*आयुमित्र*
*औदुंबर/उदुंबर आणि आपले आरोग्य*
आज श्री.दत्त जयंती. श्री दत्तात्रयाची उपासना स्मरण होताच औदुंबराचे झाड नक्कीच डोळ्यसमोर येणार. अनेक दत्तभक्त आपल्या भक्ती भावाने औदुंबराच्या प्रदक्षणा मारताना आपल्याला दिसतात, झाडाखाली बसून उपासना/साधना करतांना दिसतात तर कुणी फुल वाहताना दिसतात. अशी हि वेगवेगळ्या पद्धतीची *वृक्ष उपासना* आपल्याला भरतातचब बघायला मिळू शकते. दत्तप्रिय औदुंबर ह्याचे आध्यत्मिक दृष्ट्या महत्व तर आहेच पण आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा फार महत्व आहे.
*शारीरिक आरोग्य आणि औदुंबर*
औदुंबरचे झाड बघितले नाही असा नर दुर्लभच. कारण सर्व भारत भरात औदुंबरची झाडे बघयला मिळतात. लालबुंद फळे, हिरवी कच्ची फळे आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी खाल्ली सुद्धा असतील. औदुंबराची साल, दुध, फळ व मुळांचा रस ह्या सर्वांचा औषधी उपयोग आहे. औदुंबर हे मुख्यतः दाह कमी करणारे आहे. आम्लपित्त/एसिडीटी कमी करणारे आहे. कावीळ, मूत्ररोग, प्रमेह, तृष्णा, गर्भपात, जुलाब अश्या अनेक व्याधींवर औदुंबराचा उत्तम उपयोग आहे. एव्हडेच नाहीतर काही विषारी वनस्पतीच्या प्रभावाला सुद्धा औदुंबर कमी करते. असे बहूउपयोगी औदुंबर आहे. ( *सूचना-आपल्या वैद्यांचा सल्ला घेऊनच औदुंबरच्या विविध अंगांचा उपयोग करावा.* )
*मानसिक आरोग्य आणि औदुंबर*
जेव्हा भगवान नरसिंहाने हिरण्यकश्यपूचा वध केला तेव्हा भगवान अत्यंत क्रोधीत होते त्यांचा शारीरक व मानसिक दाह शांत होत नव्हता तेव्हा त्यांनी औदुंबराच्या झाडत त्यांचे नख टोचले होते. हे केल्यावर त्यांचा दाह कमी झाला. अशी आख्यायिका सुद्धा आहे. औदुंबर वृक्षाच्या सानिध्यात राहिल्याने मनःशांती मिळते. ज्यांना क्रोध, चिडचिडेपणा आहे, अश्यांनासुद्धा ह्या औदुंबर वृक्षाची सेवा केल्यास लाभ मिळतो. असा आमचा अनुभव आहे.
चला तर औदुंबर वृक्षाची उपासना करूया शरीर व मनाला स्वस्थ ठेवूया.
-वैद्य भूषण मनोहर देव.
*ज्योती आयुर्वेद, जळगाव* 8379820693/7588010703
drbhushandeo@gmail.com
http://wp.me/p7ZRKy-5f
No comments:
Post a Comment