Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Wednesday, May 11, 2016

नारळपाणी

नारळपाणी 🌴
नारिकेरोदकं स्निग्धं स्वादु वृष्यं हिमं लघु |
तृष्णापित्तानिलहरं दीपनं बस्तिशोधनम् || वा. सु.


नारळाचे पाणी स्निग्ध, गोड, शुक्रवर्धक करणारे, थंड, हलके, तहान शमविणारे, भुक वाढविणारे, मुत्राशयाची शुध्दी करणारे आहे.
भुक वाढविणारे असल्याने जेवणापुर्वी वा जेवनाच्या सुरूवातिला नारळपाणी घेता येईल.

सोबतच उन्हापासुन संरक्षण करण्यासाठी व शरीरातील स्निग्धता व ओलावा टिकवुन ठेवण्यासाठी, तहान भागविण्यासाठी नारळपाणी उपयोगात आणता येईल.

गर्भजल वाढविण्यासाठी नारळपाण्याचा उपयोग केला जातो. जेंव्हा शरीरातील जलीय घटक कमी झालेले असतिल त्यावेळीच समानाने समानाची वृध्दी या न्यायाने नारळपाण्याचा उपयोग होईल.

इतर कारणांनी गर्भोदक कमी असेल तर नारळपाण्याचा उपयोग होणार नाही. तसेच जेवणानतंर सेवन केलेले नारळपाणी कफवर्धन करून आमनिर्मितीच करेल व जन्म घेणारया बालकात निमोनिया सर्दी पडसे बालदमा सारखे कफाचे आजार निर्माण होतील. गर्भिणी स्रियांनी नारळपाणी घेताना त्याचे प्रमाण, घेण्याचा काळ आदींचा योग्य आयुर्वेदीय सल्ला जवळच्या वैद्याकडुन जरूर घ्यावा नाहीतर येणारया नविन पिढीला बरेच वर्ष त्रास सहन करावा लागु शकतो.

प्रत्येक आहारीय पदार्थांचे स्वतःचे असे गुणधर्म असतात, त्यानुसार प्रत्येक पदार्थ एखाद्याला फार चांगला वा चांगला वा ठीक वा वाईट वा फारच वाईट यापैकी कुठल्याही वर्गीकरणात मोडु शकतो.

सरसकट कुठलाही पदार्थ सगळ्यांनाच चांगला वा वाईट असेल असे नाही एखाद्याला चांगला असेल तर दुसरयासाठी त्रासदायक ठरू शकतो. त्यामुळेच स्वतः च्या प्रकृती सारतेनुसार खाद्यपदार्थांचे सेवन करावे त्यासाठी योग्य आयुर्वेदीय सल्ला कधीही लाभदायक च..
वैद्य गजानन मॅनमवार

श्री विश्वसंस्कृती आयुर्वेदीय चिकित्सालय पंचकर्म केंद्र पावडेवाडी नाका नांदेड
Mob no -- 9028562102, 9130497856
( for what's up post send your request messege on above mob no or add 9028562102 what's up no in your group )

No comments:

Post a Comment

Visit Our Page