आपला आहार
कित्येकदा पोटभर खाऊनसुध्दा हातपाय गळणे, अशक्तपणा जाणवणे, रक्ताचे प्रमाण कमी होणे, उत्साह कमी होणे, केस गळणे, थकवा वाटणे अशी लक्षणे दिसतात. कारण आपल्या दैनंदिन आहारात पौष्टीकता, जीवनसत्वे, लोहतत्वादींचा रहास होत आहे. याकरिता पौष्टीक व संतुलित आहाराबाबत नेहमी तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन घ्यावे.महाराष्ट्रीयन जेवणाचा विचार केला तर अगदी परीपुंर्ण असा आपला आहार आहे. परंतु फॅशनच्या प्रवाहात हे मराठमोळे ताट दुर्लभ होत चालले आहे. वरण, भात, भाजी, पोळी, कोशिबिंर, ताक, कडधान्याच्या उसळी अशा सर्व विविधपदार्थानी पूर्वी आपले ताट भरलेले असायचे. त्यामूळे आपल्याला शरीरावश्यक सर्व घटक एका जेवणातून मिळत असत.
* दररोजच्या आहारामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात हिरव्या पालेभाज्या जसे काकडी, टमाटर, गाजर, मुळा, पालक, मेथी, कद्दु, पत्तागोबी या भाज्या किंवा यांचा रस घ्यावा. शक्य असेल तर पालेभाज्या उकडून घ्याव्यात.
* सर्व प्रकारची फळे किंवा फळांचा रस पोटभरुन घ्यावा.
* मोड आलेली मटकी, मुग, सोयाबीन, चवळी इत्यादी कडधान्ये खावे.
* अधुन मधुन मलाई काढलेले दुध, ताजे ताक घ्यावे.
* कधी कधी मुगाच्या डाळीचे पाणी, मुगाच्या डाळीची खिचडी खावी.
* तंतुमय पदार्थांचा अधिक वापर करावा.
* खुप भुक लागत असेल तर चुरमुरे, लाह्रा हे कमी कॅलरीजचे पण लवकर पोट भरल्याची संवेदना देणारे पदार्थ खावेत.
* दररोजच्या जेवणामध्ये घरी बनवलेले चांगले कडविलेले साजुक तुप एक चमचा या प्रमाणात खावे.
* तसेच जेवणामध्ये गुळ व शेंगदाणे याचा देखील समावेश करावा.
* याप्रमाणे दररोजच्या आहारामधील एक चपाती किंवा भात-भाकरी कमी करुन पालेभाज्या, फळे, फळांचा रस, कडधान्ये, ताक यांचा अवश्य समावेश करावा.
* आहारातील गोड पदार्थ, डालडा, शिळे अन्न, बेकरीचे पदार्थ, दररोजचा मांसाहार, किंवा दररोजचे हॉटेलमधील जेवण इत्यादी गोष्टी बंद करावे.
या प्रमाणे सर्वसमतोल, सर्वसमावेशक असा नैसर्गिक आहार घेतल्याने शरीरावर कुठल्याही प्रकारचे दुष्परिणाम न होता आपल्या शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते.
धन्यवाद.
डॉ. कविता पवन लड्डा
लड्डा आयुर्वेदिक चिकित्सालय
विविध आजारांसाठी आयुर्वेदिक औषधोपचार व पंचकर्म उपलब्ध.
पद्मा नगर, बार्शी रोड,
लातूर. ०२३८२ २२१३६४
No comments:
Post a Comment