Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Monday, January 3, 2011

आयुर्वेद्वारे त्वचेची काळजी

आयुर्वेद्वारे त्वचेची काळजी 
आयुर्वेदामध्ये त्वचा, केस आणि शरीरासंबंधी विविध समस्यावर उपचार आहेत. खाली असे काही उपचार दिले आहेत. पण या उपचारांचा वापर करण्यापुर्वी छोट्या प्रमाणात वापर करून बघा.

विविध त्वचा प्रकारात वनौषधी फेस पॅक
त्वचेला उजाळा आणण्यासाठी व कांती चमकदार होण्यासाठी फेस पॅककोरड्या रुक्ष व सुरकुतलेल्या त्वचेसाठी
तेलकट त्वचेसाठी फेस पॅकऍक्‍ने व मुरमे होणाऱ्या त्वचेसाठी
डागयुक्त त्वचेसाठी फेस पॅकडाग आणि रंगासाठी
डोळ्याखाली काळी वर्तुळे कमी करण्यासाठी क्रिमत्वचा उजळ करण्यासाठी
सर्वोपयोगी वनौषधीयुक्त फेस पॅककातडी वरील पांढऱ्या डांगासाठी

आरोग्यपुर्ण व तजेलदार त्वचेसाठी फेस पॅक
हा फेस पॅक सर्व प्रकारासाठी उपयुक्त आहे. यामुळे मधील मृत पेशी काढुन टाकल्या जातात. यामुळे त्वचा ताणली जाउन त्वचेवरील डाग जातात. व त्वचा तजेलदार होते.

घटककृती
ज्येष्ठमध १/२ टीस्पुन, त्रिफळा १/२ टीस्पुन, मुलतानी माती १/२ टीस्पुन, मंजिष्ठा १/८ टीस्पुनपाणी किंवा दुध यामधे मिसळुन वापरा

वर उल्लेख केलेल्या सर्व वनौषधी पावडर वर सांगितल्या प्रमाणात घेउन योग्य मिश्रण करा. त्यामधे योग्य प्रमाणात पाणी किंवा दूध घालुन पेस्ट तयार करा. पाण्याऐवजी उन्हाळ्यात गुलाबपाणी वापरू शकता. नीम व त्रिफळा त्वचा साफ करते व ताणते. मंजिष्ठा आणी चंदन कांती सुधारण्यास मदत करते.

तेलकट त्वचेसाठी फेस पॅक
हा फेस पॅक तेलकट त्वचेसाठी अत्यंत उपयुक्त आहे. यामुळे त्वचा थंड होते. व रंध्रे मोकळी/स्वच्छ होतात. व ताणली जातात. यामुळे मुरूमे/ऍक्‍ने होण्यास प्रतिबंध होतो.

घटककृती
नीम १/२ टीस्पुन, ज्येष्ठमध १/२ टीस्पुन, चंदन १/२ टीस्पुन, त्रिफळा १/२ टीस्पुन, मंजिष्ठा १/२ टीस्पुनपाणी किंवा दुधात मिसळून वापरा
http://marathi.aarogya.com

केस

अकाली केस पांढरे होणे :

वाढत्या वयानुसार केस पांढरे होणे ही एक नैसर्गिक गोष्ट आहे. परंतु कमी वयात केस पांढरे होऊ लागणे हा निश्चितच चिंतेचा विषय होतो. अकाली केस पांढरे होण्याची अनेक करणे असतात. केसांना तेल न लावणे हलक्या किंमतीच्या साबण व शाम्पूचा अधिक वापर करणे, सतत औषधे घेणे, डोकेदुखी, सर्दी-पडसे, बद्धकोष्ठता, मानसिक तणाव, अशक्तपणा, केसांत कोंडा होणे, निद्रानाश, आनुवंशिकता इ.कारणांमुळे केस अकाली पांढरे होतात.
शरीरातील व्हिटॅमिनची कमतरता असल्यानेही केस अकाली पांढरे होतात. अकस्मात दुर्घटना किंवा शोक संदेश मिळाल्यासही लोकांचे केस पांढरे झाल्याचे आढळले आहेत.
एकाच वेळी सगळे केस पांढरे होणे असे प्रकार विचित्र या सदरातच मोडतात. सर थॉमस मूर तसेच मेरी ऍन्टोनेट अशा प्रसिद्ध व्यक्तींचे सर्व केस काही क्षणातच पांढरे झाले होते. असेही काही लोक आढळले आहे की ज्यांचे केस हिवाळ्यामध्ये पांढरे होतात व उन्हाळ्यामध्ये पुन्हा काळे होतात. वैद्यकीय तज्ज्ञांना अद्यापही या गोष्टीचे खरे कारण समजू शकलेले नाही.
केस अकाली पांढरे होण्याच्या समस्येपासून वाचवण्यासाठी सावधगिरी बाळगणे आवश्यक असते. त्याकरीता नियमित दिनचर्या, केसांची उचित सफाई, संतुलित आहार, व्यायाम उत्तम झोप यांची आवश्यकता असते. केस काळे राखण्यासाटःई शरीराला प्रोटिन व्हिटॅमिन ए. बी. सी. डी. ई. कॅलशीअम आयोडीन, फॉस्फोरस, खनिज क्षार, कार्बोहायड्रेट, आयर्न, कॉपर इ. पदार्थ पर्याप्त प्रमाणात मिळाले पाहिजेत. व्हिटॅमिन व कॉम्लेक्स मध्ये आढळणारे पॅन्टोर्थेनिक ऍसिड फॉलिक ऍसिड इ. पदार्थ केस काळे राखण्यात महत्वाची भुमिका बजावतात.
शरीराला सर्व द्रव्य योग्य प्रमाणात मिळवीत या करिता आपल्या आहारात दूध, दही, लोणी, पनीर, अंडे, गाजर, मुळा, टोमॅटो, मटार, पालक, लिंबू, आवळा, खजूर, द्राक्षे, सफरचंद, मोसंबी, पालेभाज्या, ताजी फळे, अंकुरीत धान्ये आदिंचा समावेश असावा.

अकाली केस पांढरे होण्याच्या संदर्भातील महत्त्वाच्या गोष्टी :

  • एक-दोन केस पांढरे झाले असल्यास ते केस तोडू नका. असे केल्याने केस पांढरे होऊ लागता.
  • थोडे केस पांढरे झाले असल्यास डाय करू नका. त्यामुळे काळ्या केसावरही प्रभाव पडतो. केस आणखी वेगाने पांढरे होऊ लागतात.
  • केस धुण्यासाठी साबण व शाम्पू ऐवजी आवळा, रिठे, शिकेकाई, बेसन, दही इ. चा वापर करा. खुप गोड पदार्थ, तेलकट, मसालेदार भोजन, दारु, अमली पदार्थ यांचे सेवन करु नक.
  • केस धुण्यासाठी गरम पाण्याचा वापर करावा.
  • केसांमध्ये हेयर स्प्रे व केस वालविण्यासाठी हेयर ड्रायरचा वापर कमीत कमी वापर करावा.

मेंदी :

पांढऱ्या केसांसाठी वनौषधी संच -
(मेंदी, आवळा, मंडूर, जास्वंद, माका, मुलतानी माती, मोतिया, रोशा तेल)
मेंदी स्थाननि गुणाने ‘केश्य’ म्हणजे केशवर्धक व केशरंजक आहे,तसेच शोथहार दाहप्रशसन व वेदना स्थापनही करते. म्हणूनच एक थंडावा देणारी वनौषधी म्हणून उष्ण कटिबंधात हिचा सर्रास वापर होत होता. हळूहळू ही मेंदी सौंदर्य प्रांतात शिरकाव करती झाली आणि आता तर एखाद्या राणीच्या थाटशत पूर्ण जगभर प्रस्थापित झाली आहे. परदेशातून तर हेना हेअर कंडिशनर व हेना शांपू चांगलेच लोकप्रिय झाले आहेत. दरवर्षी भारतातून निर्यात होणाऱ्या मेंदीची टनावारी वाढतच आहे.
केसांकरिता मेंदीच्या वापरावे अनेक फायदे आहेत. मुख्यत्वेकरून मेंदी जरी केस रंगवण्यासाठी वापरली जात असली तरी अशीच नियमित लावण्याने केसांचे आरोग्य सुधारते. केसांवर एक छान तकाकी येऊन केस सुटे सुटे होऊन खुलतात. ज्याला कंडिशन असे म्हणले जाते. केस अकाली पांढरे होत नाहीत. डोक्याला कोंडा होण्याचा थांबतो व केसांची वाढ होते. तुरळक पांढरे झालेल्या केसांन मेंदी लावून झाकता येते. मात्र पूर्ण किंवा जास्त पांढरे केस असणारे बहुधा रासयनिक डायच लावतात. परंतु त्यांनीही या द्रव्यांचे दुष्परिणाम होऊ नयेत म्हणून १५ दिवसांतून एकदा मेंदी लावावी.
मेंदी फक्त पांढऱ्या केसांनाच रंगवते (काळे केस तसेच राहतात.) बऱ्याचजणांना नुसत्या मेंदीने केसांना येणारा रंग आवडत नाही. म्हणून या संचात मंडूर (लोह) व आवळा यांचे मिश्रण सोबत वापरले जाते. मंडूर व आवळ्याच्या रासायनिक संयोगाने काळा रंग तयार होतो. माका व जास्वंद या दोन्ही वनौषधी केशरंजक मान्यता पावल्या आहेत.अ मुलतानी मातीने मिश्रणाला चिवटपणा येऊन केसांवर पसरता येते. हा अनुभव अल्हाददायी व्हावा. म्हणून केशवर्धक मोतियारोशा तेलही संचातच दिले जाते.
आजकाल तरुण मुलां-मुलीतच पांढरे केस दिसू लागले आहेत. आहारातल्या चुका, मानसिक ताण व रासायनिक प्रसाधनांचा जबरदस्त प्रचार याला बळी पडलेल्या आमच्या नव्या पिढीला या वनौषधी हे एक वरदान आहे

Sunday, January 2, 2011

मध

दृष्टीदोष

डोळ्यांना दिसत नाही. लांबचे व जवळचे कमी दिसते. डोळ्यातून पाणी येते. पाणी गळू लागते, खुपऱ्या होतात, दृष्टीस अंधूकपणा असतो. अशा वेळी डोळ्यात नुसता मध घालवा अगर सुखरी हिरडा मधात उगाळून घालावा. यामुळे सर्व दृष्टीदोष नाहीसे होतात. दृष्टी फार लवकर सुधारते.

त्वचारोग

सारखी अंगास खाज सुटते, गांधी उठतात, खरबरीत होते, त्वचेवर पांढरेपणा उत्पन्न होतो. त्वचेची आग होते. अशा वेळी मध रोज घेणे हितकारक आहे. रोज वयोमानाप्रमाणे १ ते २ तोळे मध व पाणी एकत्र करुन घ्यावे. अंगकाठी सतेज होते.

श्वास खोकला

श्वासामुळे सारखा लागणारा दम, कफामुळे सारखा येणारा खोकला, खोकुन खोकुन पोटात दुखु लागते. कंबर वाकते. एक प्रकारची तोंडावर सूज येते. सारखा कफ पडतो. अशावेळी मध अगर त्रिफळा पूर्ण व मध एकत्र करुन घावे.

अतिसार

काही खाल्ले तरी वांती होणे. अशी सवय अनेकांना असते. म्हणून अन्न पचत नाही. त्यामुळे भुक चांगली नसते. वांति होईल या भितीने अन्नद्वेष. त्यामुळे निरूत्साह उत्पन्न होती. यावेळी मधाचा वापर अन्नात अवश्य करावा. त्यामुळे वांती होण्याची प्रवृत्ती कमी होते.

कृमी

लहान बालके, मोठी माणसे कोणासही कृमी होण्याची प्रवृत्ती असते. त्यांच्या शरीरात कृमींमुळे अन्नद्वेष उत्पन्न झालेला असतो. यावेळी मध घेत जावा.

गॅस होणाऱ्यास मध व लिंबू रोज द्या

ज्या व्यक्तिंना गॅसेस होतात. अशी तक्रार असते. भूक लागत नाही, उत्साह नसतो. काम करण्याची इच्छा नसते. कोणत्याही कामास कंटाळा येतो. नेहमी निरुत्साही वाटे. अशांनी रोज लिंबू रस (एक लिंबाचा) व मध एकत्र करून ते मिश्रण रोज सकाळी काही खाण्यापूर्वी घेत जावे.

कफ विकार

खोकल्याचा, दम्याचा त्रास ज्या व्यक्तीना होत असतो, त्यांनी मधाचा वापर आपल्या आहारात सतत करावा. त्यामुळे कफाचा जोर कमी होतो व अंगात उत्साह येतो.
मध हा काही आजार असला, आपणास कोणत्यातरी गोष्टीपासून उपद्रव होत असला तरच घ्यावा, असे नाही.
चांगल्या व्यक्तींनी सुध्दा मधाचा वापर करावा. कारण मध हा आयुष्यवर्धक व वीर्यवर्धक आहे. त्यामुळे आरोग्यसंपन्न होण्यासठी तो शरीरास उपयोगी आहे.

पोटाच्या विकारांवर मध

रोज सकाळी एक पेलाभर थंड पाणी व चहाचे दोन चमचे मध एकत्र घेऊन चांगले एकजीव करुन घेणे. त्यामुळे पोटाचे विकार बरे होतात . डोकेदुखी, हातापायास ठ्णका, संधिवात यावर मध चांगले औषध आहे. भूकपण चांगली लागते



वैद्य .सुशांत पाटिल
९८६०४३१००४

ओरल पर्ल्स

सर्वागीण आरोग्याच्या विचारात दंत आणि मुखारोग्यही महत्त्वाचं ठरतं. मासिक पाळी, गर्भावस्था, रजोनिवृत्ती या अवस्थांमध्ये स्त्रियांच्या शरीरातील बदलणा-या हार्मोन्स लेव्हल्समुळे दात आणि हिरडय़ांच्या आरोग्यावर परिणाम होत असतो. दातांची हानी फक्त चेह-याच्या सौंदर्यावरच नव्हे तर शरीरावरही विपरीत परिणाम करते.

कुटुंब आणि समाजाच्याही आरोग्याची गुरुकिल्ली स्त्रीकडेच असते. पण ब-याचदा स्त्री स्वत:च आपल्या आरोग्याबद्दल सजग नसल्याचं दिसून येतं. सर्वागीण आरोग्याच्या विचारात दंत आणि मुखारोग्यही महत्त्वाचं ठरतं. कारण शरीराचं द्वार असणारं ‘मुख’ बळकट नसेल तर प्रकृतीही निरोगी असू शकत नाही. दातांची हानी फक्त चेह-याच्या सौंदर्यावरच नव्हे, तर शरीरावरही विपरीत परिणाम करते.
मासिक पाळी, गर्भावस्था, रजोनिवृत्ती या अवस्थांमध्ये स्त्रियांच्या शरीरातील बदलणाऱ्या हार्मोन्स लेव्हल्समुळे दात आणि हिरडय़ांच्या आरोग्यावर परिणाम होत असतो. वयात येणा-या मुलींमध्ये हिरडय़ांच्या विकारांचं प्रमाण अधिक दिसतं. मुखदुर्गंधी, तोंडात आणि गालाच्या आतील त्वचेवर फोड येणं (अल्सर), हिरडय़ांतून रक्त येणं इत्यादी समस्या उद्भवतात. याकडे दुर्लक्ष न करता वेळीच योग्य उपचार करून घेणं गरजेचं ठरतं.
गर्भावस्थेत हार्मोनल लेव्हलच्या चढ-उतारामुळे स्त्रीच्या शारीरिक आणि मानसिकतेवर परिणाम दिसून येतो. या अवस्थेत हिरडय़ा संवेदनशील, नाजूक बनतात. अशा स्थितीत जर दाताभोवती किटण जमलेलं असेल, तर हिरडय़ांना इजा होऊन त्यांचा दाह होतो. कालांतराने त्यातून रक्त, पू येऊन दात हलायला लागतो. हिरडय़ांच्या विकारासोबतच जर एखादा दात किडला असेल तर ही कीड दाताच्या मुळाशी पोहोचून आतल्या पल्पला इजा पोहोचवते. परिणामी दाताच्या मुळाशी सूज येऊन असहय़ वेदना होतात.

सर्वसामान्यपणे दंतविकारात आढळून येणारी लक्षणं गर्भावस्थेत प्रकर्षाने जाणवतात आणि भयंकर त्रासदायक ठरतात. शिवाय उपचाराच्या वेळी भीतीने चक्कर येणं, दम लागणं, धडधडणं, रक्तदाब वाढणं अशी लक्षणं संबंधित स्त्रीच्या गर्भावस्थेत अडचणीची आणि त्रासदायक ठरतात. उपचाराच्या वेळी वापरण्यात येणारी औषधं आणि बधिरीकरणासाठी लागणारी द्रव्याऔषधे स्त्रीच्या उदरात वाढणा-या बाळाच्या आरोग्यासाठी अयोग्य ठरतात. म्हणूनच गर्भ राहण्यापूर्वीच स्त्रीने आपलं आरोग्य निरोगी ठेवणं आवश्यक आहे.
इतर चाचण्यांसोबतच दंतवैद्याकडे जाऊन आपले दात व मुख नीट तपासून घेऊन शक्य असेल, तर उपचार करून घ्यावेत. गर्भावस्थेतील अडचणी लक्षात घेता पहिले तीन महिने आणि शेवटचे तीन महिने तसे सुरक्षित असले तरी या दिवसांत शस्त्रक्रिया, किचकट उपचार, एक्स-रे आणि विविध औषधी यांचा मारा टाळावा. आई होताना वाढलेली जबाबदारी पेलताना स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष होणं साहजिक असतं. या काळात मुखारोग्य नीट न जोपासलं गेल्यास दंतक्षय, दातांची कीड या विकाराचं प्रमाण बळावतं. शिवाय दंत स्वच्छतेमध्येही अनियमितता आल्यास हिरडय़ांच्या विकारांचं प्रमाणही वाढतं. परिणामी पायोरियासारखा रोग होऊन दात गमवावे लागतात. त्यामुळेच वेळीच संबंधित उपचार करून घ्यावेत. गर्भातील अर्भक सुदृढ राहण्यासाठी गर्भवती स्त्रीने स्वत:च्या आरोग्याबद्दल जागरूक असणं महत्त्वाचं असतं. फॅशनच्या नावाखाली स्त्रियांमध्येही आजकाल व्यसनाधीनतेचं प्रमाण वाढत आहे. मद्यपान, धूम्रपान, गुटखा, तंबाखूचं सेवन स्त्रीच्या आरोग्यासाठीही घातक ठरतं. त्यामुळे मुख कर्क रोगासारख्या जीवघेण्या आजारालासुद्धा आमंत्रण मिळण्याची शक्यता असते. रजोनिवृत्तीनंतर स्त्रियांनी आरोग्याची विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. या काळात शरीराच्या इतर व्याधीसोबतच दातांशी निगडित समस्याही जोर धरतात. दात शिवशिवणं, हलणं, दातांची मुळं उघडी पडणं, अकाली दात काढल्यामुळे चर्वणांवर परिणाम होऊन संपूर्ण आरोग्य ढासळणं, दात, हिरडय़ा, जबडा आणि त्यांचा सांधा दुखणं, दात किडणं असे अनेक विकार जडतात. आधीच ढासळत चाललेल्या शारीरिक शक्ती आणि रजोनिवृत्तीच्या वेळेस होणाऱ्या शारीरिक बदलांमुळे दंतसमस्या जास्त त्रासदायक ठरतात. आज दंत-तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे चाळिशीनंतरही दात न काढता अनेक आधुनिक पर्यायांद्वारा उपचार करणं शक्य झालं आहे. या नवनवीन उपचार पद्धतींचा अवलंब करून दंत आरोग्यासोबतच संपूर्ण आरोग्यही अबाधित ठेवता येतं.

दिवसांतून दोन वेळा ब्रश करावा.
हिरडय़ांना नियमित मसाज करावा.
काहीही खाल्ल्यास लगेच चूळ भरावी म्हणजे अन्नकण अडकून हिरडय़ांचे विकार व दंतक्षय होणार नाही.
आहारात रेषेयुक्त, भाज्या, फळं, कडधान्य इत्यादींचा समावेश करावा.
वर्षातून किमान दोनवेळा दंततज्ज्ञांकडून आपल्या दातांची तपासणी करून घ्यावी.
गर्भावस्था राहण्यापूर्वीच आपले दंतारोग्य तपासून घ्यावं. रोग आढळल्यास लगेच उपचार करून घ्यावेत.
औषधांचा अयोग्य, निर्थक, अनावश्यक वापर टाळावा.
दंतारोग्यास घातक ठरणा-या सवयींपासून दूर राहावं.
आजकाल अनेक आधुनिक उपचार पद्धती सहज उपलब्ध आहेत. दात किडल्यावर सिमेंट, चांदी किंवा कम्पोझिट, सिरॅमिक फीलिंग यांसारखे दातांच्या सौंदर्यात भर घालणारे पर्याय उपलब्ध आहेत.
चेह-याचं सौंदर्य अबाधित ठेवण्यासाठी दात काढणं शक्यतो टाळावं. ‘रूट कॅनेल ट्रीटमेंट’ करून दात पुन्हा क्रियाशील ठेवता येतो.
दात अकाली काढल्यास, स्ट्रोक पडल्यास उपलब्ध विविध पर्याय निवडून वेळेत दात बसवून घ्यावेत.
स्वत:सोबत आपल्या कुटुंबाचं आरोग्य आपल्या हाती आहे, ही जाण स्वत: स्त्रीने ठेवायला हवी. स्वत:च्या आरोग्याकडे जागरूकतेने पाहून आपणच आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे.


डॉ. संगीता अंभोरे




http://www.prahaar.in/mukta/4353.html



Saturday, January 1, 2011

आर्तव दुष्टी आणि चिकित्सा । वाग्भट शारीरस्थान

रक्त दुष्टी : कुणपं (प्रेतवत्‍) गंध :-     रक्तचंदन                
पित्त-कफ दुष्टी:     ?
वात-पित्त दुष्टी :  क्षीणं                       
वात-कफ दुष्टी : ग्रन्थिसन्निभम्‌ :- पाठा-व्योष-वृक्षकजं जलम्‌
रक्त-पित्त दुष्टी : पूयाभं (पू झाल्याप्रमाणे) :-  रक्तचंदन
त्रिदोष दुष्टी : मूत्र-विट्‍ प्रभम्‌




वैद्य प्रशांत प्रभाकर वाघमारे
श्री पुनर्वसु आयुर्वेदिक चिकित्सालय आणि पंचकर्म केंद्रयश श्री प्लाझा ; दुकान क्रमांक : ०६ ; सेक्टर - ८;
सानपाडा ; नवी मुंबई -४००७०५.
vdppwaghmare@gmail.com
vdppw.punarvasuacpc@yahoo.in
९८६७ ८८८ २६५
--
Vd. P.P.W.Shree Punarvasu AcPc & RcYashShree Plaza.
Shop  No. - 6 ; Sector - 8.
Near 7th Day Heigh-School.
Sanpada;Navi Mubai- 400705.
vdppwaghmare@gmail.com
vdppw.punarvasuacpc@yahoo.in
9867 888 265
JOIN US ON facebook :
श्री पुनर्वसु आयुर्वेदीक चिकित्सालय ; सानपाडा ; न. मुं.-७०५
VISIT OUR WEBSITE :

निदान : कामला एवम्‌ प्रमेह

१५/ १०/२००६
०३.१५ मध्यान्ह
वैद्य संजय पेंडसे (आयुर्वेदाचार्य)

निदान    :     कामला एवम्‌ प्रमेह

चरक निदान स्थानात एकूण ८ अध्याय आहेत !
प्रथम ६ शारीर , अंतिम २ मानस व्याधी आहेत.
epidemic study आहे.
कारण मीमांसा बहुत केलेली आहे .

निदानातील ८ अध्यायांची चिकित्सास्थानात पुनरुक्ती का ?
निदानात ८ च अध्याय का ?

निदान प्रक्रिया "pathogenesis"विश्लेषण आहे !
यांत अनेक universal गोष्टी कथन केलेल्या आहेत !

निदानात व्याधी निर्माण प्रक्रिया वर्णन केलेल्या आहेत !
त्यांचा उपयोग अनुक्त व्याधी निदान सम्प्राप्ती मांडण्यात होतो !
हे काही proved hypothesis नाही ! तर स्वमत आहे !
माधव निदान या ग्रंथाची श्रीकण्ठदत्त टीका उत्तम आहे !
पण चरकसंहीता निदान स्थानावरील टीका ही विशेष आहे !

वेगवेगळ्या परिने व्याधी कसे होतात ते सांगितले आहे !
उदा.
१.    एकदोष एकानुबन्ध शीघ्र     -    रक्तपित्त
२.    सर्वभाव दुष्टी अनिश्चितस्तर     -    ज्वर    स्वयमोपशय/असाध्य!!

आज प्रमेह निदान बघू.
निदान प्रकार अभ्यासू !

प्रमेह व्याधीत
चिरकाल संप्राप्ती व आशुकारी अभिव्यक्ती आहे !
aaplied तत्व in 2nd सूत्र !

१.    VPK -> २० प्रकार , ... अपरिसंख्येय व्याधी !
२.    गुल्म   ->  ५ प्रकार    

*    हविप्राशात्‌ मेह-कुष्ठयोः !
    भूतलावर प्रथमोत्पत्ती (अभिभाव कारण)

*    मानस हेतू      :-     सत्व << रज तम     { मुख्य कारण : अज्ञान / मोह }
    विकार     :     राग मोह मत्सर , इ.
    असात्म्य इंद्रियार्थसंयोग ।
उदा.    pollustion संपर्कामूळे व्याधी होतात !
    आपण स्वतः काळजी घेतो पण इतर लोक घेत नाहीत !
    म्हणजे हा सामूहिक प्रज्ञापराध झाला !!
    आणि म्हणूनच सामाजिक ज्ञान-परिसंवाद महत्वाचे ठरतात.
    प्रत्येकाचे कर्म हे प्रत्येकासाठी हेतु ठरु शकते !!

३.    सन्निपातज प्रकारात कफाधिक्याचे वर्णन ?    
    सुश्रुतोक्तः च ।

    सन्निपाताचे वर्णन तर आहे पण पुन्हा स्व स्व वर्णन पण आहे !

    अग्निमांद्य -> स्त्रोतोरोध -> सम्प्राप्ती (व्याधीअभिव्यक्ती)

    "यथादुष्टेन दोषेन ,
    यथाच अनुविसर्पितः,
    लक्षणाभिव्यक्ती ।"
        हे सर्व काही एकाच वेळी होत नाही.
    it happens in multiple stages !
    आणि  हे जसे सामान्य संप्राप्तित सांगितले तसेच प्रायः इतर दोषज प्रकारांमध्येही घडते.
    दोषांची परिणती ही हेतुंवर अवलंबून असते !
    दोषांच्या परिणती ने दोषावस्था बदलतात .

४.    विकारsपरिसंख्येया ॥

    १. प्रमेहजन्य
    २. सामान्यतः

५.    सर्व व्याधींमध्ये
        निदान विशेष -
        दोष विशेष -    
        दूष्य विशेष -        यांवर सम्प्राप्ति अवलंबून असते.
    &
    विकार विघातक भाव व अभाव यांवर     संप्राप्तिची-व्याधीची अभिव्यक्ती अवलंबून असते !

    जसे

    *दोष विशेष     पण if no अनुबन्ध     -->     विकार निर्माण नाही !
    *दूष्य विशेष     & कालप्रकर्षानुबन्ध    -->    व्याधी विलंबाने निर्माण !
    *निदान विशेष     अल्पानुबन्ध        -->    तनु अपुर्णत्व
    &
    *विपर्यये विपर्ययः च ॥    

Friday, December 24, 2010

पत्रिकेतील मंगळाचा बागुलबुवा

विवाह ठरविताना मुलाला किवा मुलीला मंगळ आहे या कारणाने अनेक विवाह ठरण्यापूर्वीच मोडतात. काही ज्योतिषी सुद्धा मंगळाचा खूप बागुलबुवा करताना दिसतात. त्यात  नक्की कितपत तथ्य आहे याच्यावर थोडासा वेगळा विचार मांडण्याचा प्रयत्न या नोटच्या स्वरूपात केला आहे.
आपल्या पत्रिकेत १,४,७,८ आणि १२ या पैकी कोणत्याही स्थानी मंगळ असेल तर ती पत्रिका “मंगळाची” आहे असे म्हणायची पद्धत आहे. जर हा विचार गृहीत धरला तर साधारण ४० टक्के पत्रिका या मंगळाच्या ठरतील. या प्रकारे वधू अथवा वर दोघांपैकी एकाची पत्रिका ”मंगळाची” असण्याची  शक्यता जास्त येते.
या पैकी प्रथम स्वतचे स्थान, चतुर्थ स्थान हे गृह सौख्याचे स्थान आणि सप्तम स्थान हे आपल्या जीवन साथीदाराचे स्थान आहे. आठवे आणि बारावे स्थान सर्व साधारणपणे अशुभ स्थाने समजली जातात. मंगळ हा अग्नी तत्वाचा,  तमो गुणी, तामसी वृत्तीचा ग्रह असल्यामुळे विवाहप्रसंगी गुणमेलन करताना या पाच स्थानात असेल तर अशुभ समजला जातो.असे असले तरी हा फारच सर्वसाधारण मियम झाला. अशा मंगळाचा गरजेपेक्षा जास्त बागुलबुवा केला जातो आणि काही तरी तारक मारक उपाय सुचविण्याकडे आणि पैसे काढण्याकडे काही ज्योतिषांचा कल असतो. अज्ञान आणि अंधश्रद्धा या कारणासाठी असे काहीतरी उपाय स्वीकारले सुद्धा जातात.  
असे असले तरीसुद्धा प्रत्येक पत्रिकेला तो तशी अशुभ फळे देईलच असे नाही. मी स्वत अशा प्रकारचा विचार करणे हा अंधश्रद्धेचा भाग आहे असे मानतो. माझ्या अभ्यासानुसार मी “मंगळ दोष” या विषयाकडे वेगळ्या प्रकारे पाहतो.
मंगळाचे शुभ अशुभत्व प्रत्येक लग्न राशीला वेगवेगळे असते. प्रत्येक राशीचे स्वामी ग्रह आहेत. काही ठराविक लग्न राशींना अशा प्रकारचा मंगळ अशुभ होण्याची शक्यता आहे. जर पुढे दिल्याप्रमाणे लग्न राशी असेल ३ मिथुन, ८ वृश्चिक, १ मेष, २ वृषभ आणि ६ कन्या तर या लग्न राशीच्या पत्रीकाना एक,चार,सात,आठ आणि बारा या स्थानी येणारा मंगळ हा चढत्या कर्माने अशुभ असेल. कन्या लग्न राशीला सर्वात जास्त अशुभ येईल.
या बरोबरच प्रत्येक लग्न राशीच्या स्वामी ग्रहाचे काही ग्रह शत्रू येयात. त्या उलट लग्न राशीच्या स्वामी ग्रहाचा एखादा मित्र ग्रह सुद्धा असेल. निरनिराळ्या ग्रहांचे अशा मंगळा बरोबर जसे ग्रह योग होतील त्याप्रमाणे हे शुभ अशुभत्व कमी जास्त होईल.



VASANT JOSHI
A6/12 ,BEST NAGAR, GOREGAON (WEST), MUMBAI 400104
9323406386
 

Visit Our Page