्वास वाढला. त्या स्वतंत्रपणे विचार मांडू लागल्या. नोकरी, कारकिर्द करण्याची त्यांची महत्वाकांक्षा वाढली आहे. त्यामुळे भावी पती व त्याच्या कुटुंबीयांबाबत मुलींच्या अपेक्षा वाढल्या आहेत. शिवाय शहरात किवा मुंबई, पुणे, नाशिकसारख्या महानगरात स्थिरावलेल्या कुटुंबातील मुली महानगराबाहेरच्या मुलांसोबत संसार थाटण्यास तयार नाहीत. ग्रामीण भागात जाण्यास तर कुणाचीच तयारी नाही. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे शिक्षणामुळे या समाजातील युवापिढीच्या विचारातही खुलेपणा आला. त्यामुळे इतर समाजातील मुला-मुलीसोबत प्रेमविवाहांचेसुद्धा प्रमाण पूर्वीच्या तुलनेत वाढले आहे आणि त्याला कुणाचा फारसा आक्षेपही नाही. या साऱ्यामुळे अल्पशिक्षित आणि शेतकरी तरुणांचे लग्न हे त्यांच्या आई-वडिलांसाठी दिव्य होऊन बसले आहे.
दुसरीकडे मुलींच्या घटलेल्या संख्येने अल्पशिक्षीत मुलींचे पालकसुद्धा पाहिजे तसे स्थळ आल्याशिवाय सोयरीक करण्यास तयार नसतात. मध्यंतरीच्या काळात तर विदर्भातील इतर समाजातील मुलींसोबत या समाजातील मुलांची लग्ने लावण्यात आली पण त्यात फसवणूक किवा वाईट अनुभव आल्याने आता हे प्रमाण कमी झाले आहे. यामुळेपरिस्थिती अशी पालटली आहे की अल्पशिक्षीत किवा शेतकरी मुले मागणी घालत असले तरी मुलींचे पालक नकार देऊ लागले आहेत आणि हुंडा वगैरे काहीच मिळणार नाही उलट लग्नाचा सर्व खर्च तुम्हाला करावा लागेल अशी मुलाकडच्यांना अट टाकू लागले आहे.
कच्छ भागात सोयरिक संबंधांसाठी हालचाली
लेवापाटीदार समाज हा गुजरात राज्यातील कच्छ भागातील मूळ रहिवासी आहे. गुजराथी भाषेचा सर्वाधिक प्रभाव असणाऱ्या या समाजाने पावागड भागातील समाजबांधवांसोबत सोयरिक संबंध निर्माण करावे असा सूर गेल्या आठवड्यात झालेल्या वधू-वर परिचय मेळाव्यात निघाला होता. यामुळे विदर्भ, मध्यप्रदेश या भागातील आदिवासी मुलींकडून होणारी फसवणूकदेखील टाळता येईल असे मत यावेळी मांडण्यात आले
i have a play which deals with this topic, it performed 150 shows on marathi stage & 100 shows on gujrati stage...
ReplyDeleteif it helps your movement, you too can perform ...