शरीर,मन आणि बुद्धी या तीन पातळीवर आपल्यात सत्तत अंतर द्वंद सुरु असते. आपल्यात असलेया सततच्या असमाधानाचे बीज इथे रोवले जते. एक छोटेसे उदाहरण सांगतो. जेवण झाल्यावर आपले पोट भरले असेल तर शरीर सांगते कि बस झाले आता आणखी काही नको, त्याच वेळी मन म्हणते कि अरे इतके सुंदर गुलाबजामून किवा बटाटेवडे आहेत कि थोडेसे आणखी खाऊ या, त्याचवेळी बुद्धी घंटी वाजवून इशारा देते कि नाही जास्त खाले तर उद्या अपचन होईल आणि आजारी पडशील.
जर बुद्धीचे ऐकले तर मन असमाधानी,जर मनाचे ऐकले तर बुद्धी असमाधानी आणि जर मन आणि बुद्धी यांनी “नाणेफेक करून अधिक खाण्याचा समझोता केला तर शरीर असमाधानी. एकूण काय अधिक खाले तरी आणि नाही खाल्ले तरी आपल्यातील शरीर,मन किवा बुद्धी सतत असमाधानीच राहते. मग हे सतत होत गेले तर कधी मनाची घुसमट,तर कधी बुद्धीचा कोंडमारा तरी कधी शरीराची तक्रार राहतेच राहते.
मग कसे दूर होणार आपले असमाधान?
No comments:
Post a Comment