१८व्या शतकात दक्षिणेतील तंजावर येथील सत्ताधीश सर्फोजी राजे भोसले (दुसरे) डोळ्यांच्या शस्त्रक्रिया करत होते, अशी माहिती नुकतीच उजेडात आली आहे. त्यामुळे भारतही याक्षेत्रात त्याकाळी मागे नव्हता, ही बाब अधोरेखित होत आहे. त्यांनी तंजावरवर १७९८ ते १८३२ या काळात राज्य केले आणि ते एक उत्तम नेत्ररोगतज्ज्ञ होते. त्यांनी अनेक प्रजाजनांच्या डोळ्यांच्या तक्रारींवर औषधपाणी तर केलेच पण अनेक नेत्र शस्त्रक्रियाही केल्याचे पुरावे आता मिळाले आहेत.
चेन्नईतील शंकर नेत्रालयातील तज्ज्ञ, तामिळनाडूच्या पुरातत्व खात्याचे माजी संचालक आणि कांचीपुरम विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. आर. नागस्वामी यांनी काही ऐतिहासिक दस्तावेज सर्फोजी राजांचे सध्याचे वंशज एस. बाबाजी राजा भोसले यांच्याकडून हस्तगत केले. त्यात सर्फोजी राजे यांनी केलेल्या नेत्र शस्त्रक्रियांची शास्त्रीय वर्णने आणि नोंदी आहेत. या हस्तलिखितांवर आधारीत शोधनिबंध

त्यांनी इंडियन जर्नल ऑफ ऑप्थॅल्मोलॉजी या शास्त्रीय नियतकालिकात नुकताच प्रसिद्ध केला.
या नोंदीच्या आधारे अशी माहिती पुढे आली आहे की सर्फोजी राजे धन्वंतरी महाल नावाने नेत्र रुग्णालय चालवत असत. आज ज्या ठिकाणी सेंट पीटर्स चर्च आहे त्या जागेवर पूर्वी हे रुग्णालय होते. राजांना आपल्या कामात डॉ. मॅकबीन नावाचे इंग्लिश नेत्रतज्ज्ञ मदत करत असत. राजांनी उपचार केलेल्या रुग्णांविषयीच्या नोंदी मोडी लिपीत तसेच इंग्रजी भाषेतही उपलब्ध आहेत. या विषयावरील माहिती आम्ही या वर्षी दुबई येथे भरलेल्या वर्ल्ड ऑप्थॅल्मोलॉजी कॉन्फरन्समध्ये मांडली. आजवर आधुनिक नेत्र शस्त्रक्रियांचे श्रेय युरोपीय शास्त्रज्ञांना दिले जात असे. पण ही बाब खरोखरच आश्चर्यकारक आहे की त्याच काळात भारतातील लोकही या क्षेत्रात तितकेच महत्त्वाचे कार्य करत होते, असे मत शंकर नेत्रालयाचे तज्ज्ञ डॉ. ज्योतिर्मय विश्वास यांनी व्य्कत केले. डॉ. जॅक्स डॅव्हिएल या फ्रेंच नेत्रविशारदाने मोतीबिंदूवरील प्रभावी शस्त्रक्रियेची माहिती सर्वप्रथम १७५२ मध्ये फ्रेंच अॅकॅडेमी ऑफ डर्जरीला सादर केली.
साधारण त्याच काळात सर्फोजी राजांच्या नोंदीत कॉर्निया, लेन्स, कंजक्टिव्हा आदि शास्त्रीय परिभाषेतील संज्ञा वापरलेल्या आढळतात. सर्फोजी राजे यांनी त्या काळी ५ ते ६० वर्षे वयोगटातील ४४ रुग्णांवर केलेल्या इलाजांची माहिती ५० हस्तलिखितांमध्ये सापडली आहे. त्यात सुईच्या साह्याने मोतीबिंदू काढणे, तसेच आज ज्याला ल्युकोमा आणि अॅमॉरॉसिस म्हणतात त्या व्याधींवरही उपचार केल्याच्या नोंदी आहेत. त्यात ९ सप्टेंबर १८२७ रोजी एका ४५ वर्षांच्या रुग्णावर केलेल्या मोतीबिंदू शस्त्रक्रियेच्या आणि १५ ऑगस्ट १८२७ रोजी एका १५ वर्षे वयाच्या मुलीच्या जंतुसंसर्ग झालेल्या डोळ्यांवर केलेल्या शस्त्रक्रियेचे उल्लेख आहेत.
या उपचारांत निळी गोळी, जळू, एरंडाचे तेल, रेवाचिनी (रूबार्ब) चूर्ण अशा भारतीय औषधींबरोबरच खडूचे चूर्ण, पेपरमिंटचा द्राव, सिल्व्हर नायट्रेट यांसारख्या युरोपीय द्रव्यांचाही वापर केल्याच्या नोंदी आहेत. निळी गोळी नावाने उल्लेख असलेल्या देशी पदार्थाचे नेमके स्वरूप आता माहित नसले तरी जंतुसंसर्ग कमी करण्यासाठी आणि वेदनाशामक म्हणून त्याचा व्यापक आणि प्रभावी वापर होत असल्याचे दिसून आले आहे. डोळ्यांची सूज उतरवण्यासाठी आणि शस्त्रक्रियेनंतर वेदना शमवण्यासाठी जळूंचा वापर केला जात असे. बरे होऊन घरी परतताना रुग्णाला शस्त्रक्रियेसाठी संमती दिल्याबद्दल आणि प्रकृतीत सुधारणा झाल्याबद्दल इनाम म्हणून २ रुपये दिले जात, अशाही नोंदी सापडल्या आहेत.

No comments:
Post a Comment