*आयुमित्र*
*माझी प्रकृति आणि मी*
प्रकृति हा शब्द अनेक संदर्भात वापरण्यात येत असतो. ह्या सृष्टीला/निसर्गाला प्रकृति म्हणून संबोधतात, आज माझी प्रकृति ठीक नाही, वैद्यराज माझी प्रकृति काय? जरा नाडी बघून सांगता का?, माझी वाताची प्रकृति आहे, माझी कफची आहे असे रुग्ण आम्हाला विचारात/सांगत असतात. प्रकृति विषयी माहिती करून घेणे फार महत्वाचे आहे. पित्त प्रकृतीच्या मुलाने/मुलीने आपला जोडीदार कसा निवडावा? कफप्रकृतीच्या माणसाने हिवाळ्यात हनिमूनला राजस्थानला जावे कि काश्मीरला? अभ्यास केलेला माझ्या लक्षात का राहत नाही? मित्राच्या मात्र चटकन लक्षात राहतो. इत्यादी अनेक प्रश्नांची उत्तरे व उपाय हवे असतील तर स्वतःची प्रकृती जाणून घेणे फार महत्वाचे आहे.
*आपल्या शरीराच्या प्रकृति कुठल्या प्रकारच्या असतात?*
शुक्र व शोणित संयोगाच्यावेळी दोषांच्या प्रभावानुसार शरीराची प्रकृती ठरत असते. एक दोष प्रभाव, दोन दोष प्रभाव व त्रिदोष प्रभाव ह्यानुसार वातप्रकृति, पित्तप्रकृति, कफप्रकृति, वातपित्तप्रकृति, वातकफप्रकृति, पित्तकफप्रकृति व समप्रकृति असे प्रकृतिचे प्रकार पडतात. हि जी आपली प्रकृति ठरते हिच शेवटपर्यंत आपली प्रकृती असते. प्रकृति शारीरिकच नव्हे तर मानस प्रकृति सुद्धा आहेत. सत्व, रज, तम आदी ७ ह्या मानसप्रकृति आहेत.
व्यक्तीच्या प्रकृतिनुसार त्याच्या शरीराची बांधणी झालेली असते. उंची, जाडी, त्वचा,डोळे, केस आदी शरीरभाव हे प्रकृतीवर अवलंबून असतात. तसेच स्वभाव, आवडीनिवडी, होणारे आजार, हे सुद्धा प्रकृतिवर अवलंबून असतात. प्रत्येक प्रकृतिच्या व्यक्तींच लक्षणे वेगवेगळी दिसून येतात. प्रत्येक व्यक्तीला आपल्या शरीरप्रकृति विषयी माहिती असणे आवश्यक आहे.
आपल्या प्रकृतिनुसार आपला आहार, विहार आणि आचार ठेवल्यास कायम निरोगी राहता येऊ शकते.
जिज्ञासूनी आपल्या वैद्यांकडून प्रकृति परीक्षण जरूर करून घ्या आणि आपली प्रकुती जाणून घ्यावी.
(संदर्भ- अ.शा.अध्याय ८/३ , अ.शा.अध्याय ८/२१ )
*-वैद्य भूषण मनोहर देव.*
*ज्योती आयुर्वेद पंचकर्म चिकित्सालय, जळगाव*
*8379820693/7588010703* *drbhushandeo@gmail.com*
http://wp.me/p7ZRKy-6p
No comments:
Post a Comment