Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Thursday, December 10, 2015

आहारातील सहा रसांचा क्रम

आहारातील सहा रसांचा क्रम

          आहाराची सुरूवात नेहमी गोड पदार्थांनी करावी. आंबट आणि खारट पदार्थ आहाराच्या मध्ये घ्यावेत तर शेवटी तिखट कडु तुरट पदार्थांचे सेवन करावे...
          आयुर्वेद शास्रानुसार पचनाचा पहिला काळ म्हणजे मधुर
अवस्थापाक कफाचा आसतो.. शरीरात प्राकृत कफ तयार होण्याकरिता व अन्नाचा शरीरास सात्म्य पोषक आहाररस तयार करण्यासाठी गोड पदार्थांनी आहाराची सुरूवात आवश्यक आहे ..
          आहार पचनातील दुसरा काळ हा पित्ताचा असते. या काळात आहार अर्धपक्व आंबट होतो.पुर्वीच्या कफवाढीमुळे भुक वाढविण्यासाठी व पाचक पित्ताचा स्राव योग्य प्रमाणात होण्याकरिता आहाराच्या मध्ये आंबट व खारट पदार्थ सेवन करावेत..
आहार पचनातील तिसरा काळ हा वाताचा काळ असतो पक्वाशयात मलभाग व षोषक आहार रस यांचे विभाजन होते.मलभाग शरीराच्या बाहेर टाकला जातो तर आहाररस शरीर पोषणाकरिता वापरला जातो..आणि प्राकृत वाताची व मलांची निर्मिती होते. तिखट कडु तुरट पदार्थ वात चांगला तयार होण्याकरिता आवश्यक आहेत यासाठीच आहाराच्या शेवटी खाण्यास सांगितले आहेत....
         वरील क्रमाच्या विपरीत आहार घेतला तर पचन बिघडते भुक मंदावते प्राकृत वात पित्त कफ मल तयार होत नाहीत शरीराचे षोषण होत नाही      ...आहार जरी सोन्यासारखा असला तरी अंगास लागत नाही मलभाग जास्त तयार होतो...
उदा. Hotels मध्ये starters ने जेवणाची सुरूवात होते. त्यामध्ये मसाला पापड soups etc असतात हे तिखट आंबट खारट पदार्थ आहेत...याने पहिल्या पचनाच्या काळात कफ तयार होणार नाही शरीराचे बल कमी होते. कफाच्या अवयवांची झीज लवकर होऊन old age चे आजार कमी वयात दिसतात.........
दुसरे उदा. आहाराच्या शेवटी sweet dish icecream etc खाणे ..ही देखील चुकीची पध्दत आहे प्राकृत वात व मल तयारच होणार नाही.. विकृत मल तयार होऊन आमवात प्रमेह मधुमेह आदी आजार होतील.
आज सगळी कडे अशा प्रकारचा क्रमच्या विरूध्द आहार घेतला जातो... ज्या लोकांत असा आहार घेण्याची frequency जास्त आहे... त्यांना विविध आजारांचा धोका अधिक आहे..... Hoteling चा परिणाम म्हणता येईल याला........

वैद्य गजानन मॅनमवार 
श्री विश्वसंस्कृती आयुर्वेद चिकित्सालय पंचकर्म केंद्र
रामानंद नगर पावडेवाडी नाका
नांदेड
 9028562102 9130497856

No comments:

Post a Comment

Visit Our Page