अकाली केस पांढरे होणे :
वाढत्या वयानुसार केस पांढरे होणे ही एक नैसर्गिक गोष्ट आहे. परंतु कमी वयात केस पांढरे होऊ लागणे हा निश्चितच चिंतेचा विषय होतो. अकाली केस पांढरे होण्याची अनेक करणे असतात. केसांना तेल न लावणे हलक्या किंमतीच्या साबण व शाम्पूचा अधिक वापर करणे, सतत औषधे घेणे, डोकेदुखी, सर्दी-पडसे, बद्धकोष्ठता, मानसिक तणाव, अशक्तपणा, केसांत कोंडा होणे, निद्रानाश, आनुवंशिकता इ.कारणांमुळे केस अकाली पांढरे होतात.
शरीरातील व्हिटॅमिनची कमतरता असल्यानेही केस अकाली पांढरे होतात. अकस्मात दुर्घटना किंवा शोक संदेश मिळाल्यासही लोकांचे केस पांढरे झाल्याचे आढळले आहेत.
एकाच वेळी सगळे केस पांढरे होणे असे प्रकार विचित्र या सदरातच मोडतात. सर थॉमस मूर तसेच मेरी ऍन्टोनेट अशा प्रसिद्ध व्यक्तींचे सर्व केस काही क्षणातच पांढरे झाले होते. असेही काही लोक आढळले आहे की ज्यांचे केस हिवाळ्यामध्ये पांढरे होतात व उन्हाळ्यामध्ये पुन्हा काळे होतात. वैद्यकीय तज्ज्ञांना अद्यापही या गोष्टीचे खरे कारण समजू शकलेले नाही.
केस अकाली पांढरे होण्याच्या समस्येपासून वाचवण्यासाठी सावधगिरी बाळगणे आवश्यक असते. त्याकरीता नियमित दिनचर्या, केसांची उचित सफाई, संतुलित आहार, व्यायाम उत्तम झोप यांची आवश्यकता असते. केस काळे राखण्यासाटःई शरीराला प्रोटिन व्हिटॅमिन ए. बी. सी. डी. ई. कॅलशीअम आयोडीन, फॉस्फोरस, खनिज क्षार, कार्बोहायड्रेट, आयर्न, कॉपर इ. पदार्थ पर्याप्त प्रमाणात मिळाले पाहिजेत. व्हिटॅमिन व कॉम्लेक्स मध्ये आढळणारे पॅन्टोर्थेनिक ऍसिड फॉलिक ऍसिड इ. पदार्थ केस काळे राखण्यात महत्वाची भुमिका बजावतात.
शरीराला सर्व द्रव्य योग्य प्रमाणात मिळवीत या करिता आपल्या आहारात दूध, दही, लोणी, पनीर, अंडे, गाजर, मुळा, टोमॅटो, मटार, पालक, लिंबू, आवळा, खजूर, द्राक्षे, सफरचंद, मोसंबी, पालेभाज्या, ताजी फळे, अंकुरीत धान्ये आदिंचा समावेश असावा.
अकाली केस पांढरे होण्याच्या संदर्भातील महत्त्वाच्या गोष्टी :
- एक-दोन केस पांढरे झाले असल्यास ते केस तोडू नका. असे केल्याने केस पांढरे होऊ लागता.
- थोडे केस पांढरे झाले असल्यास डाय करू नका. त्यामुळे काळ्या केसावरही प्रभाव पडतो. केस आणखी वेगाने पांढरे होऊ लागतात.
- केस धुण्यासाठी साबण व शाम्पू ऐवजी आवळा, रिठे, शिकेकाई, बेसन, दही इ. चा वापर करा. खुप गोड पदार्थ, तेलकट, मसालेदार भोजन, दारु, अमली पदार्थ यांचे सेवन करु नक.
- केस धुण्यासाठी गरम पाण्याचा वापर करावा.
- केसांमध्ये हेयर स्प्रे व केस वालविण्यासाठी हेयर ड्रायरचा वापर कमीत कमी वापर करावा.
मेंदी :
पांढऱ्या केसांसाठी वनौषधी संच -(मेंदी, आवळा, मंडूर, जास्वंद, माका, मुलतानी माती, मोतिया, रोशा तेल)
मेंदी स्थाननि गुणाने ‘केश्य’ म्हणजे केशवर्धक व केशरंजक आहे,तसेच शोथहार दाहप्रशसन व वेदना स्थापनही करते. म्हणूनच एक थंडावा देणारी वनौषधी म्हणून उष्ण कटिबंधात हिचा सर्रास वापर होत होता. हळूहळू ही मेंदी सौंदर्य प्रांतात शिरकाव करती झाली आणि आता तर एखाद्या राणीच्या थाटशत पूर्ण जगभर प्रस्थापित झाली आहे. परदेशातून तर हेना हेअर कंडिशनर व हेना शांपू चांगलेच लोकप्रिय झाले आहेत. दरवर्षी भारतातून निर्यात होणाऱ्या मेंदीची टनावारी वाढतच आहे.
केसांकरिता मेंदीच्या वापरावे अनेक फायदे आहेत. मुख्यत्वेकरून मेंदी जरी केस रंगवण्यासाठी वापरली जात असली तरी अशीच नियमित लावण्याने केसांचे आरोग्य सुधारते. केसांवर एक छान तकाकी येऊन केस सुटे सुटे होऊन खुलतात. ज्याला कंडिशन असे म्हणले जाते. केस अकाली पांढरे होत नाहीत. डोक्याला कोंडा होण्याचा थांबतो व केसांची वाढ होते. तुरळक पांढरे झालेल्या केसांन मेंदी लावून झाकता येते. मात्र पूर्ण किंवा जास्त पांढरे केस असणारे बहुधा रासयनिक डायच लावतात. परंतु त्यांनीही या द्रव्यांचे दुष्परिणाम होऊ नयेत म्हणून १५ दिवसांतून एकदा मेंदी लावावी.
मेंदी फक्त पांढऱ्या केसांनाच रंगवते (काळे केस तसेच राहतात.) बऱ्याचजणांना नुसत्या मेंदीने केसांना येणारा रंग आवडत नाही. म्हणून या संचात मंडूर (लोह) व आवळा यांचे मिश्रण सोबत वापरले जाते. मंडूर व आवळ्याच्या रासायनिक संयोगाने काळा रंग तयार होतो. माका व जास्वंद या दोन्ही वनौषधी केशरंजक मान्यता पावल्या आहेत.अ मुलतानी मातीने मिश्रणाला चिवटपणा येऊन केसांवर पसरता येते. हा अनुभव अल्हाददायी व्हावा. म्हणून केशवर्धक मोतियारोशा तेलही संचातच दिले जाते.
आजकाल तरुण मुलां-मुलीतच पांढरे केस दिसू लागले आहेत. आहारातल्या चुका, मानसिक ताण व रासायनिक प्रसाधनांचा जबरदस्त प्रचार याला बळी पडलेल्या आमच्या नव्या पिढीला या वनौषधी हे एक वरदान आहे
sir,a simple reason [u may forgot to add] is "parihar-viruddh"---shastra niyam --dokyavarun garam panyane snan karu naye---pan bahutek tasech kartat.
ReplyDeleteavoid this viruddh & get treatment,results are more encouraging,regards
Hair & useful panchakarma
ReplyDelete1 Nasya nasa drops
2 Shiro & padabhyanga - head - foot massage
3 basti
dr sachin nandedkar 9960224989 www.ayurvedamitra.com