*आयुमित्र*
*मी आणि माझी प्रकृती- पित्तेशची गोष्ट*
*पित्तेश शरद सांतापे* हा प्रकृती कॉलनीत वातेशच्या(वातेशच्या ओळखीसाठी मागील लेखाचा वाचवा) घराजवळ राहतो. पित्तेश अतिशय हुशार मुलगा आहे. नेहमी वर्गात पहिला असतो. शिक्षक नेहमी त्याच कौतुक करीत असतात. एखादा विषय एकदा समजला कि दीर्घकाळ त्याच्या लक्षात राहतो. स्मरणशक्ती एकाग्रःता अतिशय दांडगी आहे ह्याची. आई वडीलहि त्याच्या कामगिरीमुळे नेहमी खुश असतात.
पित्तेश शरीरयष्टी मध्यम असून तो अतिशय गोरापान आहे. ह्याचे ओठ, गाल, हातापायांचे तळवे, नख हे लाल गुलाबी आहेत. केस थोडे कोमल, विरळ आणि भुरकट आहेत. एक दिवशी पित्तेशची आई वातेशच्या घरी आली. वातेशच्या आईन विचारले काहो तुमचा मुलगा एव्हडा हुशार कसा? काय खायला देता त्याला? विशेष अस काहीच देत नाही, सुरवातीपासूनच हुशार आहे तो. पण काय सांगू त्याला नेहमी कडाक्याची भूक लागते भूक सहनच होत नाही अधून मधून काहीतरी खायला लगतच त्याला. तहानही खूप लवकर लागते. त्याला थंड आणि गोड पदार्थ जास्त आवडतात. कडू भाज्यापण आवडीने खाऊन घेतो. बाकी त्याचा जास्त त्रास नाही.
सगळ्या गोष्टींमध्ये भाग घेतो. हिम्मतवान आहे सहसा घाबरत नाही कशालाच. क्रिकेट खेळताना विराट कोहली सारखीच आक्रमकता त्याच्यात असते असे त्याचे मित्र सांगतात. लगेच चिडतो, संतापतो पण पूर्ण झुंज देतो. मला सांगत असतो, आई कमी खेळलो तरी घाम खूप येतो आणि थोडा वासही येतो. उन्हाळ्यात तर त्याला खूप त्रास होतो. उन सहन होत नाही. त्यामानाने हिवाळा आणि पावसाळा त्याला जास्त आवडतो. त्याचे अंग इतरांच्या तुलनेत थोडे गरम सुद्धा असते ह्याचे कारण सुद्धा मला जाणून घ्यायचे आहे. मी उद्या त्याला आपल्या वैद्यानकडे घेऊन जाणार आहे आणि त्यांच्या कडून प्रकृती परीक्षण करून घेणार आहे. ते आपल्या आवडी-निवडी, शरीर रचना, नाडी परीक्षण ह्यावरून प्रकृती परीक्षण करतात आणि योग्य तो आहार-विहार सुचवतात. वातेशची आई- हो वातेशला सुद्धा त्यांनी छान मार्गदर्शन केलय तुम्ही जाऊन या नक्की.
वरील कथेतील पित्तेश जसा आहे साधारण अशे व्यक्ती पित्त प्रकृतीचे असतात. आपल्यात हि लक्षणे आहेत का? हे बघा. असल्यास तुम्ही पित्त प्रकृतीचे आहात असा प्रार्थमिक अंदाज तुम्ही करू शकता. परंतु योग्य परीक्षण आपल्या वैद्यांकडूनच करून घ्या आणि त्यानुसार आहार विहार आणि आचाराच सल्ला घेऊन या.
(संदर्भ- अ. शा. ८/ १२,१३,१४ टीप- कथा काल्पनिक आहे.)
*–वैद्य भूषण मनोहर देव.*
*ज्योती आयुर्वेद पंचकर्म चिकित्सालय, जळगाव*
*8379820693/7588010703*
http://wp.me/p7ZRKy-6y
No comments:
Post a Comment