भारतीय
जीवनशैलीत आहारशास्त्राचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. प्रत्येक स्त्री
किंबहुना पुरुषसुद्धा येनकेन प्रकारे आहारशास्त्राशी निगडित आहे. रॉबर्ट
मॅककॅरिसन नावाच्या आहारतज्ज्ञांच्या मते योग्य प्रकारचा आहार आरोग्य शाबूत
ठेवण्याचा, तर अयोग्य आहार हा रोगवाढीसाठीचा एकमेव महत्त्वपूर्ण घटक आहे.
आंघोळ करणे, रात्रीची झोप घेणे या गोष्टी जशा आपण बेमालूमपणे करतो. तसाच
रोजचा स्वयंपाकही बेमालूमपणे किंवा सवयीने पार पाडला जातो. पण कसातरी
स्वयंपाक उरकून पोट भरणे हा आपला हेतू नसतोच. तो सुद्धा शास्त्रशुद्ध
पद्धतीने होणे गरजेचे आहे.
रोजच्या जेवणातला वरणभात तयार करणे हेसुद्धा शास्त्रच आहे. तांदूळ धुताना
ब-याच जणींना तो खूप रगडून भरपूर पाण्यात धुण्याची सवय असते. तांदळात
अळ्या होऊ नयेत म्हणून बोरिक पावडर लावण्याची गरज असते. ही पावडर निघून
जाण्यासाठी खूप चोळून आणि अतिरिक्त पाण्याचा वापर करून तांदूळ धुतल्यास
त्यातील 40 टक्क्यांपर्यंत थायामिन आणि ‘निकोटिनिक अॅसिड’ वाढत जाते.
हॉटेलमधला स्टीम राइस ब-याचदा आपण घरी करतो. जास्त पाण्यात तांदूळ शिजवून
जास्तीचे पाणी फेकून दिल्यावर मोकळा भात तयार होतो. पण या पाण्यासोबत
मिनरल्सदेखील जातात. त्यासाठी माफक पाण्याचा वापर करावा. यामुळे अन्नातील
मोडियम, पोटॅशियम आणि कॅल्शियमचा आपल्याला पुरेपूर वापर करता येईल.
ब-याच कुकरी शोजमध्ये असे सांगितले जाते की, पालेभाज्या शिजवताना त्यावर
झाकण ठेवले नाही तर त्या हिरव्यागार दिसतात. पण भाज्या न झाकता शिजवल्यास
त्यातील व्हिटॅमिन सी नष्ट होते. म्हणूनच शक्यतोवर अन्न पे्रशर कुकरमध्ये
शिजवावे. अन्नाला जितकी जास्त काळ उष्णता दिली जाते, तितकी त्यातील
पोषणमूल्ये कमी-कमी होत जातात. स्निग्ध पदार्थ म्हणजे तेल, तूप, जितके
जास्त गरम करू तितके त्यातील हानिकारक पदार्थांचे प्रमाण वाढते. ब-याचदा
तळण केलेले तेल-तूप आपण पुन्हा फोडणीसाठी वापरतो, पण हे तेल-तूप वापरणे
आरोग्यासाठी अतिशय घातक आहे.
अन्नाच्या पोषक तत्त्वांची जपणूक करण्यासाठी काही गोष्टींचे पालन करा-
* भाज्या शिजवताना झाकून ठेवा.
* डाळ, तांदूळ धुताना रगडून धुणे टाळा.
* भाज्या वाहत्या पाण्यात आधी धुवा, मग चिरा.
* वारंवार अन्न गरम करणे टाळावे.
* वरण, भाज्या शिजवताना शक्यतो आम्लरसाचा वापर करा.
* अन्न जपून वापरा, वाया घालवू नका. आपण वाचवलेल्या अन्नात इतर शेकडो व्यक्तींना भोजन मिळू शकते.
रोजच्या जेवणातला वरणभात तयार करणे हेसुद्धा शास्त्रच आहे. तांदूळ धुताना ब-याच जणींना तो खूप रगडून भरपूर पाण्यात धुण्याची सवय असते. तांदळात अळ्या होऊ नयेत म्हणून बोरिक पावडर लावण्याची गरज असते. ही पावडर निघून जाण्यासाठी खूप चोळून आणि अतिरिक्त पाण्याचा वापर करून तांदूळ धुतल्यास त्यातील 40 टक्क्यांपर्यंत थायामिन आणि ‘निकोटिनिक अॅसिड’ वाढत जाते.
हॉटेलमधला स्टीम राइस ब-याचदा आपण घरी करतो. जास्त पाण्यात तांदूळ शिजवून जास्तीचे पाणी फेकून दिल्यावर मोकळा भात तयार होतो. पण या पाण्यासोबत मिनरल्सदेखील जातात. त्यासाठी माफक पाण्याचा वापर करावा. यामुळे अन्नातील मोडियम, पोटॅशियम आणि कॅल्शियमचा आपल्याला पुरेपूर वापर करता येईल.
ब-याच कुकरी शोजमध्ये असे सांगितले जाते की, पालेभाज्या शिजवताना त्यावर झाकण ठेवले नाही तर त्या हिरव्यागार दिसतात. पण भाज्या न झाकता शिजवल्यास त्यातील व्हिटॅमिन सी नष्ट होते. म्हणूनच शक्यतोवर अन्न पे्रशर कुकरमध्ये शिजवावे. अन्नाला जितकी जास्त काळ उष्णता दिली जाते, तितकी त्यातील पोषणमूल्ये कमी-कमी होत जातात. स्निग्ध पदार्थ म्हणजे तेल, तूप, जितके जास्त गरम करू तितके त्यातील हानिकारक पदार्थांचे प्रमाण वाढते. ब-याचदा तळण केलेले तेल-तूप आपण पुन्हा फोडणीसाठी वापरतो, पण हे तेल-तूप वापरणे आरोग्यासाठी अतिशय घातक आहे.
अन्नाच्या पोषक तत्त्वांची जपणूक करण्यासाठी काही गोष्टींचे पालन करा-
* भाज्या शिजवताना झाकून ठेवा.
* डाळ, तांदूळ धुताना रगडून धुणे टाळा.
* भाज्या वाहत्या पाण्यात आधी धुवा, मग चिरा.
* वारंवार अन्न गरम करणे टाळावे.
* वरण, भाज्या शिजवताना शक्यतो आम्लरसाचा वापर करा.
* अन्न जपून वापरा, वाया घालवू नका. आपण वाचवलेल्या अन्नात इतर शेकडो व्यक्तींना भोजन मिळू शकते.
No comments:
Post a Comment