| केसांचा कंडीशनर | ||
| सामग्री | प्रमाण | प्रक्रिया |
| बवाची एक ते दोन चमचे (बिया) नागरमोटा एक ते दोन चमचे (मुळ) तुळशी एक ते दोन चमचे रक्त चंदनाची भुकटी | प्रत्येकी एक भाग | सर्व सामग्री गरम पाण्यात चांगल्याप्रकारे मिसळून घ्यावी व त्याची पेस्ट तयार करावी. मिश्रणानाचा केसांवर चांगल्याप्रकारे लेप द्यावा. पाच मिनिटांनी केस पाण्याने धुवावेत. ईतर औषधी जसे ब्रम्ही, भ्रिंगराज, मेहेंदी (हीना), कडुलिंब, जास्वंद, त्रिफळा. |
| आवळा | प्रत्येकी दोन भाग | |
| शिकाकाई भुकटी | प्रत्येकी पाच भाग | |
वर उल्लेख केलेल्या औषधींची चांगली सुकी भुकटी बनवता व साठवता येते. साठवण्यासाठी फक्त सुक्या व हवाबंद डब्याचा वापर करावा. आंघोळीआधी ही भुकटी पाण्यात किंवा दुधात पेस्ट करुन वापरता येते.
| केसांचा कलप | ||
| सामग्री | प्रमाण | प्रक्रिया |
| मेहेंदी (हीना) | आठ चमचे | नमूद केलेली सामग्री गरम चहासोबत लोखडी भांड्यात २४ तासांसाठी भिजत ठेवावी. वापराच्याआधी दोन चमचे लिंबुचा रस किंवा विनेगर टाकावे. एक चमचा कॉफी किंवा कत्था मिसळावा. यामिश्रणाचा केसांवर जाड थर द्यावा व एक ते तिन तासांसाठी तसेच राहुन द्यावेत. नंतर केस पाण्याने धुवून घ्यावेत. |
| नीलीनी (विकल्पिक) | आठ चमचे | |
| आवळा/त्रिफळा | चार चमचे | |
हे आयुर्वेदिक कलप पुर्णतः सुरक्षित असतात. तसेच त्यांचे कोणतेही दुष्परीणाम होत नाहीत. मिश्रणाची भुकती कॉफीमध्ये भिजत घातल्याने वापरल्यानंतर केसांना तपकिरी रंगाची झालर येते

No comments:
Post a Comment