१ ) अग्नी तत्व : १,मेष ,५ सिंह आणि ९ धनु
या तत्वाच्ग्या राशिखाली आपल्या शरीरातील प्रामुख्याने डोळे, चेहरा, हृदय, मांड्या आणि पृष्ठ भाग येतो, अग्नी तत्वाचा आपल्या रोग प्रतिकारक शक्तीशी घनिष्ट संबंध असतो, त्याच प्रमाणे आपली पचन शक्ती, शरीरातील रक्ताभिसरण, आपली शारीरिक वाढ या क्रिया अग्नी तत्त्वाशी संबधित आहेत., या राशीवर जन्म असणाऱ्याची शरीर प्रकृती सुदृढ असते, आयुर्वेदातील पित्त प्रकृती अग्नी तत्वाच्या अमलाखाली येते. अग्नितावाचे आधिक्य असल्यास निरनिराळे उष्णताजन्य तापासारखे विकार, पचन क्रियेशी संबधित आजार, हृदय विकार, लिव्हर संबंधी पोटासंबंधी आजार किवा नेहमी अधिक घाम येणे या सारखे विकार होऊ शकतात. अग्नितत्व कमी असेल तर स्नायू आखडणे, अपचन, शरीर काठिण्य, उत्साह नसणे, निरनिराळ्या प्रकारचे तणाव अशा आजार किवा परिस्थिती निर्माण होते.
२ ) पृथ्वी तत्व : २ वृषभ , ६ कन्या आणि १० मकर
या तत्वाच्ग्या राशिखाली आपल्या शरीरातील प्रामुख्याने मान, आतडी, गुडघे आणि कातडी हे भाग येतात. आरोग्याच्या दृष्टीने पृथ्वी तत्वाच्या राशी सर्वात कमकुवत आहेत., आपल्या शरीरातील उर्जा साठवून ठेवण्याचे कार्य पृथ्वी तत्व राशी करतात. उर्च्जेचा संचय आणि विलय दोन्ही या राशी तत्वाशी निगडीत आहे. आपल्या शरीर रचनेचा संबंध या तत्त्वाच्या राशीशी आहे. आपल्या शरीरातील हाडे, दात, कातडी या राशीच्या व्यक्तीना साठीजान्य विकार लवकर होतात. त्याचप्रमाणे त्वचेचे आजार, शारीरिक दुखापत, कापणे, भाजणे, दुखापत होणे, निरुत्साहीपणा याचे प्रमाण या राशीत जास्त दिसून येते. या राशीवर जन्माला येणाऱ्या व्यक्ती दिसायला इतर राशीच्या तुलनेत उजव्या वाटतात, आयुर्वेदातील कफ प्रकृतीचा संबंध इथे आहे पण इतर म्हणजे पित्त आणि वातचे कार्य सुद्धा या तत्वाच्या राशीत चालू शकते.
३ ) वायू तत्व: ३ मिथुन ,७ तुला आणि ११ कुंभ.
या तत्वाच्ग्या राशिखाली आपल्या शरीरातील प्रामुख्याने फुफ्फुसे, मूत्रपिंड, श्वसन क्रिया हे भाग येतात मज्जा संस्था, विचार शक्ती, या विषयाचा संबंध वायू तत्वाच्या राशीशी येतो. निरनिराळ्या प्रकारच्या मानसिक आजाराचा संबंध या राशीशी आहे. शरीरातील वेग वेगळ्या वायूंचे चलनवलन वायू तत्वाच्या राशी खाली येते. कोरडा खोकला, अस्थमा. सांधे दुखी आणि मजा संस्थेचे विकार या राशीवर जन्मी झालेल्या व्यक्ती अग्नी राशीच्या तुलनेत कमी बलवान असतात. या तत्वाचे अधिक असल्यास अलिप्तता वाढण्याची शक्यता असते. हे तत्व अत्यल्प असल्यास श्वासोच्छवास व्यवस्थित न होणे, मंद हालचाली, थकवा वाटणे होऊ शकते. आयुअर्वेदातील वात प्रकृतीच्या व्यक्ती या राशिखाली येतात.
४ ) जल राशी: ४ कर्क ,८ वृश्चिक आणि १२ मीन
या तत्वाच्ग्या राशिखाली आपल्या शरीरातील प्रामुख्याने आपला कोठा, मलविसर्जनक्रिया आणि पाउले येतात. शरीरातील स्नायूची रचना आणि कार्य जल तत्व राशिखाली येते, रक्तचा पुरवठा या राशी तत्त्वाखाली येतो. पाणी जन्य आजार, सर्दी,खोकला, छाती दाटून येणे, होऊ शकते, या तत्वाचे अत्यल्प शरीरात पाण्याची कमतरता निर्माण करू शकते. या राशीवर जन्माला आलेल्या व्यक्तीना संसर्गजन्य रोग लवकर होतात. बाल मृतुचे प्रमाण इतर राशीच्या तुलनेत खूप अधिक प्रमाणत दिसून येते. आयुर्वेदातील कफ प्रकृतीच्या व्यक्ती या राशी खाली येतात.
५ ) राशी तत्व निहाय आपल्या शरीराची अंतरबाह्य रचना आणि विविध शारीरिक क्रीयावरील अंमल पुढे दिल्याप्रमाणे आहे.
अग्नि तत्व राशी :
१ मेष .डोके ,तोंड, मेंदू , डोके आणि तोंडाची हाडे
५ सिंह : पाठ, पाठीचा कणा, हृदय,
९ धनु : मांड्या आणि पृष्ठ भाग , शिरा, धमन्या आणि मज्जातंतू , मागील पृष्ठ भागाची हाडे
पृथ्वी तत्व राशी
२ वृषभ : मान,गळा ,अन्न नलिका, श्वास नलिका, मानेची हाडे.
६ कन्या :कोठा, नाभी जवळील भाग, लहान मोठे आतडे, पाठीच्या कण्याचा खालील भाग
१० मकर :गुड्घे,पोटऱ्या, हाडे आणि सांधे, गुडघ्याच्या वाट्या आणि सांधे
वायू तत्व राशी
३ मिथुन :खांदे, बाह्या, फुफ्फुसे, श्वास, रक्त ,खांद्याची हाडे, पहिली फासली, हात आणि हाताची हाडे
७ तुला :कमरेचा भाग ,कातडी ,मूत्र पिंड, कमरेची हाडे
११ कुंभ :पाय, पायाचे घोटे, रक्ताभिसरण, पायाच्या घोट्याची हाडे
जल तत्व राशी
४ कर्क :स्तन, छाती , कोठा आणि पचनेन्द्रीये, स्तनाची हाडे आणि इतर पहिली सोडून इतर फासल्या
८ वृश्चिक : गुप्तेन्द्रीये, गुदध्वार, मूत्राशय आणि जननेंद्रिय,
१२ मीन :पाउले आणि पायाची बोटे, शरीरातील लसात्म्क द्रव्ये, तळव्याची,पायाच्या बोटाची हाडे.
६ ) राशी तत्व निहाय आपल्याला होणारे आजार पुढील प्रमाणे आहेत.
अग्नी तत्व राशी
१ मेष :मेंदूचे मेनिनजायतीस सारखे विकार, चक्कर, अर्धशीशी, टक्कल पडणे, तापाचे प्रकार, अपचन, जखमा, खाण्या पिण्याच्या अतिरेकामुळे होणारे त्रास
५ सिंह : रोग प्रतिकार शक्ती चांगली असते, संशयी स्वभामुळे मानसिक ताण जास्त्, हृदय विकार, ब्लड क्लोट होणे, पाठ दुखी, सांधे दुखी, पोटाचे विकार, धाप लागणे, शरीराचा तोल जाणे, दीर्घ मुदतीचे आजार होतात.
९ धनु :अपचनाचे विकार, संधीवात, कमरेचे हाड सरकणे , पचन आणि श्वसन दोन्ही प्रकारच्या आजाराची शक्यता असते, अतिरिक्त मेदाधीक्य होउ शकते. .
पृथ्वी तत्व राशी
२ वृषभ: नाक.कान.घशाचे विकार, मानेत गाठ येणे, तोंड येणे, गळवे, मंद उत्सर्जन क्रिया सहसा आजारी पडत नाहीत पण आजार झाला कि दीर्घ काल टिकतो, जास्त खाण्याने आजार ओढवून घेतात,ब्लड प्रेशरचा त्रास होऊ शकतो, झोप चांगली न येणे
१० मकर :गुडघेदुखी, त्वचेचे रोग, पाठीचे रोग, सांधेदुखी, आमवात, हिस्टेरिया, महारोग, क्षीण प्रकृती, खाण्या पिण्याच्या तक्रारी किवा कंटाळा
वायू तत्व राशी
३ मिथुन : मजा तंतुचे विकार, प्लूरसी, खोकला, फुफ्फुसाचा क्षय, अस्थमा, श्वसनविकार, अतिविचारामुळे निर्माण होणारे ताण तणाव,बुद्धीचा अधिक वापर केल्याने शरीर कमकुवत असते, खोकल्यापासून न्युमोनिया पर्यंत सर्व आजार होतात.
७ तुला :मूत्राशयाचे विविध विकार, वैवाहिक असमाधानातून निर्माण होणारे विकार
११ कुंभ :गुढगे लचकणे, गुडघ्याला सूज येणे, चमक भरणे, रक्त दुषित होणे, विषबाधा ,प्रचंड गुंतागुंतीचे मानसिक ताण तणाव, हायपर टेन्शन, रुधिराभिसरानाचे विकार, पाया संबंधी निरनिराळे विकार
जल तत्व राशी
४ कर्क:आरोग्य कमजोर,प्रतिकार शक्ती कमी, फुफ्फुसे,छातीचे विकार,पचनाचे आजार,कॅन्सर छातीत जळजळ होणे,पोटात वात धरणे, स्त्रियांचा पांढरा प्रदर,द्रव्यरूप उत्सर्जन क्रिया, चरबी वाढल्यामुळे होणारे मेदाधीक्य. .
८ वृश्चिक: घसा खराब होणे, नाकाचे विकार, नपुसक्त्व, गर्भधारणे विषयीचे विकार, रक्त अशुद्ध होणे,मुतखडा, मुळव्याध, गर्भाशय, योनीमार्ग याचे व तत्सम आजार.
१२ मीन :जलोदर, थंडीमुळे पायात पेटके येणे, संधी वात, विविध शीत विकार, द्रव्यासंबधित आजार, खाद्य पदार्थामुळे होणारे आजार, अवयवांच्या हालचालीवर ताबा न राहणे, व्यसनाधीनता. .
वर वर्णन केल्या प्रमाणे राशी तत्व निहाय शरीर रचना आणि संभाव्य आजार हे त्या त्या राशीमुळे निर्माण होत नाहीत. राशी फक्त शरीराच्या कोणत्या भागात आणि कोणत्या प्रकारचा आजार होऊ शकतो हे दाखवितात. प्रत्यक्ष आज्राचे कारण निरनिराळ्या राशीतील ग्रहस्थिती वर अवलंबून असते. कोणताही आजार होण्यासाठी लागणारी अधिक अथवा कमी उर्जा ग्रह निर्माण करतात आणि राशीच्या माध्यमातून शरीराच्या त्या त्या भागावर परीणाम करतात.
या लेखात आयुर्वेदिक ज्योतिषाचा फारच थोडा अगदी ओझरता उल्लेख केला आहे. आय्रुर्वेदिक ज्योतिष आपले शरीर आणि शरीर विकार या वर अधिक सखोलपणे मार्गदर्शन करू शकते. इथे निरनिराळ्या शाखांचा घोळ झाला तर ज्योतिषाचा अभ्यास करणाऱ्या नवोदित मित्र मैत्रीणीना मार्गदर्शक ठरण्या ऐवजी अधिक गोंधळात टाकण्याची शक्यता जास्त आहे त्यामुळे मी या विषयाचा विस्तार या सध्याच्या अभ्यासाच्या स्तरावर हेतू पुरस्पर टाळला आहे. पुढे मागे संधी मिळाली तर याचा सविस्तर विचार करू कारण आरोग्य ज्योतिष या एकाच विषयाचे स्वतंत्र असे २०-२५ लेख होतील. या लेखात माहितीचा पसारा जास्त असल्यामुळे कदाचित आपल्याला हा लेख काहीसा विस्कळीत किवा तुटक तुटक वाटण्याची शक्यता आहे कारण आरोग्य विषयक भरपूर माहिती थोडक्यात लिहिण्याचा प्रयत्न केला आहे पण मी स्वताच थोडासा असमाधानी आहे या लेखाविषयी विस्तार भयास्तब मला इथे थांबणे आवश्यक आहे. क्षमस्व.
राशितत्व निहाय अभ्यास करताना त्याचे ४(२), ४(३) आणि ४ (४) असे तीन लेख झाले आहेत.
राशी तत्व हे पंचमहाभूताशी निगडीत आहे आणि आपले शरीर पंचमहाभूतापासून तयार होते त्यामुळे आपले प्रत्येकाचे शरीर म्हणजे पंचमहाभूताचे एक विशिष्ट व्यक्तीसापेक्ष गुणकत्व आहे. प्रत्येक पंचमहाभूतावर निरनिराळ्या ग्रहांचा अंमल आहे, त्यामुळे आकाशस्थ ग्रहांचा आपल्या या पंचमहाभूतात्म्क व्यक्तीसापेक्ष गुणकत्वावर प्रभाव पडतो. सूर्य चंद्राच्या प्रभावामुळे भरती ओहोटी होते हे विज्ञानाने मान्य केले आहे. त्याच प्रमाणे चंद्राला १२ राशीतून ३६० अंशाचे भ्रमण पूर्ण करण्यास २८ दिवस लागतात आणि त्याचा संबंध स्त्रियांच्या २८ दिवसाच्या मासिक ऋतुचक्राची आहे. जन्मकालीन असलेले आपले गुणकत्व संतुलन आपल्या दैनदिन आहार विहार,वातावरण मुळे सत्तत सूक्ष्मरित्या बदलत असते. या बदलणाऱ्या गुणकत्व संतुलनामुळे ग्रह तारे यांचे आपणावर होणारे परिणाम बदलत राहतात. आरोग्याचा संबंध साहजिकच भावनेच्या संतुलनाशी सुद्धा आहे. त्यामुळे आरोग्यात होणारे दैनदिन सूक्ष्म बदलामुळे आपले भावनाविश्व सुद्धा बदलत राहते. दर सात वर्षानंतर आपल्या शरीरातील सर्व पेशी बदलतात त्यामुळे आपल्यात शारीरिक आणि मानसिक स्थित्यंतर होत जाते. या आणि अशा कारणामुळे आकाशस्थ ग्रह तारे यांचा आपल्यावर सर्व प्रकारे परिणाम होत असतो.
या कारणासाठी ज्योतिषाचा अभ्यास करताना राशी तत्वाचा आणि आपल्या पत्रिकेत कोणत्या प्रकारचे संतुलन आहे याचा अभ्यास करणे अत्यंत आवश्यक असते. पुढील लेखात आपण राशी स्वभाव या विषयी माहिती घेऊ या. तो पर्यंत राम राम
VASANT JOSHI
A6/12 ,BEST NAGAR, GOREGAON (WEST), MUMBAI 400104
932340638http://www.facebook.com/profile.php?id=1256382835
No comments:
Post a Comment