Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Friday, August 31, 2012

दूध पिणे -

दूध पिणे -
आयुर्वेदानुसार दूध हे अमृत आहे हे आपण नेहमी ऐकत आलो आहोत. ग्रंथांचे
वाचन नं करता किंवा तज्ज्ञांना नं विचारता बहुतेकांनी त्याच्यावर
विश्वासही ठेवलेला असतो. या विषयी आयुर्वेद शास्त्र काय म्हणते सांगताय
- वैद्य श्री अनंत धर्माधिकारी

प्रश्नोत्तरे:

प्रश्नं १: रोज दूध पिणे जरूरी आहे असे बहुतेकांना वाटते.आयुर्वेदाचा या
बाबतित काय सल्ला आहे?

उत्तर: दररोज दूध पिण्याची गरज नाही. योग्य रितीने तयार केलेली भारतिय
थाळी सर्व आवश्यक जिवनसत्वे(व्हिटॅमिन), रोग प्रतिकारक
तत्वे(इम्युनायझर्स) व खनिजे (मिनरलस) यांनी परिपूर्ण असते. थाळीतील
प्रथिने (प्रोटिन) व इतर पौष्टिक तत्वांनी आरोग्य लाभते, वृद्धिंगत होते
व टिकुन रहाते. परंतु सप्लिमेंटसची आवश्यकता असलेल्यांनी खालील नियमांचे
पालन करून दुधाचे सेवन करावे:

नियम क्र १: दुधाचे सेवन करण्यापुर्वी आधी खाल्लेले सर्व अन्न पचलेले
असायला हवे. अर्धे पचलेले अन्नं पोटात असताना सेवन केल्यास रोगकारक
अवस्था तयार होते. वात कफ व पित्त या विकारांमधे एकाच वेळी वाढ होते.

नियम क्र. २: अजिबात व्यायाम नं करणार्‍याने अजिबात दूध प्यायचे नाही.

नियम क्र ३: चांगली भुक लागल्याशिवाय कधीही प्यायचे नाही.

नियम क्र ४: दूध आणि फळं कधीही एकत्रं खायची नाहीत.

नियम क्र ५: रात्री दूध कधीही प्यायचं नाही.

नियम क्र ६: सकाळी उठल्यावर लगेच दूध प्यायचं नाही.

नियम क्र ७: व्यायामकरून भूक लागल्यावरच प्यायचं.

प्रश्नं २: वाढत्या वयाच्या मुलांनी दिवसातुन एकदा किंवा दोनदा दूध
प्यावे असा सर्वसाधारण समज आहे. आयुर्वेद या बाबतित काय सांगते?

उत्तर: वयाच्या ५-६ वर्षापर्यंतच दूध द्यावे.

प्रश्नं ३: गरोदर स्त्रियांनी दूध पिणे गरजेचे असते काय?

उत्तर: सप्लिमेंटसची आवश्यकता भासल्यास गरोदर स्त्रिया दूध पिऊ शकतात,
मात्रं उत्तर क्र. १ मधील नियम पाळणे आवश्यक आहे.

प्रश्न ४: स्तनपान देणार्‍या मातेला दूध पिणे गरजेचे असते काय?

उत्तर: वरील क्रं ३ प्रमाणेच

प्रश्न ५: आहारात दुग्धजन्य पदार्थांचा वापर टाळुन सुदृढ जिवन जगणे शक्य आहे का?

उत्तर: आहारातील इतर घटक कोणते यावर अवलंबुन आहे. भारतिय थाळी पद्धतीचे
जेवण उपलब्ध असल्यास शक्य आहे.

प्रश्न ६: आयुर्वेदात दुधाचे पर्याय सुचवले आहेत का?

तुप, ताक,मुगडाळ, सुके खजुर,आवळे इ. द्यावे. (अपवाद पाच ते सहा वर्षापर्यंत)

प्रश्न ७: गायींचे पालनपोषण व आहार या विषयी आयुर्वेद काय सांगते?

आयुर्वेदात या विषयी जे नियम आहेत, त्यात उत्पादन वाढीपेक्षा गुणवत्तेवर
भर दिलेला आहे. ते नियम खालीलप्रमाणे:

दिवसा गाय गोठ्यात बांधलेली नसावी. गायीला दिवसभर चरायला सोडणे आवश्यक
आहे. विविध प्रकारचे हिरवे गवत जिथे नैसर्गिकरित्या उगवते तेथे गाईला
चरायला द्यावे. अशा ठिकाणी सहाजिकच गवताची निवड गाय स्वतःच करते. विविध
प्रकारच्या गवतामुळे दुधात आवश्यक गुण निर्माण होतात.
बाहेर ढगाळलेले वातावरण नसावे. दिवसभर फिरून होणारा व्यायाम व दिवसभर
मिळणारा सूर्याचा स्वच्छ प्रकाश यामुळे गायीचे आरोग्य सुधारते.
संध्याकाळी परत आल्यावर गाईचे दूध काढावे. त्या दुधात तिखट कडु व तुरट हे
आवश्यक रस भरपूर प्रमाणात आढळतात. असे दूध चवीला गोड लागते, पचायला हलके
असते तसेच आरोग्यवर्धक असते. असे दूध आवश्यकतेनुसार, उत्तर क्र १ मधे
सांगितलेल्या नियमांचे पालनकरून रोज प्यायला हरकत नाही.

प्रश्नं ८: वर सांगितलेले नियम नं पाळता दूध काढले असेल,उदा. गोठ्यात
बांधलेल्या गाईचे दूध काढले असेल तर त्या दुधाचे तुप किंवा दही खाल्ले तर
चालते का?

उत्तर: अगदी कमी प्रमाणात. दररोज ४०-५० मिली ताक पिता येईल.

Monday, August 27, 2012

संशोधन

१८व्या शतकात दक्षिणेतील तंजावर येथील सत्ताधीश सर्फोजी राजे भोसले (दुसरे) डोळ्यांच्या शस्त्रक्रिया करत होते, अशी माहिती नुकतीच उजेडात आली आहे. त्यामुळे भारतही याक्षेत्रात त्याकाळी मागे नव्हता, ही बाब अधोरेखित होत आहे. त्यांनी तंजावरवर १७९८ ते १८३२ या काळात राज्य केले आणि ते एक उत्तम नेत्ररोगतज्ज्ञ होते. त्यांनी अनेक प्रजाजनांच्या डोळ्यांच्या तक्रारींवर औषधपाणी तर केलेच पण अनेक नेत्र शस्त्रक्रियाही केल्याचे पुरावे आता मिळाले आहेत. 

चेन्नईतील शंकर नेत्रालयातील तज्ज्ञ, तामिळनाडूच्या पुरातत्व खात्याचे माजी संचालक आणि कांचीपुरम विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. आर. नागस्वामी यांनी काही ऐतिहासिक दस्तावेज सर्फोजी राजांचे सध्याचे वंशज एस. बाबाजी राजा भोसले यांच्याकडून हस्तगत केले. त्यात सर्फोजी राजे यांनी केलेल्या नेत्र शस्त्रक्रियांची शास्त्रीय वर्णने आणि नोंदी आहेत. या हस्तलिखितांवर आधारीत शोधनिबंध 
त्यांनी इंडियन जर्नल ऑफ ऑप्थॅल्मोलॉजी या शास्त्रीय नियतकालिकात नुकताच प्रसिद्ध केला.

या नोंदीच्या आधारे अशी माहिती पुढे आली आहे की सर्फोजी राजे धन्वंतरी महाल नावाने नेत्र रुग्णालय चालवत असत. आज ज्या ठिकाणी सेंट पीटर्स चर्च आहे त्या जागेवर पूर्वी हे रुग्णालय होते. राजांना आपल्या कामात डॉ. मॅकबीन नावाचे इंग्लिश नेत्रतज्ज्ञ मदत करत असत. राजांनी उपचार केलेल्या रुग्णांविषयीच्या नोंदी मोडी लिपीत तसेच इंग्रजी भाषेतही उपलब्ध आहेत. या विषयावरील माहिती आम्ही या वर्षी दुबई येथे भरलेल्या वर्ल्ड ऑप्थॅल्मोलॉजी कॉन्फरन्समध्ये मांडली. आजवर आधुनिक नेत्र शस्त्रक्रियांचे श्रेय युरोपीय शास्त्रज्ञांना दिले जात असे. पण ही बाब खरोखरच आश्चर्यकारक आहे की त्याच काळात भारतातील लोकही या क्षेत्रात तितकेच महत्त्वाचे कार्य करत होते, असे मत शंकर नेत्रालयाचे तज्ज्ञ डॉ. ज्योतिर्मय विश्वास यांनी व्य्कत केले. डॉ. जॅक्स डॅव्हिएल या फ्रेंच नेत्रविशारदाने मोतीबिंदूवरील प्रभावी शस्त्रक्रियेची माहिती सर्वप्रथम १७५२ मध्ये फ्रेंच अ‍ॅकॅडेमी ऑफ डर्जरीला सादर केली.

साधारण त्याच काळात सर्फोजी राजांच्या नोंदीत कॉर्निया, लेन्स, कंजक्टिव्हा आदि शास्त्रीय परिभाषेतील संज्ञा वापरलेल्या आढळतात. सर्फोजी राजे यांनी त्या काळी ५ ते ६० वर्षे वयोगटातील ४४ रुग्णांवर केलेल्या इलाजांची माहिती ५० हस्तलिखितांमध्ये सापडली आहे. त्यात सुईच्या साह्याने मोतीबिंदू काढणे, तसेच आज ज्याला ल्युकोमा आणि अ‍ॅमॉरॉसिस म्हणतात त्या व्याधींवरही उपचार केल्याच्या नोंदी आहेत. त्यात ९ सप्टेंबर १८२७ रोजी एका ४५ वर्षांच्या रुग्णावर केलेल्या मोतीबिंदू शस्त्रक्रियेच्या आणि १५ ऑगस्ट १८२७ रोजी एका १५ वर्षे वयाच्या मुलीच्या जंतुसंसर्ग झालेल्या डोळ्यांवर केलेल्या शस्त्रक्रियेचे उल्लेख आहेत.

या उपचारांत निळी गोळी, जळू, एरंडाचे तेल, रेवाचिनी (रूबार्ब) चूर्ण अशा भारतीय औषधींबरोबरच खडूचे चूर्ण, पेपरमिंटचा द्राव, सिल्व्हर नायट्रेट यांसारख्या युरोपीय द्रव्यांचाही वापर केल्याच्या नोंदी आहेत. निळी गोळी नावाने उल्लेख असलेल्या देशी पदार्थाचे नेमके स्वरूप आता माहित नसले तरी जंतुसंसर्ग कमी करण्यासाठी आणि वेदनाशामक म्हणून त्याचा व्यापक आणि प्रभावी वापर होत असल्याचे दिसून आले आहे. डोळ्यांची सूज उतरवण्यासाठी आणि शस्त्रक्रियेनंतर वेदना शमवण्यासाठी जळूंचा वापर केला जात असे. बरे होऊन घरी परतताना रुग्णाला शस्त्रक्रियेसाठी संमती दिल्याबद्दल आणि प्रकृतीत सुधारणा झाल्याबद्दल इनाम म्हणून २ रुपये दिले जात, अशाही नोंदी सापडल्या आहेत.

Tuesday, June 12, 2012

परीक्षेच्या उंबरठ्यावर....!

चौथी स्कॉलरशिप ते दहावी, बारावी, स्पर्धात्मक परीक्षा घराच्या उंबरठय़ापर्यंत येऊन पोहोचल्या आहेत. सध्याच्या स्पर्धेच्या युगात मार्काच्या आंधळय़ा शर्यतीत भाग घेतल्यावाचून पर्याय नाही. मग मुलांच्या मागे अभ्यासाचा धाकदपटशा लावायचा की नाही? या संभ्रमात सध्या तमाम पालकवर्ग आपले शरीर, मन, भावनिक आरोग्य हरवून बसला आहे. ३० ते ४५ वर्षे या वयोगटातील स्त्री-पुरुषांना उच्च रक्तदाब, निद्रानाश, पोटाच्या वाढत्या तक्रारी (मनो-कायिक आजारांना) तोंड द्यावे लागत आहे. यासाठी पालकांनी स्वत: संयम बाळगणे, आवश्यक आहे तरच ते आपल्या पाल्याची परीक्षेची पूर्वतयारी करून घेऊ शकतील.
आयुर्वेदाच्या माध्यमातून या काही टिप्स :
विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी परीक्षा जवळ आल्या की स्वाभाविकच अभ्यासाचा ताण वाढतो आणि रात्रीची जागरणे आणि अभ्यासाचे वाढते तास मुलांच्या शरीर-मनावर तणाव निर्माण करतात. त्यातून क्लासेसचे दडपण असेल तर विचारायलाच नको. हा ताण कमी करायचा असेल तर त्यासाठी पुढील गोष्टींची पालकांनी काळजी घ्यावी. विद्यार्थ्यांना सकाळी लवकर उठून अभ्यास करण्याचे महत्त्व पटवून द्यावे. सूर्योदयाच्या सुमारास बाह्य वातावरणातून मेंदूला आपोआपच तरतरी, एकाग्रता, कार्यक्षमता वाढवण्याचे रसायन मिळत असते, त्याचा फायदा घ्यावा.
संपूर्ण शरीराला तिळाच्या तेलाचा हलकासा मसाज शरीर-मनाला उभारी देतो, थकवा कमी करतो, आजारांविरोधी प्रतिकारक्षमता वाढवतो.
नाकात गाईच्या तुपाचे २-२ थेंब लावल्याने सर्दीपासून संरक्षण होते, नाकाच्या आतील त्वचेचे प्रदूषणविरोधी काम सुरू राहते.
तळपायाला व केसांना रोज मसाज केल्याने डोळय़ांचे आरोग्य सुधारते.परीक्षा जवळ आल्या असल्या तरी विद्यार्थ्यांनी नियमित व्यायाम करणे, निदान सूर्यनमस्कार घालणे अपरिहार्य आहे, कारण व्यायामामुळे आळस दूर होतो.
तुळस, ज्येष्ठमध अशा वनौषधींचा वापर प्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी करता येतो.
परीक्षांच्या काळात मुलांची झोप हमखास वाढते. अशावेळी खोटी झोप म्हणजेच आळस ओळखून पिण्यासाठी गरम पाण्याचा वापर, आठवडय़ातून एकदा एरंड तेल किंवा सुंठीचे तज्ज्ञांच्या सल्ल्याने चाटण द्यावे.
जेवणात मिठाई अरबट-चरबट पदार्थ, ब्रेड, मैद्याचे पदार्थ, बाहेरचे खाद्यपदार्थ देणे टाळावे. पिण्याच्या पाण्यासंदर्भात योग्य काळजी घ्यावी.
मुलं आजारी पडल्यास लगेचच तज्ज्ञांची मदत घेऊन योग्य औषधोपचार करावे. घरातील वातावरण :घरातील वातावरणाचा मुलांच्या अभ्यासावर परिणाम होत असतो. त्यामुळे पालकांनी या काळात परस्परांतील मतभेद, वादविवाद दूर ठेवावे.
टीव्ही, कॉम्प्युटर बंद असे ओरडत पालकांनी रुद्रावतार धारण केला तर भीतीमुळे मुलांच्या मेंदूतील स्रवांवर परिणाम होतो. परिणामी स्मरणशक्तीही कमी होते. म्हणून टीव्ही, कॉम्प्युटरसाठी किती वेळ द्यावा याचं महत्त्व मुलांना संवादातून पटवून द्या.
वेखंड, गुग्गुळ, अगुरू, धूप इ. वनौषधी धुपनाने घरातील वातावरण पवित्र आणि सकारात्मक बनवण्याचा प्रयत्न करावा. लक्षात ठेवा खेळीमेळीच्या आणि आनंदी वातावरणाचा अभ्यासावर चांगला परिणाम होतो.
औषधे व रसायनांचा उपयोग :प्रत्येक मुलाची स्मरणशक्ती, ग्रहणक्षमता, धारणक्षमता त्याच्या प्रकृतीवर आणि क्षमतेवर अवलंबून असते. योग्य वाढीसाठी उत्तम आहार, विहार, योगसाधना यांची मदत घ्यावी.
गाईचे दूध, तूप, ब्राह्मी, ज्येष्ठमध, अश्वगंधा, मण्डूकपर्णी, वेखंड इ. औषधी आणि रसायन द्रव्ये मन तसेच भावभावनांवरचे तणाव कमी करून अभ्यासात स्थिरता वाढवतात. तज्ज्ञांच्या सल्ल्याने त्याचा वापर करून घ्यावा.

- डॉ. जितेश प्र. पाठक
आयुर्वेदाचार्य:
http://www.facebook.com/drjiteshpathak

Saturday, April 14, 2012

नोकरी करणाऱ्या स्त्रिया व त्यांचे आरोग्य

जे काही सामिजिक बदल घडले, घडत आहेत त्याचा परिपाक म्हणून पुरुषाच्या बरोबरीने स्त्रियांनी देखील नोकरी करावी हि प्रत्येकाची इच्छा असतेच व कुटुंबाच्या आर्थिक स्थैर्यासाठी त्याची आवश्यकता देखील भासते.

स्त्रिया तुलनेने नाजूक प्रकृतीच्या असल्यामुळे त्यांना बाहेरील नोकरीचे कष्ट व त्याच बरोबर स्वतःच्या घरातील श्रम हे दोन्हीही आपल्या क्षमतेपेक्षा अधिक पडतात. म्हणूनच त्यांचे आरोग्य बिघडण्याची अधिक शक्यता असते. तसेच स्त्री ही आपले घरकुल सांभाळणारी प्रमुख जबाबदार व्यक्ती असल्याने तिचे आरोग्य बिघडल्यास त्याचा परिणाम सर्व घरावर होऊ शकतो. म्हणूनच नोकरी करणाऱ्या स्त्रीयाच्या कुटुंबीयांनी व स्वतः स्त्रीने स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणे अधिक गरजेचे आहे. 

नोकरी कुठलीही असली तरी स्त्रीला आपली नाजूक प्रकृती, मासिक पाळी, विवाहपूर्व काळ, विवाह पश्चात काळ, गर्भारपण, बाळंतपण, रजोनिवृत्ती या शारीरिक बदलत्या परीस्थितीना तोंड द्यावेच लागते.

गर्भारपण व बाळंतपण यासाठीची मिळणारी रजा संपल्यावर स्त्रीला लगेचच नोकरीला पुन्हा जायचे असते. या काळात योग्य उपचार व आवश्यक विश्रांती न मिळाल्यास शरीराची झीज भरून येत नाही आणि सांध्याचे विकार, स्थूलता अशा अनेक समस्यांनी स्त्री ग्रासली जाते. 

अंगावर दूध पिणारे बाळ घरी टाकून जावे लागत असल्याने स्त्रीची मानसिक ओढाताण होते. स्तनात दूध साठून नंतर त्याचे इन्फेक्शन इ. त्रास देखील होतो.

चाळीशीनंतर शरीरात हार्मोनल बदल घडून मासिक पाळी नैसर्गिक रित्या थांबते त्यास रजोनिवृत्ती असे म्हणतात. या काळात मन नाजूक बनते. व अशातच सेवा जेष्ठतेने नोकरीच्या अनेक महत्वाच्या जबाबदारया त्या स्त्री वर पडतात.

घ्यावयाची काळजी -
आयुर्वेद शास्त्रा नुसार वाताज, पित्तज, कफज अशा तीन प्रकृती आहेत. आयुर्वेद तद्याकडे जाऊन आपली प्रकृती तपासून त्या अनुसार आहार, विहार व उपचार घ्यावेत. 

काम करताना आपण विविध ढबीत बसून बघावे व त्यानंतर ठरवावे की, नेमक्या कोणत्या ढबीत बसल्यावर आपला देह हा अवघडला जात नाही.
पाठीस पोक न काढणे, अंधारात काम न करणे, खूप पूढे वाकून बसून काम न करणे, पायावर पाय टाकून न बसणे, जर काँप्युटरवर काम करताना ऍडजेस्टेबल खुर्चीचा वापर करावा. आपण काम करताना ज्या खूर्चीवर बसतो, ती आपल्या कंबरेखालील भागास आधार देणारी हवी. आपल्या कंबरेस जर आधार मिळत नसेल, तर कुशन ठेवून तो द्यावा.
जर लघवीस लागली, तर शक्यतो ती दाबून ठेवू नये, कारण यामुळे देखील काही अपाय होऊ शकतो.
जेवण गरम राहील अशा टिफिनमध्ये न्यावे. यात हिरव्या भाज्या, दही डाळ इ. समावेश असावा. सारखा चहा, कॉफीवर जोर देवू नये. तसेच चहाबरोबर खाण्यास मोडावलेली कडधान्ये (उदा. मूग,मटकी, सोयाबीन्स्‌) न्यावीत.
काँप्युटरवर वा टाइपरायटरवर काम करणार्‍या स्त्रियांनी नेहमी लक्षात ठेवावे की, हातांना खूप ताण बसून देऊ नये. हात थोडे ढिले सोडून व हलक्या हातानेच टाइप करावे.
जेव्हा बसाल, तेव्हा आपली कंबर, गुडघे, पायांच्या पोटर्‍या यावर दाब पडेल, अशा प्रकारे बसणे टाळावे. हात व पायांची बोटे हालत राहतील, असे काम करावे.


- डॉ. जितेश प्र. पाठक 
आयुर्वेदाचार्य 
http://www.facebook.com/drjiteshpathak


  • 8275007220
  • 9960507983

Monday, January 9, 2012

कर्करोग विरोधी आहार विहार

नवीन संशोधनांनी आपल्या कर्करोग संबंधातील प्रतिबंधात्मक काळजी आणि उपचार या संबंधातील विचारात अनेक मुलभूत बदल केले आहेत. आपल्या खाद्यपदार्थातील काही पदार्थ हे कर्करोगाची वाढ करण्यास किंवा वाढीला प्रोत्साहन देण्यात नक्की वाटा उचलतात हे आता नक्की समजले आहे, तर काही पदार्थ हे त्याच्या वाढीवर नियंत्रण घालतात किंवा आळा बसवितात हे देखील सिद्ध केले आहे. संशोधनांनी असे लक्षात आले आहे की, किमान ३५% कर्करोगांमध्ये आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी, विशेषत: ज्यात जास्त प्रमाणात स्निग्ध पदार्थ आहेत असे व प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ यांचा विपरीत परिणाम होत असतो. आपल्या खाद्य-सवयी बदलल्या तर यातील अनेक कर्करोग नियंत्रित करता येतील असा विश्वास संशोधकांनी व्यक्त केला आहे.

कर्करोग नियंत्रण आणि उपचार करणाऱ्या संस्थांच्या मते कर्करोग हे जगात मृत्यूचे दुसऱ्या क्रमांकाचे कारण आहे.
शरीरातील अवयवांमध्ये पेशींची अनियंत्रित वाढ म्हणजे कर्करोग असे सामान्यत: म्हणता येईल. या वाढीची सुरवात, एखाद्या विशिष्ठ रसायनामुळे, एखाद्या विषाणू (व्हायरस) मुळे, वातावरणीय विषारी पदार्थामुळे ज्यांना एखाद्या विकासकांनी आणखीन घातक वळण दिले आहे, जसे आपल्या शरीरातील हार्मोन्स किंवा खाद्यपदार्थ. आपली जीवन पद्धती, विशेषत: खाद्य-सवयी कर्करोगाच्या नियंत्रणामध्ये फार महत्वाचा घटक आहे. कर्करोगाची घातकता कमी करण्यासाठी व तो आपल्याला होणार नाही याची काळजी घेण्यासाठी वनस्पती-जन्य विशेषत: शाकाहारी आहार निवडा.

कर्करोग नियंत्रक आहार:

फळे आणि भाज्या यांचा आहारातील वापर वाढवा...

अ. आहारात भाज्या आणि फळे यांचा वापर मोठ्या प्रमाणात असेल तर त्याने अनेक घातक कर्क-रोगांना आपोआपच खीळ बसेल. भाज्या व फळे, बायो-फ्लेवोनॉईडस व इतर वनस्पतीजन्य रसायने, फायबर, फॉलेट, व अँटिऑक्सिडंट्स (बिटा-कॅरोटीन आणि क जीवनसत्व) यांनी समृद्ध असतात. या सर्व पदार्थांनी कर्करोग वाढ होण्याची प्रक्रिया कमी किंवा बंद होते. फळे आणि भाज्या यांत अनेक अशी रसायने, न्युट्रीयंट्स जसे जीवनसत्व, फायटो-रसायने किंवा इतर वनस्पती जन्य रसायने असतात ज्यामुळे कर्करोगावर नियंत्रण ठेवता येते.

आ. या न्युट्रीयंट्स मुळे काही प्रकारच्या कर्क-रोगांना पायबंद घालता येऊ शकतो. कृसिफेरस भाज्या जसे, कांदा, लसूण्‍, ब्रोकोली व कॉलीफ्लॉवर आणि आंबट फळे जशी, ग्रेप-फ्रुट आणि संत्री, रास्पबेरी, स्ट्रॉ-बेरी, ब्लॅक-बेरी अशा विविध बेरीज, हिरव्या पालेभाज्या जसे पालक इ. यांचा आहारातील समावेश वाढवा. दिवसाकाठी ५ ते ९ सर्विन्गज या प्रमाणात कच्ची फळे आणि भाज्या आहारात घ्या.

इ. यातील उपयुक्त रसायने कर्करोग वाढीसाठी उपयुक्त असलेल्या पेशींचा नायनाट करून किंवा त्यांना निष्क्रिय करून आपले कार्य करीत असतात. (by preventing precancerous changes in cellular genetic material due to carcinogens by inducing the formation of protective enzymes -).(रक्षक/नियंत्रक  एन्झाईम्स ची ऊत्पत्ती केल्याने ते शरीरातील पेशींमधील जनुकीय(जेनेटिक) घटकांमधे कार्सिनोजेन्स (कॅन्सर उत्पादक घटक) मुळे होणारे कॅन्सरपूर्वीचे  बदल्‍ नियंत्रित करू शकतात.शरीरातील डीएनए च्या तंदुरुस्ती साठी आणि दुरुस्ती साठी फोलेट हे खास करून कार्य करीत असते.

विविधरंगी फळे आणि भाज्या खा :

फळे आणि भाज्या यांच्यातील विविध रंगद्रव्य आणि रसायने, ज्यांनी भाज्या आणि फळांना आकर्षक रंग प्राप्त होतात ते देखील कर्क रोगांशी प्रतिकार करण्यात मदत करीत असतात. आहार तज्ञ आता किमान ३ वेगवेगळ्या रंगाच्या भाज्या आणि २ रंगांची फळे आहारात समविष्ट करावी असे सांगतात. गर्द-हिरव्या पालेभाज्या, तसेच गर्द-पिवळी, नारिंगी आणि लाल फळे व भाज्या यांचा आहारात समावेश असावा. किमान एक सर्व्हिंग क जीवनसत्व युक्त फळे (लिंबू जातीची - मोसंबी, नारिंगी इ.) आणि कृसिफेरस भाज्या आहारात असणे आवश्यक आहे.

अनेक फळे आणि भाज्यांमध्ये एकापेक्षा जास्त प्रकारच्या कर्क-रोगांशी लढण्याची शक्ती असतेखालीएक विविध फळे आणि भाज्या यांची यादी दिली आहे :

-जीवनसत्व युक्त :

आंबट जातीची फळे, स्ट्रॉ-बेरीज, आंबा, मोड आलेली धान्ये, कॉलीफ्लॉवर व बटाटा.

बिटा-कॅरोटिन युक्त :

आंबट जातीची फळे, रताळी, गाजर, लाल-भोपळा, पपई, आंबा आणि ओला-जर्दाळू

तंतुमय पदार्थ :

मका, कडधान्ये, ब्रोकोली, मोड आलेली धान्ये, सालासकट बटाटा, गाजर, सफरचंद, बेरीज आणि अंजीर

फोलेट युक्त पदार्थ :

हिरव्या पालेभाज्या जसे पालक, संत्र्याचा रस इ.

 जीवनसत्व युक्त पदार्थ :

ड जीवनसत्व हे कर्करोग प्रतिबंधात महत्वाची भूमिका पार पाडत असते. सूर्यप्रकाश हा ड जीवनसत्वाचा अतिशय चांगला स्रोत आहे हे आपण सारेच जाणतो. आपले शरीर हे, सूर्य प्रकाशातील अतिनील किरणांपासून अतिशय पटकन आणि उपयुक्त पद्धतीने आपल्याला ड आणि ड३ जीवनसत्व, अगदी काही दिवसांत उपलब्ध करून देण्यासाठी बनलेले आहे. सूर्यप्रकाशा बरोबरच आहारात देखील ड जीवनसत्व युक्त आहार घेणे उपयुक्त ठरते हे सिद्ध झाले आहे. या मध्ये अ आणि ड जीवनसत्व असलेले दूध (फॉर्टिफाईड दूध), कडधान्ये, फळांचा रस, आणि ज्यात नैसर्गिक रित्या ड जीवनसत्व जास्त प्रमाणात आहे असे पदार्थ जसे अंडी, मासे, यांचा समावेश आहारात करावा.

क्रमश: - पुढील लेखात कर्करोगाशी मुकाबला करू शकणाऱ्या आणखी अन्नपदार्थांची माहिती करून घेऊ...

संदर्भ:
१. रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्र : मृत्यूची मुख्य कारणे...
२. अमेरिकन कर्करोग सोसायटी : कर्करोग नियंत्रण आहार नियमावली
३. राष्ट्रीय कर्करोग संस्था : कोम्पिमेंतरी व पर्यायी औषधे - वार्षिक अहवाल
४. राष्ट्रीय कर्करोग संस्था : ड जीवनसत्व व कर्करोग प्रतिबंध - शक्तीस्थळे आणि मर्यादा
५. जर्नल ऑफ क्लिनिकल न्युट्रिशन : ड जीवनसत्वाचे कर्करोग प्रतिबंधातील महत्व
६. साधक व बाधक आहार

विशेष टीप : शास्त्रीय संशोधनांतून अजून अमुक एक पदार्थ कर्करोगाशी मुकाबला करू शकतो, किंवा कर्करोग नियंत्रण करू शकतो असे निश्चित सिद्ध झालेले नाही. तथापि, विशिष्ठ पदार्थ आहारात समाविष्ट केल्यास सर्वसाधारण प्रकृतीस्वास्थ्याबरोबरच कर्करोग नियंत्रण होऊ शकते…डॉक्टर अमिता पुरोहित




विराज नाईक यांनी केलेला मराठी अनुवाद...

DrAmita Kulkarni Purohit

http://www.facebook.com/purohitamita

 

Saturday, December 31, 2011

॥ शंख भस्म ॥

शंख भस्म( १-३ गुंजा )

प्रकार ?
=>
द्विधा स दक्षिणावर्तो वामावर्तो...     (र.चं)

ग्राह्य ?
=>
द्विधा स दक्षिणावर्तो वामावर्तो शुभेतरः ।
अशुद्धो गुणदो नैव शुद्धश्च स गुणप्रदः ॥

दक्षिणावर्त शंख शुभ असतो.
अशुद्ध     अग्राह्य
शुद्ध     ग्राह्य

शंखशुद्धी ?
=>
अम्लैः सकांजिकैः च एव दोला स्विन्नः स शुद्धति ॥    (र.चं)

अम्लैः     =    निम्बूरस,इ.
कांजि    =    कांजी
दोला    =    दोलायंत्र
स्विन्न    =    शिजवणे
किती वेळ ?    =    १ प्रहर

शंखभस्म निर्माण ?
=>
१.    वन्हौ प्रोत्फुल्लयेत्‌
किंवा
२.    सम्यक्‌ लघुपुटे पचेत्‌ ।

शुद्ध शंख भस्म स्वरुप ?
=>
कुन्दवत्‌ जायते भस्म    सर्वरोगेषु योजयेत्‌ ।

==========================================॥

वृद्ध वैद्याधार से शंख भस्म निर्माण की कृती =>

दक्षिणावर्ती शंख ले । यह शुभ होता है ।
इस शंख के टुकडे कर ले ।
निम्बु रस में इन टुकडो को २४ घण्टे भिगोके रखे ।
स्वच्छ जल से प्रक्षालन कर ले ।
धूप में सुखोए ।
मृत्तीकापात्र में रख मातकापड कर गजपुट दे ।
स्वांगशीत होने दे ।
उस में कुमारी स्वरस डाल अच्छी तरह मिश्रण करे ।
धूप में सुखोए ।
सुखने पर फिर से गजपुट दे ।
इससे संगजिरे जैसा श्वेतवर्णी एवं सूक्ष्म मृदुस्पर्शी शंख भस्म प्राप्त होता है ।
==========================================॥

ग्रंथोक्त गुणधर्म=>

शंखक्षारो हिमो ग्राही ग्रहणारेकनाशनः ।
नेत्रपुष्पहरो वर्ण्यः तारुण्यपिटिकाप्रणुत्‌ ।
दक्षिणावर्तशंखस्तु त्रिदोषघ्नः शुचिर्निधिः ॥
ग्रह-अलक्ष्मी-क्षय-क्ष्वेडम्‌-अतिक्कक्षयाक्षमीः ।
(यो.र.)

==========================================॥

शंखभस्म यह शंख क्षार ही है ।

क्षार के काफी सारे गुणधर्म इस में आयें है ।
शंखभस्म  एवं कपर्दिक भस्म इनमें काफी गुणसादृश्यता है ।
दोनोही सेंद्रिय चुनखडीके कल्प है ।
पर इन्हमें शंख के कुछ विशेष गुण भी है । उनका उल्लेख आगे किया जायेगा ।

शंख भस्म ग्राही है । यह स्तंभन करता है । इसलिये अतीसार विशेषतः पक्वातीसार में उपयुक्त होता है ।
ग्रहणी व्याधी में बार बार द्रवरेच होते हो तो विशेष उपयुक्त ।
[ सशूल (कोष्ठशूल) सद्रव अल्पाल्प मल प्रवृत्ती ] यह उत्तम अवस्था है शंख भस्म के उपयोग के लिये ।

शंखोदर योग = { शंखभस्म + टंकण भस्म + अफू + जायफळ } = पक्वातीसार का योग ।

पित्तज कोष्ठशूल
पित्तज अतीसार
कफ-पित्तज कोष्ठशूल

विष्टब्ध/विदग्ध अजीर्ण

लक्षणानि    =>
    आध्मान
    आनाह
    शूल    =    तडक निघाल्याप्रमाणे वाटते.
    कोष्ठ स्तैमित्य    =    अन्न स्थिर पडल्याप्रमाणे वाटते
    विदग्ध उद्गार    =    करपट ढेकर
    मधुर उद्गार    =    गोड ढेकर

शंखभस्मस्य कार्य  
चिकित्सा तत्व    =>    उदर आध्मान नाश
                             अन्न पाचन वृद्धी
                             उदरस्थ वात शमन

अपक्ति जन्य उदरशूल
    स्थान        दोष    चिकित्सा अनुपान
१.    आमाशय    =>    पित्तज    => @ गोघृत
२.    पक्वाशय    =>    वातज    => @ निम्बु स्वरस

रसाजीर्ण / रसशेषाजीर्ण !

अनार्ह     =>    पित्त प्रकृती रुग्ण !

यकृत-प्लिहा दुष्टी समुत्पन्न विकार     =>    क्षारो हि याती माधुर्यम्‌ ।

यकृत्‌-प्लिहा वृद्धि        =>    क्षारो हि याती माधुर्यम्‌ ।
+ मलावष्टम्भ            =>    + विरेचक औषध देणे.

उदरस्थ गुल्म
अष्ठीला    

कालज अतीसार
विषूचिका
जंतुज विषूचिका (कॉलरा)        प्रारंभिक तीव्र वेग उपशमानंतर वापर उपशयकारक.
लक्षणानि    =>    द्रवरेच , छर्दी उपशय
        अल्प द्रवरेच + दौर्बल्य
चिकित्सा    =>    शंखभस्म + माक्षिक भस्म

नेत्र फूल पडणे    =>    रोपणधर्मी म्हणून उपयुक्त.

तारुण्यपीटिका    =>    उत्तम औषध.

दोषघ्नता    =>    पित्त
दूष्य    =>    रस रक्त अस्थिअ
स्थान गामित्व    =>    यकृत्‌ प्लिहा उदुंक ग्रहणी पक्वाशय नेत्र मुख

संदर्भ आयुर्वेदीय औषधिगुणधर्मशास्र भाग १ ते ५

http://www.facebook.com/waghmare.prashant
वैद्य प्र. प्र. व्याघ्रसूदन

  • 9867888265




Sunday, October 30, 2011

उतारवयात अनुभवा कामजीवन!

कामजीवन ही केवळ तरुणाईची मक्तेदारी आहे, हा एक सर्रास गैरसमज आहे. आपल्याकडील संवेदनशील सांस्कृतिक जडणघडणीमुळे हा चुकीचा प्रवाद पसरला आहे. वार्धक्यातही जोडप्यांना कामसुखाची गरज असते. कामक्रीडांमुळे शरीराचे विविध व्यायाम घडून येतात. संशोधकांना आढळलंय की कामजीवनाचं सौख्य लुटणाऱ्या वयोवृद्ध जोडप्यांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचं प्रमाण ५०० टक्क्यांनी कमी असतं.

... 

साठीकडे झुकल्यावर माणसाची कामातुरता कमी होते, हा एक सर्रास गैरसमज आहे. अमेरिकेत एकदा ५० ते ९२ वयोगटातील ४३४६ स्त्री-पुरुषांचं सवेर्क्षण घेण्यात आलं होतं. तेव्हा, साठी-सत्तरीतल्या वृद्धांनी स्पष्ट कबुली दिली होती की, त्यांचं कामजीवन सुरळीत चालू असून, त्यात त्यांना खूप रस वाटतो. ही सगळी शिकली सवरलेली मध्यमवगीर्य मंडळी होती. खरंतर वृद्धापकाळातही कामजीवन आपणास साथ देतं, हे वास्तव तरुण मंडळींनाही उत्साहवर्धक वाटणारं आहे. या सवेर्क्षणात, अडतीस वर्षं संसार केलेली बाई म्हणाली होती, 'माझा नवरा बाहेरून परत येणार असतो, तेव्हा मी त्याची आतुरतेनं वाट पाहत बसते. फोनवर त्याचा आवाज ऐकला किंवा त्याने घातलेली शीळ ऐकली की माझ्या अंगावर रोमांच उभे राहतात.'

सदुसष्ट वर्षांचे एक गृहस्थ म्हणाले होते, 'शाळेत असताना आम्ही प्रेमात पडलो अन् सरत्या काळात आमचं प्रेम वाढत गेलं. अजूनही आमच्या प्रेमाचा आलेख वर वर चढतोय.' आणि त्या सर्व प्रौढ दाम्पत्यांनी आपल्या संसारसुखाचं श्ाेय त्यांच्या निरामय कामजीवनास दिलं होतं.

वाढत्या वयानुसार माणसाच्या जिभेची चव, श्रवणशक्ती, दृष्टी, शारीरिक ताकद कमी होते, त्या प्रमाणे कामातुरतेवरही परिणाम होत असतो. शिवाय हृदयविकार, मधुमेहासारखे आजार त्यांच्या कामजीवनात अडथळे बनतात. पण या आजारांमुळे कामशक्ती ऱ्हास पावते असं मात्र मुळीच नाही.

कामजीवन ही केवळ तरुणाईची मक्तेदारी आहे, हा एक सर्रास गैरसमज आहे. आपल्याकडील संवेदनशील सांस्कृतिक जडणघडणीमुळे हा चुकीचा प्रवाद पसरला आहे. वार्धक्यातही जोडप्यांना कामसुखाची गरज असते. कामक्रीडांमुळे शरीराचे विविध व्यायाम घडून येतात. संशोधकांना आढळलंय की कामजीवनाचं सौख्य लुटणाऱ्या वयोवृद्ध जोडप्यांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचं प्रमाण ५०० टक्क्यांनी कमी असतं. नियमित वीर्यपात होणाऱ्या पुरुषांचा मूत्रनलिकेतील प्रोस्टेट ग्रंथीच्या कर्करोगापासून बचाव होतो. कामसुखामुळे वयोवृद्धांच्या शरीरातील रक्तदाबावर अनुकूल परिणाम होतो. शरीराचे मांसल स्नायू कार्यरत राहतात. संप्रेरकाचं सवण नियंत्रित राहतं आणि शरीरातील विविध ग्रंथींची पुनर्रचना होण्यास मदत होते.

इंग्लंडमधील रॉयल एडिनबर्ग इस्पितळातील डॉ. डेव्हिड क्लिस यांनी १९ ते १०२ वयोगटातील ३५०० जणांचं शास्त्रोक्त सवेर्क्षण केलं होतं. तेव्हा त्यांना आढळलं होतं की आठवड्यातून तीनदा समागम करणारी मंडळी कामसुखापासून वंचित होणाऱ्या मंडळींपेक्षा तुलनेने १० वर्षांनी तरुण दिसतात. तारुण्याच्या टिकाऊपणासाठी आनुवंशिकता केवळ २५ टक्के कारणीभूत असते, बाकी सर्व त्यांची स्वभाववैशिष्ट्यं आणि वागणुकीवर अवलंबून असतं. कामसौख्यामुळे प्रौढांच्या मनावरचा ताण सैल होण्यास मदत होते. तसंच इण्डोफिर्नसारखी वेदनाशमक जीवरसायनं शरीरात निर्माण होतात. याशिवाय, कामसुख लुटताना शरीरात उत्पादित होणाऱ्या ऑक्सिटोसिन या रसायनामुळे पती-पत्नीतील एकोप्याची भावना वाढते आणि जोडप्यात सुसंवाद होऊन त्यांच्यातील जीवनबंध घट्ट होत असतात.

अलीकडेच, स्वित्झर्लण्डमध्ये आयोजित करण्यात आलेल्या वृद्ध जोडप्यांच्या सवेर्क्षणात, पुन्हा एकदा, म्हाताऱ्या मंडळींमध्ये वाढणाऱ्या कामातुरतेवर शिक्कामोर्तब झालं आहे. अन् साठीनंतरचा काम ही काही पाश्चिमात्य लोकांची मक्तेदारी नाही, हे आपल्याकडील डॉक्टरमंडळींच्याही ध्यानी आता आलं आहे. हृदयावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर आपली कामशक्ती लय पावणार नाही ना, या शंकेने त्रस्त झालेले हृद्रोगी आहेत. म्हातारपणी होणाऱ्या पाकिर्न्सन आजारात खाल्लेल्या औषधांमुळे कामवासना वाढलेल्या आजीबाईही आहेत. इतकंच काय, हृदयाचा झटका आला तरी बेलाशक पण व्हाएग्रा वापरून लिंग ताठरता प्राप्त करून घेणाऱ्या आजोबांची उदाहरणंही आहेत.

आयुष्यातील मध्यमवयात खाणंपिणं भरपूर वाढलेलं असतं आणि थकवा येणं ही परिस्थिती बहुसंख्य लोकांच्या बाबतीत असते. स्पर्धामय जीवनात सामाजिक, आथिर्क स्तर उंचावण्याच्या धडपडीत आपण नकळत आरोग्याला गहाण टाकत जातो आणि लैंगिक जीवनाच्या सुदृढतेवरही मोठा आघात करत असतो. सर्वसाधारण: आपल्याकडील समाजात लग्न झालं, मुलंबाळं झाली की सर्व संपलं असा समज करून स्त्रिया आपलं जीवन आचरण सुरू करतात. त्यांचा वस्त्रप्रावरणांबद्दलचा नीटनेटकेपणा हरवतो. शरीराच्या आकारमानावरील ताबा सुटतो. या आणि अशा दुर्लक्षित बाबींमुळे पती-पत्नीतील आकर्षण कमी होऊ शकतं. हे आकर्षण जपून ठेवणं म्हणजे 'निज शैशवा'स जपून ठेवण्यासारखं आहे. शिवाय, शक्य तेवढं वाचन करून ज्ञानवृद्धी करणं, आपल्यातील कलागुणांचा विकास करणं यांसारख्या गोष्टींद्वारे पतीपत्नीने वैचारिकदृष्ट्या जवळीक साधली तर त्यांच्यातील आकर्षण सतत वाढीस लागतं. त्यामुळे उतरत्या वयातील कामजीवन समृद्ध होण्यास हातभार लागतो, हे सांगणे न लगेच. 





जोसेफ तुस्कानो 


http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3319369.cms

आहारातून अतिसेवन

चुकून जमिनीवर सांडलेले तेल /तूप साफ करायला वेळ व श्रम बरेच लागतात आणि एवढे करूनही ते व्यवस्थित साफ होत नाही. तुमच्या आहारातील तेल/ तूपाबाबत सुद्धा हे खरे आहे.
स्निग्धघटकातून भरपूर उष्मांक ( कॅलरीज) निर्माण होतात. आहारात जर स्निग्धघटकांचे अतिसेवन असेल तर शरीराला लागणा-या उष्मांकापेक्षा कितीतरी जास्त उष्मांक शरीरात निर्माण होतात. हे जास्तीचे उष्मांक मग शरीरात वेगवेगळ्या भागात साठवले जातात. तुम्ही स्त्री आहात की पुरुष आहात यावर शरीरात स्निग्धघटक साठण्याचे प्रमाण व जागा अवलंबून असतात.

स्त्रीच्या शरीरात पुरुषांपेक्षा जास्त स्निग्धघटके साठतात आणि हे एकदम नैसर्गिक आहे. युवा पुरुषांच्या शरीरातील स्निग्धांशाचे प्रमाण त्याच्या वजनाच्या साधारण १०-१५ टक्के असते तर युवा स्त्रीमध्ये त्याच्या दुप्पट म्हणजे तिच्या वजनाच्या २० -३० टक्के असणे हे एकदम नैसर्गिक आहे. संततीचे प्रजनन व संगोपन करणे हे स्त्रीचे नैसर्गिक काम आहे. या काळात जर तिला अन्नाची कमतरता झाली तर शरीरात साठलेल्या अतिरीक्त स्निग्धांशाच्या मदतीने शरीराची गरज भागवता यावी यासाठी निसर्गाने केलेली ती सोय आहे. त्यामुळे स्त्रीच्या प्रजनन काळात “ झीरो फिगर” चा अट्टाहास हा घातक होऊ शकतो. 
शरीरात साठलेल्या या अतिरीक्त स्निग्धांशामुळे नुसते तुमचे शरीर बेडौल दिसत नाही तर तुमच्या हृदयावरही कामाचा ताण वाढतो. ५०० ग्रॅम अतिरीक्त स्निग्धांशे तुमच्या हृदयाला ३०० किलोमीटर लांबीइतक्या जास्तीच्या रक्तवाहिण्यांमधून रक्त पाठविण्याचे अतिरीक्त काम व ताण देतात.
दुसरा तोटा म्हणजे हे सगळे स्निग्धांश रक्तातून वहात असताना ते तुमच्या रक्तवाहिण्यांच्या भिंतीवरही साठत जाऊन रक्ताभिसरणाला अडथळा निर्माण करतात. यामुळे हृदयाला होणा-या रक्तपुरवठ्यामध्ये अडथळा निर्माण होऊन गंभीर स्वरुपाचा हृदयविकारा होऊ शकतो.
शरीरात स्निग्धघटक साठले आहेत किंवा नाही हे पाहण्य़ाची एक सोपी पद्धत म्हणजे तुमच्या कमरेचा घेर व दंडाची जाडी.
या दोन ठिकाणी तुम्ही हाताचा अंगठा व तर्जनी यांच्या चिमटीत जास्तीत जास्त स्नायु पकडण्याचा प्रयत्न करा. दोन सेंटीमिटरपेक्षा जास्त जाडी जर तुम्ही तुमच्या चिमटीत पकडू शकला तर याचा अर्थ तुम्ही चिमटीत पकडलेला हा भाग शिथिल स्नायु नसून कातडीखाली साठलेली चरबी आहे . म्हणजेच तुमच्या शरीरात आधीच जास्त स्निग्धघटक साठलेले आहेत व इथून पुढे स्निग्धघटकांच्या सेवनावर तुम्हाला बारकाईने लक्ष ठेवायला हवे.
ही कसोटी सर्वांना लागू होते मग तुमचे लिंग, वय काहीही असो. तुम्ही ही सोपी कसोटी करून पहा व तुम्हीच ठरवा तुम्ही लठ्ठ आहात किंवा नाही.
एकदा हे झाले की मग आहारातून किती स्निग्धघटक घ्यायचे हे ठरवा व त्यावर काळजीपुर्वक लक्ष ठेवा. 
तुमच्या आहारातील सर्वसाधारण अन्नप्रकारातील स्निग्धघटकांचे प्रमाण खालील तक्त्यात दिले आहे. त्यावरून तुमच्या आहारात सध्या किती स्निग्धघटक आहेत व किती घ्यायला हवेत याचा तुम्हाला अंदाज घेता येईल. हे प्रमाण एका वेळच्या खाण्यातील आहे.

अन्नप्रकार ( १०० ग्रॅम)स्निग्धांशाचे प्रमाण ( ग्रॅम)
उकडलेले किंवा भाजलेले बटाटे०.१
स्निग्धांशविरहीत दुधापासून बनविलेले दही०.३
वरीलप्रमाणेच बनविलेले ब्रेडस्प्रेड४.०
लोणी८.०
चपाती१०.०
मिल्कशेक१०.०
मलई१३.०
चॉकलेटची छोटी वडी१५.०
चीझ बर्गर१५.०
कठीण पनीर१९.०
भाजलेल्या मांसाचा तुकडा२०.०
कबाब किंवा सॉसेज२१.०
सामोसा२६.०

वरील तक्त्यावरून तुमच्या रोजच्या सर्वसाधारण आहारात असलेल्या एकावेळच्या खाण्यातील स्निग्धांशाचे प्रमाण समजते.
तुमची स्निग्धतेची रोजची गरज आहे ६५ ते ८५ ग्रॅम या दरम्यान. समजा तुम्ही एकदोन सामोसे व छोटा चॉकलेटचा बार खाल्लात तरी तुमची स्निग्धघटकाची रोजची गरज पूर्ण होते. म्हणजेच तुमचे रोजचे दोनवेळचे जेवण व इतर खाणे यातून मिळालेले स्निग्धघटक हे अतिरीक्त होतील व शरीरात साठून राहतील.

आहारातील स्निग्धघटकांचे प्रमाण तुम्ही कसे कमी कराल?
वरील कसोटीप्रमाणे तुमच्या शरीरात स्निग्धघटक साठून राहिले असतील तर प्रथम रोजच्या आहारातून तुमच्या शरीरात किती स्निग्धघटक जातात याचा वरील तक्त्यावरून तुम्ही अंदाज घ्या.
आता तुम्हाला स्निग्धघटकांचे आहारातील प्रमाण कमी करावे लागेल. हे कसे कराल?
प्रथम एक गोष्ट लक्षात ठेवा की आहारातून तेल/ तेल वा तत्सम स्निग्धघटक पूर्णत: बंद करणे आरोग्याला हानीकारक अहे आणि मुख्य म्हणजे तसे करण्याची गरजही नाही. आणि रोजचे दोनवेळचे जेवण कमी करण्याचीही गरज नाही. फक्त काही पथ्ये पाळा.
रोज शक्यतो घरचेच जेवण घ्या. कमी स्निग्धता असलेल्या पदार्थांचे प्रमाण वाढवा. म्हणजेच चपाती किंवा पराठा याऐवजी पुलकी खा. त्याला वरून तूप लावू नका. भाजलेले वा उकडलेले पदार्थ जास्त खा. नाश्त्याच्या वेळी तुम्ही पावावर लोणी लावीत असाल तर पुढच्यावेळेपासून त्यावर लोण्याचा पातळ थर द्या. उपहारगृहात खावेच लागले तर तळलेल्या सामोसे / वडे सारख्या पदार्थापेक्षा उकडलेल्या इडलीला प्राधान्य द्या. चीझ सॅन्डवीचपेक्षा व्हेज सॅन्डवीच खा. भाजलेले वा उकडलेले पदार्थ खा.
रोज एक ग्लास दूध पित असाल तर दुधातील स्निग्धांशाबद्दल तुम्हास माहीत असणे आवश्यक आहे.
मलईयुक्त पूर्ण दूध : २२.० ग्रॅम,
अर्धे स्निग्धांशयुक्त दूध : ११.० ग्रॅम
स्निग्धांश काढलेले दूध : १ ग्रॅम
तुमच्या शरीरातील स्निग्धांशाच्या प्रमाणाप्रमाणे यापैकी कोणते दूध घ्यायचे ते तुम्ही ठरवू शकता. तुम्ही जाडे नसाल व तुमचा आहार संतुलीत आहे आणि आहारात तेलही प्रमाणातच आहे तर तुम्ही अर्धे स्निग्धांश युक्त दूध ( ५०%) वापरू शकता.
तुमच्या आहारात तळलेले पदार्थ असतील, भातावर व पोळीवर तूप घेत असाल तर मात्र तुम्हाला स्निग्धांशविरहीत ( स्कीम्ड) दूधच घ्यावे लागेल.




http://knowaboutyourfood.blogspot.com/

Visit Our Page