बदलत्या काळानुसार शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर नवनव्या तंत्रज्ञानाचा वापर वाढीस लागला आहे. नत्र,स्फ़ुरद, पालाश या मुख्य खतांसोबतच सुक्ष्मखतांचा (Micro nutrient fertilizers) वापर वाढला आहे. पैकी नत्र,स्फ़ुरद,पालाश या मुख्य खतांची निर्मीतीसाठी प्रचंड गुंतवणुकीचे कारखाने लागतात.
परंतू सुक्ष्मखतांची (Micro nutrient fertilizers) निर्मीती किंवा प्रक्रिया-पॆकिंग करून विपनन करणे हा उद्योग/व्यवसाय म्हणुन अत्यंत चांगला पर्याय ठरू शकतो.
या अनुषंगाने इच्छूकांना मदत व्हावी या उद्देशाने येथे काही कृषीसंबधित करता येण्याजोग्या उद्योगांची एक यादी बनविण्याचा प्रयत्न करित आहे.
१) सुक्ष्मखते (Micro nutrient fertilizers)
पिकांच्या जोमदार वाढीसाठी १६ मुलद्रव्यांची (elements) आवश्यकता असते. त्यापैकी Fe, Zn, Mn, Cu, B, Mo, Cl हे प्रमुख मुलघटक असुन यांच्या एकापेक्षा अधिक मुलघटकांच्या योग्य त्या प्रमाणात मिश्रणाला सुक्ष्मखते म्हणतात. सध्या या सुक्ष्मखंतांना प्रचंड मागणी आहे.
मुलद्रव्यांची (elements) नांवे खालील प्रमाणे.
1) Copper sulphate (CuSO4.5H2O)
2) Zinc sulphate (ZnSO4.7H2O)
3) Borax or Sod.Borate (Na2B4O7.10 H2O)
4) Manganese Sulphate (MnSO4.4H2O)
5) Ammonium Molybdate ( (NH4)6Mo7O24.4H2O)
6) Ferrous sulphate (FeSO4.7H2O)
7) Magnesium sulfate (or magnesium sulphate)
………………………………………………………………………
२) जैविक खते (Bio-fertilizers)
A. Nitrogen fixers
Symbiotic: – Rhizobium, inoculants for legumes.
Non-symbiotic: – For cereals, millets, and vegetables.
a) Bacteria:-
i). Aerobic:-Azatobacter, Azomonas, Azospirillum.
ii) Anaerobic:- Closteridium, chlorobium
iii) Facultative anaerobes- Bacillus, Eisherichia
b) Blue green algae- Anabaena, Anabaenopsis, Nostoe
A. Phosphate solubilizing micro-organisms.
B. Cellulolytic and lignolytic micro-organisms.
C. Sulphur dissolving bacteria.
D. Azolla.
………………………………………………………………………….
३) संप्रेरके - फ़वारणीच्या माध्यमातुन वापर केला जातो.
पिकांची कायीक वाढ, फ़ळांची गुणवत्तासुधारणा, पिकांचा कालावधी
कमि-जास्त करणे वा तत्सम कारणासाठी संप्रेरके वापरली जातात.
सध्या वापरात असलेली काही मुख्य संप्रेरके.
१) आमिनो अॅसिड – Amino Acid.
२) जिबरेलिक अॅसिड – Gibberellic acid (also called Gibberellin A3, GA, and (GA3)
३) नॆपथ्यालिक अॅसेटिक अॅसिड – NAA
४) ह्युमिक ऎसिड – Humic acid – Fulvic acid organic plant food and root growth promoters
……………………………………………………………………………
१) या उद्योगांसाठी जिल्हा उद्योग केंद्र,खादी-ग्रामोद्योग वा इतर शासकिय विभागांकडून बिजभांडवल स्वरूपात अर्थसाहाय्य होऊ शकते.
२) वर उल्लेखिलेले बहुतांश उद्योग २५ लाखाचे आंत असल्याने पंतप्रधान रोजगार योजनेंतर्गत सबसिडी मिळण्यास पात्र आहेत.
वरिल सर्व उत्पादनांना चांगली मागणी असून मालाची गुणवत्ता व मार्केटिंग
कौशल्य या दोन बाबींच्या आधारावर सहज यशप्राप्ती होऊ शकते.
हा ब्लॉग मराठी लोकांसाठी असून, याची निर्मिती तथा संपादन आयुष दर्पण या स्वास्थ पत्रिका द्वारे केले जाते . आमचा उद्देश सामाजिक माहिती पोहोचविने असून आम्ही त्या साठीच कार्यरत आहोत . www.ayushdarpan.org
Tuesday, November 30, 2010
सेंद्रिय शेती
सेंद्रिय शेती ही संपूर्ण जीवनाला स्पर्श करणारी शेतीची एक पद्धत आहे. या पद्धतीमध्ये माती, पाणी, वनस्पती, मातीतील असंख्य जिवाणू व त्यांचे त्याज्य पदार्थ, पर्यावरण, प्राणी, माणूस, जंगले या सर्वांच्या जीवनचक्राचा शास्त्रीय दृष्टिकोनातून एकमेकांशी कसा संबंध आहे, याचा अभ्यास करून शेती केली जाते.
सेंद्रिय शेतीची उद्दिष्ट्ये -
1. सेंद्रिय शेती पद्धतीने उत्पादनखर्चात कपात.
2. प्रति हेक्टरी निव्वळ नफा वाढविणे, विषमुक्त अन्नधान्य, भाजीपाला, फळे तयार करणे.
3. विविध प्रकारच्या प्रदूषणास आळा घालणे.
4. जनावरे व यंत्राच्या शक्तीत बचत व शेती नापिकतेच्या जबाबदारीतून मुक्तता.
100 टक्के सेंद्रिययुक्त जमीन निर्माण झाल्यानंतर त्या भागातील भूगर्भातील पाण्याच्या पातळीत निश्चित वाढ होते.
जागतिक स्तरावर, तसेच स्थानिक स्तरावर सेंद्रिय उत्पादनाला होणारी वाढती मागणी, त्यांना मिळणारे जादाचे दर, उत्पादित होणारे विषमुक्त अन्न या बाबींचा विचार करता राज्यातील सेंद्रिय शेती कार्यपद्धतीस प्रोत्साहन देणे व एक राष्ट्रीय चळवळ निर्माण करण्याची गरज आहे.
निर्यातीस सध्या वाव असणारी सेंद्रिय उत्पादनेः कापूस, गहू, तांदूळ, वनौषधी, पापड, लोणची, तीळ, कारळे, मिरची इत्यादी.
सेंद्रिय शेतीमधील अडचणी-
1. आवश्यक त्या संशोधनाचा अभाव.
2. पुरेशा प्रमाणात स्थानिक विक्रीयोग्य दुकाने उभी करणे.
3. स्थानिकरीत्या प्रमाणके तयार करून सेंद्रिय शेतीचे स्थानिक स्तरावर प्रमाणके करण्याची मुभा देणे.
4. प्रमाणीकरणाची फी शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी भरावी लागते, ही एक मोठी समस्या आहे; त्यावर उपाय शोधण्याची गरज आहे.
5. प्रक्रिया उद्योगाची कमतरता काढणीपूर्व व काढणीपश्चात सुविधा, अद्ययावत प्रशिक्षणाची गरज.
महाराष्ट्र राज्यातील सेंद्रिय शेतीची प्रमाणीकरण करणाऱ्या संस्था -
नौका - पुणे, इकोसर्ट - औरंगाबाद,
एसकेएएएल - मुंबई, आयएमओ - बंगळूर, वन्सरर्ट - जयपूर.
प्रमाणीकरणासाठी नोंद झालेले क्षेत्र - 0.58 लाख हेक्टर.
सेंद्रीय शेती पध्दतीत रासाय़नीक खते, किटक-बुरशी नाशके, संजीवके, पशुखाद्यातील घटक यांचा पुर्णतः किंवा मोठ्या प्रमाणावर वापर टाळला जातो.
- या पध्दतीत शक्यतो योग्य पिक पालट, पिकांचे अवशेष, जनावरांचे मलमुत्र, द्विदल धान्ये, हिरवळीचे खते, शेती शिवाय इतर होणारा काडीकचरा, जैविक किडरोग तणनाशके यांच्या वापर करून जमिनीची उत्पादकता व पोद टिकवून पिक घ्यायचे या पध्दतीत हे गृहीत धरले आहे की जमिन हे एक जिवंत माध्यम असून त्यामध्ये शेतीस उपकारकक्षम अशा अनंत जीव-जंतूचे वास्तव्य असते. योग्य वातावरण असल्यास त्यात सतत वाढ होत राहते.
- सेंद्रीय शेतीमध्ये जमिनीतील जीव-जंतूना पुरेसे खाद्य मिळाल्यामुळे त्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढून काही संप्रेरके सारखी समिश्रे निर्माण होतात जी वनस्पती वाढीस पोषक असतात. व त्यांची रोग-कीड प्रतीकारक शक्ती वाढण्यास मदत करतात. यामुळे रासायनिक कीड-रोग नाशकांच्या वापर कमी होऊ शकतो.
- सेंद्रीय शेतीतील उत्पादने पौष्टीकता, चव, याबाबतीत सरस असून ती साठवणीत जास्त दिवस चांगली राहतात. तसेच अशा त-हेन उत्पदीत केलेल्या भाजीपाला व फळात नायट्रेट, नायट्रोजनचे व कँडमियम धातूचे प्रमाण कमी असते. रासायनिक खतांच्या अती वापराने सुक्ष्म अन्नद्रव्यांची उपलब्धता कमी झाल्याने अन्नधान्य भाजीपाला इत्यादींची पौष्टीकता कमी होते व त्याचा मानवी शरीरावर परीणाम होतो.
सेंद्रिय शेतीमध्ये बीजसंस्कार -
संवर्धकाचा वापर - ऍझोटोबॅक्टर आणि अझोस्पायरिलम ही जिवाणू खते हवेतील नत्र स्थिरीकरण करण्यास आणि नत्र पिकास उपलब्ध करून देण्यास मदत करतात.
दहा किलो बियाण्यांस 250 ग्रॅम जिवाणूसंवर्धकांची बीजप्रक्रिया करावी.
सेंद्रिय शेतीमध्ये पीकसंरक्षण-
मित्रकिडीच्या संगोपनासाठी वापर -
पीक मित्रकीड
मका - क्रायसोपा
कोथिंबीर - ट्रायकोग्रामा, मधुमक्षिका
चवळी - लेडी बर्ड बिटल
मुख्य पिकाचे शत्रूकिडीपासून संरक्षण होण्यासाठी सापळा पिके
चवळी - मावा
तीळ - तुडतुडे
अंबाडी - बोंडअळी
तुळशी - रसशोषण करणाऱ्या किडी
झेंडू - पांढरीमाशी, सुत्रकृमी.

चरक संहिता चिकित्सामे उपयोग
चरक संहिता चिकित्सामे उपयोग :
वरील पुस्तक जेंव्हा मला वाचायला मिळाले , तेन्ह्वा वरील कव्हर आकर्षक वाटले . जुन्या ग्रंथाकाह्य स्वरूपात आडवी रचना असलेले हे पुस्तक चरक संहिते वरील अतिशय सुन्दर वा समर्पक असे आहे .याचे लेखक वैद्य . विजय कुलकर्णी आहेत . या पुस्ताकास हिंदी भाषेतून लिहिण्यात आले आहे . जेने करून राष्ट्रभाषेतुन छापेले असल्याने संपूर्ण भारत भर याचे वाचन करण्यात यावे , हा उद्देश असावा . या पुस्ताकास वैद्य . स प्र सरदेशमुख प्राचार्य आयुर्वेद महाविद्यालय वाघोली ,पुणे यांची प्रस्तावना लाभली आहे . प्रस्तावने नंतर लगेच ( चिकित्सक की आचार संहिता ) हा निर्देश आहे . .पश्च्यात अनुक्रमाणिका असून प्रथम चरक परिचय आहे .
स्वस्थ रक्षण ,चिकित्सा विभाग , चतुर्थ भाग हा व्याधि व चिकित्सा सूत्र विभाग आहे व्यवहारत उपयोगी पड़ाव असा हा ग्रंथाच आहे.
या पुस्तकात
चरक संहिताचे व्यवहारिक अंश
दैनादीन चिकित्सा में उपुक्त विवरण
चरक संहिता योग सूचि
महाकशाय , अग्रसंग्रह, चरक वैशिष्ट्य ,
चरकोक्ता यवागू , लेप
पथ्यापथ्य
या पुस्तकाचे संभाव्य वाचक
आयुर्वेदीय चिकित्सक
आयुर्वेद स्नातक/ विद्यार्थी
आयुर्वेदीय अध्यापक
आयुर्वेदीय पदव्युत्तर स्नातक
आयुर्वेद चे जिज्ञासु
लेखक
वैद्य . विजय कुलकर्णी
आयुर्वेदाचार्य ( BAMS)
PhD ( Ayu. student)
पुस्तक मिलन्याचे ठिकान
विराम प्रकाशन
विराम, व्यंकटेश सोसायटी
शिवाजी नगर,
नाशिक ४२२००६
फोन ०२५३ २४१४९२१

Monday, November 29, 2010
आपली मराठी
आपली मराठी भाषा अतिशय लवचिक आहे, एका शब्दाचे अनेक अर्थ असणे आणि एकाच अर्थाचे अनेक शब्द असणे हे चांगल्या आणि समृद्ध भाषेचे लक्षण मराठीत सुद्धा आहे. एखाद्या शब्दाची फोड केली की, त्यातूननवे शब्द तयार होणे आणि अनेक शब्द जोडून एक शब्द तोही चांगलाच लांबलचक हा प्रकार मराठीत सुद्धा आहे. असाच एक शब्द म्हणजे. `एकसमयावच्छेदेकरुन'! याच अर्थ `एकाचवेळी' असा होता. असे प्रयोग मराठीत अनेक आहेत. आता ही चार ओळींची कविता- जयवंत काकडे
किलला वार्ड, वरोरा
जि.चंद्रपुर
बघा-बाई म्या उगवताच रवीला
दाट घालुनी दधी चरवीला
त्यात गे घुसळताच रवीला
सार काढुनी हरी चरविला
या चार ओळीपैकी पहिल्या ओळीतील रवीचा अर्थ `सुर्य' असा आहे. दुसऱ्या ओळीतील चरवी हे `भांडे,' तिसऱ्या ओळीतील रवी म्हणजे `दही घुसळण्याच उपकरण' आणि चौथ्या ओळीतील `चरविला' या अर्थ आहे `खाऊ घातला'.
गंमत बघा! `रामासा त्या गावे! भजन करावे गाढवाचे!' या ओळीतील गाढ आणि वाचे हे दोन शब्द एकत्र केले की `गाढव' हा प्राणी होतो आणि या ओळीचा अर्थ गाढवाचे भजन करावे असा होतो.
`मंच' म्हणजे व्यासपीठ आणि मंचक म्हणजे पकंग. या दोन शब्दांचा घोटाळा करुन वक्ते अनेकदा विनोद निर्माण करतात.
कविवर्य मोरोपंतानी आपल्या काव्यात शब्द चमत्कृतीचे विपुल प्रयोग केले आहेत.
पु.ल. देशपांडे यांनी सुद्धा अशाच प्रकारच्या शाब्दिक कोट्या करुन मराठी भाषेतील गंमती श्रोत्यपर्यंत पोचविल्या आहेत. पु.ल. देशपांडे एका मित्राकडे जेवायला गेले. भरपेट जेवण झाल्यानंतर आभार मानताना म्हणाले , "जेवण इतकं रुचकर झालं होतं की मी तर `अवाक' झालो" . ही शाब्दिक कोटी न समजलेल्या लोकांसाठी खुलासा करीत पु,ल. म्हणाले, "मी इतका जेवलोय की आता वाकूच शकत नाही".
`शंकरासी पुजिले सुमनाने' या ओळीतील सुमनाने या शब्दाचा अर्थ `फुलाने' असा होतो आनी `चांगल्य मनाने' असा सुद्धा होते. सुमन नावाच्य व्यक्तीने असाही होतो.
शब्दाचे उच्चार स्पष्ट असावे लागतात. उच्चारात गडबड केली. तरी भलताच अनर्थ होऊ शकतो. महिला म्हणजे स्त्री. पण मैला म्हणजे घाण. संबंध म्हणजे ऋणानुबंध आणि समंध म्हणजे भूत. संवर्ग म्हणजे उपविभाग आणि स्वर्ग म्हणजे ईश्वराचे निवासस्थान. अनेक जण उच्चारात गफलत करून गोंधळ उडवितात. विनोद निर्माण करतात. गृह म्हणजे घर आणि ग्रह म्हणजे आकाशातील तारे. गृहदशा आणि ग्रहदश यातील फरक कळला नाही तर पंचाईतच.
आपल्या मातृभाषेचा आपण सखोल अभ्यास करावा. भाषेचे बारकावे जाणून घ्यावे. शब्दांचे नेमके अर्थ आणि उच्चार आपल्याला माहित असायलाच हवेत. मातृभाषेसोबत आपण इतर भाषा शिकायला मुळीच हरकत नाही. पण मातृभाषेवर आपली हुकूमत असायला हवी. तिचा अभिमान असायला हवा.
सुदैवाने मराठी भाषेने देवनागरी लिपीचा स्वीकार केला आहे त्यामुळे महाराष्ट्रीयांना त्याच लिपीतील संस्कृत, हिंदी, गुजराथी या भाषा सहज अवगत करता येतात.http://www.marathimati.com/article/AapaliMarathi.asp
लिंबु
ऊस
ऊस खाण्यामुळे लघवी साफ होते. तसेच लघवीच्या वेळी आग होत असल्यासही तो उपयुक्त ठरतो. कावीळ झालेल्या रोग्यास तर ऊसासारखे दुसरे औषध नाही. काविळीचे रोग्याने रोज दोन वेळा जेवणापूर्वी ऊस खावा. चार पाच दिवसात प्रकृतीत सुधारणा होते. ऊस हा थंड आहे. त्यामुळे उन्हाळ्यात घेतल्यास उपकारक ठरतो. त्याचप्रमाणे कलिंगड हे एक थंड फळ आहे. त्याबद्दल एकच काळजी घेणे आवश्यक आहे. रस्त्यात गाडीवर मिळणाऱ्या उघड्या फोडी खाल्यामुळे एखाद्या वेळी अपाय होण्याचा संभव असतो. कारण त्याच्यावर माशा बसून व रस्त्यातील धूळ उडून त्या दूषित झाल्या असण्याचा संभव असतो
स्मृतीभ्रंश
वृद्धावस्थेतील सर्वात नकोसा वाटणारा आजार म्हणजे विस्मरण. यामुळे त्या वृद्ध व्यक्तीनाही अतोनात त्रास होतो. या व्याधीची सुरवात छोट्याश्या गोष्टींनी होते. फ्रीजचं दार उघडणं आणि ते कशासाठी उघडलं हे ना आठवणं, कोणी घरी येणार असल्याचा निरोप सांगायला विसरणं. किल्या कुठे ठेवल्या हे ना आठवणं वगैरे.
कमलाबाई एकदा चष्मा हा शब्दच विसरल्या आणि सर्व घरात माझा गोपाळकृष्ण कुठे आहे म्हणून शोधू लागल्या. शेवटी त्यांच्या नातवाला त्यांनी विचारल्यावर नातवाने त्यांना सांगितलं, 'आजी, तुला गोपाळकृष्ण कशाला हवाय?' त्यावर त्या म्हणाल्या 'अरे, पेपर वाचण्यासाठी!' हे ऐकल्यावर ताबडतोब त्यांना काय हवंय ते नातवाला लक्षात येऊन त्यानेच चष्मा शोधून दिला. ही व्याधी पूर्णपणे टाळता येणे कठीण असते; यासाठी स्मरणाचं कार्य मेंदू कसं करतो ते पाहू.
आपला मेंदू सर्वप्रथम विविध प्रकारची माहिती संवेदी ज्ञानेद्रीयांच्या द्वारे मिळवतो. म्हणजे आपण आपले डोळे, कान, जीभ, नाक आणि त्वचा या पाच इंद्रियांचा वापर त्यासाठी करतो. मिळालेली माहिती मेंदू साठवून ठेवतो.
यामध्ये दोन प्रकार आहेत. कित्येक वर्षापूर्वीची माहिती साठवणं उदा. आपण लहानपणी शिकलेली स्तोत्र, आरत्या, पाढे हे सर्व आपल्याला मुखोदगत असतं. हा झाला पहिला प्रकार. दुसरा प्रकार म्हणजे अगदी नजीकच्या काळात घडलेल्या घटनांची माहिती साठवणं. या मध्ये अगदी नजीकच्या काळात भेटलेली व्यक्ती, शिकलेल्या गोष्टी, पाहिलेल्या घटना, स्थळे अशा सर्वांचा समावेश होतो. आपण एखादा प्रवास करून येतो. त्यात भेटलेल्या व्यक्ति काही काळ आपल्या लक्षात राहतात, हे या प्रकारचं एक उदाहरण.
मेंदूने साठवलेली ही माहिती आपल्याला गरज पडेल तेव्हा आपल्याला आठवणं हे मेंदूचे माहितीसंबंधीचे तिसरे कार्य. ही सर्व कार्ये बिनबोभाट चालू असतात. कित्येक वर्ष ही कामं विनासायास चालू असतात. याची आपल्याला कल्पनाही नसते. वृद्धावस्थेत जेव्हा स्मृतीभ्रंश होतो तेव्हा प्रथम या बाबतीत आपण विचार आणि काळजी करायला लागतो. ही कार्ये आता वृद्धावस्थेतही व्यवस्थित चालावी यासाठी आपल्याला काही प्रयत्न करावे लागतात आणि ते कोणते याचाच विचार आता आपण करणार आहोत.
सर्वप्रथम मेंदूच्या माहिती घेणा-या कार्यामध्ये म्हणजे संवेदी ज्ञानेद्रीयांच्या कार्यात सुधारणा करण्यासाठी दृष्टीने काय करता येईल ते पाहू. डॉ.आर्थर विंटर आणि श्रीमती रुथ विंटर यांनी या संदर्भात काही व्यायाम सुचवले आहेत. आपण आता विचार करणार आहोत. योगामध्येसुद्धा उत्तम व्यायाम असतात ते आपल्या क्षमतेप्रमाणे जरूर करावेत. पण यांनी सुचविलेले व्यायाम आणि उपाय अतिशय सोपे, सहज आणि कुणालाही करता येण्यासारखे आहेत.
संवेदी ज्ञानेद्रीयांपैकी सर्वात महत्वाचं ज्ञानेद्रीय म्हणजे डोळा. त्यामुळे त्याची काळजी घेणं खूप महत्वाचं ठरतं. डोळ्यावर ताण येईल अशा प्रकारे मंद प्रकाशात, बारीक टाईप असलेल्या मजकुराचं वाचन करू नये. सलग दोन तास वाचल्यानंतर १५ ते २० मिनिटे डोळ्यांना विश्रांती घ्यावी. डोळ्यांवर गार पाण्याच्या गुलाब पाण्याच्या घड्या ठेवणे, डोळ्यांवर आपले पंजे ठेऊन थोडा वेळ डोळे मिटून बसणे हे यावरचे काही उपाय. अ जीवनसत्व असलेल्या भाज्या, फळं, मोड आलेली कडधान्य, जवसाची चटणी, मासे, अक्रोड, बदाम यापैकी परवडेल ते सर्व आहारात ठेवणं आवश्यक आहे. डोळ्यात काहीही अजिबात घालू नये. टी.व्ही.सुद्धा जास्त पाहू नये. फार प्रखर प्रकाशाकडे पाहू नये. ओमेगा ३ फॅटी असिड योग्य प्रमाणात पोटात जाईल याची काळजी घ्यावी.
वृद्धावस्थेत होणारे डोळ्यांचे प्रमुख आजार म्हणजे मोतीबिंदू, काचबिंदू, दृष्टी अधू होणं आणि डोळ्यातील पडदा खराब होणं हे आहेत. यापैकी योग्य चष्म्याच्या सहाय्याने काही अंशी तरी अधू दृष्टीवर मात करता येते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे दर सहा महिन्यांनी डोळ्यांची डॉक्टरांकडे जाऊन नेत्रतपासणी करून घेणं. कारण यापैकी कोणतीही व्याधी लवकर लक्षात आली तर पूर्ण बरी होऊ शकते. मोतीबिंदूवर यशस्वी शस्त्रक्रिया करता येते. डोळ्यांच्या व्याधीवर आजकाल चांगली औषधेही आहेत.
आता डोळ्यांचं आरोग्य सुधारण्यासाठीचे व्यायाम पाहू. एक छोटा टॉर्च प्रकाशित करून उजव्या हातात धरा. समोर बघत टॉर्च डोक्यावर न्या. फक्त डोळे हलवून टॉर्चकडे पहा. पाच आकडे सावकाश म्हणेपर्यत पहा. हात फिरवून हनुवटीखाली पोटापाशी आणा. फक्त डोळे हलवून त्याकडे पाच आकडे म्हणेपर्यत पहा. आता हलवून टॉर्च उजव्या कानाच्या रेषेत अर्धा फुटावर आणा. फक्त डोळे डाव्या हातात टॉर्चकडे पहा. पाच आकडे सावकाश म्हणेपर्यत पहा. हात फिरवून टॉर्च हनुवटीखाली पोटापाशी आणा. फक्त डोळे हलूवून त्याकडे पाच आकडे म्हणेपर्यत पहा. आता हात हलवून टॉर्च उजव्या कानाच्या रेषेत अर्धा फुटावर आणा. फक्त डोळे हलवून त्याकडे पहा. आता याच तिन्ही गोष्टी डाव्या हातात टॉर्च धरून करा.
हे सर्व व्यायाम (उजव्या व डाव्या हातात टॉर्च घेऊन प्रत्येकी) पाच वेळा करा. आता उजव्या हातात टॉर्च घेऊन तो हात उजवीकडे खांद्याच्या रेषेत सरळ ठेवा. फक्त डोळे हलवून त्याकडे पहा.
मग तो हळूहळू हात हलवून चेह-याकडे नाकाच्या रेषेत व फुटावर आणा. आता त्याकडे पहा. आता तो हात डाव्या खांद्याच्या रेषेत नेता येईल तेवढा नेऊन पुन्हा फक्त डोळे हलवून त्याकडे पहा. हीच कृती डाव्या हातात टॉर्च घेऊन करा.
वरील सर्व व्यायामांचे वेळी डोकं अजिबात हलवायचं नाही. फक्त डोळे हलवायचे आणि पाच आकडे म्हणायचे. एक चेंडू किंवा झाडाची फांदी यापासून पाच फुटावर येईल अशा प्रकारे टांगा. त्याला झोका देऊन तो हलत असताना त्याकडे दोन मिनिटे खुर्चीत बसून पहा.
मग खुर्ची पलीकडच्या बाजूला किंवा त्याच बाजूला दुसरीकडे सरकवून हीच कृती पुन्हा करा हे सोपे व्यायाम आणि योग्य आहाराद्वारे आपण आपली दृष्टी सुधारू शकतो.
कमलाबाई एकदा चष्मा हा शब्दच विसरल्या आणि सर्व घरात माझा गोपाळकृष्ण कुठे आहे म्हणून शोधू लागल्या. शेवटी त्यांच्या नातवाला त्यांनी विचारल्यावर नातवाने त्यांना सांगितलं, 'आजी, तुला गोपाळकृष्ण कशाला हवाय?' त्यावर त्या म्हणाल्या 'अरे, पेपर वाचण्यासाठी!' हे ऐकल्यावर ताबडतोब त्यांना काय हवंय ते नातवाला लक्षात येऊन त्यानेच चष्मा शोधून दिला. ही व्याधी पूर्णपणे टाळता येणे कठीण असते; यासाठी स्मरणाचं कार्य मेंदू कसं करतो ते पाहू.
आपला मेंदू सर्वप्रथम विविध प्रकारची माहिती संवेदी ज्ञानेद्रीयांच्या द्वारे मिळवतो. म्हणजे आपण आपले डोळे, कान, जीभ, नाक आणि त्वचा या पाच इंद्रियांचा वापर त्यासाठी करतो. मिळालेली माहिती मेंदू साठवून ठेवतो.
यामध्ये दोन प्रकार आहेत. कित्येक वर्षापूर्वीची माहिती साठवणं उदा. आपण लहानपणी शिकलेली स्तोत्र, आरत्या, पाढे हे सर्व आपल्याला मुखोदगत असतं. हा झाला पहिला प्रकार. दुसरा प्रकार म्हणजे अगदी नजीकच्या काळात घडलेल्या घटनांची माहिती साठवणं. या मध्ये अगदी नजीकच्या काळात भेटलेली व्यक्ती, शिकलेल्या गोष्टी, पाहिलेल्या घटना, स्थळे अशा सर्वांचा समावेश होतो. आपण एखादा प्रवास करून येतो. त्यात भेटलेल्या व्यक्ति काही काळ आपल्या लक्षात राहतात, हे या प्रकारचं एक उदाहरण.
मेंदूने साठवलेली ही माहिती आपल्याला गरज पडेल तेव्हा आपल्याला आठवणं हे मेंदूचे माहितीसंबंधीचे तिसरे कार्य. ही सर्व कार्ये बिनबोभाट चालू असतात. कित्येक वर्ष ही कामं विनासायास चालू असतात. याची आपल्याला कल्पनाही नसते. वृद्धावस्थेत जेव्हा स्मृतीभ्रंश होतो तेव्हा प्रथम या बाबतीत आपण विचार आणि काळजी करायला लागतो. ही कार्ये आता वृद्धावस्थेतही व्यवस्थित चालावी यासाठी आपल्याला काही प्रयत्न करावे लागतात आणि ते कोणते याचाच विचार आता आपण करणार आहोत.
सर्वप्रथम मेंदूच्या माहिती घेणा-या कार्यामध्ये म्हणजे संवेदी ज्ञानेद्रीयांच्या कार्यात सुधारणा करण्यासाठी दृष्टीने काय करता येईल ते पाहू. डॉ.आर्थर विंटर आणि श्रीमती रुथ विंटर यांनी या संदर्भात काही व्यायाम सुचवले आहेत. आपण आता विचार करणार आहोत. योगामध्येसुद्धा उत्तम व्यायाम असतात ते आपल्या क्षमतेप्रमाणे जरूर करावेत. पण यांनी सुचविलेले व्यायाम आणि उपाय अतिशय सोपे, सहज आणि कुणालाही करता येण्यासारखे आहेत.
वृद्धावस्थेत होणारे डोळ्यांचे प्रमुख आजार म्हणजे मोतीबिंदू, काचबिंदू, दृष्टी अधू होणं आणि डोळ्यातील पडदा खराब होणं हे आहेत. यापैकी योग्य चष्म्याच्या सहाय्याने काही अंशी तरी अधू दृष्टीवर मात करता येते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे दर सहा महिन्यांनी डोळ्यांची डॉक्टरांकडे जाऊन नेत्रतपासणी करून घेणं. कारण यापैकी कोणतीही व्याधी लवकर लक्षात आली तर पूर्ण बरी होऊ शकते. मोतीबिंदूवर यशस्वी शस्त्रक्रिया करता येते. डोळ्यांच्या व्याधीवर आजकाल चांगली औषधेही आहेत.
आता डोळ्यांचं आरोग्य सुधारण्यासाठीचे व्यायाम पाहू. एक छोटा टॉर्च प्रकाशित करून उजव्या हातात धरा. समोर बघत टॉर्च डोक्यावर न्या. फक्त डोळे हलवून टॉर्चकडे पहा. पाच आकडे सावकाश म्हणेपर्यत पहा. हात फिरवून हनुवटीखाली पोटापाशी आणा. फक्त डोळे हलवून त्याकडे पाच आकडे म्हणेपर्यत पहा. आता हलवून टॉर्च उजव्या कानाच्या रेषेत अर्धा फुटावर आणा. फक्त डोळे डाव्या हातात टॉर्चकडे पहा. पाच आकडे सावकाश म्हणेपर्यत पहा. हात फिरवून टॉर्च हनुवटीखाली पोटापाशी आणा. फक्त डोळे हलूवून त्याकडे पाच आकडे म्हणेपर्यत पहा. आता हात हलवून टॉर्च उजव्या कानाच्या रेषेत अर्धा फुटावर आणा. फक्त डोळे हलवून त्याकडे पहा. आता याच तिन्ही गोष्टी डाव्या हातात टॉर्च धरून करा.
हे सर्व व्यायाम (उजव्या व डाव्या हातात टॉर्च घेऊन प्रत्येकी) पाच वेळा करा. आता उजव्या हातात टॉर्च घेऊन तो हात उजवीकडे खांद्याच्या रेषेत सरळ ठेवा. फक्त डोळे हलवून त्याकडे पहा.
मग तो हळूहळू हात हलवून चेह-याकडे नाकाच्या रेषेत व फुटावर आणा. आता त्याकडे पहा. आता तो हात डाव्या खांद्याच्या रेषेत नेता येईल तेवढा नेऊन पुन्हा फक्त डोळे हलवून त्याकडे पहा. हीच कृती डाव्या हातात टॉर्च घेऊन करा.
वरील सर्व व्यायामांचे वेळी डोकं अजिबात हलवायचं नाही. फक्त डोळे हलवायचे आणि पाच आकडे म्हणायचे. एक चेंडू किंवा झाडाची फांदी यापासून पाच फुटावर येईल अशा प्रकारे टांगा. त्याला झोका देऊन तो हलत असताना त्याकडे दोन मिनिटे खुर्चीत बसून पहा.
मग खुर्ची पलीकडच्या बाजूला किंवा त्याच बाजूला दुसरीकडे सरकवून हीच कृती पुन्हा करा हे सोपे व्यायाम आणि योग्य आहाराद्वारे आपण आपली दृष्टी सुधारू शकतो.
डोळे
डोळे येणे हा संसर्गजन्य आहे, हे सर्वांनाच ठाऊक आहे. परंतु याचा संसर्ग कसा होतो, याबद्दल अनेक गैरसमज आहे. डोळे आलेल्या व्यक्तीकडी पाहिल्याने डोळे येतात. हा एक गैरसमज आहे. जर अशा प्रकारचा संसर्ग असता तर सर्वांचे डोळे आले असते. ज्यांचे डोळे आले आहेत त्या रुग्णाच्या डोळ्यातून येणारे पाणी यामध्ये जीवाणू असतात. असा संसर्ग होऊ नये म्हणून पुढील खरबरदारी घ्यावी.
- रुग्णाने सारखा डोळ्यांना हात लावू नये, डोळे चोळू नये, यामुळे कुटुंबातील इतरांना संसर्ग होण्याचा धोका कमी होतो.
- रुग्णाचे डोळे स्वच्छ करणाऱ्या व्यक्तीनेसुद्धा डोळे स्वच्छ केल्यानंतर हात साबण लावून स्वच्छ धुवावेत.
- दिवसातून ३ ते ४ वेळा स्वच्छ पाण्याने पुढील प्रमाणे डोळे स्वच्छ करावे. ग्लासभर पानी चांगले उकळुन त्यात थोडे मीठ टाकून त्यात स्वच्छ कापडाचे छोटे छोटे तुकडे टाकावेत. त्यामुळे ते कापडाचे तुकडे निर्जंतुक होतील.
- डोळे आलेल्या व्यक्तीला हस्तांदोलन करू नये. तसेच त्यांच्या अधिक संपर्कात राहू नये.
- डोळे आलेल्या व्यक्तीला एका कुशीवर अशा प्रकारे झोपवायचे की त्याचा निरोगी डोळा खालच्या बाजुस येईल.
- स्वतःचा रुमाल, टॉवेल व अंथरुण नेहमी वेगळे ठेवावे. डोळ्यांना खाज सुटली तरी हाताचा उपयोग न करता स्वच्छ रुमालाने डोळे चोळावेत.
- डोळे आलेल्या व्यक्तीने सार्वजनिक ठिकाणी जाण्याचे टाळून घरीच आराम करावा. तसेच डोळे आलेल्या आलेल्या मुलालासुद्धा शाळेत पाठवू नये. यामुळे डोळे येण्याच्या संसर्गाची साखळी तोडण्यास मदत होते.
पिंपळी
पोटाचे विकार- पिंपळी चूर्ण गुणकारी
पिंपळीचे औषधात अनेक उपयोग आहेत. पण विशेषत: दमा, खोकला व सर्व प्रकारचे वातविकार व कफरोग यांवर अत्यंत गुणकारी आहे. कफयुक्त खोकल्यावर पिंपळीचे चूर्ण तूप व मध द्यावे. मात्र ते सर्व विषम प्रमाणात द्यावे म्हणजे आराम वाटतो. जेवण झाल्यावर पोट जड वाटणे अथवा पोटास तडस लागत असेल व अन्नपचन होत नसेल, तर जेवणानंतर पिंपळीचे चूर्ण मधाशी खावे. तसेच पोटात वात धरुन शूल होत असेल, तर पिंपळीचे चूर्ण सैंधव, आल्याचा रस व थोडा मध यातून दिल्याने दुखने थांबते. भुक अजिबात लागत नसेल व बारीक ताप असेल तसेच तोंड बेचव असून मळमळ , तोंडाला पाणी सुटणे इत्यादी लक्षणे होत असतील तर नुसते पिंप्ळीचे चूर्ण गुळाबरोबर घेतल्याने हे विकार कमी होतात. पिंपळीचे चूर्ण नुसते न घेता त्याबरोबर सुंठीचे चूर्णही थोडेसे घेतल्यास लवकर गुण येण्यास मदत होते. दमा, खोकला, ह्र्दयाचे विकार, कावीळ, पांडुरोग इत्यादी रोगही या उपायाने बरे होतात. पिंपाळीचे चूर्णाचे दुप्पट गुळ घ्यावा असे वैदक शास्त्रात सांगितले आहे.मध व पिंपळीने चरबी कमी होते
दात दुखणे, हालणे, ठणका लागणे इत्यादीसाठी पिंपळी, जिरे, व सैंधव यांचे वस्त्रगाळ चूर्ण करुन दांताच्या मुळाशी घासल्याने त्या तक्रारी कमी होतात. शरीरात स्थूलता फार वाढली असेल तर पिंपळीचे चूर्ण सतत काही दिवस मधाबरोबर घेतल्याने शरीरातील चरबी कमी होते व त्यापासून होणारा रोग बरे होतात.चौसष्टी पिंपळीने दमा बरा होतो
पिंपळाचा उपयोग अनेक रोगांवर होतो. याशिवाय तिचे काही विशेष प्रयोगही शस्त्रांत सांगितले आहेत. त्यापैकी चौसष्टी पिंपळी, वर्धमान पिंपळी, पाचक पिंपळी इत्यादी काही होत. नुसत्या पिंपळीचा सतत चौसष्ट दिवस अहोरात्र खल करतात. तिलाच चौसष्टई पिंपळी म्हणतात. ती अतिशय तीव्र, उष्ण, अतिसुक्ष्म व तीव्र असते. म्हणून ती फक्त मुगाच्या डाळीइतकी तूपमध किंवा मध साखर अथवा वासावलेहातून दोन वेळा घेतल्याने अति जुनाट दम्याचा विकारही बरा होतो. तसेस पडसे, खोकला, अग्निमांद्य, अनिमिया, जीर्णज्वर, ह्रुदयाची अशक्तता इत्यांदीवर फार गुनकारी आहे. चौसष्ट दिवसांऐवजी फक्त चौसष्ट प्रहरच खल करतात. तिलाही चौसष्टी पिंपळीच म्हणतात. पण ती जरा सौम्य आहे. पण इतके असुनही उष्ण्ता वाढल्यास गेण्याचे बंद करुन तुप व दूध पुष्कळ प्रमाणात घेतल्याने पित्त कमी होते. फारच उष्णप्रक्रुतीच्या माणसांनी मात्र पिंपळीचा उपयोग जपूनच करीत जावा.वर्धमान पिंपळीने अशक्तता जाते
गाईचे दूध चार तोळे, पाणी सोळा तोळे घेऊन त्यात तीन पिंपळ्या घालून सर्व एकत्र करून कल्हईच्या भांड्यात आटवावे. पाणी आटले म्हणजे त्यात खडीसाखर घालून त्यातील पिंपळ्या चावुन खाऊन ते दूध प्यावे किंवा थंड-उष्ण या प्रकृतिभेदानुसार पिंपळ्या खाव्यात किंवा त्या काढून टाकुन, नुसते दुध प्यावे. याप्रमाणे रोज एक पिंपळी याप्रमाणे सात दिवस वाढवीत न्यावे व पुन्हा सात दिवस रोज एक पिंपळी कमी करीत आणावी. यासव वर्धमान पिंपळी म्हणतात. यात पिंपळीचे प्रमाण व ती वाढविण्याचे दिवस यात बरेच प्रकार आहेत. पण सर्वसाधारणपणे वरील प्रमाणे घेतल्यास जरा उष्ण प्रकृतीसही मानवण्यास सोईचे होते. हिच्या सेवनाने जीर्ण ज्वर, पांडुरोग, गुल्म, उदर, अग्निमांद्य, खोकला, अशक्तता व वातरोग दूर होतात. प्रमेह रोगावरही ही गुणकारी.अजीर्णावर घ्यावयाच्या पिंपळ्या

पिंपळमुळाचे पाण्याने नारू जातो
पिंपळीचे गुणाप्रमाणेच पिंपळ मुळाचे गुण आहेत. पण त्यात काही विशेष गुण आएह्त. ते म्हणजे झोप येत नसेल तर पिंपळ मुळांचे चूर्ण गुळाबरोबर रात्री अथवा संध्याकाळी घ्यावे. म्हणजे झोप येते. तसेच ओकारीवर पिंपळमूळाचे वस्त्रगाळ चूर्ण करून त्यात त्याच्या बरोबरीने सुंठीचे चूर्ण घालुन त्यातून साधरणतः एक मासा दरवेळी मधातून चाटावे. म्हणजे ओकारी कमी होते. खोकल्यावरही या दोंहोच्या मिश्रणात थोडे बेहड्याचे चूर्ण मिसळुन मधाबरोबर अथवा कोमट पाण्याबरोबर घेतल्यास खोकला त्वरीत थांबतो. याशिवाय नारूवरही पिंपळमुळाचा अगदी सोपा उपाय सांगितला आहे. तो असा की, पिंपळगुळ थंड पाण्यात उगाळून प्याल्याने नारू बरा होतो. याप्रमाणे पिंपळगुळाचेहि अनेक औषधी उपयोग आहेत.पिंपळमुळ
पिंपळीच्या झाडाच्या मूळाचा वापर पिंपळमूळ या नावाने होत. भूऱ्या खाती रंगाची ओबड धोबड मुळे काष्ठौषधींच्या दुकानात मिळतात. त्यांचा आकारमानावरून त्यांचा भाव ठरतो. पिंपळमूळ जुने झाल्यास त्याला पोरकिडा लागण्याची शक्यता असते. यामुळे ८-१५ दिवसांपेक्षा अधिक पिंपळमूळ आणून ठेवू नये.इंपळमूळ हे अत्यंत तिखट अर्थात चव घेतल्यास जिभेच्या शेंड्याची, नाकाची चुणचुण करणारी, प्रसंगी घाम आणणारी असते. तिखट असूनही पिंपळमुळास एक सुगंध असतो. त्यामुळे पिंपळगुळाची उपयुक्तता मानसिक विकार, मतिमंदता, कफामुळे आलेले. हृदयविकार यांमध्ये दिसून येते. अतिशय तिखट असल्यामुळे पचनशक्ती वाढविणारे, साठून राहिलेली आव, पाचन करणारे, वाढलेल्या कफामुळे चोंदलेले नाक, जाड झालेल्या रक्तवाहिन्या, आतड्यांत बसलेला कफाचा लपेटा, डोकेदुखी, यकृताचा मार्ग बंद झाल्यामुळे झालेली कावीळ अशा सर्व विकारांत पिंपळगुळाचा उपयोग होतो.
मतिमंद मुलांमध्ये बऱ्याच वेळा सर्दी, लाळ गळणे, बोबडे बोलणे, अजिबात न बोलणे, सारखी लघवी होणे अशी लक्षणे असता पाव चमचा पिंपळगुळ व चिमूटभर वेखंड मधातून चाटवल्यास बालकाची कफ होण्याची प्रवृत्ती क्रमाने कमी होत मागे पडलेले बोलणे सुरू होऊ शकते.
मधमाशीपालनाचा यशस्वी उपक्रम
प्राचीन काळापासून आपल्याकडे मधाचा औषधी वापर केला जात आहे. सौंदर्य प्रसाधने, त्याचबरोबर रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठीही मधाचा वापर केला जातो. आयुर्वेदामध्ये मधाचे अनेक औषधी महत्व सांगितले आहे. आयुर्वेदिक औषधामध्ये मधाचा वापर तर होतोच याशिवाय अनेक धार्मिक विधीतही मधास महत्वाचे स्थान दिले गेले आहे. यामुळे राज्यात व देशांतर्गत मधाला बाराही महिने मागणी असते. मधाची मागणी विचारात घेऊन मधमाशा पालनाचा व्यवसाय महिला बचत गटांमार्फत सुरु करुन त्यांना आर्थिकदृष्टय़ा स्वावलंबी बनवण्याची योजना नाबार्डमार्फत कोल्हापुरात यशस्वीपणे अंमलात आणली गेली.
कोल्हापूर जिल्ह्यात मध निर्मितीसाठी असलेले पोषक वातावरण, भौगोलिक परिस्थिती आणि मुख्य बाब म्हणजे उपलब्ध असलेली वनसंपदा पाहून पन्हाळा तालुक्यातील किसरुळ या गावाची निवड करण्यात आली. राज्यात प्रथमच करण्यात आलेला हा प्रयोग यशस्वी झाला असून डोंगराळ भागातील महिला आता मधमाशा पालनाचा व्यवसायही करु शकतात हे सिध्द झाले आहे.
मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँक, गजानन महाराज बहुउद्देशीय संस्था तसेच युटीएमटी या संस्थेमार्फत कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील किसरुळ या नैसर्गिक वनसंपत्तीने नटलेल्या गावाची येथील मधमाशांसाठी असलेले पोषक वातावरण पाहून निवड करण्यात आली होती. या महिलांना स्थानिक सातेरी जातीच्या मधमाशा पकडणे, त्यांना पेटीत ठेवून त्यांचे संवर्धन करणे, पेटीतून मध काढणे, त्यांची विक्री करणे, याविषयीचे विशेष प्रशिक्षण या महिलांना देण्यात आले. बचत गटाच्या अध्यक्षा मालुताई पोवार या संदर्भात बोलतांना म्हणाल्या, आम्ही सुरवातीस २५ पेटय़ा ठेवून हा व्यवसाय सुरु केला. पहिल्यांदा आम्हाला २० किलो शुध्द मध मिळाला. हा सर्व मध आम्ही मधमाशांना न मारता काढला आहे. याबाबतचे प्रशिक्षण आम्ही घेतले आहे त्याचा आम्हाला फायदा झाला आहे. गटातील महिला आता उत्साहाने काम करीत आहेत. यावर्षी पावसाळा लांबल्याने मध थोडा कमी मिळाला आहे, पण येत्या हंगामात जास्तीत जास्त मध मिळेल असे आत्मविश्वासाने त्यांनी सांगितले.
पुढील वर्षी जानेवारी २०११ मध्ये या व्यवसायाला थोडा जास्त वेग येण्याची शक्यता आहे. कमी कष्ट आणि मुख्य बाब म्हणजे खर्चही कमी, त्यामुळे या व्यवसायात आता महिला बचत गट सहभागी होण्याची शक्यता वाढली आहे. किसरुळच्या या राज्यातील पहिल्या मधमाशी पालन व्यवसाय करणार्या महिला गटाची माहिती लंडनस्थित एक अभ्यासक श्री. सोफी यांना समजल्याने त्यांनी स्वत: येथे येऊन या ग्रामीण महिलांशी संवाद साधला. महिलांच्या कामाची पाहणी करुन कौतुकही केले. जिल्हा बँकेचे गोरख शिंदे, गजानन महाराज संस्थेचे राजेंद्र जाधव यांची मदत या महिलांना लाभली आहे. महिलांनी पारंपारिक लोणची, पापड, लाडू, चकली सारखे चाकोरीबध्द व्यवसाय तर करावेत पण त्याहून जास्त लाभ देणारे मधमाशा पालन सारखे व्यवसाय त्याला जोडधंदा म्हणून करावयास हरकत नाही. डोंगराळ, दुर्गम भागात इतर व्यवसाय करणे फारच अवघड असते. मग अशा ठिकाणी नैसर्गिक विपुलता, वनसंपदा भरपूर असते. मधमाशा पालनाचा व्यवसाय अशा ठिकाणी करावयास कोणतीच हरकत नाही हे यावरुन सिध्द झाले आहे.
या दुर्गम भागातील महिलांनी उत्पादित केलेल्या मधाला मागणीही आता येत आहे. शिवाय श्रीमती मालुताई पोवार महिलांना प्रशिक्षण देत असतात. आतापर्यंत दुर्लक्षित राहिलेले आपले गाव या व्यवसायामुळे प्रकाश झोतात आल्याबद्दल त्या समाधानी आहेत. इतर महिलांना जर प्रशिक्षण घ्यावयाचे असेल किंवा जर शुध्द मध घ्यावयाचा असेल तर ९६३७६८६२३५ या आपल्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा अशी विनंती त्यांनी केली आहे. चला तर मध खरेदी करुन या आपल्या भगिनींच्या व्यवसायाला हातभार लावू या http://mahanews.gov.in

Subscribe to:
Posts (Atom)