👀 उत्तम नेत्रांसाठी आहार 👀
निरोगी असतानाही डोळे चांगले राहण्यासाठी नेहमी पुढील पदार्थांचे सेवन करावे.
सातु, गहु, साठीसाळीचे तांदुळ व हरीक ही १ वर्ष जुनी धान्यें व मुग वैगेरे कफ व पित्त यांचा नाश करणारी धान्यें ही तुपासह खावे.
अशाच प्रकारे तुपासह भाज्या खाव्यात. फळात डांळीब, मनुका तसेच खडीसाखर, सैंधव मीठ, हे पदार्थ, प्यावयास पावसाचे पाणी, पादत्राण्यांचा उपयोग आणि शास्रोक्त रितीने शोधन(शरीरशुध्दी) आदींनी नेत्रांचे आरोग्य सुस्थितीत राहते....
👀 नेत्रांसाठी अन्य उपाय👀
आयुर्वेदीय शास्रानुसार पायांमध्ये दोन मोठ्या शिरा असुन त्या पुढे डोळ्यापर्यंत गेल्या आहेत. त्यामुळेच पायांस लावलेले तुप तैल उटणे लेप आदींचे काम डोळ्यापर्यंत होते.
मलोत्पत्ती, तळपायाला उष्ण (गरम) स्पर्श, पायांस नेहमी तुडवुन, दाबुन घेणे या कारणांनी नाड्या बिघडल्या तर डोळ्यासही विकार उत्पन्न करतात. म्हणुनच पादत्राने घालणे, पायांस तुप लावने व पाय धुणे हे प्रकार डोळ्यास हितकारक असतात. त्यांचा नेहमी वापर करावा.
नेत्रांसाठी वर्ज्य---मलमुत्रांचे वेग अडवणे, अजीर्ण असताना जेवन,पुर्वीचे पचले नसताना जेवन, शोक करणे, रागक्रोध, दिवसा झोपणे, रात्रिजागरण, विदाहकारक, विष्टंम्भी मलमुत्र अडवुन ठेवणारे अन्न, मलमुत्र अडवणारया क्रिया टाळाव्यात.
वैद्य गजानन मॅनमवार
श्री विश्वसंस्कृती आयुर्वेद नांदेड
9028562102 , 9130497856
No comments:
Post a Comment