Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Tuesday, January 24, 2017

मी आणि माझी प्रकृती- कफेशची गोष्ट

*आयुमित्र*
*मी आणि माझी प्रकृती- कफेशची गोष्ट*

*कफेश वसंत गोडबोले* नावाचे एक व्यक्तिमत्व आमच्या प्रकृती कॉलनीत राहते. कफेशला मी फार जवळून ओळखतो. कफेशचे व्यक्तित्व अतिशय साधे आहे. कोणाच्या जास्त घेण्यादेण्यात नाही. सात्विक वृत्त्तीचा कफेश लोकांना, मोठ्यांना, गुरुजनांना मान सम्मान देणारा आहे आणि कृतज्ञ आहे. घरात आईवडील ह्यांच्याशी सुद्धा आदराने कफेश वागतो. अगदी शांतता प्रिय माणूस आहे हा. थोडा लाजाळू असून जास्त मित्र नाहीत पण आहेत ते एकदम पक्के. कफेश अतिशय गोड/मधुर(पण मिठीछुरी मात्र नाही), नम्रतापूर्वक आणि विचारपूर्वक बोलतो. बोलणे गंभीर, मध्ये थोड थाबुन पण स्पष्ट आणि सत्य बोलणे आहे. कफेश क्षमावान आहे. परंतु एखाद्याशी वैर झाल्यास छुपे आणि पूर्ण शत्रुत्व ठेवतो. असा हा कफेश मनात कशाची लालसा ठेवत नाही. सदा समाधानी असतो.

कफेशचे व्यक्तिमत्व आकर्षक व सुंदर आहे. शरीर दृढ, मजबूतआणि भरदार पण स्थूलता नाही. केस एकदम मजबूत असतात. डोळे प्रसन्न व मोठे आहेत. कपाळ, छाती, मंड्या व बाहू मोठे आणि मजबूत आहेत.  कफेश भूक, तहान, उन, गर्मी सहन करू शकतो. ह्याची सहन शक्ती उत्तम आहे. खाण्यात ह्याला तिखट, तुरट व कडू पदार्थ आवडतात. गरम- गरम आणि कोरडे अन्न खायला ह्याला फार आवडते. शारीरक हालचाली, कमी असतात जास्त खेळायला, फिरायला आवडत नाही. झोपायला मात्र आवडते. एखादा विषय समजायला थोडा उशीर लागला तरी त्याच्या दीर्घकाळ आठवणीत राहतो. कफेशची मती(बुद्धी )स्थिर आहे. असा हा कफेश दूरदर्शी व दानशील सुद्धा आहे.

वरील कथेतील कफेश जसा आहे साधारण अशे व्यक्ती कफ प्रकृतीचे असतात. आपल्यात हि लक्षणे आहेत का? हे बघा. असल्यास तुम्ही कफ प्रकृतीचे आहात असा प्रार्थमिक अंदाज तुम्ही करू शकता. परंतु योग्य परीक्षण आपल्या वैद्यांकडूनच करून घ्या आणि त्यानुसार आहार विहार आणि आचाराच सल्ला घेऊन या.

आजवर आपण वात, पित्त व कफ प्रकृतिची व्यक्ती कशी असते हे जाणून घेतले आहे. ह्या व्यतिरिक्त  वात-पित्त, वात-कफ, पित्त-कफ आणि वात-पित्त-कफ अश्या प्रकृतीचे व्यक्ती सुद्धा असतात. ह्या व्यक्तींमध्ये दोन्ही/तिन्ही  प्रकारची लक्षणे आढळून येतात. आपली नेमकी प्रकृती जाणून घेण्यासाठी आपल्या वैद्यांकडे जाऊन प्रकृती परीक्षण करून घ्यावे.

(संदर्भ- अ. शा. ८/ १२,१३,१४   सु.शा. ४/७१,७२,७३,७४ व ७५ टीप- कथा काल्पनिक आहे.)

*–वैद्य भूषण मनोहर देव.*
*ज्योती आयुर्वेद पंचकर्म *चिकित्सालय, जळगाव*
*8379820693/7588010703*
*drbhushandeo@gmail.com*

http://wp.me/p7ZRKy-6A

No comments:

Post a Comment

Visit Our Page