#डायटिंग_व_क़्वाड्रायटिंग
डायटिंग हा शब्द आपल्या करिता काही नवीन नाही. वजन, पोट, साखर, चरबी, कोलेस्तेरोल वे वाढले कि आपली डायटिंग सुरु होते. मग कोणी कडक उपास, गोड बंद, तेल तूप बंद इत्यादी प्रकार सुरु होतात. डायटिंग हा आधुनिक शास्त्राचा कन्सेप्ट आहे. डायटिंग म्हणजेच डाय म्हणजे दोनदा आणि इटिंग म्हणजे खाणे(मी लावलेला अर्थ). दिवसातून दोनदाच पोटभर खाणे आणि दिवसभर काहीही न खाणे म्हणजे डायटिंग.
#क़्वाड्रायटिंग
आपण किती वेळा खावे आणि किती खावे?
ह्या प्रश्नाचे उत्तर प्रत्येक व्यक्तीसाठी सारखे नाही. उदा. ज्याचा अग्नी म्हणजे पचनशक्ती चागली आहे, तरुण आहे, हिवाळा हा ऋतू आहे, नित्य व्यायाम करणारा आहे, दिवसाची वेळ आहे असा व्यक्ती आहाराची मात्रा जास्त घेत असेल व चार वेळा जेवत असेल तरी त्याला त्रास होणार नाही. परंतु ह्याच्या उलट मंदाग्नी, वृध्द, पावसाळा, व्यायाम अभाव, रात्रीची वेळ अश्या व्यक्तीने जास्त मात्रेत आहार घेत असेल व चार वेळा खात असेल तर नक्कीच त्रास झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आयुर्वेद सागते कि प्रत्येकाने आपले वय, प्रकृती, पचन शक्ती, व्यायम/बल , प्रदेश, ऋतू, वेळ ह्या नुसार आहार कमी जास्त मात्रेत घेणे अपेक्षित आहे.
परंतु स्वास्थ्य व्यक्तीसाठी क़्वाड्रायटिंग योग्य ठरते. सकाळी पोटभर जेवण, दुपारी थोडा नाश्ता, संध्यकाळी हलके जेवण व रात्री परत थोडे दुध किवा एखादे फळ असे चार वेळेस स्वास्थ्य व्यक्तीने आहार घेण्यास हरकत नाही.
(टीप- क़्वाड्रायटिंग हे नवीन नामकरण मी चार वेळा खाणे ह्या अर्थाने केलेले आहे.)
वैद्य भूषण मनोहर देव.
ज्योती अयुर्वेद,
वैद्य भूषण मनोहर देव.
ज्योती अयुर्वेद,
जळगाव
8379820693
No comments:
Post a Comment