#घरोघरी_आयुर्वेद
बस्ती हे पंचकर्मातील एक कर्म. या प्रक्रियेत गुदमार्गाद्वारे काढ्याचे वा तेलाचे मिश्रण दिले जाते. शरीरातील वात वाढला की; बस्ती हा अतिशय उत्तम परिणामकारक उपाय आहे. या उपक्रमाला ‘बस्ती’ असे नाव का पडले ठाऊक आहे का? पूर्वीच्या काळी बस्ती देण्यासाठी मृत प्राण्यांचे मूत्राशय काढून- स्वच्छ करून त्यात काढे वा तेलाचे मिश्रण भरून बस्ती दिला जात असे; जेणेकरून या मुत्राशयातील स्नायूंवर योग्य दाब दिल्यास त्यातील औषध शरीरात पोहचावे. या मूत्राशयास संस्कृतमध्ये ‘बस्ती’ असे म्हणतात. त्याच्या सहाय्याने दिला जातो म्हणून हा उपक्रमदेखील ‘बस्ती’ याच नावाने ओळखला जाऊ लागला. आजही बस्ती अशाच पद्धतीने दिला जातो का? उत्तर आहे....नाही! सध्याच्या काळात; बहुतांश दाक्षिणात्य राज्यांत प्लॅस्टिकच्या जाड पिशव्यांचा वापर करून बस्ती दिला जातो. आपल्याकडे बहुतेक वैद्य हे एनिमा सिरींज आणि कॅथेटर यांच्या सहाय्याने बस्ती देतात.

सांगण्याचा मुद्दा असा की; ‘आयुर्वेदाने काळाप्रमाणे बदलणे आवश्यक आहे.
नाहीतर साचून राहिलेल्या डबक्याप्रमाणे आयुर्वेदाची गत होईल’ अशी आपली
विद्वत्ता पाजळणाऱ्या ‘स्वयंघोषित’ विद्वानांची कमतरता नाही. कित्येकदा
त्यांची ही तथाकथित ‘सुधारक’ मते आपल्यालाही ‘जबरदस्त’ वगैरे वाटत असतील.
मात्र अशी सनसनाटी विधान करणाऱ्या लोकांचा आयुर्वेदातला अभ्यास नेमका किती
असतो हे सर्वप्रथम बघायला नको का? आयुर्वेदाचा सांगोपांग अभ्यास असणारा
कुठलाही माणूस आपल्याला सांगेल की; आयुर्वेदाने नेहमीच काळानुसार आवश्यक
बदल स्वीकारले आहेत. मात्र तसे करताना ते बदल केवळ तपशीलातील बदल आहेत.
त्याच्या ‘कोणत्याही’ मुलभूत सिद्धांताला धक्का लागलेला नाही. (यावर
स्वतंत्रपणे लिहीनच.) त्यामुळे अशा सुधारकांना माझी एकच विनंती आहे की; अशी
चक्रम विधाने करण्यापूर्वी आपले ज्ञान पुन्हा एकदा तपासून पहा.
उगाच आपली थोरवी तमाम लोकांनी गावी; यासाठी आयुर्वेदाच्या आडून शिखंडीसारखे बाण चालवत बसू नका.
© वैद्य परीक्षित स. शेवडे
(आयुर्वेदतज्ज्ञ- लेखक- व्याख्याते)
श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद; डोंबिवली
संपर्क: ०२५१-२८६३८३५

No comments:
Post a Comment