Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Monday, December 14, 2015

'' मूतखडा ''

'' मूतखडा '' 

========
कोकण किनारपट्टीत नेहमी आढळणारा आजार म्हणजे मुत्रमार्ग व किडनीतील खडे/ स्टोन त्याच्या सोबतच्या गैरसमजूती बऱ्याच आहेत उदा. लक्षणावरून इतर तपास न करता मुतखड्याचे निदान करणे व त्याच्या बरोबर गावठी उपाय व गोळ्या चालू करणे एकदा निदान झाल्यावर गोळ्या किंवा गावठी उपाय वर्षानुवर्षे चालू ठेवणे ( बऱ्याच वेळा किडनीवर त्याचे दुष्पपरिणाम होवून ती काम करणे बंद होते.) सोनोग्राफी करुन घेणे व योग्य सल्ला न घेता तसेच गोळ्या चालू करणे पित्तपिशवीच्या खड्यांविषयी गोळ्या चालू ठेवण्याबाबत अशाच गैरसमजूती आढळतात. पोटात दुखत असल्यास दुखीचे इंजेक्शन घेणे. बऱ्याच वेळा मुत्रमार्गात मुतखडा अडकून भयंकर वेदना होतात त्यावेळी तपास करुन निदान न करता लोक परत परत दुखीवरचे इंजेक्शन घेत राहतात. त्यामुळे तात्पुरते बरे वाटते पण यामुळे आजार बळावून किडनीचे कार्य कमी होते, ती काढावी सुद्धा लागू शकते.
मुतखडा होणे टाळण्यासाठी काय करावे?
पाणी भरपूर पिणे.
लघवी तुंबवून न ठेवणे.
काढलेला स्टोन/पडलेले स्टोन तपासून घेऊन ते कुठच्या प्रकारचे आहे ते जाणून घेऊन त्याप्रमाणे पथ्य करावे.
मुतखड्याची लक्षणे कोणती?
पोट दुखणे.
लघवीला त्रास होणे.
लघवी तुंबणे.
कधी कधी जंतूचा होऊ व ताप येणे.
लघवीतून रक्त जाणे.
मुतखड्याचे निदान करण्यासाठी काय करावे?
लघवीची तपासणी करणे, त्यामध्ये लघवीतील रक्तपेशी व जंतंच्या प्रादुर्भावचे निदान होते.
सोनोग्राफी जी अत्यंत महत्त्वाची आहे त्यामुळे जंतूंच्या प्रादुर्भावाची लक्षणे दिसली आहेत का? किडनीला त्याचा काही त्रास आहे का? या सर्वांची उत्तरे आपल्याला सोनोग्राफीतून मिळतात पण त्याच्याबरोबर नुसती सोनोग्राफी करुन भागत नाही त्याच्याबरोबर इतर तपास, लक्षणे व सर्व रिपोर्टचा एकत्रित विचार करुन मग त्याच्यावर उपचार ठरवावे लागतात. रक्त तपासणी करुन किडनीचे कार्य कमी झालेले नाही ना हे तपासावे लागते.
एकदा निदान झाल्यावर काय उपचार करु शकतात?
उपाय हे मुतखड्याचा आकार, स्थान, जंतूचा प्रादुर्भाव किदनीला होणारा त्रास, इतर रिपोर्टस यावर अवलंबून असतात.
एक महत्त्वाची गोष्ट सांगाविशी वाटते.
काही मुतखडे निदान झाल्याझाल्या लगेच काढावे लागतात काही मुतखडे एकाद दुसरा महीना थांबून तुम्ही बघू शकता पण त्यावर लक्ष ठेवावे लागते. ते विरघळले आहेत का? हे अधून मधून बघावे लागते. तर काहींना काहीच करावे लागत नाही. वरील निर्णय घेण्यासाठी / युरोलॉजिस्टचा सल्ला घेणे आवश्यक ठरते.
कारणे, लक्षणे व आहार
१) अनुवंशिकता- मूत्रपिंडात असलेले काही आजार हे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीत जातात व त्यामुळे मुतखडा तयार होतो. उदा. रीनल टयुब्युलर अ‍ॅसिडॉसीस, सीन्टीन्युरीया इ.
२) वय आणि लिंग- वयाच्या पंचेचाळीस ते चाळीस या गटात मुतखडा होण्याचे प्रमाण जास्त असते. पुरुषांध्ये असलेल्या टेस्टेस्टेरान या हारमोनमुळे लीव्हरमध्ये आक्ससेटचे प्रमाण वाढते व मुतखडा होण्याचे प्रमाण पुरुषांध्ये जास्त आढळते.
३) विविध प्रदेश- वातावरणातील तापमान व दमटपणा यांच्या परिणामामुळे विविध प्रदेशामध्ये मुतखड्याचे प्रमाणे कमी आढळून येते. डोंगराळ व अधिक तापमान असणाऱ्या
प्रदेशांध्ये याचे प्रमाण जास्त असते. उदा. युनायटेड स्टेट्स, ब्रिटन, नार्थ इंडिया, पाकिस्तान, नार्थ ऑस्ट्रेलिया, चीन इ. महाराष्ट्रात मराठवाडा व विदर्भ भागात याचे प्रमाण तुलनात्मक जास्त आढळते. त्या त्या प्रदेशातील आहार व सवयी याचाही परिणाम यावर होतो.
४) पर्यावरण- अतिउष्ण वातावरणात श्वाच्छोश्वासचे प्रमाण वाढते व त्यामुळे लघवीचे प्रमाण घटते ,व यामुळे मुतखडा बनण्याची प्रक्रिया चालू होते.
५) पाण्याचे प्रमाण- पाण्याच्या भरपूर प्रमाणात वापर (दररोज ३ लीटरपेक्षा जास्त पाणी पिणे) व लघवी भरपूर होण्यामुळे मुतखडा होण्याचे प्रमाण कमी होते. पाणी खुप पिल्यामुळे मुतखड्याचे लहान क्रिस्टल बाहेर फेकले जातात आणि मुतखडा बनण्यासाठी पाहिजे तो वेळ त्यांना मिळत नाही. जास्त क्षमता क्षारयुक्त असलेले पाणी पिण्याचे देखील मुतखड्याचे प्रमाण वाढते. उदा. बोअरचे पाणी.
६) आहार- आहार हा मुतखडा तयार होण्याचे एक महत्त्वाचे कारण आहे. वेगवेगळ्या प्रातांत तयार होणारे अन्नधान्य व भाज्या व त्यातील क्षारांचे प्रमाण याचाही यावर परिणाम होतो. आहारात कॅल्शियम, युरीक अ‍ॅसीड, ऑक्सलेट व इतर क्षार असलेले पदार्थाचे प्रमाण जास्त झाल्यास त्यांचे लघवीतील प्रमाण वाढते व मुतखडा तयार होतो. पंजाबमध्ये मुतखड्याचे प्रमाण जास्त असण्याचे कारण अ जीवनसत्व अभाव आहे. यामुळे मुतखडा बनण्यास प्रेरणा मिळते. जेवणात दाळीचे प्रमाण अतिजास्त असणे, पॉलीशड राइसचे प्रमाण जास्त असणे, फॅटस व मांसाहरचे प्रमाण जास्त असणे यामुळे मुतखडा बनण्याचे प्रमाण वाढते.
७) व्यवसाय- अतिशय स्थूलपणाच्या व्यवसायात असणाऱ्या व्यक्तींना मुतखडा होण्याचे प्रमाण वाढते.
उदा. * ऑफीस टेबल वर्क, अ‍ॅडमीनीस्ट्रटीव्ह वर्क इ.
* अतिशय तत्प उन्हात काम करणाऱ्या व्यक्तीमध्येही याचे प्रमाण असते.
* अंतराळविरामध्येही याचे प्राण जास्त आढळते. कारण गुरूत्वाकर्षण शक्ती स्पेसमध्ये कमी असल्यामुळे वजन सहन करणाऱ्या हाडातील कॅल्शियम कमी होते व मुतखड्याचे प्रमाण वाढते.
८) मुत्रसंस्थेचे इंफेक्शन– जंतूच्या इंफेक्शनमुळे त्याचा विषाचा प्रादुर्भाव मुत्र संस्थेवर होतो व मुतखडा बनण्यासाठी पोषक वातावरण तयार होते.
९) हायपरप्यारा यायरॉईडीझम- पॅराथायरॉईड ही एक गळ्याजवळ असणारी ग्रंथी असून त्यामुळे कॅल्शियमचे संतुलन राखले जाते. याची वाढ झाल्यामुळे आतड्यामध्ये कॅल्शियम शोषून घेण्याचे प्रमाण वाढते व कॅल्शियमचा किडनीतून बाहेर पडणारा भाग वाढतो व मुतखडा तयार होतो.
१०) दीर्घकालीन आजार- ज्या आजारात रुग्ण बराच काळ अथरुणात झोपून राहतो. उदा. पॅरालिसीस (अर्धांगवायू) फॅक्चर इ. त्यामुळे कॅल्शियम चे क्षार किडनीत जमा
होऊन मुतखडा होण्याचे प्रमाण वाढते.
११) किडनी व मुत्रसंस्थेचे आजार- ज्या किडनीच्या आजारामध्ये लघवी ही बाहेर फेकली जात नाही व त्याला अडथळा निर्माण होतो त्या सर्व आजारामंध्ये मुतखडा होण्याचे प्रमाण जास्त असते. उदा. * युरेथ्रल स्ट्रीक्चर * पी.यु.जे. ऑक्स्ट्रक्शन, * मुत्रवाहिनी बारीक होणे (युरेट्रल स्ट्रीक्चर), * प्रोस्टेट ग्रंथी वाढणे, * फामोसीस इ. मुतखड्याची पूर्वसूचना देणारी लक्षणे-
१) लघवीतून रक्तस्त्राव होणे.
२) लघवीला नेहमी जळजह होणे.
३) पाठीमागच्या भागात दुखणे व ते दुखणे अंडाशयाकडे जाणे.
४) लघवीतून बारीक कण जाणे इ. मुतखडा झाल्यानंतर व त्याची उपचार घेतल्यानंतर तो परत होऊ नये म्हणून घ्यावयाची आहारातील काळजी. आहारात पाण्याचे व द्रव पदार्थाचे प्रमाण जास्त ठेवावे. २४ तासात कमीत कमी अडीच ते तीन लीटर लघवी बाहेर पडायला हवी. आहारात खालील वस्तू ५० टक्के कमी कराव्यात. दुध, दुधाचे पदार्थ. उदा. चहा, कॉफी, तुप, लोणी, बटर, चीज, मासांहार-मटण, मासे, कोंबडी, अंडी इ. पालक, चवळी, टमाटे, आवळा, चिक्कू, काजू, काकडी, मनुका, कोबी, भोपळा, मशरुम, वांगे इ. भरपूर पाणी पिणे हे मुतखडा न होण्यासाठी आवश्यक असते. त्याचबरोबर नारळाचे पाणी, मका, भात, अननस, ज्यूस, केळी, लिंबू, गाजर, डाळ, कारले, बदाम या वस्तुंचे प्रमाण चांगल्यापैकी आहारात असावे.
======
आयुर्वेद
======
मुतखडयांवर आयुर्वेदात अनेक औषधे सांगितली आहेत. मुतखडयांचा त्रास असल्यास एकदा तरी तज्ज्ञाकडून योग्य ती तपासणी करून घेणे आवश्यक आहे. ताबडतोब शस्त्रक्रिया करणे आवश्यक नसल्यास निरनिराळे आयुर्वेदिक उपाय करून पाहता येतील. वरुणादि काथ हे औषध यासाठी उपयुक्त आहे. हे औषध सकाळ सायंकाळ 2-2 चमचे घ्यावे.
एक उपाय म्हणजे पाषाणभेद वनस्पती व गोखरू काटे (सराटे) यांचे समप्रमाणात मिसळलेले चूर्ण दोन ग्रॅम, रोज एक वेळ (सकाळी रिकाम्या पोटी) पाण्याबरोबर द्यावे. त्यानंतर चार-पाच तास तोंडाने काहीही न घेण्याची सूचना द्यावी. याप्रमाणे दीड महिना रोज उपचार करावेत. पाच-सहा महिन्यांनंतर परत एकदा महिनाभर हाच उपाय करावा. हा उपाय लागू पडल्यास लघवीतून खडयाची खर बाहेर पडताना जाणवते. औषध चालू केल्यानंतर आठ-दहा दिवसांत हा परिणाम दिसणे अपेक्षित आहे.
याचबरोबर कुळीथाचा काढा (25 ग्रॅम कुळीथ + 200 मि.ली. पाणी मंद आचेअर उकळून 50 मि.ली द्रव तयार करणे) रोज द्यावा. असे तीन ते सात दिवस देऊन तीन-चार आठवडे थांबून परत 3 ते 7 दिवस हाच उपाय करावा.
पुनर्नवा वनस्पतीही मुतखडयावर उपयुक्तआहे. पुनर्नवा (खापरखुटी, वसूची भाजी) ही पावसाळयापासून होळीपर्यंत ठिकठिकाणी आढळते. या वनस्पतीची मुळासकट बिनतिखट चटणी (50 ग्रॅम) रोज जेवणात असावी. ओली वनस्पती काढून सावलीत वाळवून नंतर वापरता येते.
या उपायांबरोबरच टोमॅटो, कोबी, अळू,, इत्यादी भाज्या जेवणातून वर्ज्य कराव्यात.
============
होमिओपथी निवड
============
चामोमिला, लायकोपोडियम र्बेरिस व्हल्गॅरिसचा द्राव 3/4 थेंब पाण्यात टाकून दिवसातून दोन वेळा रोज घ्यावा.
मुतखडा हा विकार सुरवातीच्या अवस्थेमध्ये असल्यास औषधांद्वारे बरा होऊ शकतो. मात्र वेळीच योग्य उपचार न केल्यास मुतखड्याच्या आकारात वाढ होते. अशा वेळी शस्त्रक्रमाद्वारेच मुतखडा काढावा लागतो.
PCNL शस्त्रक्रीया –
ही एण्डोस्कोपीद्वारे केली जाणारी शस्त्रक्रीया असून यामध्ये संपूर्ण भूल किंवा कंबरेखालील भाग बधीर करुन एक्स-रे किंवा सोनोग्राफी मशीनच्या सहाय्याने किडनीमध्ये सुई घालून त्याद्वारे किडनीपर्यंत छोटा मार्ग बनवून एण्डोस्कोप घालून मुतखडा काढला जातो. खडे मोठे असल्यास ते फोडृन तुकडे करुन काढले जातात.
============================================================
किडनी स्टोनपासून नैसर्गिकरीत्या सुटका=
बदलती जीवनशैली, अनियमित दिनचर्या, खाण्या-पिण्याच्या उलटसुलट सवयी यामुळे अनेक जण सध्या किडनी स्टोनच्या त्रासाला बळी पडतायत. किडनी स्टोनचा खूप त्रास होत असताना प्रचंड पोटात दुखतं. हा आजार आनुवंशिकही असू शकतो. या आजाराने त्रस्त रुग्णाला डॉक्टर अनेकदा ऑपरेशन करण्याचा सल्ला देतात. पण यावर मात करण्यासाठी काही घरगुती उपचार आहेत. या औषधांच्या सेवनाने तुम्ही या आजारावर मात करू शकता.
मीठ आणि मूत्रातील खनिज पदार्थ एकमेकांच्या संपर्कात आल्यास किडनी स्टोनचा आजार होऊ शकतो. किडनी स्टोनचा आकार विविध प्रकारचा असतो. काही कण वाळूप्रमाणे बारीक असतात, तर काही कण मोठे असतात. कधी कधी लहानसहान स्टोन लघवीवाटे शरीराच्या बाहेर पडतात. पण जे आकाराने मोठे असतात ते बाहेर पडत नाहीत. परिणामी पोटात दुखण्यासारखे त्रास होतात. मात्र हे स्टोन नष्ट करणारे काही घरगुती उपाय पुढे दिले आहेत. त्याचा उपयोग केल्यास निश्चितच आराम पडेल.
द्राक्षांचे सेवन करा
सध्या थंडीचे दिवस आहेत. या मोसमांत द्राक्षं चांगली येतात. आता द्राक्ष बाजारातही दिसायला सुरुवात झाली आहेत. त्यामुळे ती मुबलक प्रमाणात मिळतील. किडनी स्टोनपासून सुटकारा मिळण्यासाठी द्राक्षं अतिशय उपयुक्त ठरतात. द्राक्षात पोटॅशिअम मीठ आणि पाणी भरपूर प्रमाणात असतं. तसंच द्राक्षात अलबुमीन आणि सोडिअम क्लोराइड यांचं प्रमाण खूप कमी असतं. म्हणूनच ती या आजारात अतिशय उपयुक्त ठरतात.
कारल्याचा आहारात समावेश करा
कारलं चवीला अतिशय कडू असतं. त्यामुळे प्रत्येकालाच ते आवडतं असं नाही. क्वचितच त्याचा आहारात समावेश होतो, मात्र किडनी स्टोनवर हा रामबाण उपाय आहे. कारल्यात मॅग्नेशिअम आणि फॉस्फरस असतं जे किडनी स्टोन होण्याची प्रक्रिया थांबवतं. म्हणूनच जे रुग्ण किडनी स्टोनने त्रस्त आहेत त्यांनी आपल्या आहारात कारल्याचा आवर्जून समावेश करायला हवा.
केळी खा
स्टोनचा कमीत कमी त्रास व्हावा म्हणून केळी खायला हवीत. केळ्यात बी-६ नावाचं जीवनसत्त्व असतं. या जीवनसत्त्वामुळे खड्यांच्या निर्मितीला आळा घातला जातो. याशिवाय जीवनसत्त्व बी अन्य जीवनसत्त्वांबरोबर सेवन केल्यास किडनी स्टोनच्या आजारात खूप आराम पडतो. एका शोधानुसार जीवनसत्त्व बीचं १०० ते १५० मिलिग्राम दररोज सेवन या आजारात खूप फायदेशीर ठरतं.
ओवा
लघवीला चालना देणारे गुण ओव्यात उपजतच असतात. त्यामुळे ओवा किडनी स्टोनसारख्या आजारात टॉनिक म्हणून उपयुक्त ठरतो. किडनीत स्टोन जमा होऊच नये म्हणून नियमित आहारात, मसाल्याच्या रूपात ओव्याचा वापर करावा.
लिंबाचा रस
ऑलिव्ह ऑइल आणि लिंबाचा रस यांच्या एकत्रित सेवनाने या आजारात खूप फायदा होतो. या आजारात पोटदुखी होते. अशा वेळी ६० मिलीलीटर लिंबाच्या रसात तितक्याच ऑलिव्ह ऑइलची मात्रा घेतली तर पोटदुखीपासून त्वरित आराम पडतो.
चाकवताचा रस
किडनी स्टोन नष्ट करण्यासाठी चाकवत ही पालेभाजी अतिशय उपयुक्त ठरते. यासाठी चाकवताची अर्धी जुडी पानं चांगली उकळून घ्यावीत. हे पाणी गाळून त्यात काळीमिरी, जिरं आणि थोडं सैंधव मीठ घालावं. हे पाणी दिवसातून चार वेळा प्यावं. खूप गुणकारी ठरतं.
थंड कांदा
कांद्यात स्टोननाशक तत्त्वं असतात. आहारात कांद्याच्या सतत सेवनाने किडनी स्टोनपासून सुटकाराही मिळू शकतो. साधारण ७० ग्रॅम कांदा किसून त्याचा रस काढावा. सकाळी अनशापोटी या रसाच्या नियमित सेवनाने स्टोनचे बारीक बारीक खडे होतात आणि ते लघवीवाटे बाहेर पडतात.
तुळस
तुळस कित्येक आजारांत लाभदायक आहे. तुळस घालून नियमित चहा प्यायल्याने किडनी स्टोनच्या आजारापासून आराम पडतो. तुळशीचा रस प्यायल्याने स्टोन लघवीवाटे बाहेर पडण्यास मदत होते. कमीत कमी एक महिना तुळशीच्या पानांच्या रसासोबत मधाचं सेवन केल्यामुळे किडनी स्टोनपासून कायमची सुटका मिळू शकते. तुळशीची ताजी पानं रोज चावून खाल्ल्याने खूप फायदा होतो.
सौफ' चा चहा-
अर्धा चमचा सौफ बारीक करून घ्‍या. दोन कप पाण्‍यात पाच मिनिट उकळून घ्‍या. सौफचा चहा दिवसातून दोन-तीन वेळा घेतल्‍यानंतर स्‍टोनपासून होणार त्रास बंद होतो. लघवी करताना त्रास होत असेल तर आवळ्याचा रस प्‍यायल्‍यानंतर त्रास होत नाही. आवळ्याचा रस, साखर आणि तुपचे मिश्रण घेतल्‍यानंतर स्‍टोनचा त्रास होत नाही. आवळ्याचा रस आणि इलायची याचे मिश्रण गरम करा. उलटी, चक्कर येणे, पोटात दुखणे याचा त्रास होत नाही.
डाळिंबाचा रस
किडनी स्टोनपासून सुटका होण्यासाठी डाळिंबाच्या दाण्यांचा रस सेवन करणं हा अतिशय गुणकारी घरगुती उपचार आहे. डाळिंबाचे दाणे आणि रसात काहीसा तुरटपणा असल्याने तो किडनी स्टोनसारख्या आजारात अतिशय उपयुक्त ठरतो.
लघवी करताना जळजळ होत असेल तर गुळवेल आणि आवळ्याचे मिश्रण तयार करा. यामध्‍ये आदरक पाच ग्रॅम, अश्वगंधा पाच ग्रॅम टाका. हे मिश्रण 100 मिली लीटर पाण्‍यात उकळून घ्‍या. हा काढा दोन दिवसाच्‍या आतंराने दोन महिने प्‍यायल्‍यानंतर किडणी स्‍टोन बरा होतो.
दुर्वा च्‍या मुळ्या, अंबी हळदीचे कंद, मालकांगनीचे पाने समान मात्रेत घ्‍या. याला बारीक वाटून या मिश्रणाचा रस तयार करा. हे मिश्रण मधासोबत घेतल्‍यानंतर स्‍टोन बरा होतो. अश्वगंधा नवस्‍पतीचा रस प्‍यायल्‍यानंतर स्‍टोन बरा होतो. अश्वगंधा वनस्‍पतीच्‍या मुळ्याचा रस व आवळ्याचा रस समप्रमाणात घ्‍या. मूत्राक्षय आणि लघवी करताना होणारा त्रास होणार नाही.
या उपायामुंळे किडनी स्टोनपासून सुटका होऊ शकते. हे उपाय घरगुती तर आहेतच, शिवाय फायदेशीरही आहेत. मात्र हे उपाय उपयुक्त ठरले नाहीत तर तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
DrJitendra Ghosalkar
७७९८६१७२२२ /९४०४८०९५३१

आम्लपित्त / हायपर अ‍ॅसिडीटी

आम्लपित्त / हायपर अ‍ॅसिडीटी

आपल्या पचनसंस्थेत मुख, अन्ननलिका, जठर, लहान आतडे, मोठे आतडे इत्यादी अवयव आहेत. यापैकी जठराशी संबंधित असणारी आम्लपित्त ही व्याधी वेळीच लक्ष न दिल्यास गंभीर रूप धारण करू शकते. जर पथ्ये पाळली तर पित्त आटोक्यात ठेवता येते.
***** आम्लपित्ताची सामान्य लक्षणं
तीव्र वेदना डोकेदुखी,
घशाशी होणारी जळजळ,
तोंडाला आंबट,
कडवट पाणी येणं,
उलटीची भावना होणं .
काहीवेळा यामध्ये आंबट व करपट ढेकर येणं ही देखील तक्रार असते.
आम्लपित्तामध्ये पित्तदोषाचा उष्ण गुण वाढतो, त्याच्या उष्ण गुणामुळेच छातीमध्ये जळजळ होत असते.
या सर्व लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. दुर्लक्ष केल्यास पुढे जठराच्या ठिकाणी व्रण निर्माण होण्याची शक्यता असते. याला अल्सर असं म्हणतात. अल्सर हा अत्यंत तापदायक असा प्रकार आहे.
***** आम्लपित्ताची कारणे :
* अतिशय तिखट, मसालेदार, चमचमीत जेवण करणं,
* अतिशय आंबट खाणं,
* अतिप्रमाणात चहापान करणं,
* मोठय़ा प्रमाणावर केलेलं मद्यपान,
* तंबाखूच्या सेवनाचं वाढतं प्रमाण,
* मांसाहाराचं वाढत चाललेलं प्रमाण,
* अतिजागरण,
* जेवणाच्या वेळेत असणारा अनियमितपणा,
* भूक लागलेली असताना आहार न घेणं,
* मानसिक चिंता
* आम्लपित्ताची लक्षणे :
* तीव्र वेदना डोकेदुखी,
* घशाशी होणारी जळजळ,
* तोंडाला आंबट, कडवट पाणी येणं,
* उलटीची भावना होणं
* आंबट व करपट ढेकर येणं
* हातापायांच्या तळव्यांची आग होणे.
* डोळे लाल होणे, जळजळणे, पापणीवर रांजणवाडी येणे.
* शरीर स्पर्शाला गरम लागणे, ताप आल्यासारखे वाटणे.
* अंगावर गळू येणे, त्यात पाणी किंवा पू होणे.
* डोळ्यांसमोर अंधारी येणे, चक्कर येणे.
* तोंड येणे.
* नाकातून रक्‍त येणे.
* लघवीच्या ठिकाणी जळजळ होणे.
* अंगावर तांबूस रंगाचे फोड किंवा गांध्या येणे. अंगाला खाज सुटणे.
* निरुत्साही वाटणे.
* यावर वेळीच उपचार झाले नाहीत तर पुढे केस गळणे, अकाली पांढरे होणे यासह यकृताशी संबंधित काही गंभीर आजार होऊ शकतात.
* आम्लपित्तामध्ये पित्तदोषाचा उष्ण गुण वाढतो, त्याच्या उष्ण गुणामुळेच छातीमध्ये जळजळ होत असते.
* उलटी होऊन गेल्यावर मग या रुग्णांना बरं वाटतं. काही जणांना तर घशात बोटं घालून उलटी करावी लागते.
* या सर्व लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. दुर्लक्ष केल्यास पुढे जठराच्या ठिकाणी व्रण निर्माण होण्याची शक्यता असते. याला अल्सर असं म्हणतात.
* अल्सर हा अत्यंत तापदायक असा प्रकार आहे. म्हणून आम्लपित्ताकडे वेळीच लक्ष देणं आवश्यक आहे.
****** प्रतिबंधात्मक उपाय :
* आपली दिनचर्या नियमित ठेवावी.
* आपला स्वभाव रागीट तसंच खूप चिंता करणारा असा असल्यास त्यावर नियंत्रण आणावे.
* व्यसनांपासून सदैव दूर राहावे.
* उन्हात जाताना छत्री न्यावीच.
* ज्यांना आम्लपित्ताचा त्रास नेहमी होतो अशांनी रोगाची कारणं शोधून ती टाळण्याचा प्रयत्न करणं हा प्रत्येक रोगाच्या उपचारामधील एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे,
* काही उपचार हे तात्पुरता दिलासा देणारे असतात, तर काहींचे दुष्परिणामही (साइड इफेक्ट्स) असू शकतात. उदाहरणच द्यायचं तर सोडय़ाचं देता येईल. आम्लपित्ताचा त्रास होऊ लागला की रोग्यांना ‘सोडा’ पिण्याची सवय असते. सोडय़ामुळे वाढलेल्या पित्ताचं तात्पुरतं उदासीनीकरण होऊन तात्पुरतंच बरं वाटतं. पण ही सवय लावून घेणं चांगलं नाही. यापेक्षा अधिक पित्ताची निर्मिती होणं कसं टळेल, याकडेच अधिक लक्ष पुरविलं पाहिजे.
***** घरगुती उपाय
* पाणी प्या : पोटात दुखू लागलं किंवा खाल्ल्यावर त्रास होऊ लागला तर एक ग्लास कोमट पाणी प्यायलं पाहिजं. दिवसभरात कमीत कमी दहा ग्लास पाणी पोटात जाणं आवश्यक आहे.
* आलं घातलेला चहा करून पिता येईल. कपभर चहात एक चमचा ताजं आलं घालून तो चहा घेणं फायद्याचं ठरतं.
* छोटी दालचिनी किंवा २-३ वेलदोडे खाल्ल्याने पित्ताचा त्रास कमी होतो.
जेवल्यानंतर लगेच झोपू नका : झोपण्यापूर्वी कमीत कमी दोन तास आधी जेवण झालं असलं पाहिजे.
* ताजी चिरलेली मिंटची पानं गरम उकळत्या पाण्यात घालून काही वेळानंतर ते पाणी जेवणानंतर प्या.
* लवंग चोखल्याने नैसर्गिकरित्या पित्त कमी होते.
* जेवानंतर बडीशेप खाणं उत्तम. त्यात अनेक पाचक घटक असल्याने जेवणानंतरच्या सेवनाने अपचनाचा त्रास होत नाही.
* आम्लपित्ताच्या रुग्णांनी आपल्या जेवणामध्ये साजूक तुपाचा वापर भरपूर प्रमाणात करावा. तूप हे उत्तम पित्तनाशक असल्याने त्याचा या ठिकाणी चांगला उपयोग होतो.
* कारले, कडवे वाल, मेथीची भाजी या चवीला कडवट असणाऱ्या भाज्याही अधूनमधून खाणे चांगले असते.
* साळीच्या लाह्या, मनुका, अंजीर, खडीसाखर हे पदार्थ सेवन करणे,
* फळांमध्ये शहाळ्याचे पाणी, नारळाचे दूध, आवळा, डाळिंब, सफरचंद, केळे, ऊस यांना अधिक प्राधान्य देणे,
* उकळून गार (सामान्य तापमानाचे) पाणी पिणे, पाणी उकळताना त्यात चंदन, वाळा, अनंतमूळ वगैरे शीतल द्रव्ये टाकणे हेसुद्धा पित्त संतुलनास मदत करते.
* तांदूळ, गहू, मूग ही धान्यं, दुधीभोपळा, पडवळ यांसारख्या भाज्या खाव्यात.
भाज्यांमध्ये दुधी, तोंडली, घोसाळी, दोडका, भेंडी, कोहळा, पडवळ, परवर, चाकवत, पालक अशा पचायला हलक्‍या व शीतल स्वभावाच्या भाज्या निवडणे;
* भाज्या करताना जिरे, हळद, धणे, कोकम, मेथ्या, तमालपत्र वगैरे मसाल्याचे पदार्थ वापरणे,
* हिरव्या मिरचीऐवजी शक्‍यतो लाल मिरची, आले वापरणे हेसुद्धा पित्त वाढू नये म्हणून मदत करणारे असते.
* शेंगदाणे किंवा कूट घातलेले पदार्थ जमल्यास खाऊ नयेत किंवा कमी खावेत.
* स्थूल असल्यास आधी वजन कमी करा. व्यायाम करा.
* पोट रिकामे असेल तेव्हा आम्लपित्ताची लक्षणे वाढतात. म्हणून सामान्यतः दर तीन तासांनी थोडा का होईना आहार घेणे आवश्यक आहे. पित्ताचा त्रास होत असेल तर त्या काळात आंबट, तिरवट, आंबविलेले पदार्थ वर्ज्य करावे.
* पित्ताचा त्रास होत असेल तर लाल मटण खाणं कमी केलं पाहिजे. त्याऐवजी चिकन किंवा मासे खाल्ल्याने पित्ताचा धोका टाळता येतो.
* चहा , कॉफ़ी संपूर्ण बंद. / दरदिवशी फक्त दोनच कप घेऊन कॅफेनच्या सेवनावर नियंत्रण ठेवता येईल.
* मेथी, वांग संपुर्ण बंद
* शक्यतो जगरण नाही, झाल्यास, झोपतना १/२ कप गार दुध. सुतशेखर १ गोळी.
* कमित कमी ४ वेळा आहार. झोपायच्या आधी कमित कमी ३ तास जेवण.
* प्रत्येक घास नीट चावून खा.
* शक्यतो मसालेदार पदार्थ कमी प्रमाणात खातो
* उपासाला जास्त प्रमाणात फ़लाहार. आणि इतर पदार्थ कमी.
* आंबवलेले पदार्थ ( इडली, उतप्पा ) कमी. डोसा खाउन पित्त वाढत नाही अस लक्शात आलय.
* vanila icecream ने खुप बर वाटत. जरा त्रास होतोय अस वाटल कि लगेच IceCream
* नाहिच बर वाटल तर, ३-४ ग्लास कोमट पाण्यात मीठ घालुन प्यायच व उलटी काढायची. एकदा पित्त पडुन गेल कि बर वाटत. ( किमान 3-4 महिने तरी )
* तूर डाळीने पित्त होते. त्याऐवजी मूग डाळ वापरावी.
* सकाळी दुध, जिलबी खाण्याचा पण पित्त कमी होण्यास उपयोग होतो.
* आहारात पचायला हलके असणारे व त्याचबरोबर चवीला गोड, तुरट, कडू चवीचे लागणारे पदार्थ घ्यावेत. हे सर्व रस पित्त कमी करणारे आहेत.
* जास्त तिखट, मसालेदार, आंबट पदार्थ वापरू नयेत.
* खूप पोट भरेल एवढे जेवू नये. जेवल्यानंतर झोपू नये.
* जास्त मीठ क्षार असणारे असे लोणची, पापड इ. पदार्थ टाळावे.
* सर्वात महत्त्वाचे म्हणजे दही अजिबात खाऊ नये. दही शरीरावर उष्ण परिणाम करणारं व त्यामुळे पित्ताचा त्रास वाढविणारं आहे म्हणून ते पूर्ण बंद करावं.
* तळलेले पदार्थ, मसालेदार, मांसाहारी पदार्थ खाऊ नयेत.
* विरुध्द अन्नाचा, प्रक्रिया केलेल्या पदार्थांचा, फास्ट फूडचा, बेकरीच्या पदार्थांचा, हवाबंद डब्यातील पदार्थांचा, कोल्डींक्सचा त्याग करावा.
* आयुर्वेदातील पंचकर्मापैकी वमन आणि विरेचन या दोन कर्माचा, आम्लपित्तामध्ये चांगला उपयोग होतो
* आम्लपित्ताचा नेहमी त्रास असणा-यांनी मोरावळा खावा. (आवळ्याच्या मोसमामध्ये आवळा आणि साखरेचा पाक यांचा उत्तम संयोग असलेला हा मोरावळा तयार करून ठेवावा.) आवळा हा थंड गुणधर्माचा, पित्तशामक असल्याने त्याचा आम्लपित्तामध्ये उत्तम उपयोग होतो.
* आवळा सुपरी, मोरावळा, गुलकंद
* २-३ आमसुलं/कोकमं खावी किंवा त्याचं सरबत घ्यावं अथवा लिंबाच्या रसातले आल्याचे तुकडे खावे (थोडे कमी कारण आलं उष्ण असतं)
* पित्तावर तुळशीची पाने चघळणे, लवंगा चघळणे किंवा गुळाचा खडा चघळून खाणे या उपायांचाही उपयोग होतो.
* मोरावळा, गुलकंद, दाडिमावलेह सेवन करणेही पथ्यकर असते
* शतावरी, ज्येष्ठमध, दुर्वा या वनस्पती द्रव्यांचा वापर वैद्यांच्या सल्ल्याने केल्यास आम्लपित्तामध्ये लाभ होतो.
* Gelucil, हे तर आहेच
* Homeapathy मधील Nux Vomika चा सुद्धा मला चांगला फ़ायदा झाला आहे.
***** आहार योजना -
1) पहाटे - एक ग्लास पाण्यात अर्धा लिंबू पिळावा. त्यात एक चमचा मध टाकावा आणि हे पाणी प्यावे. त्यानंतर बरोबर अर्ध्या तासाने एक चमचा (तीन ग्रॅम) गव्हांकूराचे चूर्ण एक ग्लास साध्या पाण्यासोबत घ्यावे. यानंतर साधारण एक तास काही खावू नये.
2) सकाळी ८ वाजता - २ केळी, १ गालास संत्र्याचा रस, १ फुलका आणि घरचे लोणी अगर एक खाकरा, चार ते पाच खजूराच्या बिया आणि सुंठ टाकून केलेला एक कप चहा घ्यावा.
3) दुपारचे जेवण - जेवणापूर्वी एक कप कोकम सरबत आणि थोडेसे गूळ - आले घ्यावे. जेवणात कोंडायुक्त कणकेचे फुलके, एक पालेभाजी, एक फळभाजी, कोशिंबीर, कवठाची चटणी, मुगाचे वरण अगर मोड आलेल्या मुगाची भाजी, हातसडीचा भात, जेवणाच्या शेवटी एक कप गोड ताक आणि जेवणानंतर थोडीशी आवळा सुपारी
4) सायंकाळी ४ वाजता - एक सफरचंद, तीन ते चार बदामबिया, दोन ते चार अंजीरे आणि अर्धाकप आल्याचा चहा घ्यावा.
5) रात्रीचे जेवण - हे दुपार प्रमाणेच असावे. बदल हवा असेल तर हिरव्या भाज्यांचे सूप, ग्रीन सॅलेड, दूध पोळी आणि थोडी मुगाची खिचडी घ्यावी.
6) झोपताना - एक ग्लास थंड दूध घ्यावे.
या प्रमाणे आहार योजना केली तर पित्ताच्या विकारावर आपण विजय मिळवू शकतो.
**** अपचन
* सकाळी उठल्यानंतर जर दोन कप उकळून कोमट केलेले पाणी घेतले तर मल पातळ होऊन rectum मध्ये येते. आपल्या instestine मधून मल खाली rectum पर्यंत पोचायला पाहिजे मग constipation होत नाही.
* तसेच रात्री झोपताना लगेच जेवन झाल्याझाल्या झोपू नये. थोडे चालावे फ़िरावे कुणाशी बोलावे.
* भरपूर फ़ायबर असलेले फ़ळ खाल्ले तर constipation चा त्रास कमालीने कमी होतो. जसे संत्री जर आतल्या सालीसकट खाल्ले तर शरीराला भरपूर प्रमाणात फ़ायबर मिळते आणि त्यामुळे अन्न भरभर खाली उतरते.
* तसेच टरबुज, चिक्कु, बटाट्याची साल ह्या सर्वांमध्ये भरपूर प्रमाणात फ़ायबर असते.
* मुगाची डाळ पचायला सोपी आणि त्यातील टरफ़लांमध्येही भरपूर फ़ायबर असते.
* जेंव्हा आपण खूप मैदा असलेले पदार्थ खातो त्यावेळी constipation घडते.
* रात्रीच्या जेवनानंतर सहसा दुध घेणे टाळावे. दुधासाठी सकाळची वेळ खूप चांगली असते. दुध घ्यायचेच झाले तर चरबीयुक्त दुध न घेता skimmed milk घ्यावे.
* तसेच पापड लोणची जेवनातून काढून टाकावी. रात्रीच्या वेळी भात न खाता चपाती खावी.
***** शरीर थंड ठेवणार्‍या / थंड गुणाच्या पाककृती
* खीर
साहित्य : सुवासिक तांदूळ, दूध, खडीसाखर, वेलदोडे, तूप.
गायीच्या तुपावर तांदूळ चांगले गुलाबी होईपर्यंत परतावे व नंतर मिक्सरमध्ये बारीक करावे. दूध चांगलं गरम करून त्यात हे तांदूळ मिसळावे व शिजेपर्यंत खीर उकळून घ्यावी. खीर गुणकारी व्हावी या दृष्टीनं त्यात खडीसाखर बारीक करून घालावी. स्वादासाठी वेलदोडा पूड घालावी.
* शीतल दूध
साहित्य : दूध, सब्जाचं बी/ तुकुमराई, खडीसाखर, बेदाणे, वेलची पूड.
दूध चांगलं उकळून नंतर गार करावं. रात्री सब्जाचे बी किंवा तुकुमराई पाण्यात भिजत घालावी म्हणजे चांगली फुगेल. खडीसाखर बारीक करून ठेवावी. दुपारी जास्त उन्हाच्या वेळी गार दुधातच खडीसाखर, बेदाणे, वेलची पूड त्याचप्रमाणे भिजवलेलं सब्जाचं बी घालावं. यामुळे शरीरातील उष्णता आणि वाढलेलं पित्त नियंत्रणात येतं.
* खजूर-खवा-गुलकंदाचे रोल
खजूर बिया काढून अगदी मऊ करून घ्यावा. खवा मळून घ्यावा. नंतर खजूर व खवा एकत्र करून हे मिश्रण चांगलं एकजीव करावं. या मिश्रणाचा गोळा करून पोळपाटावर लाटावा व त्या पोळीवर गुलकंद पसरून त्याचा रोल करावा. त्याचे एक-एक इंचाचे तुकडे करून सुक्या खोबर्‍यात हे रोल घोळवून घ्यावं.
* व्हेज क्लिअर सूप
साहित्य : टोमॅटो, कोथिंबीर, कांदा, धने, जिरे पूड, मीठ, साखर आणि गाईचं तूप.
कृती :- टोमॅटो उकडून घ्यावे. सालं काढून तुकडे करावे. कांद्याचेही तुकडे करावे. भरपूर कोथंबीर धुवून चिरून घ्यावी. सगळ्या भाज्या मिक्सरवर एकत्र फिरवून एकजीव कराव्या. गाळणीवर गाळून वरचा चोथा बाजूला ठेवावा. खाली भाज्यांचे स्वच्छ मिश्रण मिळेल.
कढईत गाईचं तूप घ्यावं. त्यात जिरे, हिंग यांची फोडणी करावी. त्यात वरील भाज्यांचे पातळ मिश्रण टाकून ते चांगलं उकळून घ्यावं. यात चवीपुरतं मीठ आणि साखर टाकावी.
एरवी आपण सूपमध्ये मिरेपूड, लवंग, दालचिनी इ. मसाले वापरतो. पण हे पदार्थ गुणानं उष्ण असल्यानं वापरू नये. धणे-जिरे मात्र उष्णता कमी करतात त्यामुळे ते सुपातून वापरावे.

खा ह्या स्वस्थ भाज्या ताकदवान शरीरासाठी

खा ह्या स्वस्थ भाज्या ताकदवान शरीरासाठी

==========================================
अनियमित खानपान आणि दिनचर्या, जास्त प्रमाणात फास्ट फूडचे सेवन इत्यादी कारणांमुळे विकसित समाजातील आपल्यासारख्या लोकांचे आयुष्यमान 60 ते 65 वर्षांचे झाले आहे तर आदिवासी लोकांचे आयुष्यमान 80 ते 85 वर्षांचे आहे. तर मग, विकसित आणि स्वस्थ कोण? आपण का ते लोक, जे आजही आदिवासी म्हणून ओळखले जातात. जास्त विकसित आणि पैसा कमावण्याच्या शर्यतीमध्ये आपण स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला निरोगी शरीरासाठी आवश्यक असलेल्या पोषक तत्वांपासून दूर घेऊन जात आहोत. आहाराच्या नावावर कृत्रिम रंगाने रंगवलेल्या भाज्या आणि फास्ट फूड कल्चर आपल्या आरोग्याला नष्ट करत आहे. जर तुम्ही आदिवासी लोकांसारखे स्वस्थ राहण्यास इच्छुक असाल तर येथे जाणून घ्या, काही अशा भाज्यांबद्दल ज्या तुम्हाला नेहमी स्वस्थ आणि निरोगी ठेवतील.
तोंडले -
ही भारतात उगवणारी एक वेलवर्गीय आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे. याच्या फळांची भाजी करतात. फळे सुरुवातीला हिरवी असतात, पिकल्या नंतर ती लाल दिसतात. तोंडल्यामध्ये कॅरोटीन व्यतिरिक्त प्रोटीन, फायबर आणि कॅल्शियमसारखे महत्त्वपूर्ण तत्व आढळून येतात. गुजरात येथील डॉँग आदिवासी भागात तोंडल्याची भाजी खूप प्रचलित आहे. येथील आदिवासी लोकांच्या मतानुसार अर्धेकच्चे तोंडले काही दिवस खाल्ल्यास डोळ्यांना लागलेला चष्मा काढून ठेवाल. तोंडले काविळीवर, कुष्ठरोगावर व पांडुरोगावर गुणकारी आहेत.
शेवगा -
मध्यप्रदेशमधील पाताळकोट येथील आदिवासी शेवग्याच्या झाडाच्या पानांची चटणी करून खातात. शेवग्याच्या शेंगा आणि पानांमध्ये व्हिटॅमिन 'ए' भरपूर प्रमाणात असते. शेवग्यामध्ये दुधापेक्षा चार पट अधिक कॅल्शिअम आणि दोन पट अधिक प्रथिनं हे पोषकद्रव्य असतात.
पचनक्रियेशी संबंधित आजार शेवगा सेवनाने नष्ट होतात. दस्त, कावीळ या आजारांमध्ये शेवग्याच्या पानांचा ताज रस, एक चमचा मध आणि नारळ पाणी एकत्र करून पिल्यास आराम मिळेल.
शेवग्याच्या पानांचे चूर्ण कॅन्सर आणि हृदय रुग्णांसाठी उपयुक्त औषध आहे. शेवग्याच्या सेवनाने ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते. शेवग्याचा उपयोग पोटातील अल्सरच्या उपचारामध्ये केला जाऊ शकतो. यामुळे शरीरातील उर्जेचा स्तर वाढतो.
बीट -
बीटमध्ये आढळणारा अ‍ँटीऑक्सिडेंट हा पदार्थ शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवितो. हा एक नैसर्गिक शर्करा मिळण्याचा स्रोत आहे. यात सोडियम, पोटॅशियम, फॉस्फोरस, क्लोरिन, आयोडीन आणि अन्य महत्त्वाची जीवनसत्वे असतात. बीटमध्ये किडनी आणि पित्ताशय स्वच्छ ठेवण्याची शक्ती असते. रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास किंवा अर्धा ग्लास बीट ज्युस अवश्य घ्या. किडनी आणि पित्ताशय विकारांमध्ये बीट ज्युस आणि गाजर ज्युस एकत्रित करून पिणे आरोग्यदायी असते. पांढरे बीट पाण्यात उकडवून हे पाणी फोड, जळजळ आणि तोंड येणे यासाठी उपयुक्त आहे. ताप आणि थंडीतही उपयुक्त आहे. म्हणून सदैव तारुण्य टिकवायचे असल्यास बीटचे नियमित सेवन करा.
दोडके -
दोडक्याची चटणी तयार करून आदिवासी लोक ज्वर (ज्वर) आलेल्या व्यक्तीला खाऊ घालतात. या लोकांच्या मतानुसार यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. कावीळ झालेल्या व्यक्तीच्या नाकामध्ये दोडक्याचा २-३ थेंब रस टाकल्यास नाकातून पिवळा द्रव पदार्थ बाहेर पडतो. या उपायाने कावीळ लवकर समाप्त होतो असे आदिवासी लोक मानतात. दोडक्यामध्ये इन्सुलिनप्रमाणे पेप्टाईड्स आढळून येतात, यामुळे मधुमेहावर (डायबिटीस) नियंत्रण ठेवण्याचा हा उत्तम उपाय आहे.
पालक -
आदिवासी लोकांच्या आहारात हिरव्या पालेभाज्या भरपूर प्रमाणात असतात. आदिवासी लोक शरीरात ताकद आणि चपळता निर्माण होण्यासाठी पालक भरपूर प्रमाणात खातात. पालकाच्या भाजीत जीवनसत्त्व ए, बी, सी आणि इ तसेच प्रोटीन, सोडियम, कॅल्शियम, फॉस्फरस, क्लोरिन व लोह असते. पालक रक्तातील रक्तकणांची वाढ करते. पालकमध्ये जास्तीत जास्त प्रोटीन निर्माण करणारे अ‍ॅमिनो अ‍ॅसिड असते. कच्चा पालक फार गुणकारी आहे. याच्या सेवनामुळे पचनक्रिया सुरळीत काम करते. खोकला आणि फुफ्फुसावर आलेली सूज कमी करण्यासाठी पालकच्या रसाने गुळण्या कराव्यात. पालकच्या रसाने दृष्टीदोष कमी होतो. तसेच स्मरणशक्तीही वाढते.
टोमॅटो-
दररोज जेवणामध्ये टोमॅटोचा वापर अवश्य करा. टोमॅटोमध्ये लायकोपेन हे ऍन्टीऑग्झिटंट असल्यामुळे ते शरीराची झीज रोखते आणि तारुण्याचे रक्षण करते. म्हणून नियमित टोमॅटो खाणार्‍यांची त्वचा आणि केस तजेलदार असतात. मधुमेहाच्या रुग्णामध्ये ब्लड शुगरचे प्रमाण समतोल राखण्यासाठी टोमॅटो खाणे उपयुक्त ठरू शकते. आजारानंतर आलेला थकवा दूर करण्यासाठी टोमॅटो सर्वात चांगला विकल्प आहे.
कोबी -
आदिवासी लोक लहान मुलांसाठी पत्ता कोबीचे सेवन गुणकारी मानतात. ८ ते १० महिने वय असणार्या मुलांचे वजन कमी असल्यास त्यांना अर्धा ते एक कप पत्ता कोबीचा रस प्यायला दिल्यास वजन वाढते. कोबीची पाने गोड, शीतल, मूत्रल व कृमिनाशक आहेत. पोटदुखी, त्वचाविकार, दमा व ताप यांवर कोबीची पानं गुणकारी आहेत, असा आयुर्वेदात उल्लेख आढळतो. हिरड्यांच्या रोगावर कच्ची पाने चघळणे उपयुक्त ठरते.
DrJitendra Ghosalkar७७९८६१७२२२ /९४०४८०९५३१

अ‍ॅसिडिटी

अ‍ॅसिडिटी

=========
खाल्लेले अन्न व्यवस्थित न पचल्यामुळे डायजेशन प्रक्रियेमध्ये पोटात एक असे अ‍ॅसिड स्रावीत होते जे डायजेशनसाठी खूप आवश्यक असते. अनेकदा हे अ‍ॅसिड गरजेपेक्षा जास्त निर्माण होऊ लागते ज्यामुळे हृदयात जळजळ आणि पोटात गरम होते. या स्थितीला अ‍ॅसिडिटी किंवा अ‍ॅसिड पेप्टिक रोगाच्या नावाने ओळखले जाते.
अ‍ॅसिडिटी होण्यामागची कारणे
आहारात अनियमितपणा, अन्न व्यवस्थितपणे न चावणे, पर्याप्त प्रमाणात पाणी न पिणे, तळलेले आणि मसालेदार अन्न खाणे, जंक फूड, तणावग्रस्त राहणे आणि धुम्रपान इ. गोष्टी अ‍ॅसिडिटीला कारणीभूत ठरतात. जड अन्न जास्त प्रमाणात खाल्ल्याने अ‍ॅसिडिटीची समस्या निर्माण होऊ शकते. सकाळी नाष्टा न करणे आणि उशिरापर्यंत उपाशी राहिल्याने अ‍ॅसिडिटी होऊ शकते.
अ‍ॅसिडिटीचे लक्षणं
1. पोट गरम झाल्याचे जाणवणे
2. हृदयात जळजळ
3. मळमळ होणे
4. ढेकर येणे
5. अन्न-पाणी घेण्याची इच्छा न होणे
6. डिस्पेप्सिया
उपाय -
बटाटा -
कदाचित तुम्हाला गॅस, अ‍ॅसिडिटी दूर करण्याचा हा विचित्र उपाय वाटेल, परंतु बटाट्याचे ज्यूस प्यायल्यास गॅस, अ‍ॅसिडिटीची समस्या दूर होते. बटाटा एल्कलाइनचा उत्तम स्रोत आहे. ज्यूस तयार करण्यासाठी कच्चे बटाटे साल काढून पाणी मिसळून मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. त्यानंतर या ज्यूसमध्ये थोडेसे गरम पाणी मिसळून हे ज्यूस प्या. गॅस, अ‍ॅसिडिटी दूर होईल तसेच लिव्हर स्वच्छ होते.
जांभूळ
मधुमेह उपचारामध्ये जांभूळ एक पारंपारिक औषध आहे. या फळाला मधुमेह रुग्णांचेच फळ म्हटले तर अतिशोक्ती ठरणार नाही, कारण यातील बी, साल, रस आणि गर हे सर्व घटक मधुमेहमध्ये सर्वात फायदेशीर आहेत. ऋतूनुसार जांभळाचे सेवन औषधी रुपात भरपूर करावे. पोटाच्या रोगावर हे रामबाण औषध आहे. रिकाम्या पोटी जांभूळ खाल्ल्यास गॅस व अ‍ॅसिडिटीची समस्या दूर होते.
पेरू
पेरू खाल्ल्याने बद्धकोष्ठता आणि अ‍ॅसिडिटीमध्ये फायदा होतो. पेरूमध्ये विविध प्रकारचे गुण असतात, जे आरोग्यासाठी लाभकारी ठरतात. यामध्ये व्हिटॅमिन, फायबर आणि मिनरल तत्व भरपूर प्रमाणत असतात. यामध्ये फायबर असल्यामुळे हे बद्धकोष्ठता दूर करते.
संत्री
संत्र्याची सर्वात मोठी विशेषता म्हणजे यामध्ये उपलब्ध असलेले फ्रक्टोज, डेक्स्ट्रोज, खनिज आणि व्हिटॅमिन्स शरीरात पोहोचताच उर्जा निर्माण करण्याचे कार्य करतात. संत्रीचे सेवन केल्याने शरीर स्वस्थ राहते आणि उत्साह वाढतो. याच्या नियमित सेवनाने अ‍ॅसिडिटी नष्ट होते.
टोमॅटो
शरीरासाठी टोमॅटो अत्यंत लाभकारी आहेत. यामुळे विविध रोगांचे निदान होते. हे शरीरातील विशेषतः किडनीमधील जीवाणू बाहेर काढते. यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, फॉस्फोरस आणि व्हिटॅमिन-सी आढळून येते. अ‍ॅसिडिटीचा त्रास असल्यास टोमॅटोचे सेवन वाढवल्यास हा त्रास दूर होण्यास मदत होईल. यामध्ये क्षार जास्त प्रमाणात असतात. यामुळे याच्या नियमित सेवनाने अ‍ॅसिडिटी होत नाही.
पपई -
हे एक चवदार, गोड आणि आरोग्यदायी फळ आहे. पपईत बीटा-कॅरोटिन, ए, बी, डी जीवनसत्वे आणि कॅल्शियम, प्रोटीन आदी तत्त्व भरपूर प्रमाणात असतात. पपई खाल्याने पोटाचे रोग, हृदयरोग, आतड्यांचे रोग दूर होतात. पचनसंस्थेचे कार्य सुधारते
DrJitendra Ghosalkar

ओठ गुलाबी आणि सुंदर ठेवा या थंडीच्या दिवसातही

ओठ गुलाबी आणि सुंदर ठेवा या थंडीच्या दिवसातही

=====================================
कोणत्याही व्यक्तीचे बाह्यसौंदर्य हे त्या व्यक्तीच्या ओठांवरूनही ठरत असते. मुलगा असू द्या की मुलगी, सुंदर ओठांमुळे व्यक्तिमत्त्व आकर्षक बनते. हिवाळ्यात काही लोकांचे ओठ सतत फाटतात किंवा ओठांना चीर पडते. अधिक प्रमाणात सौंदर्य प्रसाधने वापरल्यानेही ओठांचे सौंदर्य नष्ट होते. या ऋतूमध्ये तुम्ही वॅसलीन किंवा लीप जेलचा वापर करून ओठ काही काळासाठी नरम आणि सुंदर करता. परंतु ओठ दिवसभर सुंदर दिसण्यासाठी आणि नरम राहण्यासाठी येथे सांगण्यात आलेले घरगुती उपाय अवश्य करून पाहा.
हिवाळ्यात थंडीमुळे ओठांना भेगा पडल्या असतील तर रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धवून घ्या. त्यानंतर ओठांवर दुधाची साय, लोणी, किंवा तुपाने हलक्या हाताने मालिश करा. या उपायाने ओठ नरम आणि सुंदर राहतील. हा सोपा आणि रामबाण उपाय.
प्रत्येक ऋतूमध्ये ओठ सुंदर आणि नरम ठेवण्यासाठी देशी गुलाबाच्या पाण्यात भिजवलेल्या काही पाकळ्या दररोज ओठांवर रगडा. या उपायने तुमचे ओठ गुलाबी आणि चमकदार होतील. महत्वाचा फायदा म्हणजे तुम्हाला लिपस्टिक लावण्याची गरज भासणार नाही.
ओठ फाटण्यावर रामबाण उपाय म्हणजे मोहरीचे तेल किंचित गरम करून रात्री झोपताना नाभीवर लावा. हा आयुर्वेदिक उपाय अतिशय चमत्कारी आहे. १२ तासात परिणाम दिसतील.
विलायची बारीक करून लोण्यामध्ये मिसळून हे मिश्रण दिवसातून दोन वेळेस लावल्यास ओठ नरम होतील. ओठांचे पापुद्रे निघत असतील, ओठांना चीर पडत असतील तर रात्री झोपताना ओठांना बदाम तेल लावा. दही, लोणी यात केसर मिसळून ओठांना लावल्याने ओठ हळू हळू गुलाबी होतात.
ओठ जास्त प्रमाणात फाटले असेतील तर टमाट्याच्या रसामध्ये तूप किंवा लोणी मसळून ओठांवर लावावे. ओठ पूर्ववत होईपर्यंत हा उपाय चालू ठेवावा.
मध आणि लिंबू
लिंबाचा रस आणि मध एकत्र करून फ्रीजमध्ये ठेवा. त्यानंतर हे मिश्रण एक तासभर ओठांना लावून ठेवा. त्यानंतर ओठ स्वच्छ धुवून घ्या. दिवसातून कमीत कमी दोन वेळेस हे मिश्रण ओठांवर लावा. लिंबामुळे ओठांवरील काळसरपणा दूर होईल आणि मधामुळे ओठ कोमल आणि सुंदर होतील.
https://www.facebook.com/jitendra.ghosalkar.54
Dr. Jitendra Ghosalkar 

कृत्रीमरित्या पिकवलेली फळे

कृत्रीमरित्या पिकवलेली फळे

आजकाल बाजारात मिळणारी बरीचसी फळे रसायनिक पदार्थांच्या साहाय्याने पिकविली जातात आणि नैसर्गिकरित्या पिकवण्यासाठी लागणारया कालावधीपेक्षा लवकर रसायनांद्वारे पिकवुन (संस्कार करून) विक्रीसाठी आणली जातात.....
आयुर्वेद शास्रानुसार १ सुत्र आहे. संस्कारोही गुणांन्तरधारम् उच्यते | संस्काराने गुणधर्म बदलतात. काय बदल होते ते पहाने महत्वाचे... काल परिणाम संस्कार हा एक महत्वाचा परिणाम होतो. बहुतेक सर्व फळे बीजापासुन निर्माण होत असल्याने फळामध्ये लवकर पक्वावस्था येते तशीच early maturity मानवी शरीरात दिसते. सामान्य विशेष या आयुर्वेद सिध्दांतानुसार वरील प्रमाणे लवकर पिकणारी फळे खाणारया मुलांमुलीमध्ये early maturity दिसु शकते. यावर कदाचित भविष्यात संशोधन होईलही..
दुसरा परिणाम फळांचे प्राकृत चवीत रसात गोड आंबट तुरट आदीमध्ये बदलाचा दिसुन येतो..
उदा... काही वेळा रासायनिक पध्दतीने पिकविलेली केळी गोड न लागता कच्च्या केळी प्रमाणे तुरट लागते हे प्रत्यक्ष खाल्ले असता समजते.. अशा प्रकारे चवीतील बदल इतर फळांच्या बाबतीत ही प्रत्यक्ष दिसतात आणि फळे खाण्याच्या मुळ हेतुला हरताळ फासला जातो. कारण चवीत गोड आंबट तुरट आदीतील बदल हे गुणधर्म बदलाला कारणीभुत ठरतात फळे खाण्याचा उद्देश सफल होत नाही उपयोग होत नाही शरीरासाठी.. केमीकल्स चे परिणाम दुष्पपरिणाम हा स्वतंत्र विषय!!!
नैसर्गिकरित्या पिकवलेली फळे खायचीत की रसायनांद्वारे early mature झालेली फळे खायचीत ते स्वतः च्याच हातात आहे.....

श्री विश्वसंस्कृती आयुर्वेद चिकित्सालय पंचकर्म केंद्र
 पावडेवाडी नाका
 नांदेड

9028562102, 9130497856

मधुमेहाची आयुर्वेदानुसार कारणे

मधुमेहाची आयुर्वेदानुसार कारणे

🍀
गुरूस्निग्धाम्ललवणान्यतिमात्रं समश्नताम्| नवमन्नं च पानं च निद्रामास्यासुखानि च| त्यक्तव्यायामचिन्तानां संशोधनमकुर्वताम्|| च.सु.१७/७८-७९
मधुमेहाची आयुर्वेदानुसार कारणे ...
१.गुरू (पचावयास जड) पदार्थांचे अधिक सेवनाने....
२.स्निग्ध द्रव्य तेल तुप उदीडासारखे पदार्थांचे अधिक सेवनाने...
३.लवण( खारट)आंबट पदार्थांचे अधिक सेवनाने....
४.नविन तयार धान्यापासुनचे अन्न, नविन मद्य व नविन जलसेवनाने...
५.अधिक निद्रा, नेहमी बसुन लोळुन राहणे (कष्टाचा अभाव) आदींनी...
६.व्यायामाचा चिंतेचा अभाव, पंचकर्माद्वारे शरीराची शुध्दी न करणे....
आदी कारणांमुळे शरीरात कफ पित्त मेद (चरबी) मांस वाढतो. वाताच्या गतिला अवरोध होतो. अवरोधित वात शरीरातील ओजला मुत्रायशयात आणतो..तेंव्हा कष्टकारक मधुमेहाचा आजार उत्पन्न होतो..
वरील कारणांत गोड पदार्थांचा समावेश केला नाही. कारण गोड पदार्थ शरीराचे बल ताकत टिकवुन ठेवतात.शरीराची झीज भरून काढतात.तर आंबट खारट पदार्थ पातळ कफ वाढवितात.पातळ कफ शरीरात पसरणारा असतो.तो सर्व शरीराला व्यापतो अधिक प्रमाणात वाढल्यास शरीरात मधुमेहाची निर्मिती करतो.गोड पदार्थांतुन शरीरासाठी आवश्यक जो घट्ट कफ तयार होतो.त्या घट्ट कफसोबत मिसळुन हा पातळ कफ शरीरात द्रवता ( liquidity) वाढवतो.आणि हा पातळ कफ मुत्राच्या मार्गाने बाहेर पडतो.आणि वारंवार लघ्वीला जावे लागते..
वरील कारणांवरून असे लक्षात येते की आंबट खारट पदार्थ व सुखकर आयुष्य, कष्टाचा अभाव हे मधुमेह उत्पतीचे मुळ कारणे आहेत.. एकदा पातळ कफ तयार व्हावयास सुरूवात झाली की गोड पदार्थ आजार वाढावयास मदत करतात..
चिकित्सा करताना देखील प्रकृती व कारणांचा विचार आवश्यक आहे..

श्री विश्वसंस्कृती आयुर्वेद चिकित्सालय पंचकर्म केंद्र 
पावडेवाडी नाका 
नांदेड 9028572102, 9130497856

🍀 शरीरावरील सुजेची कारणे

🍀 शरीरावरील सुजेची कारणे 

🍀
अबल, पांडु (anemia), लंघनाने कृश झालेल्या लोकांनी क्षार, आंबट, तीक्ष्ण, उष्ण आणि जड पदार्थांचे सेवन केल्याने सुज उत्पन्न होते.
तसेच दही, माती खाण्याची सवय, शुष्क भाज्या, विरोधी पदार्थ, कृत्रीम विषापासुन बनविलेले अन्न खाल्ल्याने सुज उत्पन्न होते..
पुर्वी मुळव्याधचा त्रास असेल तर,
मुळीच व्यायाम न करणे, कधीच शरीरशुध्दी न करणे, कुठल्याही मर्मावर (शरीरातील महत्वाचा अवयव भाग) आघात झाल्याने, अकाली गर्भपात किंवा गर्भस्राव झाला असता शरीरावर सुज उत्पन्न होते...
🔴 सुज असताना वर्ज्य 🔴
शरीरावर सुज असताना पुढील आहारविहार टाळावा..
१. मांसाहार
२. वाळलेल्या भाज्या, उसरी
३. नविन धान्य खाण्यास वापरणे टाळावे.
४. गुळाचे पदार्थ
५. पिष्टमय पदार्थ हरभरा आदी डाळीपासुन बनविलेले पदार्थ
६.दही, पनीर, आईसक्रीम
७. तीळापासुन बनवविलेले पदार्थ
८. उशीरा पचणारे पदार्थ
९.मद्य
१०. खारट पदार्थ पापड खारे बिस्कीट लोणचे
११. मोड आलेले पदार्थ मटकी वाटाणा छोले
१२. पथ्यकर व अपथ्यकर पदार्थ एकत्र मिसळुन खाणे टाळावे
१३. असात्म्य पदार्थ म्हणजे असे पदार्थ जे खाल्ले असता नेहमी त्रास होतो.
१४. विदाही पदार्थ दाहकारक पदार्थ उदा. दही उदीड दाळ बेकरी पदार्थ दाक्षीणात्य पदार्थ
१५. दिवसा झोपु नये..
वैद्य गजानन मॅनमवार
श्री विश्वसंस्कृती आयुर्वेद चिकित्सालय पंचकर्म केंद्र 
पावडेवाडी नाका
 नांदेड

9028562102, 9130497856

वजन कमी करण्याचे फायदे


वजन कमी करण्याचे फायदे

सध्याच्या धावपळीच्या जीवनाशैली मुळे प्रत्येक घरामध्ये रक्तदाब, मधुमेह, थायरॉईड, पीसीओडी यासारख्या वाढलेल्या वजनाशी संबंधीत रुग्ण आढळुन येत आहेत. ज्या कुटुंबात अशा आजारांचे रुग्ण नाहीत ते खरोखरच भाग्यवान म्हणावे लागतील. आई वडीलांना असलेला रक्तदाब-मधुमेह-हृदयविकार-थायरॉईड सारखे आजार मुलांना वयाच्या ३०-३५ या वर्षातच होत आहेत असे दिसुन येत आहेत. आई - वडील आपल्या मुलांसाठी भरपुर गुंतवणुक करत असतात मात्र जमीन-जागा-पैसा यांच्या गुंतवणुकी बरोबरच ते आपल्या मुलांसाठी रक्तदाब-मधुमेह-हृदयविकार-थायरॉईड यांची नकळत गुंतवणुक करत असतात. जर पालकांना रक्तदाब-मधुमेह-हृदयविकार-थायरॉईड सारखे आजार असतील तर त्यांनी स्वतःची काळजी घ्यावी सोबतच आपल्या मुलांना हे आजार होऊ नये म्हणुन त्यांनाही सतत मार्गदर्शन करणे महत्वाचे असते. 
रक्तदाब-मधुमेह-हृदयविकार-थायरॉईड-पीसीओडी या सारख्या कित्येक आजारांचे मुळ हे वाढलेल्या वजनात - व्यायामाच्या अभावात- आहाराच्या अनियमिततेतच असते. वजन कमी करुन व्यायामाची शरीराला सवय लावली, शरीराला आवश्यक तोच व आवश्यक तितकाच आहार सेवन करण्याची सवय लावली तर रक्तदाब - मधुमेह-हृदयविकार-थायरॉईड-पीसीओडी यासारख्या आजारांची तिव्रता कित्येक पटिने कमी होते, या आजारांची सुरु असलेल्या औषधांचे प्रमाण ही कमी होते, भविष्यातील दुष्परीणामांचे प्रमाण ही कमी होते.
वजन कमी करण्यासाठी आम्ही(लड्डा आयुर्वेदिक चिकित्सालय) अवलंबलेली शास्त्र शुध्द आयुर्वेदिक चिकित्सा पधद्ती अत्यंत उपयुक्त आहे. वजन कमी करणे म्हणजे शरीर शुध्दिकरण करणे होय. वजन कमी करताना हृद्य, किडनी, लिव्हर, आतडे , शरीरातील रक्तवाहीन्या हे शरीरातील मह्त्वपुर्ण अवयवांची साफसफाई होते. हृदय, फुफ्फुस यांना शक्तीदायक औषधांचा पुरवठा होतो. शरीर हल्के वाटायला लागते, सुस्ती आळस कमी होतो, कामाचा उत्साह वाढतो . शरीराचा बेडौलपणा कमी होऊन शरीराची सुंदरता वाढते. नित्य व्यामाने मनातील नकारात्मकता कमी होऊन कॉन्फीडन्स लेवल वाढते. 
रक्तदाब - मधुमेह-हृदयविकार-थायरॉईड-पीसीओडी यांचा रुग्णांनी आपले वजन कमी कसे करता येईल, वजन नियंत्रणात कसे राहील, शरीराचे शुध्दीकरण -साफसफाई कशी करता येईल याकडे सतत लक्ष ठेवावे . 
वजन कमी करण्यासाठी संपर्क
डॉ. पवन लड्डा
लड्डा आयुर्वेदिक चिकित्सालय
लातूर. पिन ४१३५३१
व्हॉट्स एप नंबर ०९३२६५११६८१
काही शंका किंवा प्रश्न असतील तर वरील नंबर वर मॅसेज करावे.

Saturday, December 12, 2015

शरीराचे तीन खांब-- आहार निद्रा व बह्मचर्य...

शरीराचे तीन खांब-- आहार निद्रा व बह्मचर्य...

आहार निद्रा ब्रम्हचर्य हे शरीराचे तीन आधारस्तंभ आहेत.
जसे घरास खांब (pillers) असतात तसे.......
सुख दुख शारीराची पुष्टी कृशता शक्ती अशक्तता षंढता etc झोपेवर अवलंबुन असते......
अकाली झोपणे, अति झोपणे , अल्प प्रमाणात झोपणे हे शरीर व आयुष्याची हानी करतात. रात्रीचे जागरण शरीरात रूक्षता आणते तर दिवसा झोपल्याने कफपित्त वाढतो..दिवसा झोपायचे असल्यास ती बसुनच घ्यावी लोळु नये......
आहार हा गरम , स्नेह असलेला तुप तेल आदिंनी युक्त, विरूध्द नसलेला , मात्रावत म्हणजे जेवढा पचेल तेवढाच कमीही नाही आणि अति जास्त प्रमाणात नाही असा , सहाही रसांनी युक्त असलेला आहार मनपुर्वक घ्यावा. आहार अतिशय घाईने खाणे आणि एकदम हळुवार खाणे चुकीचे आहे....
ब्रम्हचर्य पालन करणे हे देखील दीर्घायुष्य व बल चांगले राहण्यासाठी अतिशय आवश्यक आहे....
वरील तीन स्तंभ म्हणजे आहार निद्रा ब्रम्हचर्य यांचे पालन बिघडले तर शरीररूपी घर ढासळते कमकुवत होते.कारण शरीराचे pillers कमकुवत होतात......
Hypertension , sugar वाढणे thyroid glands चा त्रास etc आजार हे तीन खांब कमकुवत झाल्याचे लक्षण होय.. आणि या व्याधीसाठींची औषधी हे pillers ला पुन्हा टेकु आधार देण्यासारखे आहे....
त्यामुळेच bp, sugar cholesterol , thyroid साठीची औषधे कायमस्वरूपी घ्यावा लागतात कारण शरीराला तीन pillers सह गोळी रूपी टेकु आधाराची आवश्यकता पडते गोळ्याशिवाय bp sugar cholesterol control होत नाहीत....
यासाठीच नजिकच्या आयुर्वेद चिकित्सकाकडुन प्रकृती तपासुन आहार विहार निद्रा औषधी पंचकर्म याविषयी यांविषयी सल्ला घ्यावा तीन स्तंभ pillers मजबुत ठेवुन आरोग्य उत्तम राखावे....
श्री विश्वसंस्कृती आयुर्वेद चिकित्सालय पंचकर्म केंद्र 
रामानंद नगर 
पावडेवाडी नाका
 नांदेड
वैद्य गजानन मॅनमवार
9028562102 9130497856

Visit Our Page