Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Tuesday, October 20, 2015

गर्भसंस्कार आणि काम परमात्म्याची सृजनशक्ती

गर्भसंस्कार आणि काम परमात्म्याची सृजनशक्ती
लेखक – प्रा. वैद्य सुभाष मार्लेवार
आयुर्वेद वाचस्पति
सहयोगी प्राध्यापक, पोदार वैद्यक महाविद्यालय व रुग्णालय, वरळी, मुंबई
भ्रमणध्वनी - +९१७७३८०८६२९९/ +९१९८१९६८६२९९
ईमेल – subhashmarlewar@gmail.com
रशियातील एका वैज्ञानिकाने माकडांवर काही प्रयोग केले. माकडांचे त्याने दोन गट बनवले. एका गटामध्ये हुबेहूब कृत्रिम माकडीण बनवली. नकली हात, नकली चेहरा सर्वकाही हुबेहूब माकडासारखेच. दुसऱ्या गटामध्ये जिवंत माकडीण ठेवण्यात आली. माकडाच्या १० नवजात पिल्लांना कृत्रिम माकडीणीमार्फत चांगल्या प्रकारचे दूध पाजण्यात आले, कृत्रिम प्रेम करून पालन – पोषण करण्यात आले. ही पिल्ले त्या कृत्रिम माकडीणीच्या पोटाला बिलगून राहत. कालांतराने ही पिल्ले धष्टपुष्ट, स्वस्थ अशी माकडे बनली. मात्र मानसिकदृष्ट्या ती कमकुवत होती, विक्षिप्त व विकृत बनली होती. पिल्लांना दूध मिळाले, त्यांचे शरीरही चांगले धष्टपुष्ट झाले. परंतु ती विक्षिप्त का झाली? वैज्ञानिक गोंधळात पडले. वैज्ञानिकांच्या प्रयोगशाळेमध्ये प्रेम ही वस्तू मिळतच नाही. दुसऱ्या गटातील पिल्लांना प्रेमासहित दुध मिळाले व ती शारीरिक व मानसिकदृष्ट्या आरोग्यसंपन्न घडली.
पहिल्या गटातील पिल्लांच्या परिस्थितीप्रमाणे आपल्या देशातील समाजाची परिस्थिती बनली आहे. अभिनय करणारी आई मिळते. अभिनय करणारा बाप मिळतो. नकली बाप नकली आई मुलांसाठी अंगाई गीत गाते. पण मुले विक्षिप्त होतात. आपण म्हणतो ही अशांत कशी झाली. ही मुले एखाद्याच्या पोटात सुरा भोसकतात, मुलींच्या अंगावर अॅसीड टाकतात, कॉलेजला आग लावतात, बसवर दगड फेकतात. शिक्षकांना मारहाण करतात.
आजचा समाज प्रेमाच्या केंद्रावर निर्मित नाही. त्यामुळे समाजात विक्षिप्तता व गुन्हेगारी प्रवृत्तीचे प्रमाण जास्त आहे. युद्ध, आत्महत्या, कुरूप-समाज आणि रुग्ण-मनुष्य ही प्रेमाच्या अभावातून निर्माण झालेली परिस्थिती आहे. प्रेमातून विवाह निर्माण झाल्यास सुसंस्कृत समाज निर्माण होण्याची शक्यता अधिक आहे. जे पति-पत्नी प्रेमपूर्ण संभोगात लीन होत नाहीत, ते केवळ भौतिकवादी मुलास जन्म देतील. त्यांचे जीवन भौतिकतेच्या पुढे जाणार नाही. जे आई-वडील एकमेकांवर प्रेम करून मुलास जन्म देतील, त्या मुलांच्या जीवनात वसंताची बहार येईल, त्यांचे जीवन गतिमान व समृद्ध बनेल. प्रेम हे बीज आहे व सुप्रजनन हे या बीजास आलेले फळ आहे. प्रेम जर कुटुंबाचे केंद्र बनेल तर स्वामी अरविंद घोषांची सुपर-मॅन ची कल्पना, ओशोंची महामानवाची संकल्पना या पृथ्वीवर साकार होईल. भृण ज्याचा पहिला अणु प्रेमाचा त्याचा अंतिम श्वासही प्रेमाचाच असेल. ह्यातूनच एक सात्विक मानवता उत्पन्न होऊ शकते.
क्षितिजाच्या पलीकडे जाऊन नवनिर्माण करणे खरच कठीण काम आहे. खर तर ती एक जोखीम आहे. मात्र अशी जोखीम जे घेत नाहीत, ते जमिनीवरच्या किड्या-मुंग्यांप्रमाणे जगतात व जे क्षितिजाच्या पलीकडे झेप घेतात. ते “बाज” पक्षी म्हणून सिद्ध होतात. अलिकडचा समाज हा घराची कवाडे बंद करून यशप्राप्तीची आराधना करणारा आहे.
धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे जीवनाचे चार पुरुषार्थ आहेत. समाज धारण करणारी सुव्यवस्था म्हणजे ‘धर्म’. निर्वाहाचे साधन म्हणून उपयोगात येतो तो ‘अर्थ’. प्रजननातील महत्त्वपूर्ण घटक म्हणजे ‘काम’. या तिन्ही पुरुषार्थांचा उपभोग घेऊन साक्षी भावाने निवृत्त होणे म्हणजे ‘मोक्ष’. काही प्रवृत्तींनी कामजीवनाचे विकृतीकरण करून समाजापुढे मांडले, म्हणून समाजाला त्याचा आनंद घेता आला नाही. खरं तर कामशक्ती म्हणजे परमात्म्याची सृजनशक्ती, ह्यातूनच ऊर्जाशक्ती निर्माण होते. प्रेमभावाने पति-पत्नीचे मिलन घडले तर ‘कामाचे’ रुपांतर सृजनशक्तीमध्ये होईल. अपवित्र किंवा पापदृष्टीने कामशक्तीकडे पाहिले तर ‘काम’ कुरूप होऊन जाईल आणि प्रेमभावे बघितले तर ‘दिव्यशक्ती’ बनून राहील.
पति-पत्नीच्या शारीरिक मिलनापूर्वी त्यांचे मानसिक मिलन होणे अत्यावश्यक आहे. लैंगिक शक्ती ही इंद्रियांमध्ये नसते तर ती मनामध्ये असते. विवाहानंतर शरीरे एकत्र आली म्हणजे मिलन झाले असे नाही. एकमेकांना समजून घेणे, एकमेकांच्या प्रश्नांशी एकरूप होणे व त्यानंतरचे शारीरिक मिलन अद्वितीय असते, दिव्य आनंद देऊन जाते.
प्रेम हे परमात्म्याचे द्वार आहे, पण आमचे त्याकडे लक्ष नाही. भौतिक माणसांनी आणि भौतिकवादी प्रवृत्तीने ही दारे बंद करून टाकली आहेत. ह्या प्रवृत्तीने प्रेमाची हत्या करून मनुष्य जीवन सुव्यस्थित करण्याचा तथाकथित प्रयत्न केला आहे. जीवनात प्रेमाची संभावनाच राहणार नाही ह्याकडे लक्ष दिले आहे. समाजाची संपूर्ण व्यवस्था निष्प्रेम आहे आणि त्यातून होणारे विवाद जीवनाच्या अंतापर्यंत टिकून राहतात ही त्याची शोकांतिका. हजारो वर्षांपासून आपण भगवान श्रीकृष्ण, श्रीराम, गौतमबुद्ध, जीझसक्राईस्ट, मोहम्मद पैगंबर, गुरुनानक, संत ज्ञानेश्वर, चक्रधरस्वामी अशा अनेक संत महात्म्यांची स्तुती करत आलो आहोत. ह्या सर्वांना ईश्वरप्राप्ती झाली मात्र आजच्या समाजात अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच माणसे पूर्णत्वाला गेली. ह्याचा विचार करण्याची नितांत गरज आज निर्माण झालेली आहे.
शेतकऱ्याने लाखो बीजे पेरली आणि त्यातील एखादेच बीज जर अंकुरले तर त्याला तुम्ही शेतकरी म्हणाल का? ही बीजे जमिनीवर नुसती जरी फेकली असती तरी त्यातील एखादे नक्कीच उगवले असते! तेव्हां लाख बीजे पेरली आणि ती सर्व उगवली तर तो खरा शेतकरी. त्यापैकी दोन-चार उगवली नाही तरी ठीक आहे. पण आता तर उलटेच होत आहे. कोट्यावधी मुले जन्माला येतात, त्यात एखादा डॉ. होमी भाभा असतो, कधी डॉ. माशेलकर तर कधी डॉ. अब्दुल कलाम.
फुलाच्या सुगंधाची उधळण ही प्रत्येक बीजाची क्षमता . . . .
प्रेमसंपन्न वैवाहिक जीवनामुळे प्रत्येक व्यक्ती गौरवाला, तेजस्वीपणाला प्राप्त होऊ शकते. प्रत्येक बीजात ही क्षमता आहे की, ते फुलाप्रत पोचते व सुगंध उधळते आणि जेव्हां हे बीज वृक्ष बनते तेव्हां पाखरे त्यावर क्रीडा करतात. वारा देखील फेर धरत गाणे म्हणतो. वसंताच्या ह्या क्षणांमध्ये परिपूर्णतेचा आनंद आणि उल्हास आहे, हीच परमात्म्याची प्राप्ती आहे. भोगवादी प्रवृत्तीची माणसे संतती निर्माण करतात, काळाच्या ओघात यमसदनास जातात. मात्र आपली संतती मागे ठेऊन जातात. ‘उल्लू मर जाते है, औलाद छोड जाते है !’ मग ही मुलेही मागे राहत नाहीत, ती देखील पैदास वाढवतच जातात. अशाप्रकारे हळूहळू खोट्या नाण्यांचे चलन वाढत जाते. प्रेमाशिवाय विवाह करण्यापेक्षा अविवाहित राहिलेलेच बरे !
बहुतेक वेळा श्रेष्ठ आणि प्रज्ञावान व्यक्ती अविवाहित राहतात . . . .
संत रामदासस्वामी, ओशो, अटलबिहारी बाजपेयी, डॉ. अब्दुल कलाम ह्यांनी विवाह केला नाही. गानकोकिळा लता मंगेशकर हे त्यातलेच एक उदाहरण. अन्य सामान्य माणसे एक नाही तर चार विवाह करतात. माणूस जितका निकृष्ट असतो तितका तो जास्त वैताग निर्माण करतो. बुद्ध देखील एकाच मुलाचा पिता झाला. सर्वसामान्य माणसे रांगा लावून टाकतात. त्यांच्यात स्पर्धा चालू आहे की कोण किती मोठी रांग लावतो.
प्रेमाशिवाय विवाह करू नये असे माझे मत नाही. परंतु पति-पत्नीमध्ये ताळमेळ असावा. परंतु अलीकडे तसे दिसत नाही. पति-पत्नीचा ताळमेळ तुम्ही कुणा करवी पाहता? ज्योतिषाकडून ! जरा त्याच्या घरची अवस्था पहा. स्वत:च्या बायकोशी तो ताळमेळ साधू शकला आहे का? अन न जाणो किती पति-पत्नीचा ताळमेळ तो बसवतो आहे? तोही चार – आठ आण्यात. . . .
पति-पत्नीमध्ये ताळमेळ बसला तर त्यांची मुलेही प्रतिभावान होतील. प्रेम आणि विवाहाची ही पद्धत लागू झाली तर शेकडो आईनस्टाईन जन्माला येतील, प्रतिभेच्या राशी उभ्या राहू शकतील.
प्रतिभावंतांना जन्म देणे वैदिक विज्ञानाने शक्य :-
पति-पत्नीने एकत्र येतांना नियोजनबद्ध पद्धतीने एकत्र येणे महत्वाचे. नियोजनविना ते अशक्य आहे. ह्या संबंधीचे सविस्तर मार्गदर्शन आयुर्वेदीय ग्रंथामध्ये दिसून येते. आपण शेतातील बियांची जितकी काळजी घेतो तितकी माणसाच्या बीजाची घेत नाही. आपल्यासारखे मूर्ख आपणच ! शेताला पाणी सोडणे, राखण करणे हे जसे महत्वाचे तसेच माणसांसाठी विशेष संस्कार करण्याची आज नितांत गरज आहे.
प्रेम आणि विवाह यांचा काय संबंध ?
प्रेमातून विवाह होऊ शकतो तसेच विवाहानंतरही प्रेम होऊ शकते. ह्या संदर्भात काही गोष्टी समजून घेणे आवश्यक आहे. प्रेम ही परमेश्वराची मोठी देणगी आहे तर विवाह ही समाजव्यवस्था आहे. विवाह सामाजिक संस्था आहे. प्रेम प्रकृतीचे दान आहे. प्रेम व्यक्तीच्या प्राणामध्ये निसर्गतः निर्माण होते तर विवाह मात्र समाज व कायद्यानुसार केला जातो. विवाह ही मनुष्याची गरज आहे तर प्रेम हे परमात्म्याचे दान आहे. वैवाहिक जीवनात प्रेम निर्माण होईलच असे नाही. विवाहामुळे सहवास लाभतो. सहवासामुळे प्रेम निर्माण होऊ शकते. विवाहापासून परिवार बनतो, ज्याला आपण ‘गृहस्थाश्रम’ म्हणतो. संघर्ष, कलह, द्वेष, इर्षा अशा परिस्थितीत देखील आपण तोंडदेखले हसत घराबाहेर पडतो. ह्यात आत्मतृप्ती होत नाही. पति-पत्नी एकमेकांच्या गरजा पूर्ण करू शकत नाहीत. ह्यातूनच एकमेकांस कमी लेखणे, दुषणे देणे, विक्षिप्त वागणे सुरु होते. ऋषिमुनींनी निर्माण केलेला हा समाज अधोगतीकडे कसा जातो हे अनाकलनीय आहे. तुझ्यामुळे मला शांती मिळत नाही असे जेव्हां पति-पत्नी म्हणायला लागतात तेव्हा प्रेम काय आहे हे कळते. दोन लहान मुले एकमेकांशी भांडत होती. आईने मुलांना भांडण्याचे कारण विचारले असता मुलांनी उत्तर दिले, “मम्मी ! वी आर नॅाट फायटिंग, वी आर प्लेईंग मम्मी अँड़ ड़ॅड़ी गेम !”
मानवता निर्माण होण्यासाठी कामाची पवित्रता, धार्मिकता स्वीकार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कामयोगातून परमात्मा जीव जन्माला घालतो. तो जीव म्हणजे पाप नाही तर जीवन आहे. मनुष्य जीवनावर प्रेम करत नाही. म्हणून फक्त लैंगिकता उरली व यौवन पाप झाले. वास्तविक हे पाप नसून ह्यात फक्त प्रेमाचा अभाव आहे !
जीवन निरंतर बदलत आहे. जीवनाची सृजनात्मकता परमात्मा स्वरूपाने तुमच्या समोर आहे. जोपर्यंत पति-पत्नी एकमेकांवर प्रेम करणार नाहीत तोपर्यंत सुप्रजनन होणार नाही. मुलांना दूध मिळेल, कपडे मिळतील, घरही मिळेल परंतु प्रेम मिळत नसेल तर सर्व मिळूनही व्यर्थच.

"औषधी गर्भसंस्कार"..........

"औषधी गर्भसंस्कार"..........

एक शास्रीय प्रकाशन व उत्पादने
"गर्भविकास आणि मातृपोषणाचा अद् भुत संगम"
प्रत्येक दाम्पत्याला निकोप व सुधृढ बालक हवे असते. ते त्यांचे सुंदर स्वप्न असते. त्यासाठी ते मनापासून प्रयत्नशील असतात. बालक निकोप व सुदृढ तर हवेच, त्याचबरोबर मातेची प्रसुतीही नैसर्गिक पद्धतीने आणि संकटमुक्त व्हावी, अशीही अपेक्षा असते. केवळ पती-पत्नीच नव्हे तर साऱ्या जवळच्या नातेवाईकांची हीच अपेक्षा असते. सतयुग असो वा कलियुग, ह्या अपेक्षा अनादी काळापासून तशाच आहेत, आणि पुढेही तशाच राहणार ह्यात दुमत होणे असंभव. ह्या अपेक्षा सर्वार्थाने पूर्ण करणारी, विशेष पद्धतीने कार्य करणारी १६ उत्पादने "अक्षय उद्योग समूहाने" निर्माण केली. ती उत्पादने व त्यामागील शास्त्रीय सिद्धांत आपल्याला "औषधी गर्भसंस्कार" पुस्तिकेच्या स्वरुपात आम्ही सुपूर्द करीत आहोत.
आयुर्वेद प्राचीन आहे. ह्या प्राचीन आयुर्वेदात समग्र मानवी जीवनाचा सखोल आणि सूक्ष्म अभ्यास केला गेला आहे. निरोगी राहण्यासाठी अनंत प्रकारचे आहार, विहार, औषधोपचार व सर्वप्रकारे दक्षता घेवूनही रोग झालाच तर त्याचे निराकरण करण्याचे अगणित उपाय ह्या शास्त्रात विस्ताराने दिलेले आहेत. त्यामुळेच हे प्रभावी शास्त्र आज एकविसाव्या शतकातही साऱ्या विश्वात लोकप्रिय होत आहे.
आयुर्वेदाच्या मौलिक खजिन्यात मातृत्व प्राप्तीच्या विषयावर यथासांग विवेचन उपलब्ध आहे. ह्या विवेचनाचा उपयोग गर्भधारणा, गर्भसंगोपन, सुलभ प्रसूती, बालकल्याण अशा सर्व टप्प्यांमध्ये कसा होऊ शकतो ते विस्तृतपणे ह्या पुस्तिकेत सोप्या शब्दात सांगितले आहे.
मूळ आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये लग्नासाठी मुलीचे वय सोळा वर्ष, तर मुलाचे वीस वर्ष असावे असे वर्णन केले आहे. ह्या वयाला 'समत्वागतवीर्य' म्हटले आहे. म्हणजेच ह्या वयात विवाह होऊन गर्भधारणा झाली तर स्त्री व पुरुषाचे दोष-धातु सर्वोत्तम स्थितीत असतात व निकोप गर्भधारणेची शक्यता सर्वात जास्त असते. जसजसे वय वाढते तसतसे शरीरात दोषांचे संतुलन बिघडत जाते व गर्भधारणेच्या दृष्टीने थोडी कठीण परिस्थिती उत्पन्न होउ लागते.
एकविसावे शतक किती धकाधकीचे, धावपळीचे, चिंता आणि ताण-तणावाचे झाले आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. कायद्याची वयोमर्यादा, शिक्षणाचा कालावधी, आर्थिक स्थैर्य, विभक्त कुटुंब पद्धती ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता विवाहाचे वय काळाच्या ओघाने आपोआपच वाढत जात आहे व त्याचा परिणाम स्त्री-पुरुषांच्या प्रजनन संस्थेवर होतो व पर्यायाने पुढच्या पिढीवर सुद्धा. हे दुष्टचक्र कुठे थांबवता येईल का ? कलियुगाची ही जीवनपद्धती तर बदलणे शक्य नाही, मग त्याचे दुष्परिणाम कसे आटोक्यात आणता येतील ?
ह्या सर्व समस्यांचे सकारात्मक निवारण फक्त आयुर्वेदातच सापडते. मूळ ग्रंथातील विवेचन अभ्यासताना थक्क होण्याची पाळी येते. ह्या विषयातील एक एक पैलू घेऊन त्यांची उपयुक्तता आणि सर्वांगीण लाभ स्त्रीला व होणाऱ्या बालकाला कसकसे प्राप्त होऊ शकतात हे आता पुढे पाहूया:
आयुर्वेदानुसार प्राकृत गर्भधारणा होण्यासाठी ४ गोष्टी योग्य प्रकारे एकमेकांना अनुरूप व पोषक असाव्या लागतात.
१) ऋतु… … गर्भाधानास योग्य काळ.
२) क्षेत्र… … गर्भाशयाची योग्य स्थिती.
३) अम्बु… … योग्य पोषक घटक.
४) बीज… … स्त्री व पुरुष यांचे निरोगी बीज.
ऋतु ... गर्भाधानास योग्य काळ
२८ दिवसांचा काळ हा मासिक ऋतु स्रावाचा प्राकृत काळ समजला जातो. मासिक स्रावाच्या पहिल्या दिवसापासून पुढे "दहा ते अठरा हा ८ दिवसांचा काळ" गर्भस्थापनेसाठी सुयोग्य असतो. इतर दिवशी संबंध ठेवण्याने प्रायः गर्भधारणा होत नाही. गर्भधारणा न होण्याच्या काळाला "सेफ पिरियड" म्हणतात. सध्या सोनोग्राफीच्या सहाय्याने गर्भधारणेसाठी योग्य काळ अगदी अचूकपणे कळू शकतो.
सोनोग्राफी करणे तुलनेने कमी खर्चिक व अतिशय निर्धोक असल्यामुळे त्याचा लाभ घेण्यास हरकत नाही. कायद्याच्या दृष्टीकोनातून सोनोग्राफी करण्यास काही निर्बंध घालण्यात आले आहेत. गर्भलिंग निदान व त्यामुळे होणाऱ्या भृणहत्या टाळण्यासाठी शासनाने हे कायदे आता कटाक्षाने अमलात आणण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे.
क्षेत्र ... गर्भाशयाची योग्य स्थिती
गर्भाशयाच्या रचनेत जन्मतः दोष असू शकतो. साधारणतः ३ ते ४ टक्के स्त्रियांमध्ये असे दोष असतात. अशा दोषांमुळे गर्भस्थापना होऊ शकते परंतु गर्भाची वाढ पूर्ण काळ होत नाही. गर्भाशयाच्या रचनेत काही दोष असल्यास ऋतुचक्राच्या तक्रारी उद्भवू शकतात. विशेषतः मासिक स्रावाच्या दिवसांमध्ये तीव्र वेदना होणे हे मुख्य लक्षण असते. सोनोग्राफीच्या सहाय्याने ह्या दोषाचे निदान करता येते.
अम्बु ... योग्य पोषक घटक
झाडांच्या वाढीसाठी जसे खत - पाणी तसेच गर्भाशयाच्या व पर्यायाने गर्भाच्याही पोषणासाठी जे जे काही आवश्यक घटक ते सर्व "अम्बु" समजावेत. आधुनिक वैद्यक शास्त्राप्रमाणे इस्ट्रोजिन, प्रोजेस्टेरॉन, प्रोलॅक्टिन इ. घटकांचा योग्य समतोल असणे येथे अभिप्रेत आहे. ऋतुस्राव, गर्भधारणा, गर्भपोषण, स्तन्यनिर्मिती, रजोनिवृत्ती अशा सर्व स्थिती सुरळीत होण्यासाठी शरीरातील अन्तःस्रावी ग्रंथींचे कार्य अविरतपणे चालू असते. गर्भावस्थेत ह्यांचा उत्तम समतोल गर्भाच्या पोषणासाठी अनिवार्य असतो.
बीज ... स्त्री व पुरुष यांचे निरोगी बीज
जन्मतः स्त्रीबीजकोषात ठराविक संख्यने सूक्ष्म स्वरुपात स्त्रीबीज दडलेली असतात. दर महिन्याच्या ठराविक दिवशी एक एक बीज परिपक्व होते व त्याचे पुरूषबीजाबरोबर मीलन झाले तर गर्भधारणा संभवते, अन्यथा मासिक स्रावाच्या वेळी स्त्री शरीरातून हे बीज बाहेर टाकले जाते. स्त्री व पुरुषबीजे निरोगी असली तरच गर्भधारणा व्यवस्थित घडते, निरोगी व सुदृढ बालक जन्माला येऊ शकते.
पुरूषबीजांची म्हणजेच शुक्राणूंची संख्या २० ते ४० दशलक्ष प्रति मि. ली. एवढी असते. किंबहुना एवढी असल्याशिवाय गर्भधारणा बहुधा होतच नाही. त्यातील फक्त एकच शुक्राणु गर्भधारणा घडवतो, तरीपण ही संख्या कमी असून चालत नाही. शिवाय त्यांची चलनवलन क्षमता, स्वरूप, अम्लता ही देखील महत्वाची असते. शुक्राणु सर्व दृष्टीने निरोगी असणे जरुरीचे असते.
स्त्रीबीज किंवा पुरुषबीज दोषयुक्त असता गर्भधारणा झाली तर बहुतेकवेळा गर्भस्राव होतो. त्यातूनही गर्भधारणा झालीच तर होणाऱ्या बालकामध्ये जन्मतः व्यंग राहते व अशा बीजदोषामुळे निर्माण झालेले व्यंग कायमस्वरूपी राहते.
मुळातच स्त्री देह नाजुक, त्या नाजुकपणातही हवीहवीशी वाटणारी संवेदनशील अवस्था म्हणजे 'गर्भावस्था'. पहिल्या गर्भारपणात तर स्त्रीला ही अवस्था अगदीच नवीन, औत्सुक्याची व कुतुहलाची असते. एका जिवंत शरीरातून दुसऱ्या चैतन्यमय शरीराची निर्मिती करणे ही निसर्गाची एक आश्चर्यजनक आणि थक्क करणारी किमया आहे. गर्भधारणा प्रक्रियेत कारणीभूत असलेला प्रत्येक घटक, त्यातील रसायने, त्यांचे प्रमाण सर्व काही माहिती असले तरी स्त्री आणि पुरुषाच्या जिवंत शरीराशिवाय असा नवीन देह निर्माण करण्याची जादू अजून ह्या पृथ्वीतलावर कोणी साकार करू शकलेले नाही.
प्राचीन आयुर्वेदात सुदृढ व निकोप अपत्यप्राप्ती साठी अचूक मार्गदर्शन केले आहे आणि गर्भासंबंधी सर्व दोष निवारण करण्याची क्षमता असणारे निश्चित असे औषधी पाठ सांगितले आहेत. शास्त्रशुद्ध व कालानुरूप सुयोग्य बदल करून हे पाठ विलेपित वटी व तेलाच्या स्वरुपात आम्ही सादर करीत आहोत. त्यांचे नामकरण व संक्षिप्त उपयोग पुढील प्रमाणे :-
१) अश्वमाह - शुक्राणु दोष निवारण, सामर्थ्य, संख्या व गती वर्धन
२) फलमाह - स्त्रीबीज दोष निवारण, सामर्थ्य व रोगप्रतिकारशक्ती वर्धन, विद्युत-चुंबकीय लहरींच्या दुष्परिणामांपासून संरक्षण
३) प्रथमाह - गर्भाशय स्थिती सुधार व स्थापक
४) द्वितिमाह - गर्भिणी व गर्भ यांचे स्वास्थ्य व पोषण
५) तृतिमाह - गर्भिणी व गर्भ यांचे स्वास्थ्य व पोषण
६) किक्किस निवृत्ती तेल - तणाव चिन्ह (स्ट्रेचमार्क्स) प्रतिबंध
७) चतुर्माह - गर्भिणी व गर्भ यांचे स्वास्थ्य व पोषण
८) पंचमाह - गर्भिणी व गर्भ यांचे स्वास्थ्य व पोषण
९) षष्ठमाह - गर्भिणी व गर्भ यांचे स्वास्थ्य व पोषण
१०) सप्तमाह - गर्भिणी व गर्भ यांचे स्वास्थ्य व पोषण
११) अष्टमाह - गर्भिणी व गर्भ यांचे स्वास्थ्य व पोषण
१२) सुप्रसव पिचु तेल - सुलभ, सुरक्षित व नैसर्गिक प्रसव, स्नायू बलवर्धन व जंतु-संसर्ग प्रतिबंध
१३) नवमाह - गर्भिणी व गर्भ यांचे स्वास्थ्य व पोषण
१४) दशमाह - गर्भिणी व गर्भ यांचे स्वास्थ्य व पोषण
१५) सूतिकाभ्यंग तेल - प्रसुती पश्चात मातृस्वास्थ्य रक्षणासाठी अभ्यंग
१६) क्षीरमाह - स्तन्यप्रवर्तन, शोधन व वर्धन
गर्भावस्थेतील प्रत्येक टप्प्यात क्रमाक्रमाने करावयाची ही "औषधी गर्भसंस्कार" योजना आहे. प्रत्येक औषधी घटकाचा उपयोग कसा होतो, ह्यांचा शास्त्राधार काय व त्यावरील संशोधनात्मक शास्त्रीय संदर्भ नेमके कोणते ह्याचे औत्सुक्य सर्वांनाच असणार. ह्या माहिती पुस्तिकेत पाठांतील प्रत्येक घटकाचे कार्मुकत्व प्रतिपादित केलेले असून त्यांचे संदर्भ एकत्रितपणे परिशिष्टात दिले आहेत.
मनोज अनंत जोशी 

सुलभ प्रसव व सुप्रजेसाठी उपाययोजना.........

सुलभ प्रसव व सुप्रजेसाठी उपाययोजना.........

सुलभ प्रसव, सुप्रजा व प्रजनन आरोग्य ही संकल्पना चरक, काश्यपादि काळापासून चिंतनीय मानली जाते. ह्यासाठी महर्षि काश्यप ह्यांनी ‘काश्यपसंहिता’ हा ग्रंथ साकारलेला आहे. ह्या ग्रंथात बालकांच्या सुदृढपणाचे रहस्य दडलेले आहे. ह्याउलट चरकसंहिता, अष्टांगसंग्रह इ. ग्रंथात माता व बालक ह्या दोघांच्या जीवित्वाची हमी, सुलभ प्रसवाचे उपाय, सुप्रजा व यशस्वी बाळंतपणाची जबाबदारी तत्कालीन समयी घेण्यात आलेली आहे. त्यामुळे सुप्रजननाची संकल्पना अनादि कालापासून चालत आलेली आहे असे म्हटल्यास वावगे होणार नाही.
प्रजनन आरोग्यामध्ये प्रजनन क्षमता, प्रजनन नियमन व गरोदरपणापासून प्रसवापर्यंत सर्व अवस्था सुखरूप होणे ह्या गोष्टींचा समावेश होतो. गरोदरपण व लैंगिक आजारांचा संसर्ग ह्या भीतीपासून मुक्त करणे, लिंगभेद, वृद्धत्व, स्त्रियांना सक्षम करणे, मासिक पाळीतील आरोग्य इत्यादि विषयांचा समावेश प्रजनन आरोग्यामधे होतो. ह्या लेखामधे सुलभ प्रसव व सुप्रजा ह्या दोन बाजूंचा आपण परामर्ष घेऊया.
सुप्रजा निर्मिती कशासाठी ?
भारतीय संस्कृती विविधतेने नटलेली आहे. ह्यात गर्भाधानापासून अंतेष्टीपर्यंत सोळा संस्कार वर्णन केलेले दिसतात. हे संस्कार क्रमाने गर्भाधानापासून प्रसवापर्यंत व बालकाच्या जन्मापासून विवाहापर्यंत केल्यास सुप्रजा निर्मिती होऊ शकते. यंत्रतंत्र युगात जगत असताना हे कसे शक्य आहे? असा विचार दांपत्याच्या मनामध्ये येऊ शकतो. पालकांनी आता विचार करायला हवा की देशाची शक्ती केवळ लोकसंख्येवर नव्हे तर सुसंस्कारित अपत्यांना जन्म देण्यामध्ये आहे. देशाच्या प्रतिमेची काळजी आता प्रत्येकानेच करायला हवी.
मातृत्व ही प्रेमाचा गौरव करणारी घटना आहे. ह्यासाठी डझनावारी मूलं जन्माला घालण्याची आवश्यकता नाही. सुसंस्कारित अशी एक किंवा दोन अपत्ये पुरेशी आहेत. जन्मच द्यावयाचा असेल तर जन्म देण्यायोग्य विवेकानंद, शिवाजी, ज्ञानेश्वर, श्रीकृष्ण, बुद्ध, नागार्जुन, चरक, सुश्रुत आणि काश्यप ह्यांना द्यायला हवा, जो मातापित्यांची प्रतिमा उजळवेल, आपल्या परिवाराचा व देशाचा विकास करेल अशांनाच जन्माला घालावे.
सुप्रजाजनन शक्य आहे काय?
मनुष्याचा शारीरिक व बौद्धिक विकास होऊ लागला तेव्हा जोडीदार निवडण्याचे स्वातंत्र्य पण त्याला मिळाले. स्त्री-पुरुषांनी केवळ आनंदासाठी एकत्र येणे वेगळे मात्र सुप्रजननासाठी दोघे जेव्हा एकत्र येतात तेव्हा काही गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे. आपण इतर गोष्टींमध्ये वैज्ञानिक चिंतन करतो, पण स्वत:बाबत मात्र ते करत नाही. स्वतःबाबत मात्र आपण मोठे अवैज्ञानिक आहोत. बागेतील फुलझाडांची आपण जशी काळजी घेतो तसेच आपल्या बाबतीतही करायला हवे. एखादी गोष्ट घडण्यापूर्वी त्या गोष्टीबद्दल सर्वांगीण विचार करावा. गोष्ट घडून गेल्यावर उहापोह करण्यात अर्थ नाही. म्हणून विवाहाबाबत शास्त्रमर्यादा पाळावी. शास्त्रविहित वयात विवाह होऊन गर्भधारणा झाल्यास मूल अधिक संपन्न होण्याची शक्यता आहे. गर्भाधानासाठी उत्तम शुक्र, निकोप स्त्रीबीज, दोहोंची व्याधिविरहित शरीरे म्हणजेच प्रजनन – विषयक कुठलाही आजार नसावा. ह्यासाठी दांपत्याने वैज्ञानिक तपासणी, उपचार ह्यांचा उपयोग करून घ्यायला हवा. कारण लुळी-पांगळी, वजनाने कमी, बुद्धिहीन, कायम आजारी असलेली मुले जन्माला येण्यापेक्षा मुलाला जन्मच न देणे निश्चितच योग्य ठरेल.
बाळाचे जीवन गर्भधारणेपासूनच सुरु होत असते. म्हणून दांपत्याने आधीपासून आचार रसायनाचे सेवन करावे. प्रत्येक दांपत्याने असा संकल्प करावा की, जो पर्यंत मी सदाचार व ध्यान करण्यास समर्थ होत नाही तो पर्यंत मी मुलाला जन्म देणार नाही. कारण चंगेजखान, नादिरशहा, हिटलर, रामन-राघवन, सद्दाम हुसैन, लादेन अशांना जन्म देऊन काय फायदा ?
बुद्धिहीनांनी लोकसंख्या वाढविणे देशाच्या दृष्टीने धोक्याचे ठरत आहे. बुद्धिहीन वर्गाला समज देऊन प्रजनन थांबविणे, कुटुंबनियोजन सक्तीचे करणे, सुप्रजाजनन, दोन मुलांमध्ये अंतर ठेवणे आता गरजेचे झाले आहे. कुटुंबनियोजन ऐच्छिक ठेवल्यास सुप्रजाजनन, प्रतिभा, बुद्धिमत्ता ह्यांची क्षती होण्याची शक्यता आहे. सुप्रजा निर्मितीबद्दल सूक्ष्मपणे विचार विचार करून आचरण केले तर देशाची प्रतिमा निश्चितच विकसित होईल ह्यात शंका नाही.
आयुर्वेद पंचकर्म आणि सुप्रजा :-
सुप्रजा निर्मितीसाठी प्रजोत्पादनास योग्य काळ, शुद्ध गर्भाशय, स्त्रीबीज, पुरूषबीज, दांपत्याचे सर्व शारीरिक व मानसिक भाव कारणीभूत ठरतात. म्हणूनच स्त्री व पुरुष ह्या दोघांनीही गर्भाधानापुर्वी स्नेहन, स्वेदन व आयुर्वेदातील पंचकर्मोपचार तज्ञाकडून करून घ्यावेत. शरीर शुद्धी झाल्यावर सात्विक आहार-विहार करावा. पुरुषाने औषधीसिद्धी तूप व स्त्री ने तेल व उडिदाचा प्रयोग वैद्याच्या मदतीने करावा. गर्भाधानकाळामधे पहिल्या महिन्यापासून ते दहाव्या महिन्यापर्यंत आयुर्वेदात वर्णन केलेली गर्भिणी परिचर्या व मासानुमासिक चिकित्सा करावी. ह्या चिकित्सेमुळे बाळाची वाढ उत्तम होते. गर्भपाताची भीती राहत नाही. गर्भिणी विषाक्ततेची शक्यता राहत नाही. पूर्णमास व प्राकृत प्रसव होतो. मृतगर्भ जन्माला येत नाही. पहिल्या तीन महिन्यांमधे होणाऱ्या उलट्या व मळमळ थांबते. गरोदरपणात मातेस झटके येत नाहीत व रक्तदाबही नियंत्रित राहतो. योनिगत रक्तस्त्राव होत नाही, सूतिका रोगाची भीती राहात नाही. शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते. ह्या सर्व गुणांमुळे गर्भिणी स्त्रियांनी ही औषधे घेऊन गरोदरपणामधे होणाऱ्या गुंतागुंती टाळाव्यात. ही औषधे महाराष्ट्रात अनेक आयुर्वेद रुग्णालयातून अनेक तपे वापरात आहेत. गेल्या पस्तीस वर्षापासून म.आ.पोदार रुग्णालयात ही वापरात असून यशस्वी बाळंतपणाचे रहस्य ह्यात दडलेले आहे. समाधानी माता व तिच्या कुशीत झोपलेलं गुटगुटीत बाळ हा कुटुंबाच्या दृष्टीने आनंदाचा क्षण आहे. त्यासाठी खालील औषधे प्रत्येक मातेने आवर्जून वापरावीत.
औषधे वापरण्याची पध्दत :-
जुनी पद्धत - औषधांची पाच ग्रॅम भरड रात्रभर पाण्यात भिजत घालावी. औषधाच्या वजनाच्या दुप्पट पाणी घालून अर्धे पाणी उरेपर्यंत मंद आचेवर काढा तयार करावा. मिश्रण गाळून घ्यावे व तो काढा सकाळ – संध्याकाळ दोन वेळा घ्यावा. अशी ९ महिनेपर्यंत काढे देण्याची पूर्वी पद्धत होती.
अक्षय फार्मा रेमेडीज ह्या अनुभवसिद्ध औषध निर्मिती कंपनीने ह्या औषधी पाठांवर सखोल शास्त्रीय संशोधन करून त्यांना गोळ्यांच्या स्वरुपात सादर केले आहे. पाठांमधील प्रत्येक वनस्पतीचा सुयोग्य परिचय व त्याची कार्मुकता शास्त्रीय पद्धतीने अभ्यासून प्रसिद्ध केली आहे. ह्यात विशिष्ट नॅनोटेक्नोलॉजी सदृश शास्त्रीय निर्माण पद्धती वापरून ह्या गोळ्या गुणधर्माने अधिक श्रेष्ठ बनविल्या आहेत. काही अनुपलब्ध किंवा संदिग्ध वनस्पतींच्या ऐवजी श्रेष्ठ गुणांच्या प्रातिनिधिक द्रव्यांचा वापर करीत हे पाठ प्रचारात आणण्याचे कौतुकास्पद कार्य केले आहे. पूर्वीच्या काढ्यांपेक्षा ह्या गोळ्या घेण्यास अधिक सुलभ आहेत. स्त्रीच्या ऋतुचक्राच्या अनुषंगाने २८ दिवसांचा महिना व २८० दिवसांची म्हणजेच १० महिन्यांची गर्भावस्था ह्या शास्त्रीय सिद्धांतावर आधारित १० महिन्यांचे १० पाठ निर्माण केले.
गर्भिणी मासानुमासिक पाठ
पहिला महिना: यष्टिमधु, सागाचे बीज, शतावरी, देवदार
दुसरा महिना: आपटा, काळेतीळ, मंजिष्ठा, शतावरी
तिसरा महिना: शतावरी, प्रियंगु, श्वेत सारिवा
चौथा महिना: अनंतमूळ, कृष्णसारिवा, कुलिंजन, कमलपुष्प, यष्टिमधु
पाचवा महिना: रिंगणी, डोरली, शिवण फळ, वटांकुर, वड साल
सहावा महिना: पृश्निपर्णि, बला, शिग्रु, श्वदंष्ट्रा (गोखरू), मधुपर्णिका
सातवा महिना: शृंगाटक, कमलगट्टा, द्राक्ष, कसेरु, यष्टिमधु, शर्करा
आठवा महिना: कपित्थ, बिल्व, बृहति, पटोल, इक्षु, निदिग्धिका
नववा महिना: सारिवा, अनंता, शतावरी, यष्टिमधु
दहावा महिना: शतावरी, यष्टिमधु, सुंठ, देवदार
कुसंतती पेक्षा वांझ राहणे केव्हाही उत्तम :-
श्रीसमर्थ, श्रीचक्रधर, छत्रपती शिवाजी सारखा नरश्रेष्ठ मानव जातीचे कल्याण करतो. “आमचे काय बुवा?” म्हणून देवावर हवाला ठेवणारे दांपत्य क्लिब समजावे. म्हणून सर्वांनी शास्त्राज्ञा पाळून विधिपूर्वक सुप्रजाजनन करावे. चांगली संतती व्हावी ही प्रत्येकाची इच्छा असते, पण कृती मात्र नसते. नुसती फुंकर मारून बासरी वाजत नाही. उत्तम रागदारी बाहेर पडण्यास बोटांचा युक्तिपूर्वक उपयोग करावा लागतो. त्याचप्रमाणे सुप्रजननासाठी योग्य कृती घडली पाहिजे. संतती एकच असावी व ती पुरुषोत्तत्म अशा स्वरुपाची असावी. कन्या असेल तर ‘स्त्रीत्व’ असणारी शूर साम्राज्ञी असावी, अन्यथा खंडोगती प्रजा काय कामाची ?
सुलभ प्रसव म्हणजे काय ?
योनिमार्गाने, डोक्याकडून, माता व बालकाला कुठल्याही प्रकारची इजा न होता होणारी प्रसूती ह्यास सुलभ प्रसव म्हणता येईल.
सुलभ प्रसूतीसाठी मातृत्वाचे खालील नियम प्रत्येकाने लक्षात ठेवावे:-
1. गर्भवती स्त्री ने धुम्रपान व मद्यपान करू नये. त्यामुळे बालकास इजा होऊ शकते.
2. गर्भवती राहिल्यापासून प्रसूती होईपर्यंत दहा वेळा तज्ञांकडून तपासणी करावी.
3. प्रसूती वेळेपर्यंत मातेचे वजन दहा किलोने वाढले पाहिजे.
4. दहा तास विश्रांती, ज्यात झोप – दुपारी दोन तास व रात्री आठ तास.
5. रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण दहा ग्रॅम पेक्षा कमी नसावे.
6. दहा महिन्यांपर्यंत मातेचे लसीकरण पूर्ण झालेले असावे.
7. पहिला डोस – अठरा आठवड्यात, दुसरा डोस – चोवीस आठवड्यात
8. गरोदरपणातील जोखिमीची प्राथमिक चिह्ने व लक्षणांचे ज्ञान असावे
9. गरोदर मातेला रुग्णालयात नेण्याचे नियोजन असावे.
10. प्रसूती प्रशिक्षित व्यक्तींकडून करून घ्यावी.
11. कळा सुरु झाल्यापासून दहा ते बारा तासात प्रसव पूर्ण झाला पाहिजे.
12. बालकाचे श्वसन, रोदन, ध्वनि, रंग, प्रतिक्रिया ह्या गोष्टी व्यवस्थित असाव्यात.
13. प्रसूतीपश्चात दहा आठवड्यांपर्यंत तपासणी करावी.
14. दहा महिन्यांपर्यंत बालकास स्तनपान द्यावे.
15. बालकाच्या वयाच्या दहाव्या महिनापर्यंत लसीकरण पूर्ण झालेले असावे.
16. आईचे दूध हेच बाळासाठी सर्वोत्तम आदर्श असे अन्न आहे. ‘केवळ स्तनपान’ आणि ‘बाळ रडेल तेव्हाही स्तनपान’ हा मंत्र सर्व मतांनी लक्षात ठेवावा. स्तनपान शक्यतो दोन वर्षेपर्यंत चालू ठेवावे.
गरोदरपणासाठी वर्णन केलेली सर्व औषधे घ्यावीत त्याबरोबर विशिष्ट वनस्पतींनी युक्त काढयांचा अस्थापन बस्ति आठव्या महिन्यात घ्यावा. नवव्या महिन्यापासून प्रसूतीपर्यंत योनीभागी ‘सुप्रसव पिचु तेलाचा’ पिचु दररोज रात्रभर ठेवावा. ह्या पिचुधारणेने विटपाचे कठीणत्व जाऊन त्याठिकाणी मृदुत्व येते, प्रसवमार्गात स्निग्धता निर्माण होते, योनीमार्गात लवचिकता निर्माण होऊन स्नायूंची शक्ती वाढते. ह्यामुळे विटपछेद (एपिझिओटॉमी) करण्याची वेळ येत नाही.
सुखप्रसवासाठी वेगवेगळ्या प्रकारचे सकारात्मक विचार मातेला देता येतात. प्रसुतीच्या वेळी अशा सूचना वारंवार देऊन सुख-प्रसव घडून आणता येतो. ह्याला आश्वासन चिकित्सा म्हणतात. गर्भिणी परीक्षणामुळे व विविध तपासण्यांमुळे जोखमीच्या शक्यता शोधून काढणे सहज शक्य आहे. सुख प्रसव ही नक्कीच अवघड बाब नाही. ह्या चिकित्सा घेण्याची मातेची मानसिक तयारी हवी. केवळ प्रसूतीतज्ञ कुशल असून भागणार नाही.
प्रजनन आरोग्यातील आयुर्वेदाचा सहभाग :-
सर्वंकष प्रजनन व बाल आरोग्य सेवा ह्यात एकूण पन्नास प्रकारच्या सेवा शासन पुरवीत असते. ह्यात आयुर्वेदाचा सहभाग पुढील प्रमाणे असू शकतो.
माता – बाल संगोपन :-
प्रसूतीपूर्व तपासणी
प्रसूतीपश्चात काळजी
प्रशिक्षित व कुशल व्यक्तीमार्फत प्रसूती
सर्वंकष प्रजनन व बाल आरोग्य सेवा :-
१) लैंगिक शिक्षण
२) विवाहपूर्व समुपदेशन
३) आहार – विहार सल्ला
४) बालआरोग्य शालेय प्रशिक्षणात आयुर्वेदाचा सहभाग
५) स्पष्ट कारण नसलेल्या वंध्यत्वाबाबत मार्गदर्शन व उपचार
६) बालक अतिसारसंबंधी आयुर्वेदोक्त उपचार
७) प्रसवकालीन गुंतागुंतीचे व्यवस्थापन
८) चाळीशी नंतरची घ्यावयाची आरोग्य विषयक काळजी
९) स्तन व गर्भाशयाच्या कर्करोगाचे निदान करणे.
महाराष्ट्र शासनाकडून अपेक्षा :-
1. आयुर्वेद पदवी व पदव्यूत्तर प्रशिक्षण घेतलेल्या संबंधीत विषयातील तज्ञांना आधुनिक प्रशिक्षण सक्तीने द्यावे.
2. स्त्री व पुरुष टाका व बिनटाक्याचे वंध्यत्वीकरण शस्त्रकर्म प्रशिक्षण इच्छुक वैद्यकीय व्यावसायिकांना द्यावे.
3. सुरक्षित गर्भपाताचे प्रशिक्षण इच्छुक वैद्यकीय व्यावसायिकांना मिळण्याची व्यवस्था करावी
4. राज्य सेवेतील आयुर्वेद वैदकीय अधिकारी वर्ग - २ व वर्ग - ३ ह्यांना आयुर्वेदिक औषधांचा वापर करण्याची सक्ती करावी
5. जिल्हा आयुर्वेद विस्तार अधिकारी ह्यांच्या आयुर्वेद ज्ञानाचा वापर पूर्ण जिल्ह्यात करून आयुर्वेदाव्यतिरिक्त इतर कामे त्यांच्यावर लादू नयेत.
प्रजनन आरोग्य कार्यक्रमाची अंमलबजावणी एकात्मिकरित्या झाली तर स्त्रियांचे सर्वांगीण आरोग्य आणि पर्यायाने समाजाचेच आरोग्य सुधारण्यासाठी प्रजनन आरोग्य सेवेचा दीर्घकाळ उपयोग होईल असे वाटते.
लेखक –
प्रा. वैद्य सुभाष मार्लेवार
आयुर्वेद वाचस्पति,
सहयोगी प्राध्यापक,
स्त्रीरोग व प्रसूतीतंत्र विभाग,
रा. आ. पोदार वैद्यक महाविद्यालय
मुंबई ४०० ०१८
+917738086299
+919819686299
subhashmarlewar@gmail.com

मासिक पाळी – एक निसर्गदत्त देणगी........

मासिक पाळी – एक निसर्गदत्त देणगी........

मासिक पाळी ही स्त्री शारीरक्रियेची नैसर्गिक अवस्था असून तिच्या आरोग्याचे प्रतिक आहे. नैसर्गिक घडामोडीची स्त्री देहातील नियमितता, नियमबद्धता, नेटकेपणा ह्या सर्वांचे प्रतिकात्मक चित्रण म्हणजे मासिक ऋतुचक्र. सृष्टीतील ऋतुचक्राचे सदेह दर्शन स्त्रीमध्ये दिसते. निसर्ग जसा परिवर्तनशील तशीच स्त्रीपण आवर्तनशील आहे. नियमबद्धता, सातत्य, स्थैर्य ह्या सर्व गोष्टी निसर्गाप्रमाणेच स्त्रीच्या देहामध्ये आहेत. निसर्गातल्या अदृश्य, अमृत ऋतूची शक्ती, सामर्थ्य ह्याचे सजीव सगुणरूप म्हणजे स्त्री. म्हणून स्त्रीला ऋतुमती झाली असे म्हणतात. स्त्रियांच्या मासिकपाळी संदर्भात वैज्ञानिक माहीतीचा आढावा घेत असतानाच मासिकपाळी निसर्गदत्त देणगी कशी आहे ह्याचा उहापोह ह्या लेखामध्ये आपण करणार आहोत.
पौगंडावस्था म्हणजे काय ?
वयाच्या ८ ते १८ वर्षाच्या दरम्यान स्त्री शरीरामध्ये विशिष्ट बदल होत असतात. ह्यात जांघेत, बगलेत केसांची वाढ, स्तनांची वाढ, स्त्रीचा बांधा व मासिक पाळी सुरु होणे. ह्यास पौंगडावस्था असे म्हणतात. हा काळ सुमारे ४ वर्ष राहतो. ह्याकाळात उंची व वजनात वाढ होते. मानसिक बदल पण होतात. ह्या वयात मुलींचा आत्मविश्वास जागृत करणे व त्यांच्यावर संस्कार करणे महत्वाचे आहे.
मासिक पाळी म्हणजे काय ?
स्त्रियांमध्ये दर महिन्याला ३ ते ४ दिवस योनिमार्गे जो रक्तस्त्राव होतो. त्याला मासिक पाळी किंवा रज:स्त्राव म्हणतात.
मासिक पाळी केव्हा सुरु होते ?
प्रथम ‘रजोदर्शन’ सामान्यतः वयाच्या १२ व्या वर्षी होते. देश, काल, ऋतु, वयानुसार काही स्त्रियांमध्ये प्रथम रजोदर्शन १६ व्या वर्षी देखील होऊ शकते. बदलत्या वातावरणामुळे व जीवनशैलीमुळे अलीकडे ८ व्या वर्षीसुद्धा प्रथम रजोदर्शन झाल्याची उदाहरणे आहेत. एकदा रजोदर्शन झाल्यानंतर गरोदरपणी व सूतिकावस्थेत रज:स्त्राव होत नाही. कालांतराने पुन्हा मासिक पाळी पूर्ववत सुरु होते. वयाच्या ४५ वर्षानंतर मासिक पाळी हळूहळू बंद होते व पुन्हा येत नाही. ह्यास ‘रजोनिवृत्ती, किंवा ‘मेनोपॅाज’ असे म्हणतात.
मासिक पाळीत रज:स्त्राव किती दिवस असतो व पुन्हा किती दिवसानंतर येते ?
महर्षी चरकांनी रज:स्त्राव काळ ५ दिवसांचा सांगितला आहे. काही स्त्रियांमध्ये हा काळ ७ दिवसांचा सुद्धा असतो. आधुनिक विज्ञानदेखील ह्याला सहमत आहे. मासिकपाळीची पुनरावृत्ती २८ दिवसांनी होते. काही स्त्रियांमध्ये हा काळ जास्तीतजास्त ३५ दिवसांपर्यंत वाढू शकतो. नियमित पाळी येणे हे आरोग्याचे लक्षण आहे. स्त्रीरोग चिकित्सेत व गर्भावस्थेत महिना म्हणजे हा २८ दिवसांचा काळ समजावा.
मासिकपाळीमध्ये किती रक्तस्त्राव होतो ?
मासिक पाळीतील रक्तस्रावाचे प्रमाण निर्धारित करणे कठीण असते. प्रत्येक स्त्री मध्ये हे प्रमाण वेगवेगळे असते. त्यामुळे ठराविक प्रमाण एका स्त्रीसाठी सामान्य असेल, तर दुसऱ्या स्त्रीसाठी तेच अधिक ठरू शकते. महर्षी चरकाचार्यांनी हे प्रमाण ४ अंजली मानले आहे. आधुनिक विज्ञानाप्रमाणे दर मासिक पाळीत ५० ते ७० मिलीलीटर रक्तस्राव होतो. महर्षी चरकांनी ह्यासंदर्भात सुंदर वर्णन केलेले आहे. “नैवातिबाहुलात्यल्पमार्तवं शुध्दमादिशेत् |” ह्यावरून भारतीय शास्त्रज्ञांची प्रज्ञा दिसून येते. व्यवहारात सामान्यपणे १ दिवसात स्त्रीला २ ते ३ घड्या बदलाव्या लागतात.
ऋतुमती स्त्री कशी ओळखावी ?
ह्या काळात आधीच्या ऋतुकाळातील संचित रज शरीराबाहेर गेलेले असते. द्वितीय ऋतुकाळातील रज नवीन असल्याने योनी शुद्ध असते. ह्या काळात स्त्रीला ‘ऋतुमती’ म्हणतात.
ऋतुमती स्त्रीची लक्षणे -
१) स्त्रीची योनि आणि गर्भाशय व्याधिरहित असणे अर्थात गर्भाधानास बाधक असा कोणताही व्याधी नसणे.
२) स्त्रीबीज शुद्ध असणे.
३) स्त्री शारीरिक रूपाने स्वस्थ असणे.
४) स्त्रीची मानसिक अवस्था प्राकृत व प्रसन्न असणे.
५) स्त्री पुरुष संभोगाकांक्षिणी (उत्सुक) असणे.
ह्यासंदर्भात पुरातन ग्रंथातील वर्णन वाखाणण्यासारखे आहे. त्या काळी अल्ट्रासोनोग्राफी सारख्या सोयी नव्हत्या. असे असूनही ग्रंथात ह्याबद्दल अतिशय चपखल वर्णन आढळते.
पीनप्रसन्नवदनां प्रक्लिन्नात्ममुखद्विजाम् |
नरकामां प्रियकथां स्रस्तकुक्ष्यक्षिमूर्धजाम् ||
क्षामप्रसन्नवदनां स्फुरच्छ्रोणिपयोधराम् |
स्वस्ताक्षिकुक्षिं पुंस्कामां विद्यादृतुमतीं स्त्रियम् ||
मासिक पाळीत दिनचर्या कशी असावी ?
आधुनिक चिकित्सा शास्त्रात रजस्वला स्त्रीसाठी कुठल्याही विशेष दिनचर्येचे वर्णन मिळत नाही. रक्तस्रावामुळे स्त्रीला थकवा येतो, चालण्यास कष्ट होतात. अशावेळी त्या स्त्रीला आराम मिळण्याच्या दृष्टीकोनातून आयुर्वेदाने अधिक परिश्रम करण्यास निषेध केला आहे. हॉर्मोन्सच्या प्रभावामुळे काही स्त्रियांना भूक लागत नाही. आयुर्वेदानुसार वायु आपले कार्य जननेन्द्रियांच्या ठिकाणी करत असतो. त्यामुळे वायु आणि पित्त एकत्रितपणे पचनाचे कार्य योग्यरीत्या करू शकत नाही. अग्निमांद्य स्वाभाविक असतेच. म्हणूनच लघु, सुपाच्य व अल्पाहार घेण्यास सांगितला आहे. ह्याकाळात योनि अशुद्ध असण्याची भावना होते म्हणून योनिधावन करू नये असेही वर्णन आहे. काही स्त्रिया योनिधावन करणे उचित मानतात. परंतु त्याचा निषेध आहे हे ध्यानात ठेवावे. आधुनिक वैद्यकशास्त्र देखील ह्याच्याशी सहमत आहे. आधुनिक विज्ञानाने रजस्वला स्त्री निरोगी असेल, तर संभोग निषिद्ध मानलेला नाही. मात्र योनीमध्ये जंतुसंक्रमण असल्यास समागम करू नये. त्यामुळे डिम्बवाहिनी शोथ (salpingitis) होण्याची शक्यता असते. संक्षेपाने, आयुर्वेदात रजस्वला स्त्रीला विशिष्ट दिनचर्या पालन करण्याचा आदेश दिला आहे, तर आधुनिक विज्ञानाने कुठलेही बदल करण्यास सांगितले नाहीत.
मासिक पाळीच्या काळात पोटात दुखण्याचे कारण काय ?
ओटीपोटात जंतुसंसर्ग झाल्यामुळे पोटात दुखू शकते. पोषक आहार, मोकळी हवा व पाळी नियमित करणारी हॉर्मोनविरहित आयुर्वेदिक औषधे घेतल्यास पोटातील दुखणे थांबते. आयुर्वेदातील बस्ति चिकित्सा ह्यात उपयुक्त ठरते.
नियमित मासिक पाळी मागे-पुढे करण्यासाठी गोळ्या घेणे चांगले आहे का?
मासिक पाळी मागे-पुढे करण्यासाठी गोळ्या घेणे आरोग्याच्या दृष्टीने संयुक्तिक नाही. मासिक पाळी चक्र म्हणजे काही एखादी अपॉईंटमेंट नव्हे म्हणून सूज्ञ स्त्रियांनी उठसूट लहानसहान कारणांसाठी हॉर्मोन्स घेऊन आरोग्य बिघडू देऊ नये. ह्याने निसर्ग नियमांना व स्त्रीच्या शारीरक्रियांना अडथळा येतो व पुढे संततीप्रप्तीच्या काळात अडचणी निर्माण होतात.
हॉर्मोन म्हणजे काय ?
विशिष्ट यंत्रणांना उत्तेजित करण्यासाठी शरीरातील ग्रंथींपासून निर्माण होणारा व रस-रक्तामार्फत स्रवणारा द्रव म्हणजे हॉर्मोन. स्त्री शरीरात अशा हॉर्मोन्स वर संपूर्ण नियंत्रण करणारी मस्तिष्क स्थित पियुशिका ही अन्तःस्त्रावी ग्रंथी असते. मासिक पाळीमध्ये पहिल्या पंधरा व पुढच्या पंधरा दिवसात काही बदल करण्यास ही ग्रंथी सतत कार्यरत असते. तिच्या स्रावांना हॉर्मोन्स म्हणतात.
आयुर्वेदिक ग्रंथामध्ये आयुर्वेदात हॉर्मोनचा विचार आहे का ?
आयुर्वेदिक ग्रंथामध्ये हॉर्मोनचा विचार ‘ओज’ ह्या अर्थाने केलेला आहे. गर्भावस्थेत ओज स्थिर–अस्थिर ह्या संदर्भातील उल्लेख आलेले आहेत. तैत्तरीय उपनिषदामध्ये हॉर्मोन संदर्भातील उल्लेख आहेत. ह्या ओजामुळेच स्त्री व्यक्तिमत्व प्रसन्न व लोभस दिसते.
वर्षभर हॉर्मोनच्या गोळ्या घेऊन पाळी कायमची बंद केल्यास काय परिणाम होतात ?
परवा सुनीताने मला दूरध्वनीवरून हा प्रश्न विचारला तेव्हा मला धक्काच बसला. हे खूळ मला उशिरा कळाले. पूजा, मंगलकार्य अशा प्रसंगी अपवादात्मक परिस्थितीत हॉर्मोनच्या गोळ्या घेणे ठीक आहे. परंतु ह्यामुळे शरीरातील हॉर्मोनचे संतुलन बिघडते. मग ३६५ दिवस गोळ्या घेऊन पाळी थांबवायची म्हणजे नैसर्गिक चक्र कृत्रिम हॉर्मोन देऊन बिघडवायचे व त्याचे गंभीर परिणाम पुढे आयुष्यभर भोगायचे.
अलीकडेच लिब्रल नावाच्या गोळीसंदर्भात वाचले. ३६५ दिवस गोळी घेऊन पाळीपासून मुक्त करणारी ही गोळी म्हणजे परदेशातून आलेलं एक खुळ. त्या अनुषंगाने सुनीताने विचारलेला प्रश्नही तसा बरोबरच होता म्हणा. नैसर्गिक हॉर्मोनमुळे स्त्री शरीर हॉर्मोनियस राहते हे सुनीताला कोण सांगणार? स्त्रीबीज ग्रंथीमध्ये स्त्रीबीजाला जिवंत ठेवणारे हॉर्मोन म्हणजे अपर ओज. गर्भाशयात व गर्भाशयाच्या बाहेर जन्मानंतर सर्वांना कार्यरत ठेवणारे हॉर्मोन म्हणजे अपर ओज. ह्या सर्व गोष्टी सुनीताच्या बुद्धीस आकलन न होणाऱ्याच दिसतात.
कृत्रिम हार्मोन घेऊन मासिक पाळीचे चक्र बदलणे म्हणजेच निरोगी स्त्रीला रोगी बनविणे. १० - २० वर्षापूर्वी गर्भनिरोधकांना स्त्रियांनी विरोध केला. नीतीमुल्याची ती झलक होती. सगळा खटाटोप करून उठसूट हॉर्मोनच्या गोळ्या घेऊ नयेत एवढ खरं. वर्षभर गोळ्या घेणे ही कल्पनाही न केलेली बरी.
शरीरात सर्व धातू तयार झाल्यानंतर शेवटी ओज तयार होते. हे ओज जन्मापासून मृत्यु पर्यंत चित्तामध्ये असते. (universal intelligence) व आनंद स्वरुपात स्थित असते. (aspects of supreme). कृत्रिम हार्मोन घेतल्यामुळे आनंद आणि त्याचे स्वरूप दोन्ही नष्ट होतात. आनंदाचे स्फुरण, शब्द पोरके होतात. अष्टधा प्रकृती, बुद्धी, अहंकार, पंचतन्मात्रा, पंचमहाभूते यांच्या ठायी हे ओज असते. कृत्रिम गोळयांमुळे ह्या ओजाची नासाडी होते. म्हणून सुनिता असो की अन्य स्त्रिया, कोणीही ह्या गोळ्या घेण्याबद्दल चुकुनही विचार करू नये.
लेखक –
प्रा. वैद्य सुभाष मार्लेवार
आयुर्वेद वाचस्पति,
सहयोगी प्राध्यापक,
स्त्रीरोग व प्रसूतीतंत्र विभाग,
रा. आ. पोदार वैद्यक महाविद्यालय
मुंबई ४०० ०१८
+917738086299
+919819686299
subhashmarlewar@gmail.com

गर्भसंस्कार आणि काम परमात्म्याची सृजनशक्ती

गर्भसंस्कार आणि काम परमात्म्याची सृजनशक्ती
लेखक – प्रा. वैद्य सुभाष मार्लेवार
आयुर्वेद वाचस्पति
सहयोगी प्राध्यापक, पोदार वैद्यक महाविद्यालय व रुग्णालय, वरळी, मुंबई
भ्रमणध्वनी - +९१७७३८०८६२९९/ +९१९८१९६८६२९९
ईमेल – subhashmarlewar@gmail.com
रशियातील एका वैज्ञानिकाने माकडांवर काही प्रयोग केले. माकडांचे त्याने दोन गट बनवले. एका गटामध्ये हुबेहूब कृत्रिम माकडीण बनवली. नकली हात, नकली चेहरा सर्वकाही हुबेहूब माकडासारखेच. दुसऱ्या गटामध्ये जिवंत माकडीण ठेवण्यात आली. माकडाच्या १० नवजात पिल्लांना कृत्रिम माकडीणीमार्फत चांगल्या प्रकारचे दूध पाजण्यात आले, कृत्रिम प्रेम करून पालन – पोषण करण्यात आले. ही पिल्ले त्या कृत्रिम माकडीणीच्या पोटाला बिलगून राहत. कालांतराने ही पिल्ले धष्टपुष्ट, स्वस्थ अशी माकडे बनली. मात्र मानसिकदृष्ट्या ती कमकुवत होती, विक्षिप्त व विकृत बनली होती. पिल्लांना दूध मिळाले, त्यांचे शरीरही चांगले धष्टपुष्ट झाले. परंतु ती विक्षिप्त का झाली? वैज्ञानिक गोंधळात पडले. वैज्ञानिकांच्या प्रयोगशाळेमध्ये प्रेम ही वस्तू मिळतच नाही. दुसऱ्या गटातील पिल्लांना प्रेमासहित दुध मिळाले व ती शारीरिक व मानसिकदृष्ट्या आरोग्यसंपन्न घडली.
पहिल्या गटातील पिल्लांच्या परिस्थितीप्रमाणे आपल्या देशातील समाजाची परिस्थिती बनली आहे. अभिनय करणारी आई मिळते. अभिनय करणारा बाप मिळतो. नकली बाप नकली आई मुलांसाठी अंगाई गीत गाते. पण मुले विक्षिप्त होतात. आपण म्हणतो ही अशांत कशी झाली. ही मुले एखाद्याच्या पोटात सुरा भोसकतात, मुलींच्या अंगावर अॅसीड टाकतात, कॉलेजला आग लावतात, बसवर दगड फेकतात. शिक्षकांना मारहाण करतात.
आजचा समाज प्रेमाच्या केंद्रावर निर्मित नाही. त्यामुळे समाजात विक्षिप्तता व गुन्हेगारी प्रवृत्तीचे प्रमाण जास्त आहे. युद्ध, आत्महत्या, कुरूप-समाज आणि रुग्ण-मनुष्य ही प्रेमाच्या अभावातून निर्माण झालेली परिस्थिती आहे. प्रेमातून विवाह निर्माण झाल्यास सुसंस्कृत समाज निर्माण होण्याची शक्यता अधिक आहे. जे पति-पत्नी प्रेमपूर्ण संभोगात लीन होत नाहीत, ते केवळ भौतिकवादी मुलास जन्म देतील. त्यांचे जीवन भौतिकतेच्या पुढे जाणार नाही. जे आई-वडील एकमेकांवर प्रेम करून मुलास जन्म देतील, त्या मुलांच्या जीवनात वसंताची बहार येईल, त्यांचे जीवन गतिमान व समृद्ध बनेल. प्रेम हे बीज आहे व सुप्रजनन हे या बीजास आलेले फळ आहे. प्रेम जर कुटुंबाचे केंद्र बनेल तर स्वामी अरविंद घोषांची सुपर-मॅन ची कल्पना, ओशोंची महामानवाची संकल्पना या पृथ्वीवर साकार होईल. भृण ज्याचा पहिला अणु प्रेमाचा त्याचा अंतिम श्वासही प्रेमाचाच असेल. ह्यातूनच एक सात्विक मानवता उत्पन्न होऊ शकते.
क्षितिजाच्या पलीकडे जाऊन नवनिर्माण करणे खरच कठीण काम आहे. खर तर ती एक जोखीम आहे. मात्र अशी जोखीम जे घेत नाहीत, ते जमिनीवरच्या किड्या-मुंग्यांप्रमाणे जगतात व जे क्षितिजाच्या पलीकडे झेप घेतात. ते “बाज” पक्षी म्हणून सिद्ध होतात. अलिकडचा समाज हा घराची कवाडे बंद करून यशप्राप्तीची आराधना करणारा आहे.
धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे जीवनाचे चार पुरुषार्थ आहेत. समाज धारण करणारी सुव्यवस्था म्हणजे ‘धर्म’. निर्वाहाचे साधन म्हणून उपयोगात येतो तो ‘अर्थ’. प्रजननातील महत्त्वपूर्ण घटक म्हणजे ‘काम’. या तिन्ही पुरुषार्थांचा उपभोग घेऊन साक्षी भावाने निवृत्त होणे म्हणजे ‘मोक्ष’. काही प्रवृत्तींनी कामजीवनाचे विकृतीकरण करून समाजापुढे मांडले, म्हणून समाजाला त्याचा आनंद घेता आला नाही. खरं तर कामशक्ती म्हणजे परमात्म्याची सृजनशक्ती, ह्यातूनच ऊर्जाशक्ती निर्माण होते. प्रेमभावाने पति-पत्नीचे मिलन घडले तर ‘कामाचे’ रुपांतर सृजनशक्तीमध्ये होईल. अपवित्र किंवा पापदृष्टीने कामशक्तीकडे पाहिले तर ‘काम’ कुरूप होऊन जाईल आणि प्रेमभावे बघितले तर ‘दिव्यशक्ती’ बनून राहील.
पति-पत्नीच्या शारीरिक मिलनापूर्वी त्यांचे मानसिक मिलन होणे अत्यावश्यक आहे. लैंगिक शक्ती ही इंद्रियांमध्ये नसते तर ती मनामध्ये असते. विवाहानंतर शरीरे एकत्र आली म्हणजे मिलन झाले असे नाही. एकमेकांना समजून घेणे, एकमेकांच्या प्रश्नांशी एकरूप होणे व त्यानंतरचे शारीरिक मिलन अद्वितीय असते, दिव्य आनंद देऊन जाते.
प्रेम हे परमात्म्याचे द्वार आहे, पण आमचे त्याकडे लक्ष नाही. भौतिक माणसांनी आणि भौतिकवादी प्रवृत्तीने ही दारे बंद करून टाकली आहेत. ह्या प्रवृत्तीने प्रेमाची हत्या करून मनुष्य जीवन सुव्यस्थित करण्याचा तथाकथित प्रयत्न केला आहे. जीवनात प्रेमाची संभावनाच राहणार नाही ह्याकडे लक्ष दिले आहे. समाजाची संपूर्ण व्यवस्था निष्प्रेम आहे आणि त्यातून होणारे विवाद जीवनाच्या अंतापर्यंत टिकून राहतात ही त्याची शोकांतिका. हजारो वर्षांपासून आपण भगवान श्रीकृष्ण, श्रीराम, गौतमबुद्ध, जीझसक्राईस्ट, मोहम्मद पैगंबर, गुरुनानक, संत ज्ञानेश्वर, चक्रधरस्वामी अशा अनेक संत महात्म्यांची स्तुती करत आलो आहोत. ह्या सर्वांना ईश्वरप्राप्ती झाली मात्र आजच्या समाजात अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच माणसे पूर्णत्वाला गेली. ह्याचा विचार करण्याची नितांत गरज आज निर्माण झालेली आहे.
शेतकऱ्याने लाखो बीजे पेरली आणि त्यातील एखादेच बीज जर अंकुरले तर त्याला तुम्ही शेतकरी म्हणाल का? ही बीजे जमिनीवर नुसती जरी फेकली असती तरी त्यातील एखादे नक्कीच उगवले असते! तेव्हां लाख बीजे पेरली आणि ती सर्व उगवली तर तो खरा शेतकरी. त्यापैकी दोन-चार उगवली नाही तरी ठीक आहे. पण आता तर उलटेच होत आहे. कोट्यावधी मुले जन्माला येतात, त्यात एखादा डॉ. होमी भाभा असतो, कधी डॉ. माशेलकर तर कधी डॉ. अब्दुल कलाम.
फुलाच्या सुगंधाची उधळण ही प्रत्येक बीजाची क्षमता . . . .
प्रेमसंपन्न वैवाहिक जीवनामुळे प्रत्येक व्यक्ती गौरवाला, तेजस्वीपणाला प्राप्त होऊ शकते. प्रत्येक बीजात ही क्षमता आहे की, ते फुलाप्रत पोचते व सुगंध उधळते आणि जेव्हां हे बीज वृक्ष बनते तेव्हां पाखरे त्यावर क्रीडा करतात. वारा देखील फेर धरत गाणे म्हणतो. वसंताच्या ह्या क्षणांमध्ये परिपूर्णतेचा आनंद आणि उल्हास आहे, हीच परमात्म्याची प्राप्ती आहे. भोगवादी प्रवृत्तीची माणसे संतती निर्माण करतात, काळाच्या ओघात यमसदनास जातात. मात्र आपली संतती मागे ठेऊन जातात. ‘उल्लू मर जाते है, औलाद छोड जाते है !’ मग ही मुलेही मागे राहत नाहीत, ती देखील पैदास वाढवतच जातात. अशाप्रकारे हळूहळू खोट्या नाण्यांचे चलन वाढत जाते. प्रेमाशिवाय विवाह करण्यापेक्षा अविवाहित राहिलेलेच बरे !
बहुतेक वेळा श्रेष्ठ आणि प्रज्ञावान व्यक्ती अविवाहित राहतात . . . .
संत रामदासस्वामी, ओशो, अटलबिहारी बाजपेयी, डॉ. अब्दुल कलाम ह्यांनी विवाह केला नाही. गानकोकिळा लता मंगेशकर हे त्यातलेच एक उदाहरण. अन्य सामान्य माणसे एक नाही तर चार विवाह करतात. माणूस जितका निकृष्ट असतो तितका तो जास्त वैताग निर्माण करतो. बुद्ध देखील एकाच मुलाचा पिता झाला. सर्वसामान्य माणसे रांगा लावून टाकतात. त्यांच्यात स्पर्धा चालू आहे की कोण किती मोठी रांग लावतो.
प्रेमाशिवाय विवाह करू नये असे माझे मत नाही. परंतु पति-पत्नीमध्ये ताळमेळ असावा. परंतु अलीकडे तसे दिसत नाही. पति-पत्नीचा ताळमेळ तुम्ही कुणा करवी पाहता? ज्योतिषाकडून ! जरा त्याच्या घरची अवस्था पहा. स्वत:च्या बायकोशी तो ताळमेळ साधू शकला आहे का? अन न जाणो किती पति-पत्नीचा ताळमेळ तो बसवतो आहे? तोही चार – आठ आण्यात. . . .
पति-पत्नीमध्ये ताळमेळ बसला तर त्यांची मुलेही प्रतिभावान होतील. प्रेम आणि विवाहाची ही पद्धत लागू झाली तर शेकडो आईनस्टाईन जन्माला येतील, प्रतिभेच्या राशी उभ्या राहू शकतील.
प्रतिभावंतांना जन्म देणे वैदिक विज्ञानाने शक्य :-
पति-पत्नीने एकत्र येतांना नियोजनबद्ध पद्धतीने एकत्र येणे महत्वाचे. नियोजनविना ते अशक्य आहे. ह्या संबंधीचे सविस्तर मार्गदर्शन आयुर्वेदीय ग्रंथामध्ये दिसून येते. आपण शेतातील बियांची जितकी काळजी घेतो तितकी माणसाच्या बीजाची घेत नाही. आपल्यासारखे मूर्ख आपणच ! शेताला पाणी सोडणे, राखण करणे हे जसे महत्वाचे तसेच माणसांसाठी विशेष संस्कार करण्याची आज नितांत गरज आहे.
प्रेम आणि विवाह यांचा काय संबंध ?
प्रेमातून विवाह होऊ शकतो तसेच विवाहानंतरही प्रेम होऊ शकते. ह्या संदर्भात काही गोष्टी समजून घेणे आवश्यक आहे. प्रेम ही परमेश्वराची मोठी देणगी आहे तर विवाह ही समाजव्यवस्था आहे. विवाह सामाजिक संस्था आहे. प्रेम प्रकृतीचे दान आहे. प्रेम व्यक्तीच्या प्राणामध्ये निसर्गतः निर्माण होते तर विवाह मात्र समाज व कायद्यानुसार केला जातो. विवाह ही मनुष्याची गरज आहे तर प्रेम हे परमात्म्याचे दान आहे. वैवाहिक जीवनात प्रेम निर्माण होईलच असे नाही. विवाहामुळे सहवास लाभतो. सहवासामुळे प्रेम निर्माण होऊ शकते. विवाहापासून परिवार बनतो, ज्याला आपण ‘गृहस्थाश्रम’ म्हणतो. संघर्ष, कलह, द्वेष, इर्षा अशा परिस्थितीत देखील आपण तोंडदेखले हसत घराबाहेर पडतो. ह्यात आत्मतृप्ती होत नाही. पति-पत्नी एकमेकांच्या गरजा पूर्ण करू शकत नाहीत. ह्यातूनच एकमेकांस कमी लेखणे, दुषणे देणे, विक्षिप्त वागणे सुरु होते. ऋषिमुनींनी निर्माण केलेला हा समाज अधोगतीकडे कसा जातो हे अनाकलनीय आहे. तुझ्यामुळे मला शांती मिळत नाही असे जेव्हां पति-पत्नी म्हणायला लागतात तेव्हा प्रेम काय आहे हे कळते. दोन लहान मुले एकमेकांशी भांडत होती. आईने मुलांना भांडण्याचे कारण विचारले असता मुलांनी उत्तर दिले, “मम्मी ! वी आर नॅाट फायटिंग, वी आर प्लेईंग मम्मी अँड़ ड़ॅड़ी गेम !”
मानवता निर्माण होण्यासाठी कामाची पवित्रता, धार्मिकता स्वीकार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कामयोगातून परमात्मा जीव जन्माला घालतो. तो जीव म्हणजे पाप नाही तर जीवन आहे. मनुष्य जीवनावर प्रेम करत नाही. म्हणून फक्त लैंगिकता उरली व यौवन पाप झाले. वास्तविक हे पाप नसून ह्यात फक्त प्रेमाचा अभाव आहे !
जीवन निरंतर बदलत आहे. जीवनाची सृजनात्मकता परमात्मा स्वरूपाने तुमच्या समोर आहे. जोपर्यंत पति-पत्नी एकमेकांवर प्रेम करणार नाहीत तोपर्यंत सुप्रजनन होणार नाही. मुलांना दूध मिळेल, कपडे मिळतील, घरही मिळेल परंतु प्रेम मिळत नसेल तर सर्व मिळूनही व्यर्थच.

सुप्रजनन : वैज्ञानिक दृष्टीकोन

सुप्रजनन : वैज्ञानिक दृष्टीकोन
लेखक – प्रा. वैद्य सुभाष मार्लेवार
(आयुर्वेद वाचस्पति)
सहयोगी प्राध्यापक,
पोदार वैद्यक महाविद्यालय व रुग्णालय, वरळी, मुंबई.
+917738086299
+919819686299
आपले अपत्य शारीरिक, मानसिक व बौद्धिकदृष्ट्या उत्तम असावे हे प्रत्येक स्त्रीचे स्वप्न असते, त्याशिवाय ती स्वत:ला अपूर्णच समजते. केवळ आई होणे ही एकच जबाबदारी तिच्यावर नसते तर आजच्या धावपळीच्या जीवनात ‘एक अपत्य–सुखी दांपत्य’ ह्या सूत्राचा अवलंब करताना एकुलते एक अपत्य सुसंस्कृत, सुजाण, सुदृढ व सर्वार्थाने परिपूर्ण असणे गरजेचे आहे. त्यासाठी सुप्रजननाचे महत्व आहे.
मासिक ऋतुचक्रामध्ये रजःप्रवृत्तीपासून पुढे १२ ते १६ दिवस गर्भधारणेसाठी योग्य असतात. गर्भशयामध्ये ह्याच काळात बीजाचे रोपण होणे शक्य असते. त्यावेळी रसधातुचे पोषण होणे आवश्यक आहे. बीज, बीजभागदुष्टि गर्भाच्या आरोग्यासाठी कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे पुरुषाचे शुक्र सुद्धा उत्तम प्रकारचे असणे आवश्यक आहे. जन्मास येणाऱ्या बालकाचे आरोग्य पूर्णत: माता–पित्याच्या मानसिक व शारीरिक अवस्थेवर अवलंबून असते. त्यासाठी त्यांची आवश्यक शरीरशुद्धी, आहार–विहार व औषधी यांचा गर्भावर होणारा परिणाम यासंबंधी विचार करणे आवश्यक आहे.
सुदृढ गर्भधारणेसाठी स्त्रीबीज व पुरुषबीज सक्षम असणे आवश्यक ठरते. त्यासाठी सर्वात पहिला उपचार म्हणजे शरीरशुद्धी. ह्यासाठी अत्यंत उपयुक्त उपचार म्हणजे ‘आयुर्वेदीय पंचकर्म’. गर्भधारणेची इच्छा असणाऱ्या स्त्री–पुरुषाने शास्त्रोक्त पद्धतीने पंचकर्म अर्थात वमन, विरेचन, नस्य, बस्ति इ. उपचार अवश्य करावेत. विरेचन म्हणजे कोठा साफ करण्यासाठी नुसते जुलाब नव्हेत किंवा बस्ति म्हणजे केवळ साबण पाण्याचा एनिमा नव्हे. ह्यात आयुर्वेदीय निर्माण पद्धतीने तयार केलेले व वनस्पतींनी सिद्ध केलेले तूप प्रकृती, वय व शरीरशक्तीचा विचार करून किमान सात दिवस घ्यावे. शरीरशुद्धीसाठी बाह्यस्नेहन म्हणजेच अभ्यंग, मसाज इ. चा उपयोग करावा. पंचकर्म म्हणून केवळ शिरोधारा, अंगाला तेल रगडणे असे वरवरचे दिखाऊ उपचार करू नयेत. स्त्रियांनी गर्भाधानापूर्वी शोधन व बृहण उत्तरबस्ति, योगबस्ती क्रम, योनिघावन–धूपन, इ. उपचार तज्ञ आयुर्वेद स्त्रीरोग चिकित्सकाच्या मार्गदर्शनाखाली करावेत. शास्त्रशुद्ध पद्धतीने ह्या सर्व गोष्टी करण्यासाठी किमान दोन महिन्यांचा कालावधि लागतो. त्यापेक्षा कमी वेळात केलेल्या शॉर्टकट उपचारांचा योग्य फायदा होणे शक्य नाही हे सुप्रजेसाठी इच्छुक दांपत्याने समजून घ्यावे. “वैद्यराज व्हिजन” ही संस्था ह्यासाठी मोफत समुपदेशन करते.
पंचकर्म उपचारांनी शरीरशुद्धी तर होतेच त्याचरोबर पुरुष व स्त्रीबीजशुद्धी पण होते. सर्व इंद्रियांची शक्ती वाढते, मन प्रसन्न होते. स्त्री–पुरुषामधील आकर्षण वाढते व पुढे गर्भधारणा होऊन आरोग्यसंपन्न अपत्यप्राप्ती होते.
शरीरशुद्धीच्या महत्त्वाच्या टप्प्यानंतर आर्तव व शुक्र वाढण्यासाठी ओजवर्धक औषधी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. ह्यात अश्वगंधा, आत्मगुप्ता, श्वदंष्ट्रा, नारायणी, कोकिलाक्ष,अक्कलकारा, नागवल्ली पत्र अशा वनस्पती असाव्यात.‘अश्वमाह’ नावाने ह्या संपन्न वनस्पतींनी निर्मित औषध उपलब्ध आहे. ह्याच्या सेवनाने शुक्र धातूचे सामर्थ्य वाढते. ‘तंत्र शुक्र बाहुल्यात् पुमान’ असे वर्णन संहिताकारांनी केले आहे. त्यामुळे निःसंशय सुप्रजानिर्मिती होते.
ह्या औषधामुळे रसधातुचे उत्तम पोषण होते. सुप्रजननासाठी सार्वदेहिक शुक्र तसेच बीजभूत शुक्र ह्या दोन घटकांची गरज असते. ह्या औषधांमध्ये मायक्रोन्युट्रियंट्स असल्याचे सिद्ध झाले आहे. अनादि काळापासून वनस्पतींच्या रूपाने आयुर्वेदामध्ये ह्यांचा वापर करण्यात येतो.
1.कवचबीजामुळे शरीरातील टेस्टोस्टेरॅान वाढते. त्यामुळे लिबिडो म्हणजे कामशक्ती वाढते.
2.वासा व गुडुची - ह्या द्रव्यांमुळे शुक्रदुष्टी दुर होते व त्याप्रमाणे शुक्रामध्ये कुठल्याही प्रकारची विकृती रहात होत नाही.
3.शतावरी, अश्वगंधा, कृष्ण्तीळ ह्या द्रव्यांमुळे शुक्राणूंची संख्या वाढते व शुक्रबीज निर्मिती होते. ही सर्व औषध योजना करण्यामागे संहिताकारांचे कौशल्य वाखाणण्यासारखे आहे. माझ्या खाजगी प्रॅक्टिसमध्ये मी ह्याचा वापर अनेक दांपत्यांवर केला असून त्याचे उत्तम परिणाम झालेले अनुभवास येतात. ह्यासाठी “शुक्रजीवक व अश्वमाह” ही औषधे मी वापरतो. दूध व तुपाबरोबर घेतल्याने ह्या औषधांमुळे उत्तम शुक्रवर्धन होते असा माझा अनुभव आहे.
4.विदारीकंद या द्रव्यात मॅग्नेशियम व ‘अ’ जीवनसत्व असून शुक्रपोषणासाठी ह्याची मदत होते. आमलकीमध्ये जीवनसत्व ‘सी’, जीवनसत्व ‘के’, कॅल्शियम, मॅग्नेशियम असते. त्यामुळे पेशींमध्ये कुठल्याही प्रकारची विकृती निर्माण होत नाही. आमलकीमध्ये आठ ते दहा मिलिग्रॅम जीवनसत्व ‘सी’ असून हे पेशींचा विनाश होऊ देत नाही.
5.अंनतमूळ आणि गोक्षुर हे स्त्री-पुरुषांमध्ये एकमेकांविषयी प्रेमभावना उत्पन्न करतात. ह्यामध्ये शुक्रबीज निर्मितीची शक्ती आहे.
6.पिप्पली व पुनर्नवा हे अॅन्टिफंगल व शोथनाशक आहे.
‘शुक्रजीवक व अश्वमाह’ बरोबर रुग्णाची प्रकृती बघून वरील औषधांचे सेवन करणे हितावह ठरते.
आता स्त्रियांना सुप्रजननासाठी देण्यात येणाऱ्या औषध योजनेबाबत थोडक्यात विचार करूया. सुप्रजनन तर दूरच पण काही मातांना वारंवार गर्भस्त्राव व गर्भपात होतात. काही स्त्रियांमध्ये तर सातत्याने पाच पेक्षा जास्त वेळा अकाली प्रसूती होऊन गर्भ मृत झाल्याचे दिसते. अशा स्त्रिया मातृत्व सुखापासून वंचित राहतात. आयुर्वेदात अशा स्त्रियांसाठी ‘क्षेत्रचिकित्सा’ वर्णन केली आहे. अनेक स्त्रियांचे प्रसव अकाली होऊन बालक मृत्यू पावते. क्षेत्रचिकित्सेसाठी खालील वनस्पतींनी निर्माण केलेल्या ‘गर्भजीवक’ नामक गोळ्या उपयुक्त आहेत.
ह्यात पुत्रजीवी, शतावरी, सारिवा, कसेरु, गंभारी, कमळ बीज, मंजिष्ठा ह्या वनस्पती आहेत. ह्या चिकित्सेमुळे सुयोग्य गर्भधारणा होते, गर्भपात टाळता येतो.
सध्या मोबाईल सदृश अनेक विद्युत उपकरणाचा वापर दैनंदिन जीवनात बेसुमार वाढलेला दिसतो. त्यांपासून निर्माण होणारी रेडिएशन्स स्त्री शरीरावर सतत आघात करत असतात. ह्यांच्या दुष्परिणामांपासून गर्भ व गर्भिणी संरक्षण करण्यासाठी ‘फलमाह’ नामक गोळ्या नक्कीच उपयोगी ठरतील असा विश्वास वाटतो. ह्या विषयाला खंबीर ग्रंथाधार आहे. हा पाठ फलसर्पि नावाने प्रसिद्ध आहे. सर्पि म्हणजे घृत किंवा तूप.
आयुर्वेदात ज्या ठिकाणी तुपाचा उल्लेख आहे त्याठिकाणी गायीचेच तूप अभिप्रेत आहे. सध्या भारतात मिळणारे बहुतांश गायींचे दूध हे जर्सी जातीच्या प्राण्याचे आहे. भारतीय वंशाच्या गायीच्या व जर्सी प्राण्याच्या दुधाच्या गुणधर्मांत लक्षणीय फरक आहेत. शिवाय त्यापासून तूप निर्माण करण्याची प्रचलित प्रक्रिया देखील निराळी आहे. दुधाच्या सायीला विरजण लावून दही निर्माण करणे, त्यापासून लोणी प्राप्त करणे व नंतर अग्नी संस्काराने त्यापासून तूप तयार करणे ही पद्धत शास्त्रीय आहे. सध्या प्रचलित असलेल्या ‘क्रीम सेपरेशन’ पद्धतीने प्राप्त केलेले लोणी म्हणजे प्राणिज चरबी. ह्या चरबीला उष्णता देऊन प्राप्त केलेला स्निग्धांश म्हणजे सध्या बाजारात मिळणारे तूप. गुणधर्मांच्या दृष्टीने 'लोणकढे’ तुपाच्या तोडीस उतरणे हे कदापि शक्य नाही. आणखीन एक कारण म्हणजे गर्भावस्थेत तुपाच्या स्वरुपात औषध गिळणे बऱ्याच स्त्रियांना शक्य होत नाही शिवाय काही काळानंतर अशा तुपाला एक प्रकारचा उग्र वास येतो. म्हणून हा कल्प ‘सिद्ध तुपाच्या’ पद्धतीने निर्माण करण्यापेक्षा त्यातील वनस्पतींचा वापर अन्य स्वरुपात करणे अधिक योग्य आहे. म्हणून ह्या वनस्पतींच्या मिश्रणातून निर्मित गोळ्या “फलमाह” नावाने उपलब्ध झाल्या आहेत.
गर्भिणीच्या सुयोग्य पोषणासाठी ह्या गोळ्या फारच उपयुक्त आहेत. वारंवार होणारे गर्भपात, अकाली प्रसव ह्याचबरोबर स्त्रियांमध्ये होणाऱ्या टॉर्च इन्फेक्शनवरही फलमाह गोळ्यांनी यशस्वी चिकित्सा करता येते. अकाल प्रसव, गर्भस्त्राव, गर्भपात ह्यावर निश्चित अशी चिकित्सा नसल्याचे मत आधुनिक वैद्यक शास्त्रातील स्त्रीरोगतज्ञ वेगवगळ्या परिसंवादातून व्यक्त करीत असल्याचे माझ्या माहितीत आहे.
सुप्रजननासाठी आयुर्वेदात उपलब्ध औषधे :-
अश्मंतक, इक्षु, कपित्थ, कमल पुष्प , कमलगट्टा, कसेरु,कुलिंजन, कृष्ण सारिवा, तिल,कृष्ण सारिवा, गंभारी, गोक्षुर, डोरली, देवदार, द्राक्ष, पटोल, पृश्निपर्णि, प्रियंगु, बला, बिल्व, मंजिष्ठा, यष्टिमधु, रिंगणी, वटांकुर, वड साल, शतावरी,शाकबीज, शिग्रु, शृंगाटक, श्वेत सारिवा, सुंठ इ. वनस्पती सुप्रजननासाठी उपयुक्त असून ह्यांत सूक्ष्मपोषक तत्वे आहेत. शिवाय प्रत्येक महिन्यात गर्भाला आवश्यक असलेली हॉर्मोन्स देखील ह्यातून प्रेरित होतात. आधुनिक शास्त्रानुसार मॅक्रो व मायक्रोन्युट्रियंट्स ह्यामध्ये समाविष्ट असून ते गर्भशयातील बाळाची वाढ उत्तम प्रकारे करतात. या औषधांमध्ये ग्लूटॅमिक अॅसिड, मेथीअॅनिन आणि आर्जिनीन यांसारखी दहापेक्षा जास्त अमाईनो अॅसिड असल्याचे डॉ. के. एस. अय्यर, परेल, मुंबई यांनी सिद्ध केले आहे. ह्यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, ह्यांसारखी घटकद्रव्ये उपलब्ध आहेत. शिवाय गर्भाच्या वाढीनुसार हॉर्मोन्सच्या गरजेचे बदलते प्रमाण ह्यांच्या सेवनाने गर्भिणीला व गर्भाला नैसर्गिक रित्या प्राप्त होतात. वरील औषधांचा उपयोग गर्भिणीपांडू, रक्तक्षय, प्रीएक्लेम्पशिया, जेस्टेशनल डायबिटीस, इंट्राहिपॅटिक कोलेस्टॅसिस ह्या विकारांमध्येसुद्धा होतो. मुंबई येथील पोदार रुग्णालयात ह्यावनस्पती पाठांचा उपयोग गेल्या पन्नास वर्षापासून होत आहे.
औषधाइतकीच आहार योजना देखील महत्वाची आहे.
स्त्रियांसाठी आहार :-
सुप्रजननासाठी स्त्रियांनी रोजच्या आहाराशिवाय कॅल्शियम व मॅग्नेशियमयुक्त बनणारे पदार्थ, मेथी, शेवग्याच्या शेंगा, बीट, अंजिर, द्राक्ष, कलिंगड, बाजरी, तीळ, उडीद, हिरव्या पालेभाज्या, सुकामेवा, ज्वारी, इ. सेवन करावेत.
पुरुषांसाठी आहार:-
ताजी फळे, दूध, लसूण, मुळा, बटाटे, तुप, उडीदडाळ, साखर, फरसबी, बीट, गाजर, इ. आहार पुरुषांनी सेवन करावा.
स्त्री-पुरुषांनी असा वेगवेगळा आहार का घ्यावा?
वरील आहारामध्ये शुक्र व आर्तव यांना कार्यक्षम करण्याची क्षमता असते. अपत्यपथामध्ये शुक्रनिवडीची क्षमता असते. अपत्यपथ, गर्भाशयमुख, गर्भाशय यांच्यामध्ये शुक्रनिवड व भृणरूजूकरण अवलंबून असते. वरील प्रकारचा आहार सुप्रजननासाठी आवश्यक ठरतो. शरीरशुद्धी, औषधीद्रव्ये आणि आहार यांचा विचार केल्यानंतर आता आपण वातावरणाचा गर्भावर काही परिणाम होतो काय ह्या विषयावर उहापोह करू या.
आपला आहार-विहार जीवनपद्धती या बाबी कशा असाव्यात हे आपण ठरूवू शकतो. ह्यात काही चुकीचे सेवन केले गेले तर त्याचा विपरीत परिणाम गर्भावर होऊ शकतो. ओझोन व कार्बन मोनॉक्साईड या वायूचे हवेमधील प्रमाण ज्या भागांमध्ये जास्त आहे, त्या भागातील गरोदर बायकांची मुले सदोष हृदय घेऊन जन्माला येण्याची शक्यता असते. हृदयाबरोबरच फुप्फुसावरही प्रदूषणाचा वाईट परिणाम होतो. गरोदरपणाच्या दुसऱ्या महिन्यात हृदयामध्ये व फुफ्फुसामध्ये असे दोष निर्माण होतात. अशा प्रकारचा अभ्यास कॅलिफोर्नियातील शास्त्रज्ञांनी केला आहे. ह्यासाठी योग्य पद्धतीने व तज्ञ मार्गदर्शनाखाली प्राणायाम करणे हितकर ठरू शकते.
ह्या सर्व गोष्टींचा विचार करून केलेली शास्त्रशुद्ध आयुर्वेदीय चिकित्सा दाम्पत्याला सुप्रजननासाठी एक वरदानच ठरेल ह्यात शंका नाही.

"गर्भसंस्कारांचा अंधश्रध्द सापळा". . . . दैनिक लोकसत्ता आणि वास्तव

"गर्भसंस्कारांचा अंधश्रध्द सापळा". . . . दैनिक लोकसत्ता आणि वास्तव
डॉ. चंद्रकांत संकलेचा व डॉ. अरुण गद्रे ह्यांच्या लेखाचा कल हा प्रामुख्याने वैदू व भोंदू अशा आयुर्वेदीय वैद्यक व्यावसायिकांबाबत जाणवतो. असे असले तरीही ह्या उभयतांचे आयुर्वेदाचे ज्ञान उथळ असल्याचेही जाणवते. आयुर्वेदाबाबत त्यांनी केलेली विधाने व परीक्षणे, ‘संस्कार’ ह्या संकल्पनेकडे पाहण्याचा दृष्टीकोन अशास्त्रीय दिसतो. मोजक्या रुग्णांकडील ऐकीव माहिती शास्त्रीय कसोट्यांवर पडताळून न पाहता त्यावर आरोपपत्र सदृश मतप्रदर्शन करणे हे योग्य वाटत नाही.
सद्यस्थितीत गरज नसतांनाही अनेक डॉक्टर सिझेरियन सारख्या शस्त्रक्रिया, अवाजवी वैद्यकीय तपासण्या, गर्भाशय निर्हरण शस्त्रक्रिया (Histrectomy) करीत असतात. किंबहुना नर्सिंगहोम / हॉस्पिटल्सचा पायाच अशा गोष्टींवर उभारलेला असतो. अर्थात डॉक्टर म्हटले की त्याच्या जीवनात ‘अर्था’ शिवाय अर्थच नसतो. उत्तम गुण मिळवून पास झालेल्या विद्यार्थ्याला डॉक्टरच बनायचे असते कारण आजूबाजूच्या डॉक्टरांची भरभराट तो आपल्या डोळ्याने बघत असतो. मी एक चित्रकार होणार किंवा कवी होणार असे म्हणणारा हुशार विद्यार्थी विरळाच.
बुडती हे जन देखवे ना डोळा
येतो कळवळा म्हणोनिया –
हे जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या अभंगातील अवतरण ह्याठिकाणी चपखल असले तरीही डॉक्टर द्वय वैद्यकीय व्यवसायातील इतर अनैतिक बाबींकडे लक्ष देत असल्याचे आमच्या वाचनात नाही. कोणतेही शास्त्र सर्वार्थाने परिपूर्ण असू शकत नाही हे दोघांनाही माहीत असेलच.
भारतीय वैद्यक शास्त्रात अनेक संस्कार वर्णन केलेले आहेत, त्यापैकी ‘डोहाळे जेवणाचा’ संस्कार डॉक्टरांच्याही घरी असेलच. हिंदूंमध्ये गरोदरपणातील हा संस्कार म्हणजे एक पर्वणी समजला जातो. अन्य संस्कारात ‘विवाह संस्कार, नामकरण संस्कार, सप्तपदी, कर्णवेधन, नासावेधन’ असे अनेक संस्कार शास्त्रात वर्णन केले आहेत. ह्याशिवाय मंत्रोच्चारांमध्ये अथर्वशीर्ष, गायत्रीमंत्र, रामरक्षा, आचमन हे सर्व संस्कार डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे सर्व लोकांनी त्वरित बंद करावेत. विवाहसंस्कार तर तज्ञ डॉक्टरांनी मुळीच करू नये कारण त्यामध्ये पैशाचा, अन्नाचा, वेळेचा अपव्यय खूप मोठ्या प्रमाणात होतो. तो पैसा डॉक्टरांनी आपल्या गावातील शेतकरी किंवा गरिबांना वाटून टाकावा, त्यातून कळवळ्याची प्रतिमा अधिक उजळून निघेल.
अनेक वृत्तपत्रे जाहिरातीच्या रूपाने कधी आरोग्य तर कधी प्रचार या मोहमयी नावाखाली स्वप्ने विकत असतात. बरे न होणाऱ्या आजारांविषयी भंपक जाहिरातींद्वारे शास्त्रीय पुरावा नसतांना जाहिराततंत्राच्या मार्गाने बाजार करतात. त्या बाजारात एकजण फसला की दुसरा फसतो व नकट्या गुरूंचा संप्रदाय तयार होतो. भारतातील अनेक राष्ट्रविधाते ह्यांच्या नावाचा उल्लेख गर्भसंस्कारांमध्ये कोणी करत असेल तर तो आईच्या मनात सकारात्मकतेचे बीज पेरण्याच्या हेतूने केलेला असतो. ह्याचा अर्थ त्यांच्या मातापित्यांना संस्कार माहीत नव्हता असा होत नाही. आचारवंत, विचारवंत संस्कारक्षम मातापित्यांच्या पोटी उत्तम संतती निर्माण होऊ शकते. त्यात विचारांचा मोठा भाग असतो. विचार हे विकत घेता येत नाहीत. अर्थात अॅलोपॅथिक डॉक्टरांच्या दुकानांमध्ये समुपदेशन फुकट मिळत नाही आणि ते त्यांना परवडतही नाही. आचारसंहिता व नीतीनियम न पाळणारे, समव्यावसायिकांकडून पैसे घेणारे महाभाग आम्ही मुंबईमध्ये पाहिले आहेत. एका सर्जनने तर जखमेला घातलेले टाके रुग्णाकडे पैसे नसल्यामुळे उसवून टाकले. ह्याचा अर्थ, सगळेच सर्जन काही तसेच असतात असे नाही. ह्याउलट एका मूत्रविकार तज्ञाने फोलीज कॅथेटर आणण्यासाठी स्वतःच्या खिशातले पैसे देऊन डोळ्यात अश्रू आणले. व्यवसायाचे बाजारीकरण होऊ नये असे मलाही नक्कीच वाटते.
माजी राष्ट्रपती कै. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम ह्यांची पुस्तके डॉक्टरांनी वाचावीत म्हणजे त्यांना कळवळा, तितीक्षा, मायाळूपणा, प्रज्ञा, अध्यात्म हे शब्द आकलन होण्यासाठी मदत होईल. भारतातील जेष्ठ नेते, लोकसभेचे माजी सभापती श्री. मनोहर जोशी तसेच प्रथितयश सिने अभिनेत्री जया बच्चन, हेमा मालिनी, रेणुका शहाणे, आदेश बांदेकर, सुकन्या कुलकर्णी तसेच कालनिर्णयकार ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर अशा तज्ञांनी गर्भसंस्कारांविषयी गौरवोद्गार काढलेले आहेत.
डॉक्टर द्वयांच्या भावंडांपैकी काही प्रसिद्ध अॅलोपॅथिक डॉक्टर मुंबईच्या अगदी मध्यवर्ती व मोक्याच्या ठिकाणी ‘गर्भसंस्कार केंद्रे’ चालवितात. ह्यातून त्यांचा वैज्ञानिक दृष्टीकोन दिसून येतो. नजीकच्या काळात शिशुसंस्कार केंद्रे उघडण्यात येतील, त्यात मुंडनविधि, वर्षावर्धनविधि, लिहिण्याचा विधि, बाळाच्या मेंदूला उत्तेजना देण्याचे तंत्र इ. विधि केंद्रात शिकविले जातील. तेव्हां कळवळ्याची जाती असलेल्या डॉक्टरांनी सुसज्ज राहावे.
मंत्र उच्चार हे एक वेगळे शास्त्र असून डॉक्टर द्वायांच्या विवाह संस्कारांमध्ये यज्ञाच्या वेळी हे मंत्रोच्चार नक्कीच झालेले असावेत. ह्या संदर्भात नासाच्या परीक्षणे दोघांनी अभ्यासावीत. डॉक्टरांनी दिलेली गर्भासंस्कारातील उदाहरणे सकारात्मक दृष्टीने दिलेली असतात त्यामुळे होलिस्टिक रिलॅक्झेशन होते. गर्भसंस्कारांमध्ये गर्भधारणापूर्व समुपदेशन असते. ह्यात लैंगिक शिक्षण, पाळीच्या तक्रारी, पहिल्यांदा शारीरिक संबंध ठेतांना येणाऱ्या अडचणी, अनुवांशिक विकारांचे ज्ञान व त्याविषयी शंका समाधान मनमोकळेपणाने केले जाते. त्याचबरोबर विवाहपूर्व समुपदेशन ह्यांसारखे अनेक विषय शास्त्रोक्त पद्धतीने हाताळले जातात. त्यासाठी आयुर्वेदीय संहिता ग्रंथोक्त संदर्भ विचारात घेऊन त्यांना विज्ञानाची जोड दिली जाते.
प्रज्ञावंतांसाठी संदर्भ उद्धृत करीत आहे. –
चरक शारीरस्थान ८/२७ – २८; चरक शारीरस्थान ४/४; सुश्रुत शारीरस्थान २ – ३२; सुश्रुत शारीरस्थान ३/६; अष्टांगहृदय शारीरस्थान १/३७ – ४३; अष्टांगसंग्रह शारीरस्थान १/६८; चक्रदत्त च. वि. ८/१४ असे अनेक संदर्भ देता येतील.
मार्गाधारे वर्तावे विश्व हे मोहरे लावावे l ज्ञानेश्वरी ३/१७१
आमच्या शास्त्रात सांगितल्याप्रमाणे वागून इतरांना त्याच मार्गाने जाण्यास प्रवृत्त करावे असा ह्याचा मतितार्थ आहे. त्यामुळे आम्हीसुद्धा श्रेयसी प्रजेसाठी संहिताकालीन संदर्भ अभ्यासून विज्ञाननिष्ठ दृष्टीने गर्भिणी स्त्रियांचे समुपदेशन करतो. आमच्या कोणत्याही शहरात “गर्भसंस्कार लेन” नाहीत, किंवा डॉक्टर हाउस सारखे “गर्भसंस्कार हाउस” किंवा “गर्भसंस्कार नर्सिंगहोम्स” नाहीत. जगण्याची लढाई आमच्यापैकी अनेक डॉक्टरांनी १९७२ सालच्या दुष्काळात सुद्धा केली आहे. प्रेरणा आणि सहकार्यामुळे दुर्गम भागातले डॉक्टर राजधानीच्या ठिकाणी स्थिरावले आहेत. १९५६ साली माझ्यावरही गर्भसंस्कार केले नाहीत पण संस्कारित आई-बाबांमुळे शिवाजी, ज्ञानेश्वर, अभिमन्यू, रवींद्रनाथ टागोर, आईनस्टाईन ह्यांच्या विचारांची प्रेरणा मिळाल्यामुळे मी आज येथवर पोहोचलो. अर्धनग्न, अर्धपोटी, अशिक्षित आई-बापापोटी जन्मलेली मुले असो की जन्मपूर्व, गर्भावस्थेत व जन्मानंतर केलेल्या संस्कारांमुळे स्मशानात जळणाऱ्या प्रेताच्या प्रकाशात अभ्यास करून असो, संस्कारांच्या सहाय्याने मनुष्य कर्तृत्वसंपन्न होऊ शकतो, इतिहास घडवू शकतो.
“संस्कार” हा विषय अतिशय गंभीर आहे. त्यासाठी ओशोंच्या विचारांवर आधारित “काम, परमात्म्याची सृजनशक्ती” हा फेसबुक किंवा मराठीसृष्टी.कॉम वरील लेख डॉक्टरांनी विवेकबुद्धीने आवर्जून वाचावा.
गर्भसंस्कारात खालील गोष्टींचा अंतर्भाव होतो.
विवाहापुर्व समुपदेशन संस्कार, बीजसंस्कार, ग र्भाधान संस्कार, आहार संस्कार, मासानुमासिक परिचर्या संस्कार, विहार (समुपदेशन) संस्कार, शृंगार संस्कार, ध्वनिध्यान संस्कार, गर्भसंवाद संस्कार, योगासने व प्राणायाम संस्कार, औषधी गर्भसंस्कार, सूतिका संस्कार, जातकर्म संस्कार ह्याशिवाय जातमात्र परिचर्या, रजस्वला परिचर्या, ऋतुमती परिचर्या इत्यादी गोष्टींचे वर्णन शास्त्रात आढळते.
झी २४ तास वाहिनीवर दि. १९ सप्टेंबर रोजी ‘ज्योतिष आणि गर्भजनन मंत्रोच्चार’ विषयावर सखोल मार्गदर्शन केले आहे. डॉक्टरांनी यूट्यूब किंवा इतरत्र हा कार्यक्रम पाहण्याचा प्रयत्न करावा.
गर्भसंस्कार आवश्यकता –
आजच्या दैनंदिन धावपळीच्या जीवनात खालील गोष्टींचे प्रमाण वाढत आहे.
वारंवार गर्भपात होणे, जन्मजात विकृतींचे वाढते प्रमाण, वाढते अनुवांशिक विकार, लहान मुलांचे मानसिक व्याधी तसेच इतर आजारांचे वाढते प्रमाण ह्या समस्यांवर “औषधी गर्भसंस्कारांद्वारे” उपाययोजना करता येऊ शकते.
गर्भावस्था का?
गर्भाचे पोषण मातेच्या रसापासून होते. आई काय बोलते, काय ऐकते, कसे वागते, काय खाते, काय पिते त्यानुसार परिणाम त्याचे परिणाम गर्भावर होतात.
गर्भाचे मन हे आई-वडिलांच्या मनाशी युक्त असते. गर्भिणी स्त्री ज्याप्रकारच्या कथा वार्ता ऐकेल त्यानुसार बाळाचे मन घडते. एकचित्त होऊन जे ती ऐकते त्यानुसार बाळाचे मन घडते. मातेच्या मानसिक अवस्थेचा परिणाम गर्भाच्या वाढीवर आणि योग्य वेळी प्रसूती होण्यासाठी कारणीभूत असतो असे सिद्ध झाले आहे. ह्यातून सिद्ध होते की आईची जीवनशैली, स्वतःचे संचित, आई-वडिलांचे गुणदोष आणि गर्भावस्थेतील उपचार ह्यांचा परिणाम अपत्यावर होतो.
बाळाच्या मेंदूचा ६० ते ७०% विकास गर्भावस्थेतच होतो व उरलेला जन्मानंतर पहिल्या ५ वर्षात होतो. बीज रुपात असलेल्या पुरुष व स्त्रीबीजापासून २.५ ते ३ किलो वजनाचे बाळ जन्माला येते. म्हणजेच गर्भाची सर्वात जास्त वाढ गर्भावस्थेतच होते.
गर्भसंस्कार म्हणजे काय?
निरोगी, सर्वगुणसंपन्न, उत्तम शारीरिक, मानसिक व बौद्धिक क्षमता, मनोवांछित संतति व्हावी ह्यासाठी गर्भधारणेपूर्वी व सगर्भावस्थेत केल्या जाणाऱ्या सर्व उपचारांना गर्भसंस्कार म्हणतात. तसेच बाळ जन्मल्यानंतर ५ वर्षांपर्यंत त्याची वाढ झपाट्याने होत असते. त्यावेळी करण्यासाठी अनेक संस्कार आयुर्वेदीय ग्रंथांमध्ये वर्णन केले आहेत.
श्रेयसी प्रजा – पुराणांचा संदेश . . .
आपल्या वंशामध्ये पूर्वीपेक्षा श्रेष्ठ वारस जन्माला यावा ही सृष्टीची इच्छा आहे, एवढेच नव्हे तर निसर्गही त्यासाठी धडपडत असतो. डार्विनच्या सिद्धांतानुसार प्रत्येक प्राण्यामध्ये पुढील वंश चांगला व्हावा ह्याची ओढ असते. आपल्या विलक्षण बुद्धिसामर्थ्याने मनुष्याने वेगवेगळ्या क्षेत्रात घेतलेली ही जणू गरुडझेपच आहे. मात्र ह्या खटपटीत नैतिक, बौद्धिक, अध्यात्मिक दृष्ट्या पवित्र राहून तमोगुणादि विकारांपासून मुक्त होऊन निस्वार्थ भावनेने प्राणीमात्रांचे कल्याण चिंतणाऱ्या मूळ मानवी प्रवृत्तीचा ह्रास होत गेला. परिणामी, व्यभिचारी, दुराचारी, संकुचित वृत्तीचा एक प्रचंड जनसमुदाय पृथ्वीवर जगत आहे. ह्याच वेगाने अध्यात्मिक व वैचारिक अधोगतीला जाणारा हा समुदाय भविष्यकाळात ह्या सृष्टीचे रक्षण करू शकेल का? अशी भयावह परिस्थिती आज निर्माण झाली आहे. ह्या भीतीला दूर करून नव्या दृष्टीने, नव्या पद्धतीने, गतकाळातील आदर्श विचारांचा नवा समाज निर्माण करण्यासाठी वेद पुराणातील उपदेशांचा मागोवा घेणे आवश्यक आहे.
गर्भसंस्कार नावाची संकल्पना समाजामध्ये रुजवण्याचा प्रयत्न आयुर्वेद व अॅलोपॅथिक तज्ञ करीत असले तरीही अपत्यप्राप्तीची इच्छा होण्यापूर्वी वेदपुराणातील घटनांचा मागोवा व त्याचा समग्र अभ्यास करणे हेच श्रेयसी प्रजोत्पादनाचे मूळ रहस्य आहे.
गौतम बुद्ध, श्रीराम, श्रीकृष्ण, छत्रपती शिवाजी, सम्राट अशोक, भगवान महावीर, संत ज्ञानेश्वर, तुकाराम, सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी इ. विरक्त विचारश्रेणींचे महामानव, अन्यायाच्या विरोधात हातात समशेर उपसलेला वीर शिवबा ह्यांच्या चरित्राचा अभ्यास केला तर ह्यांचा जन्म हा निव्वळ योगायोग नव्हता तर विशिष्ट इप्सित साध्य करण्यासाठी व अखंड मानवजातीचे कल्याण चिंताणाऱ्या विचारश्रेणी असलेल्या दाम्पत्याकडून केल्या गेलेल्या तपसाधनेतून झाला होता.
प्रजनन व संतती निर्माण ह्यातील फरक –
सर्व जाती, धर्म, पंथांची व सर्व सामाजिक आर्थिक व बौद्धिक स्तरातील माणसे समविचारी नाहीत किंबहुना आध्यात्मिक, वैचारिकदृष्ट्या बहुसंख्य गण अजूनही मागासलेले आहेत. मग अशा लोकांनी संतती जननाचे वैश्विक प्रयोजन ज्ञात असेल का? स्त्रीरोग व प्रसूती विषयाच्या चिकित्सक म्हणून काम करीत असतांना बहुतांश दांपत्य ही अनियोजित प्रणयातून मुले जन्माला घालतात व लोकसंख्या वर्धन करण्याखेरीज समाजाला कसलेही योगदान देत नाहीत असा माझा अनुभव आहे. ह्या प्रक्रियेला प्रजनन म्हणता येईल का? ह्याउलट, पुरण कथांमध्ये कंसाचा वध करून माता-पित्याची बंदिवासातून सुटका करण्यासाठी जन्मलेला भगवान श्रीकृष्ण, गंगापुत्र भीष्माचा संहार करण्यासाठी तपसाधनेने शिखंडीच्या रुपात जन्मलेली अंबा, धर्माचा बाजार मांडून मानवतेची गळचेपी करणाऱ्या धर्ममार्तंडाने जेव्हां विठ्ठल पंतांचा अतोनात छळ केला तेव्हां अशा कर्मठांना खऱ्या धर्मांचे व मानवी जीवनाचे अनमोल मार्गदर्शन करण्यासाठी वयाच्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिणारे संत ज्ञानेश्वर अथवा जुलमी राज्यकर्त्यांच्या पाशवी अत्याचारांचा सूड उगवण्यासाठी जिजाऊने शंभू महादेवांकडून मागून घेतलेला नवसपुत्र शिवबा ! ह्या उदाहरणांकडे पहिले तर हे देखील मनुष्य योनीमध्ये जन्माला आले परंतु त्यांनी आपल्या अलौकिक कर्तृत्वाने जगाला कसे दिपवून टाकले हे सांगण्याची गरज नाही. मग सामान्य माणसापेक्षा त्यांचे वेगळेपण काय? तर हे वेगळेपण म्हणजे त्यांच्या जन्माला येण्याचे काही निश्चित प्रयोजन होते, जे की किडा मुंगी प्रमाणे उठसूट जन्माला येणाऱ्या माणसाच्या बाळांना असतेच असे नाही. अशी योगायोगाने जन्माला आलेली प्रजा म्हणजे ‘संतती’ होय. त्याला श्रेयसी प्रजा म्हणता येत नाही. मात्र विशिष्ट उद्देशाने तपस्वी प्रयत्नांनी व कल्याणकारी चिंतनातून प्रकर्षाने जन्माला घातलेली ‘सुप्रजा’ निर्माण करणे ह्याला प्रजनन किंवा ‘प्रकर्षाने जनन’ असे म्हणता येईल. हा फरक जाणकारांनी समजून घेणे महत्वाचे आहे.
प्रजनन ही बाब नैसर्गिक नसावी –
हे शीर्षक पाहून वाचकांना थोडा भ्रम उत्पन्न होईल. मग थोड्या संयमाने विषय समजून घेतला तर त्याची व्याप्ती लक्षात येईल. संतती निर्माण व प्रजनन ह्यातील भेद आता लक्षात येईल. नैसर्गिकपणा म्हणजे माणसाच्या सहज वागण्यातून व नैसर्गिकपणे असलेल्या स्त्री – पुरुष आकर्षणातून निर्माण झालेली प्रणय प्रक्रिया व त्यातून निर्माण होणारी संतती म्हणजे पुनरुत्पादन होय. अशा अपत्यांच्या जन्माचे प्रयोजन निश्चित असते असे नाही व म्हणून त्यांच्या पासून घडणारी कार्ये देखील विशेष उल्लेखनीय असतील असे नाही. व्यभिचारी वृत्तींमधून किंवा केवळ कामवासनेची तृप्ती करण्यासाठी केलेल्या मैथुनातून निपजलेली प्रजा ही समाजघातक असू शकते. सुसंस्कृत घरातील व उच्चविद्याविभूषित लोकांनी गुन्हेगारी केल्याची उदाहरणे बोटावर मोजण्याएवढी सापडतात. मात्र मूर्ख मातापित्यांच्या निकृष्ट संस्कारातून जन्मलेली मुले बालवयापासूनच कुकर्मे करण्यास प्रवृत्त होतात. अशा बालकांच्या जन्माचे व जन्मानंतरच्या कार्याचे प्रयोजन दाम्पत्याला माहीत नसते म्हणून असा नैसर्गिकपणा श्रेयसी प्रजेचे उद्दिष्ट पूर्ण करू शकत नाही.
सद्गुणी व मेहनती अपत्यप्राप्तीच्या इच्छेखातर सदर दाम्पत्य जेव्हा एखाद्या धार्मिक विधिप्रमाणे शरीर व मनाचे पावित्र्य राखून एकमेकांमध्ये रममाण होतात व स्वतःच्या विकाररहित अवस्थेत श्रेयसी प्रजेच्या उत्पादनार्थ प्रणय करतात तेव्हा त्यास कृत्रिमपणा म्हणावा लागेल. येथे मिलन ही जरी नैसर्गिक आकर्षणाची अवस्था असली तरी अपत्यप्राप्तीचा उद्देश येथे निश्चित असतो व त्यासाठी तपःसाधनेचा खटाटोप असतो. त्यामुळे यशदायी संतती लाभते. ह्या अधिकच्या प्रयत्नांना व कल्याणकारी चिंतनाला कृत्रिमपणा म्हणावा लागेल, जो सर्वांमध्ये सहजपणे नसतो पण कल्याणकारी अपत्य प्राप्तीसाठी जोपासावा लागतो.
मैथुन हा मजेचा विषय नाही –
अपत्य उत्पादनार्थ मैथुन ही अनिवार्य बाब असली तरीही श्रेयसी प्रजोत्पादनासाठी मैथुन ही क्रिया सर्वस्व नाही. श्रेयसी प्रजेच्या प्राप्तीसाठी आवश्यक असणाऱ्या अनेक बाबींपैकी ती एक पायरी आहे. कदाचित इतर पायऱ्यांहून तिचे महत्व वेगळे असेल पण यशाचे शिखर सर करण्यासाठी सर्व पायऱ्या सर कराव्याच लागतात. पुराणामध्ये मुळात केवळ अपत्यप्राप्तीसाठी इच्छेपोटीच मैथुन करण्याची उदाहरणे सापडतात. पशु-पक्षांमध्ये केवळ विशिष्ट हंगामात नर-मादी एकत्र येतात व एकदा गर्भधारणा झाली की पुन्हा प्रणय हा विषय पिल्लांच्या जन्मापर्यंतच काय तर दुसरे अपत्य प्राप्त करण्यापर्यंत अवलंबला जात नाही. मध्यंतरीच्या काळात ते नर मादी एकत्र असले तरी मैथुन मात्र करीत नाहीत. फक्त मानव सोडला तर जगातला कोणताही पशु सदानकदा मैथुन करीत नाही. हे मानवाचे पशुपेक्षा अधिक विकसित (?) असण्याचे प्रधान लक्षण आहे. हा मुद्दा जरी वाचकांना संभ्रमात टाकणारा असला तरी मनुष्य हा किती वासनिक आहे हे सत्य लपू शकत नाही. कलियुगातील माणूस जसा विविध विकारांच्या आहारी जाऊन त्याचे समर्थन करतो तसे ह्या प्रणय वासनेचेही करेल. पण पुराणांना ते मान्य नाही. केवळ मजेसाठी वा इंद्रियांच्या तृप्तीसाठी केलेला प्रणय हा उत्कृष्ट संतान निर्माण करू शकत नाही. मनोवांछित संततीची लालसा बाळगणाऱ्या दाम्पत्यांनी मैथुनाचे नियोजन करणे हे महत्वाचे आहे. त्यासाठी यथायोग्य विहित नमुन्यातील नियमांचे पालन करावे हा पुराणांचा संदेश आहे.
प्रणयातून साधना –
प्रणय हा मजेचा विषय नसून प्रजननाचा पाया आहे. कारण प्रत्यक्ष मैथुन प्रसंगी असणारे दाम्पत्याचे विचार, आचार, इच्छा कृती, भाव, स्वास्थ्य, मनोनिग्रह, मनोबल, देहबल इ. अनेक बाबी जशाच्यातशा अपत्यामध्ये येतात. नियोग पद्धतीने व्यासांच्या वराने भीष्माकडून गर्भवती होतांना एका स्त्रीने आपले डोळे त्याच्या तेजाला पाहून मिटून घेतले व तिच्या पोटी जन्मलेला धृतराष्ट्र हा जन्मांध राहिला. तशाच पद्धतीने दुसरी स्त्री व्यासांचे तेज पाहून निस्तेज झाली व तिच्या उदरी जन्मलेला पुत्र पांडु हा पंडुत्व ह्या आजाराने ग्रासला. राक्षस कुळातील हिरण्यकश्यपु दैत्याने दैत्य कुळाची शोभा वाढवणारा पुत्र व्हावा अशी अपेक्षा केली. मात्र ती स्त्री प्रणयप्रसंगी नारदमुनींचे चिंतन करीत होती. तिच्या चांगुलपणाने भक्त प्रल्हाद जन्माला आला. ह्या उदाहरणांकडे मनोरंजनाच्या कथा म्हणून न पाहता ज्ञानी माणसाने अभ्यास करणे आवश्यक आहे.
आयुर्वेदामध्ये गर्भाधानविधि पूर्वी शुचिर्भूत होणे, मंगल स्वस्ति वाचन करणे, श्वेत वस्त्र घालणे, फुलांच्या माळा घालणे, ईश्वर आराधना करणे वर्णन केलेले आहे. ह्याचा विचार केला तर प्रणय हा साधनेमध्ये व्यत्यय उत्पन्न करीत नाही तर प्रणयातून प्रजोत्पादनासाठी साधना आवश्यक आहे.
उपसंहार –
श्रेयसी प्रजोत्पादनासाठी पुराणांचा अभ्यास करणे हे निश्चितच सोपे काम नाही. ह्याशिवाय बदलत्या जीवनशैलीच्या व पाश्चात्यांच्या बिनबुडाच्या संस्कृतीचा उदोउदो करणाऱ्या जनसामान्यांना ह्या विषयाची गंभीरता व महत्व पटेल अशी अपेक्षा करणे ही व्यर्थ आहे. परंतु पाश्चात्य वैज्ञानिक व विज्ञान युगात वावणारे तज्ञ जर ‘श्रेयस’ समाज निर्माणाचे स्वप्न दूर नाही. आजकालची तरुण पिढी बहुतांश बाबींचे नियोजन अगोदरपासूनच करतात ही चांगली बाब आहे. पण त्याचबरोबर वेद, शास्त्र, पुरण व आयुर्वेद ह्यांच्या उपदेशांचा विचार करून उत्तम प्रजा निर्मितीचे स्वप्न त्यांनी उराशी बाळगणे उचित ठरेल. येथे केवळ गर्भधारणापर्यंतच्या काळाशी संबंधित विचार प्रस्तुत केला आहे. गतकाळातील घटनांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला आहे. ह्या विषयाची व्याप्ती खूप मोठी असून एका लेखामध्ये एवढा विस्तार सामावणे अशक्यप्राय आहे.
लेखक – प्रा. वैद्य सुभाष मार्लेवार
M.D. Ayurved (Gyn & Obs)
सहयोगी प्राध्यापक,
पोदार वैद्यक महाविद्यालय व रुग्णालय,
वरळी, मुंबई
भ्रमणध्वनी - +917738086299/ +919819686299
ईमेल – subhashmarlewar@gmail.com

Visit Our Page