Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Monday, November 29, 2010

डोळे

डोळे येणे हा संसर्गजन्य आहे, हे सर्वांनाच ठाऊक आहे. परंतु याचा संसर्ग कसा होतो, याबद्दल अनेक गैरसमज आहे. डोळे आलेल्या व्यक्तीकडी पाहिल्याने डोळे येतात. हा एक गैरसमज आहे. जर अशा प्रकारचा संसर्ग असता तर सर्वांचे डोळे आले असते. ज्यांचे डोळे आले आहेत त्या रुग्णाच्या डोळ्यातून येणारे पाणी यामध्ये जीवाणू असतात. असा संसर्ग होऊ नये म्हणून पुढील खरबरदारी घ्यावी.
  • रुग्णाने सारखा डोळ्यांना हात लावू नये, डोळे चोळू नये, यामुळे कुटुंबातील इतरांना संसर्ग होण्याचा धोका कमी होतो.
  • रुग्णाचे डोळे स्वच्छ करणाऱ्या व्यक्तीनेसुद्धा डोळे स्वच्छ केल्यानंतर हात साबण लावून स्वच्छ धुवावेत.
  • दिवसातून ३ ते ४ वेळा स्वच्छ पाण्याने पुढील प्रमाणे डोळे स्वच्छ करावे. ग्लासभर पानी चांगले उकळुन त्यात थोडे मीठ टाकून त्यात स्वच्छ कापडाचे छोटे छोटे तुकडे टाकावेत. त्यामुळे ते कापडाचे तुकडे निर्जंतुक होतील.
  • डोळे आलेल्या व्यक्तीला हस्तांदोलन करू नये. तसेच त्यांच्या अधिक संपर्कात राहू नये.
  • डोळे आलेल्या व्यक्तीला एका कुशीवर अशा प्रकारे झोपवायचे की त्याचा निरोगी डोळा खालच्या बाजुस येईल.
  • स्वतःचा रुमाल, टॉवेल व अंथरुण नेहमी वेगळे ठेवावे. डोळ्यांना खाज सुटली तरी हाताचा उपयोग न करता स्वच्छ रुमालाने डोळे चोळावेत.
  • डोळे आलेल्या व्यक्तीने सार्वजनिक ठिकाणी जाण्याचे टाळून घरीच आराम करावा. तसेच डोळे आलेल्या आलेल्या मुलालासुद्धा शाळेत पाठवू नये. यामुळे डोळे येण्याच्या संसर्गाची साखळी तोडण्यास मदत होते.

No comments:

Post a Comment

Visit Our Page