*आयुमित्र*
*सुधन आणि आयुर्वेद*
देशात काळ्या धनाची चर्चा सुरु आहे. आज बरेच लोक काळे धन पांढरे करण्याच्या रांगेत सकाळपासूनच लागले आहेत. परंतु काळेधन बदलून घेणे म्हणजे ते शुध्द होते का? व्यावहारिकदृष्ट्या कदाचित होत असाव पण अस नाही. स्वच्छ धनापेक्षा धन हे सुधन म्हणजेच योग्य मार्गाने कमाविलेले असावे.
*सुधन आणि आयुर्वेदाचा काय संबंध?*
आयुर्वेद आचार्य चाराकांनी त्रिविध एषणा वर्णन करतांना ह्याचा उल्लेख केलेला आहे. प्रत्येक व्यक्तीने ज्याची इच्छा करावी अशा तीन एषणा वर्णन केल्या आहेत. त्यापैकीच एक म्हणजे *धनैषणा*. जीवन जगण्यासाठी आवश्यक साधने आपल्याकडे असलेच पाहिजे. कायदेशीरपणे शेती, पशुपालन, व्यापार, नौकरी यासारखी कामे करून धन मिळवावे. ज्याची निंदा कायदा व आजूबाजूचा समाज करीत नाहीत. अस जो करेल तोच खरा धनवान होईल. समाजाकडून मानसम्मान प्राप्त होईल. असे जो करीत नाही त्याच्या पदरी दुख येते. म्हणून धन असावे पण ते सुधन म्हणजे योग्य मार्गाने मिळवलेले असावे.
आयुर्वेदाचे हे आपल्या सामाजिक आरोग्याविषयीचे नियम आपण नक्की पळूया आणि सुधन मिळवूया.
*वैद्य भूषण मनोहर देव.*
*ज्योती आयुर्वेद,
जळगाव
8379820693
http://wp.me/p7ZRKy-40
No comments:
Post a Comment