*आयुमित्र*
*रोगकारक आमरस*
आम शब्द वाचल्यावर पटकन आपल्या डोळ्यासमोर येतो तो पिवळसर गोड आंबा. आंबा कोणाला आवडत नाही. सगळेच चवीने खातात. आमरस म्हंटला कि कैरीचे पन्हे डोळ्यासमोर येते तर कुणाच्या समोर आंब्याचा रस येत असेल. असो. पण आज मला आंब्याविषयी चर्चा नाही करायची आहे. आम रसा विषयी करायची आहे.
आपण जेवण केल्यावर खाल्लेलं अन्न हे आमाशयात(stomach) जमा होते. पुढे अन्नाचे पचन सुरु होते. खर तर अन्न दातांनी चाऊन खाण्यापासूनच पचन क्रिया सुरु होते. अन्न निट ३२ वेळा चाऊन-चाऊन खाल्ल असेल. त्यात लाळ मिसळली गेली असेल. सगळ्यात महत्वाच जाठाराग्नी उत्तम असेल तर पूर्ण अन्नाचे पचन होते. परंतु जर अग्नी मंद असेल तर पूर्ण अन्नाचे पचन होत नाही. नीट पचलेला आहार पुढे जाऊन शरीराचे पोषण करणारा रस धातू बनतो आणि न पचलेला आहार ह्या पासून आम-रस बनतो. आम म्हणजे कच्चा/न पचलेला असा ह्याचा अर्थ आहे.
पुढे हा आमरस दोष धातूच्या ठिकाणी जाऊन रोग उत्पन्न करतो. अन्नपचन व्यवस्थित असल्यास आमरस तयार होत नाही आणि पुढे रोगही उत्पन्न होत नाहीत. आमदोष उत्पन्न होऊ नये ह्यासाठी अन्नाचे पचन निट होणे महत्वाचे आहे. भूक लागणे हा जाठराग्नी प्रज्वलित असल्याचा इंडिकेटर आहे. बऱ्याच लोकांना भूक असो का नसो वेळ झाला म्हणून खायची सवय असते. परंतु भूक लागेल तेव्हाच जेवणे योग्य आहे. आधी खाल्लेलं अन्न पचत नाही तोवर पुन्हा काहीही खाऊ नये. पचायला जड असे पदार्थ जेवणाच्या सुरवातीला घेणे योग्य असते. कारण जेव्हा जाठराग्नी प्रज्वलित असतो तेव्हा जड अन्न सुद्धा सहज पचवून टाकतो. साधारण गोड पदार्थ पचण्यास जड असतात. आंब्याच्या रसाची स्वीट डिश हि सगळ्यात आधी घेतली म्हणजे त्याचे पूर्ण पचन होईल. नाहीतर शेवटी घेतल्यास आंब्याच्या रसाने आमरस तयार होईल.
भोजन सेवनाचे नियम आयुर्वेदाने ह्यासाठीच संगुन ठवले आहेत. आमरस तयार झालाच तर गरम पाणी, सुंठ हे फार उपयोगी आहे. पण आपल्या वैद्यांच्या सल्याने ते कसे, कधी व किती घ्यावे हे ठरवून घ्यावे. चलातर मग शरीरात आमरस होण्यापसून टाळूया. निरोगी राहूया.
*–वैद्य भूषण मनोहर देव.*
*ज्योती आयुर्वेद पंचकर्म चिकित्सालय, जळगाव*
*8379820693/7588010703*
*drbhushandeo@gmail.com*
http://wp.me/p7ZRKy-7G
No comments:
Post a Comment