चेहरयावरील सुरकुत्या
त्वचेवर सुरकुत्या येउ लागल्यास आपले शरीर वृध्दत्वाकडे झुकु लागले आहे याची जाणीव होऊ लागते. त्यामुळे सुरकुतलेल्या त्वचेबद्दल सर्वांच्या मनात एक प्रकारची भिती असते. चाळिसीच्या आसपासच्या स्त्रिया आपल्या चेहरयावरील सुरुकुत्या लपविण्याचा आटोकाट प्रयत्न करताना दिसतात. आपण जास्तीत जास्त काळ चांगले दिसावे अशी सुप्त इच्छा त्यामागे असते. त्यासाठी ब्युटिपार्लरच्या चकरा, वारंवार फेशीयल करणे, जाहीरातीमध्ये दाखविण्यात येणारी विविध महागडी क्रिम्स वापरणे इत्यादी उपाय केले जातात. वयाच्या एका ठरावीक मर्यादेनंतर सुरकूत्या पडू लागणे ही नैसर्गिक प्रक्रिया मानली जाते. परंतु वय कमी असताना सुरकुत्या पडणे हे आरोग्यामध्ये बिघाड दर्शिवणारे आहे. शरीरामध्ये रुक्षता किंवा कोरडेपणा वाढणे हे सुरकुत्या पडण्याचे एक कारण होय. चेहरयावरील त्वचा मुळात नाजुक असल्याने वयाचा किंवा कोणत्याही आजाराचा चेहरयावर लगेच बदल जाणवतो, कोरडेपणा वाढला की त्वचा आकसल्यासारखी होते . एरवी आपण पाहतो की भाज्या किंवा फळे बाहेर हवेत तशीच राहिली की त्यातील रस किंवा ओलावा कमी होउन ते वाळतात व लगेच सुरकुततात. संत्री , चिक्कु, आंबा किंवा सफरचंद यासारखया फळामध्ये आपण हा बदल अनुभवू शकतो. तसेच काहीसे त्वचेचे होते, त्वचेमधील स्निग्धताच कमी झाल्याच हा परिणाम असतो. कारण काहीही असली तरी चेहरयावरील सुरकुत्यामुळे सौंदर्यात बाधा येते, हे निश्चित. मग यासाठी आपल्याला काय करता येईल ते आपण बघु या.* यामध्ये आयुर्वेदातील रसायन चिकित्सा ही अत्यंत फलदायी आहे. रसायन याचा अर्थ पेशींचे पुनर्जीवन करणारी चिकित्सा होय. आपल्या रोजच्या आहारात काही पदार्थ उत्तम रसायन गूण देणारे असतात. जसे दूध, तूप, मध आणि आवळा, फळे इत्यादी पदार्थ प्रत्येकाला सहज पणे मिळतील असे आहेत. आवळा आपण मोरावळा किंवा च्यवनप्राश या स्वरुपा मध्ये वर्षभर घेऊ शकतो. आपल्या प्रकृतीनुसार वैद्यकीय सल्ल्याने आपण रसायन विधी सेवन करावा.
* बाह्य उपचारामध्ये सर्वांगाला अभ्यंग म्हणजे मसाज हा अत्यंत महत्वाचा उपचार होय. मसाज केल्याने त्वचा व स्नायू यांना बळ मिळते. त्वचेचा नॅचरल टोन टिकून राहतो. त्वचेचे झिजलेले थर निघुन जातात व नवीन तजेलदार सूंदर मुलायम त्वचा प्राप्त होते. मालिशकरिता तीळ तेल, कुंकुमादी तेल, बदाम तेल इत्यादी तेल प्रकृतीनूसार वापरावे.
* चेहरयाला मसाजसोबत काही विशिष्ट वनौषधींचे लेप लावल्याने देखील फायदा होतो. हे लेप ठरावीक वेळेस व ठरावीक जाडीचे लावायला हवे. मसाज वाफारा व त्यानंतर लेप हे उपचार तदण्यांच्या देखरेखीखाली करावे.
* कोरफडीचा गर काढुन तो हळद टाकून फेसावा व चेहरयाला लावावा. मध आणि साय हे मिश्रण चांगले घोटून चेहरयाला चोळावे.
* मसूरीचे पीठ, काकडीचा रस व मध असा लेप एकत्र करुन नियमितपणे चेहरयाला लावावा.
असे काही घरघुती उपचार आपण सुरकुत्या घालविण्यासाठी करु शकतो.
* त्यासोबत दररोज कमीत कमी ३० मिनीटे फिरायला जावे. योगासने करावीत. ओंकार, ध्यान, शवासन, सर्वांगासन इ. करावे.
* सर्वात महत्वाचे ताण तणाव रहित जीवन जगण्याचा प्रयत्न करावा. सदैव आनंदी राहावे.
डॉ. कविता पवन लड्डा
लड्डा आयुर्वेदिक चिकित्सालय
पंचकर्म * त्वचा रोग़़ * सौदर्य समस्या * केसांचे विकार * गर्भसंस्कार
लातूर
मो. ०९३२६५११६८१
लड्डा आयुर्वेदिक चिकित्सालय
पंचकर्म * त्वचा रोग़़ * सौदर्य समस्या * केसांचे विकार * गर्भसंस्कार
लातूर
मो. ०९३२६५११६८१
No comments:
Post a Comment