मधुमेह आणि रक्त तपासणी : मधुमेहाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत , त्यामुळे त्याबद्दलची जागरुकता असणे हि तितकेच महत्वाचे आहे . आज आपण थोडक्यात समजून घेऊ कि आपल्याला कोणकोणत्या रक्त तपासणी करून घ्याव्या लागतात . सद्या बरेचसे मधुमेही रुग्ण उपाशी पोटाची आणि जेवनांनंतर 2 तासा नंतरची साखर तपासत असतात , FBSL n PPBSL . किमान या तपासण्या करणे हि गरज आहे , जर आपल्याला मधुमेहाची लक्षणं दिसत असतील तर किमान लघवीतील साखर , वरती सांगितल्याप्रमाणे उपाशी पोटी आणि जेवनांनंतरची साखर तपासणे गरज आहे . हे झाले नवीन रुग्णांसाठी मग ज्यांना ऑलरेडी मधुमेह आहे जे औषध अथवा इन्सुलिन घेतात त्यांच्यासाठी काय फक्त वरील तपासण्या पुरेश्या आहेत का ? याच उत्तर निश्चितच नाही अस आहे , कारण जेव्हा आपण उपाशी पोटी व जेवणानंतर 2 तासानी शुगर तपासतो तेव्हा आपल्याला त्यात्या वेळेची रक्तशर्करा समजत असते, मात्र जेव्हा आपण औषध घेत असतो तेव्हा त्या औषधांच्या परिणाम होण्याच्या कालावधी नुसार दिवसभरात रक्तातील साखरेचे प्रमाण हि कमी अधिक होत असते जे आपल्याला वरील तपासण्या करून समजत नाही अथवा खरच आपली साखर नियंत्रणात आहे का हे देखील समजत नाही . मग आपली साखर नियंत्रणात आहे हे कळणार तरी कसे ?? या साठी आपल्याला एक HbA1C या तपासणीचा आधार घ्यावा लागतो , सध्या भाषेत सांगायचं झालं तर हिमोग्लोबिन ला चिकटलेली साखर , या तपासणीत आपल्याला मागील 90 दिवसात आपली साखर किती नियंत्रणात होती याची माहिती कळते व त्यावरून आपल्याला हे पण कळते कि खरच आपली साखर नियंत्रणेत आहे का , म्हणून मधुमेही रुग्णांनी दर 3 महिन्यांनी हि तपासणी करून घेणे गरजेचे आहे , तसेच जर तुमी इन्सुलिन घेत असाल तर आपली साखर रात्री , सकाळी , दुपारी , संध्याकाळी अशा वेगवेगळ्या वेळी तपासून पाहिली पाहिजे जेणेकरून आपल्याला आपल्या रक्तातील साखरेचा अंदाज येईल . योग्य तपासण्याचा आधार , आहार , व्यायाम व योग ,औषध आणि पंचकर्म यांचा वापर केल्यास आपण मधुमेह आटोक्यात ठेवू शकतो.
डॉ.सचिन रामकृष्ण पाटील एम.डी. पंचकर्म 9823347244
डॉ.निलेश पाटील एम.डी. पंचकर्म
9970278707
वेदाग्नी डायबेटिस केअर क्लिनिक व पंचकर्म सेंटर पुणे ,बेळगाव
डॉ.सचिन रामकृष्ण पाटील एम.डी. पंचकर्म 9823347244
डॉ.निलेश पाटील एम.डी. पंचकर्म
9970278707
वेदाग्नी डायबेटिस केअर क्लिनिक व पंचकर्म सेंटर पुणे ,बेळगाव
No comments:
Post a Comment