*आयुमित्र*
*तक्र/ताक/छाछ आणि आपले आरोग्य*
*तक्र शक्रस्य दुर्लभं* म्हणजे पृथ्वी वरील ताक हे स्वर्गातील देवराज इंद्रालासुद्धा दुर्लभ आहे. अशी महती ह्या ताकाची आहे. ताक हे सगळ्याच देश-प्रदेशांमध्ये प्रचलित आहे. चवदार मठ्ठा, गरमगरम कढी, लस्सी अश्या अनेक रेसपी ताकापासून बनवतात. ताकातल्या मीरच्या सुद्धा. असे हे ताक आपल्या आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा फार महत्वाचे आहे.
ताक हे भूक वाढवणारे आहे. ताकाचा मुख्य फायदा हा उदर रोगांसाठी होतो. पचनाचे विकार, आतड्यांचे आरोग्य, मुळव्याध/बवासीर, पोटसाफ न होणे ह्यावर ताक उत्तम आहे. सकाळी, जेवताना ताक पिणे महत्वाचे आहे. उन्हाळ्यात मठ्ठा, ताक पिणे उत्तम असते. शरीरात आलेली दुर्बलता, दाह लगेच कमी करते.
ताक घेताना एक काळजी ह्या दह्यात अर्धे पाणी मिसळून मग मंथन करा, ताक मात्र जास्त आंबट नको, त्यातील लोणी वेगळे केलेले हवे. वात विकारात मीठ टाकून, पित्तविकारात खडीसाखर टाकून व कफ विकारात त्रिकटू म्हणजे सुंठ, मिरे व पिंपळी चूर्ण मिसळून ताक घ्यावे.
ताक मला वैयक्तिक खूप आवडते. ताज घुसळलेल ताक प्यायला फार मजा वाटते. त्यात पुदिना, जिरे,धणे पूडघातली तर अजूनच भारी. आपणही दररोज ताक घ्यायला काहीच हरकत नाही.
*–वैद्य भूषण मनोहर देव.*
*ज्योती आयुर्वेद पंचकर्म* *चिकित्सालय, जळगाव*
*8379820693/7588010703*
drbhushandeo@gmail.com
http://wp.me/p7ZRKy-6b
No comments:
Post a Comment