आपली झोप आणि आयुर्वेद
by aayumitra
देशात सध्या “गरीब रात्री झोपतो आहे, श्रीमंत जागा आहे”, इमानदार झोपला आहे, बेईमानांची झोप उडाली आहे”, अश्या घोषणा ऐकायला मिळताय. मोठ्या नोटा बंद झाल्याने अनेकांना अनिद्रेचा त्रास होतोय.
आयुर्वेदाने निद्रेला आहार, निद्रा व ब्रम्हचर्य ह्या तीन महत्वाच्या उपस्तंभात सहभागी केले आहे. योग्य पद्धतीने झोप घेतल्यास आरोग्य प्राप्ती होते. परंतु खूप झोपल्याने, न झोपल्याने, जेवल्यावर लगेच झोपल्याने, उन्हाळा सोडून इतर ऋतूत दिवसा झोपल्याने आपले आरोग्य धोक्यात येवू शकते. जे बाल, वृध्द आहेत, खूप थकलेले आहेत व ज्यांचे शारीरिक व मानसिक बल कमी झाले आहे अश्या व्यक्तींना निद्रेच सगळे नियम लागू होत नाहीत.
चांगली झोप येण्यासाठी/ निद्रानाश झालेल्यांनी अभ्यंग( अंगाला तेल लावणे), पादाभ्यंग(तळपायाला तेल लावणे) दारारोज करणे, गाईचे दुध व तूप आहारात घेणे, चांगले संगीत ऐकणे, झोपयची जागा स्वच्छ, सुवासिक ठेवणे, झोपण्याची बिछाना/गादि मुलायम व सुखकारक वापरणे उपयुक्त ठरते.
किती वेळ झोपावे? हा प्रश्न नेहमीच विचारल्या जातो. ह्याचे उत्तर सगळ्यांसाठी एकसारखे नाही. लहान मुले, तरुण व वृध्द ह्यांची झोप वेगवेगळ्या प्रमाणात असते. शारीरिक व मानसिक प्रकृतीनुसार सुद्धा झोपेचे प्रमाण कमी जास्त असू शकते. जसे आपले पंतप्रधान फक्त ४ तास झोपतात व बाकी पूर्णवेळ कार्यरत असतात. कफ प्रकृतीचे लोक जास्त झोपतात तर वाताज प्रकृतीचे लोक कमी झोपतात. काही लोक अभ्यासपूर्वक आपला झोपेचा वेळ कमी जास्त करू शकता.
-वैद्य भूषण मनोहर देव.
ज्योती आयुर्वेद,
जळगाव 8379820693
No comments:
Post a Comment