"औषधी गर्भसंस्कार"
'गर्भविकास व मातृपोषणाचा अद्भुत संगम'
प्रजनन हा प्रत्येक सजीव प्राण्याचा नैसर्गिक धर्म आहे. अन्य प्राण्यांपेक्षा मनुष्य हा बौद्धिकदृष्ट्या श्रेष्ठ असल्याने केवळ प्रजनन नव्हे तर सु-प्रजनन होण्यासाठी काय करावे, कसे करावे, कोणी करावे, ह्या सर्व गोष्टींचे लाभ प्राप्त करण्यासाठी औषधी गर्भसंस्कारांचे महत्व आहे. ह्या विषयांच्या सखोल अभ्यासातून निर्मित १८ आयुर्वेदीय औषधी कल्पांचा संच म्हणजेच "औषधी गर्भसंस्कार".
संस्कार कशासाठी ?
सोन्याचांदीचे दागिने पाहतांना आपले डोळे दिपून जातात पण मूळ खाणीतून मिळणारे सोने आहे तशा स्थितीत कधीही वापरता येत नाही. त्यात अनेक धातू, खनिजे, माती आणि अशुद्धी असतात. ह्या सर्वांमधून शुद्ध स्वरूपात सोने मिळविण्यासाठी त्यावर कित्येक संस्कार करावे लागतात. नंतर त्यातून दागिने घडविले जातात. अन्न पदार्थांवरही निरनिराळे संस्कार करावे लागतात तेव्हा ते पदार्थ रूपाने खाण्याजोगे होतात. संस्कार न करता प्रजनन होणे शक्य आहे पण सु-प्रजननासाठी शास्त्रशुद्ध आणि नैसर्गिक वनस्पतींचा वापर करून निर्माण केलेली उत्पादने खऱ्या अर्थाने सु-प्रजनन साध्य करू शकतात. हे आहे संस्कारांचे महत्व.
काळाची गरज :
काळानुसार वाढत असलेला शैक्षणिक कालावधी, मानसिक ताणतणाव, स्वतंत्र कुटुंब पद्धती, खाद्यपदार्थातील कृत्रिम व रासायनिक रंग / प्रिझरव्हेटिव्हज, मोबाइल सदृश किरणोत्सर्गाचा दुष्परिणाम, प्रदूषण, लग्न करण्यासाठी कायद्याची वयोमर्यादा, भरमसाठ लोकसंख्या व त्यामानाने वैद्यकीय सुविधांची कमतरता अशा अनेक गोष्टी गर्भावस्थेतील दुष्परिणामांसाठी कारणीभूत होतात. प्रजनन तर प्रत्येकच प्राणी करतो पण हे सर्व घटक अन्य प्राण्यांच्या बाबतीत होत नाहीत. प्रदूषण व विद्युतचुंबकीय लहरींचे परिणाम मात्र अन्य प्राण्यांवरही होतांना दिसतात. त्यामुळेच हल्ली चिमण्या अगदी दिसेनाशा झाल्या आहेत. मग गर्भाशयात वाढत असलेल्या चिमण्या जीवाला धोका पोचणार नाही का? त्यामुळे वंध्यत्व (मूल न होणे), बीजदोष (जेनेटिक आजार), प्रसूतीच्यावेळी अडचणी, गर्भस्राव, गर्भपात अशा अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात. गर्भावस्थेत होणारे निरनिराळे आजार व त्यातून गर्भावर होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी आयुर्वेदाच्या तिजोरीत अनेक अनमोल रत्नांचा खजिना दडलेला आहे. ह्या खजिन्याची गुरुकिल्ली म्हणजेच "औषधी गर्भसंस्कार".
दहा महिन्यांची गर्भावस्था :
केवळ आयुर्वेदातच नव्हे तर ऋग्वेदापासून सत्यनारायणाच्या कथेपर्यंत किंवा मराठी विश्वकोशातही गर्भावस्था दहा महिन्यांची असल्याचे वर्णन मिळते. ही कालगणना भिंतीवरच्या प्रचलित दिनदर्शिकेनुसार नसून स्त्रीच्या मासिक ऋतुचक्रानुसार, म्हणजेच २८ दिवसांचा महिना धरून केली आहे. ह्याप्रमाणे २८० दिवस असो किंवा ४० आठवडे, गर्भावस्थेचे आयुर्वेदाचे गणित किती तंतोतंत आहे हे स्पष्ट होते.
औषधी गर्भसंस्कारांमधील १८ उत्पादनांचा संक्षिप्त परिचय :
• अश्वमाह - पुरुष बीज सर्वांगीण सामर्थ्य वर्धनासाठी
• प्रजांकुर घृत - श्रेष्ठ गर्भस्थापक नस्य, पुरुष व स्त्री उभायतांसाठी
• फलमाह - निरोगी स्त्रीबीजप्रवर्तन, गर्भपोषण व विद्युतचुंबकीय लहरींचे दुष्परिणाम रोखण्यासाठी
• प्रथमाह ते दशमाह - आचार्य वाग्भट वर्णित गर्भावस्थेच्या १० महिन्यांचे १० मासानुमासिक कल्प
• किक्किस निवृत्ति तेल - किक्किस (स्ट्रेचमार्क) नियामक उदराभ्यंग तेल
• सुप्रसव पिचु तेल - प्रसूतीमार्ग सुस्निग्ध, लवचिक व निर्जंतुक करून नैसर्गिक - सुलभ प्रसूतीसाठी
• सूतिकाभ्यंग तेल - गर्भावस्था व प्रसूतीचा शीण घालवून उत्तम मातृ आरोग्यासाठी
• क्षीरमाह - दर्जेदार व मुबलक स्तन्य निर्मितीसाठी
• हेमप्राश - शास्त्रोक्त सुवर्णप्राशन कल्प, बालकाच्या बौद्धिक आणि रोगप्रतिकार क्षमता वर्धनासाठी
सुप्रजननासाठी शास्त्रशुद्ध व काळाच्या कसोटीवर पारखून सिद्ध झालेले आयुर्वेदीय उपाय म्हणजेच "औषधी गर्भसंस्कार". ह्या "औषधी गर्भसंस्कारांचा" वापर करून अभेद्य असे सुरक्षा कवच निर्माण करता येईल. एवढेच नव्हे तर गर्भधारणा, गर्भविकास आणि मातृपोषण ह्या तीनही उद्देशांची परिपूर्ती साध्य होईल.
https://www.facebook.com/groups/
+917208777773
aushadhigarbhasanskar/
No comments:
Post a Comment